অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सार्वजनिक आरोग्य विभाग

सार्वजनिक आरोग्य विभाग

वेबसाईट : सार्वजनिक आरोग्य विभाग

महाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०५८० उपकेंद्रे, आणि ३७ आश्रम शाळांद्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे.

उपकेंद्रे

या उपकेंद्रांमध्ये प्रसुतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयीत क्षय, हिवताप, आणि कुष्ठरुग्णांची तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण अशा आरोग्य सेवा पुरविल्या जातात. प्रत्येक उपकेंद्रात एक बहुविध आरोग्य सेवक (पुरुष), एक बहुविध आरोग्य सेवक (महिला) आणि एक अर्धवेळ महिला परिचर असते. याशिवाय काही उपकेंद्रांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बहुविध आरोग्य सेवक (महिला) कार्यरत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्रे

उपकेंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवाशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त सेवा पुरविल्या जातात. त्या पुढील प्रमाणे आहेत

बाह्य रुग्ण विभाग, ६ खाटांचा अंतररुग्ण विभाग, तातडीच्या सेवा, शस्त्रक्रिया व प्रयोगशाळेच्या सुविधा, विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, कुटुंब कल्याण सेवा आणि उपकेंद्रातून संदर्भित निर्देशित करण्यात आलेल्या रुग्णांचे उपचार .

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाची संख्या १५ असून स्वच्छता व रुग्णवाहिका सेवा करारपद्धतीने देण्यात येतात.
महाराष्ट्र जिल्हा परिषद नियम १९६१ मधील कलम १८३ व १८७ अन्वये खालील योजनांसाठी अनुदान देण्यात येते :-

  • नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम
  • प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची दुरुस्ती व देखभाल.
  • प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटिकरण.
  • उपकेंद्रांचे बांधकाम.
  • प्रादेशिक असमतोल अंतर्गत - प्राथमिक आरोग्य केंद्रांची व उपकेंद्रांची स्थापना व बांधकाम.
  • स्त्रोत : महाराष्ट्र शासन

    अंतिम सुधारित : 1/28/2020



    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate