অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कार्यक्रमाचे आधारस्तंभ

डिजिटल इंडिया उपक्रम कसा साकार केला जाईल: डिजिटल इंडियाचे आधारस्तंभ

डिजिटल इंडिया हा सर्वव्यापी कार्यक्रमांतर्गत अनेक सरकारी मंत्रालये व विभागांचा समावेश होतो. यामध्ये अनेक संकल्पना व विचारांचे जाळे विणून एक, सर्वसमावेशक उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे ज्यामुळे त्यातील प्रत्येकाची अंमलबजावणी मोठ्या उद्दिष्टाचा एक भाग म्हणून केली जाईल. प्रत्येक वैयक्तिक घटक स्वतंत्र आहे, मात्र तो एका व्यापक चित्राचाही भाग आहे. डिजिटल इंडिया हा कार्यक्रम संपूर्णपणे सरकारद्वारे राबविला जाणार आहे व इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग (डीईआयटीवाय) यामध्ये एकंदर समन्वयाचे काम करेल.

डिजिटल इंडियै वाढीच्या क्षेत्रातील नऊ आधारस्तंभांना अतिशय आवश्यक असलेली चालना देणे हे उद्दिष्ट आहे ही क्षेत्रे आहेत, ब्रॉडबँडचे महाजाल, मोबाईल जोडणीची सार्वत्रिक उपलब्धता, सार्वजनिक इंटरनेट उपलब्धता कार्यक्रम, ई-प्रशासन : तंत्रज्ञानाद्वारे शासनप्रणालींमध्ये सुधारणा, ई-क्रांती - सेवांचे इलेक्ट्रॉनिक वितरण, सर्वांसाठी माहिती, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, रोजगारासाठी माहिती तंत्रज्ञान व शीघ्र उद्दिष्टसाध्य उपक्रम. यापैकी प्रत्येक क्षेत्र हा एक क्लिष्ट कार्यक्रम आहे व त्यामध्ये अनेक मंत्रालये व विभागांचा समावेश होतो.

Public Internet Access Programme e-Governance – Reforming Government through Technology Universal Access to Mobile Connectivity eKranti - Electronic delivery of services Information for All Electronics Manufacturing IT for Jobs Early Harvest Programmes Broadband Highways

अंमलबजावणी दृष्टिकोन

डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत सर्व उपक्रम पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादा घालून देण्यात आली आहे, या उपक्रमांमध्ये आयसीटी पायाभूत सुविधा स्थापित व विस्तारित करणे, सेवा वितरण.... इत्यादींचा समावेश होतो. बहुतेक उपक्रम पुढील तीन वर्षात सुरु होतील अशी योजना आहे. लवकर पूर्ण करण्यासाठी नियोजित करण्यात आलेले उपक्रम ("शीघ्र उद्दिष्टसाध्य उपक्रम") व नागरिक संपर्क उपक्रम ("सर्वांसाठी माहिती") आधीच सुरु करण्यात आले आहेत व पूर्ण केले जात आहेत.

सध्या सुरु असलेल्या अनेक योजना एकत्रित करणे हे डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या योजनांची फेररचना, पुननिर्मिती व पुनर्केंद्रीकरण केले जाईल व समकालिक पद्धतीने अंमलबजावणी केली जाईल. अनेक घटक म्हणजे केवळ प्रक्रियांमध्ये सुधारणा आहे ज्यासाठी किमान खर्च येईल. या सगळ्या कार्यक्रमांची डिजिटल इंडिया नावाने सामाईक प्रसिद्धी (ब्रँडिंग) त्यांचा परिवर्तनात्मक परिणाम ठळकपणे दर्शविते.

या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना, सरकार, उद्योग, नागरी संस्था व नागरिकांदरम्यान डिजिटल इंडियाचे इच्छित परिणाम साधण्यास नाविन्यपूर्ण उपययोजनांचा विचार करण्याकरिता विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी व्यापक सल्लामसलत केली जाईल. सहयोगपूर्ण व सहभागात्मक प्रशासनाला मदत करण्यासाठी डीईआयटीवायने आधीच “मायगव्ह” नावाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे (http://mygov.in/(दुवा बाहेरचा आहे)) तसेच, डिजिटल इंडियाच्या उद्दिष्ट क्षेत्रांच्या अंमलबजावणीच्या दृष्टिकोनाविषयी चर्चा करण्यासाठी अनेक चर्चा व कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

 

स्त्रोत :  डिजिटल इंडिया

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate