অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उत्तर प्रदेशमधील ई-प्रशासन

ई-शिष्‍यवृत्ति

उपलब्‍ध असलेल्‍या सेवा:
  • इतर मागासवर्गीयवअनुसूचित जातीजमातींच्या उमेदवारांच्‍या बँक खात्‍यांमध्‍ये शिष्‍यवृत्तीच्या रकमेचेइलेक्‍ट्रॉनिक स्‍थानांतरण
  • शिष्‍यवृत्तीसाठी अर्जाचा फॉर्म
  • शिष्‍यवृत्ती प्रकल्‍पाकरिता बँकांच्‍या नोडल ऑफिसरची यादी
  • इतर मागासवर्गीयवअनुसूचित जातीजमातींच्या शिष्‍यवृत्ती प्रकल्‍पाकरिता नोडल ऑफिसरची यादी

ह्या सेवांपर्यंत पोचण्‍यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://scholarship.up.nic.in/

भू-लेख – उत्तरप्रदेश

उपलब्‍ध असलेल्‍या सेवा:
  • खात्‍याची नक्‍कल (डुप्लिकेट)
  • खेड्यांची जिल्‍हेवार यादी
  • सर्व खेड्यांचे वर्णन (माहिती)
  • जमिनीच्‍या (मातीच्या) प्रकाराबाबत तपशील

ह्या सेवांपर्यंत पोचण्‍यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://bhulekh.up.nic.in

कोशवाणी

उपलब्‍ध असलेल्‍या सेवा:

  • सर्व 73 कोशागारांनीदिलेल्या व स्वीकारलेल्या रकमांचा मासिक संकलित डाटा
  • वित्त प्राधिकारणे मदत (ग्रँट) पातळीपासून अगदी ऑब्जेक्टआणि व्‍हाउचर पातळीपर्यंतचा खर्च आणि अंदाजपत्रकाची सद्यस्थिती माहिती करून घेऊ शकतात
  • विभागप्रमुखआणि वित्त विभाग त्‍यांच्‍या संबंधित अनुदानाच्‍या खर्चाचा तपशील  DDO (जिल्हा विकास अधिकारी) वार प्राप्‍त करू शकतात
  • कन्‍याधन योजनेच्‍या खर्चाचा तपशील पाहिला जाऊ शकतो
  • आनुषंगिक खर्चाच्‍या भुगतानाचा तपशील देखील पाहता येतो

ह्या सेवांपर्यंत पोचण्‍यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://koshvani.up.nic.in

कोर्टाच्‍या केसची ऑनलाइन माहिती

उपलब्‍ध असलेल्‍या सेवा:
  • कोर्टाचा निकाल आणि आदेश
  • शंकांचे निरसन
  • वाद यादी व केसची सद्यस्थिती

ह्या सेवांपर्यंत पोचण्‍यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://courtcases.up.nic.in/

ऑनलाइन परिवहन सेवा

उपलब्‍ध असलेल्‍या सेवा:
  • ड्रायव्हिंग लायसन्‍स आणि वाहन नोंदणीशी निगडित अर्जाचा फॉर्म
  • ड्रायव्हिंग लायसन्‍स आणि वाहन नोंदणी करिता फी आणि टॅक्‍स संरचना
  • फॉर्म भरणे आणि नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांसाठी दिशानिर्देश
  • रस्‍त्‍याच्‍या सुरक्षित वापरासाठी वाहन चालवण्याविषयी सल्ला

ह्या सेवांपर्यंत पोचण्‍यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://www.uptransport.org

नियुक्ति ऑनलाइन सेवा

उपलब्‍ध असलेल्‍या सेवा:
  • अधिकार्‍यांच्‍या नियुक्तीची (पोस्टिंग) जिल्‍हेवार यादी
  • प्रशिक्षण आणि प्रतिनियुक्तीसाठी अर्ज सेवा
  • महत्‍वपूर्ण सरकारी आदेश आणि सर्क्युलर
  • कोर्टाच्‍या केसेस करीता नोडल अधिकार्‍यांची यादी

ह्या सेवांपर्यंत पोचण्‍यासाठी कृपया लॉग ऑन करा –
http://niyuktionline.up.nic.in

जीआयएस (GIS) आधारित योजना ऍटलस (नकाशाचे पुस्‍तक)

  • योजना विभागासाठी विकास/सामाजिक-आर्थिक संकेतांवर आधारित 100 द्विभाषिक नकाशांचा समावेश असलेला ऍटलस तयार करण्‍यात आला आहे.
  • संपूर्ण ऍटलस ऑनलाइन उपलब्‍ध आहे आणि सांख्यिकी पत्रिकेच्‍या 4000 संकेतांवर आधारित एक डायनामिक मॅप क्‍वेरी(नकाशासंबंधी शंकानिरसन)सुध्‍दा ऑनलाइन उपलब्‍ध आहे.
  • ह्या पद्धतीमुळे योजना विभागाला योजना नकाशा (प्‍लॅनिंग ऍटलस) हाताने(मॅन्‍युअली) तयार करण्‍यासाठी लागणारा वेळ देखील कमी करण्‍यास मदत मिळाली आहे.

ह्या सेवांच्‍या जास्‍त माहितीसाठी कृपया लॉग ऑन करा –

http://emanchitra.up.nic.in/emanchitra/

लोकवाणी

लोकांना त्यांची सरकार विषयीची गा-‍हाणी सोप्या त-‍हेने मांडता यावीत आणि त्या समस्यांचे १५ दिवसांच्या आत व अधिक कार्यक्षम पद्धतीने निवारण करता यावे यासाठी २००४ साली लोकवाणी प्रकल्पाची सूरुवात करण्यात आली. सरकारी कार्यालयांत थेट न जाता देखिल आपली कामे पार पाडण्याची सुविधा ही यंत्रणा देते. याअंतर्गत दिल्या  जाणा-‍या सेवांपैकी काही सेवा पुढिलप्रमाणे आहेत जसे : ऑनलाईन अर्ज करणे, जनतेच्या तक्रारी स्वीकारणे व त्यांचे निवारण करणे, विविध सरकारी योजनांची माहिती, त्यांसाठी लागणारे अर्ज, येणारा खर्च, लाभार्थी, इ., स्थानिक रोजगाराच्या उपलब्धतेची संधी.
लोकवाणीच्या वेबसाईटवर लॉग इन करण्यासाठी प्रत्येक केंद्राला एक पासवर्ड देण्यात आला आहे. पुरविल्या जाणा-‍या प्रत्येक सेवेसाठी आकारल्या जाणा-‍या शुल्कांची यादी तयार करण्यात आली आहे आणि लोकवाणीची केंद्रे देखिल सेवे साठी शुल्क आकारताना याच यादीनुसार आकारतील याचीही काळजी घेण्यात आली आहे. डिसेंबर, २००४ पर्यंत १३ लोकवाणी केंद्रे उभारण्यात आली होती. डिसेंबर, २००६ मध्ये हीच संख्या ९० वर जाऊन पोहोचली. यामुळे लोकांना छोट्या छोट्या कामांसाठी जिल्हा मुख्यालयात फेरे घालण्याची काहीच गरज नाही. ही कामे ते त्यांच्या नजिकच्या तहसिल, विभाग आणि नगरात जाऊनही करू शकतात. लोकवाणीच्या वेबसाईटचा पत्ता:  www.sitapur.nic.in/lokvani (युजर नेम: guest पासवर्ड: guest)
जमिनींच्या नोंदी, निविदांचे अर्ज, शस्त्रास्त्र परवाना अर्ज, शिक्षकांचा जी.पी.एफ. यासारख्या सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध आहेत. कामात पारदर्शकता आणण्यासाठी सरकारी विकास कामे, शिधा वाटप, ग्राम सभेला पाठविण्यात आलेला निधी आदी माहिती लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या सर्व सेवांमध्ये सर्वात लोकप्रिय अशी सेवा आहे ऑनलाईन तक्रार निवारण सेवा. या सेवेद्वारे ३१ डिसेंबर, २००६ पर्यंत ८२ हजारांहून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या आणि त्यांतील ७६ हजार पाचशे (९३%) तक्रारींचे निवारण करण्यात आले.
जमिनीच्या नोंदीही संगणकीकृत करून लोकवाणीच्या वेबसाईटवर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त जन्म/ मृत्यू नोंदणी करणे, अनुसुचित जाती/ जमातीचा दाखला मिळवणे, नागारिकत्वाचा दाखला मिळवणे यासारख्या सेवा एक खिडकी सेवेच्या माध्यमातून पुरविल्या जात आहेत. उत्तर प्रदेशच्या ५० हून जास्त जिल्ह्यांत लोकवाणीची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate