অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय

संचालनालयाबद्दल

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग, कारखाने अधिनियम, १९४८ व त्याखालील तरतुदींची अंमलबजावणी आणि त्याखालील नियमांनूसार कामगारांची सुरक्षा, आरोग्य व कल्याण याबाबत खात्री करते. तसेच कामकाजाचे तास, कामाच्या जागेची परिस्थिती, अपघातांची आणि धोकादायक घटनांची संख्या कमी करणे, सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण याबाबत कामगारांच्या तक्रारींवर राज्य व केंद्र शासनाने तयार केलेल्या धोरण आणि कार्यक्रमानुसार उपाययोजना करणे यामध्ये महत्वपूर्ण भुमिका बजावते. माहितीसाठी काही सारांश खालीलप्रमाणे:

  • कामाच्या जागेतील विषमता व भेदभाव दूर करणे.
  • व्यवसायिक आरोग्य आणि सुरक्षाविषयक जागरुकता वाढविणे. आणि त्यांची कामकाजाच्या ठिकाणी अंमलबजावणी करणे.
  • कामगारांचे अधिकार हे मानवी हक्क असण्याची संस्कृती वाढविणे.
  • कामाची उत्पादकता वाढण्यास मदत होईल अशी सेवा व माहिती पुरविणे.
  • व्यवसायीक सुरक्षा व आरोग्य वाढवण्यासाठी कामगार आणि समाजाचा सहभाग.
  • कामगारांचे मालक आणि शासन यांच्याशी निरोगीसंबंध
  • कामगार आणि रोजगार संबंधित प्रकरणांमध्ये शासनाला धोरणात्मक सल्ला आणि मार्गदर्शन करणे.

उद्दिष्टे

संचालक, औद्यौगिक सुरक्षा व आरोग्य, महाराष्ट्र राज्य, यांचे प्रमुख उद्दिष्ट "कारखाने अधिनियमांच्या कलमांअन्वये कामगारांच्या सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणासाठी काम करणे.” तसेच कामगारांच्या हक्कांचे संरक्षण आणि तक्रारींचे निवारण यांची हमी देणे.

संचालक, औद्यौगिक सुरक्षा व आरोग्य, यांच्या मार्फत अंमलबजावणी होणारे कायदे,

  • कारखाने अधिनियम, १९४८.
  • महाराष्ट्र कारखाने नियम, १९६३.
  • हानिकारक रसायनांचे उत्पादन, साठवण, व आयात नियम, १९८९.
  • रासायनिक अपघात (आपत्कालीन नियोजन, सुसज्जता, व प्रतिसाद) नियम, १९९६.
  • श्रमिक मोबदला अधिनियम, १९२३.

 

कार्य

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाची कार्ये औद्योगिक सुरक्षा, व औद्योगिक आरोग्य, या दोन भागांमध्ये विभागली जातात:

औद्योगिक सुरक्षा

  • परवाने जारी करणे
  • कारखान्यांचे निरीक्षण करणे
  • कारखान्यातील अपघातांची चौकशी करणे व प्रतिबंधात्मक उपाय सुचविणे
  • तक्रारींची चौकशी करणे
  • एम.ए.एच. कारखान्यांचे निरीक्षण करणे व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे
  • कारखान्यांची सांख्यिकी माहिती गोळा करणे
  • कायदेशीर कारवाया सक्षम व्यक्तींना मान्यता देणे
  • कल्याण अधिकार्‍यांची नोंदणी

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचा आरोग्य विभाग कारखान्यांमधील वातावरणाचे निरीक्षण करतो. आरोग्य विभागाची कार्ये पुढीलप्रमाणे :

औद्योगिक आरोग्य

  • उपसंचालक (आरोग्य) कारखान्यांचे निरीक्षण करतात.
  • कामाच्या वातावरणाचे निरीक्षण, आरोग्यविषयक सर्वेक्षणे, जसे की ध्वनीची तीव्रता, वायुविजन, हवा, इत्यादी.
  • वयाची पडताळणी. कारखाने अधिनियमा अंतर्गत अल्पवयीन व्यक्तींची तपासणी व प्रमाणन
  • धोकादायक प्रक्रियांमध्ये काम करणार्‍या व्यक्तींची आरोग्य तपासणी
  • प्रमाणक शल्यचीकीत्साकाची प्राधिकृती.
  • प्रथमोपचार प्रशिक्षण संस्थांना मान्यता देणे

 

स्त्रोत :  कामगार विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate