অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मतदाता सेवा पोर्टल

निवडणूक आयोगाचे मतदाता सेवा पोर्टल… मतदारांसाठी स्मार्ट पर्याय

प्रस्तावना

आधुनिक तंत्रज्ञाच्या वापरामुळे अनेक गोष्टी सोप्या होत आहेत. संगणकीकरणाच्या युगात बँकिग, शॉपिंग सगळे काही ऑनलाईन होत आहे. अनेक शासकीय सेवादेखील ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना मिळू लागल्यामुळे प्रशासकीय कामकाजाचा वेग वाढला आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगानेदेखील मागे न राहता मतदारांसाठी अनेक सेवा ऑनलाईन केलेल्या आहेत. आयोगाच्या http://www.nvsp.in या राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलमुळे आता मतदारांना घरबसल्या मतदान प्रक्रियेशी संबंधित विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.


मतदानांमध्ये निवडणूक प्रक्रियेची माहिती मतदारांना व्हावी याकरिता निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारीनिमित्त देशभरात मतदार जागृतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याबरोबरच वर्षभर मतदार नोंदणीसाठी मोहीम राबविण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून मतदारांना नोंदणीसाठी किंवा मतदार यादीतील दुरुस्तीसाठी तसेच इतर माहिती सहजपणे मतदात्यांना उपलब्ध होण्यासाठी पोर्टलचा पर्याय आयोगाने उपलब्ध केला आहे. यामुळे मतदारांना कार्यालयाच्या फेऱ्या कमी होऊन आपल्या गरजेनुसार आणि वेळेनुसार विविध प्रक्रिया पूर्ण करता येणार आहेत. या वेबपोर्टलच्या माध्यमातून मतदारांना पुढील प्रक्रियातून मतदार करु शकणार आहेत.


वेबपोर्टलचे फायदे-


  • मतदार यादीत नाव शोधणे.
  • नवीन मतदारांची ऑनलाईन नोंदणी.
  • प्रवासी भारतीयांची ऑनलाईन पद्धतीने मतदार म्हणून नोंदणी.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज क्र. 6, 6 क, 7, 8, 8 क हे भरता येतात, तसेच आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासता येते.
  • मतदार यादीतील चुकीची दुरूस्ती. मतदारयादीत नोंदणी, सुधारणा, नाव काढून टाकणे किंवा पत्ता बदल अर्ज करू शकतो.
  • वेबपोर्टलवर मतदारांना त्यांची मतदार माहिती स्लिप मुद्रित करता येऊ शकते.
  • आपले नाव, पत्ता यांच्या आधारे अथवा मतदार ओळखपत्रावरील क्रमांकाच्या आधारे लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ शोधता येतो.
  • आपल्या ब्लॉक लेव्हल ऑफिसर, इलेक्ट्रॉल रोल ऑफिसरबाबत माहिती घेता येते.
  • इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत माहिती घेता येते.
  • जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय अधिकारी यांच्याबाबत सुद्धा जाणून घेता येऊ शकते.
  • सेवा पोर्टलद्वारे तक्रारी अथवा काही सल्ला असल्यास तेदेखील पोर्टलच्या माध्यमातून कळविता येतात.
मतदार नोंदणी प्रक्रिया अधिक सुलभरितीने होण्याबरोबरच इतर अनुषांगिक सेवा सुविधा अधिक सुलभपणे मतदारांना देण्यात या पोर्टलची भूमिका महत्वाची आहे. मतदारांनीदेखील या पोर्टलचा उपयोग केल्यास त्यांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे आयोगाचे मतदाता सेवा पोर्टल मतदारांसाठी स्मार्ट पर्याय ठरणार आहे.

-विजय अ. कोळी,
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.
स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate