অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संग्राम केंद्रामार्फत आर्थिक समावेशन

संग्राम केंद्रामार्फत आर्थिक समावेशन

आर्थिक समावेशन व्याख्या

  • आर्थिक समावेशन म्हणजे एक अशी सुविधा किंवा एक अशी प्रक्रिया ज्यामार्फत आपण बँकेच्या सर्व सुविधा गावातील लोकांना बँकेच्या प्रतिनिधी मार्फत देऊ शकतो. ज्यामध्ये प्रामुख्याने शून्य रुपयात खाते उघडणे तसेच सरकार मार्फत येणारे सर्व अनुदान वितरीत करणे इत्यादी. सर्व सामान्यांपर्यत विविध बँकिग सेवा त्यांचे रहिवासी क्षेत्रात उपलब्ध व्हाव्यात हा आर्थिक समावेशनाचा सेवांचा मुख्य उद्देश आहे.
  • ई-पंचायत प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्ये कॉम्युटर, प्रिंटर, इंटरनेट कनेक्टीव्हीटी व संगणक परिचालकयुक्त संग्राम केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
  • राज्यातील इंटरनेटयुक्त संग्राम केंद्रांना CSC / महा-ई-सेवा केंद्रांचा दर्जा देण्यात आला.
  • सदयस्थितीत या संग्राम केंद्रांमधून ई-पंचायत अंतर्गत प्राप्त तसेच विविध योजनांसंबंधित डेटा एन्ट्री व ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील विविध 19 प्रकारचे दाखले ग्रामस्थांना देण्यात येतात.
  • CSC-SPV ही केंद्रशासनाच्या नॅशनल ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत ग्रामस्थांना विविध सेवा त्यांचे रहिवासी क्षेत्रातच उपलब्ध करून देण्यासाठी स्थापन केलेली कंपनी आहे.
  • ग्रामविकास विभागाने केंद्रशासनाच्या अखत्यारीतील CSC-SPV या कंपनीसमवेत करारनामा करून, पंचायती राज संस्थांकडे ई-पंचायत प्रकल्पांतर्गत उभारलेल्या इंटरनेटयुक्त संग्राम केंद्रांतून वित्तीय समावेशनांतर्गत (Financial Inclusion) विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या बँकिंग सेवा तसेच खाली उदाहरणादाखल नमूद केलेल्या सेवा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे,
  • बँकेत खाते उघडणे, बँकेत पैसे भरणे, काढणे, ड्राफ्ट बनविणे, पैसे हस्तांतरण करणे, पीक कर्जासहीत इतर कर्ज प्रस्ताव करणे व कर्ज वितरण करणे इ.
  • ग्रामस्थांना एल.आय.सी., इन्शुरन्स, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, नॅशनल पेंशन सिस्टीम (स्वावलंबन योजना), लाभार्थ्याला थेट अनुदान (DBT) इ.
  • या सेवांबरोबरच विविध प्रकारचे मोबाईल/ डीटीएच रिचार्ज टेलिफोन, लाईट बील भरणे, विविध प्रकारच्या बस सेवा, रेल्वे टिकीट आरक्षण सेवा इ.
  • तसेच भविष्यात पासपोर्ट, मनरेगा पेमेंट, टेलिमेडीसिन, विविध प्रशासकीय विभागांचे दाखले संग्राम केंद्रांतून उपलब्ध होणे शक्य.
  • मार्च 2014 पर्यंत राज्यातील जवळजवळ 5000 ग्रामपंचायतींमध्ये बँकिंग सेवा सुरू करण्यात येत आहेत. पुढील सहा महिन्याच्या कालावधीत उर्वरीत सर्व इंटरनेटयुक्त ग्रामपंचायतींमध्ये या सेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
  • या प्रकल्पाद्वारे, ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध साधन संपत्तीचा पूर्णत: उपयोग करून, ग्रामस्थांना बहुतेक सर्व प्रकारच्या उपरोक्त सेवा (G2C व B2C) त्यांचे रहिवासी क्षेत्रात उपलब्ध होत आहेत. यासाठी ग्रामस्थांनी अदा केलेल्या सेवा शुल्क / कमीशनमधून ग्रामपंचायतींना अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होणार आहे.
  • अशाप्रकारे विभागाच्या या अभिनव संकल्पनेद्वारे ग्रामपंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण व ग्रामस्थांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रातच शहरासारख्या सर्व सुविधा विनासायास उपलब्ध होऊन नागरिकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होऊन त्यांचे जीवनमान अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न विभागाने केला आहे

आर्थिक समावेशनाचे मुख्य उद्देश (Scope of Financial Inclusion)

भारतातील शहरी किवा ग्रामीण भागातील बँकेच्या सेवापासून वंचित लोकांना बँकेच्या सेवा वित्तीय समावेशनामार्फत पुरविणे. बँकिंग साक्षरता, सुक्ष्म बचत, कर्ज, विमा आणि सुलभ आर्थिक व्यवहार ही वित्तीय सामावेशानाची पंचसूत्री आहे. उच्च प्रतीच्या माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा वापर. सरकारमार्फत मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ. विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त करणे करिता इ.

वित्तीय समावेशनासाठी बँकेच्या सेवा व सुविधा (FI Banking Services & Products

  • No-Frills Accounts ग्राहकाचे शून्य रुपयात बचत खाते उघडणे.
  • Current Account ग्राहकाचे चालू खाते उघडणे.
  • Deposit of Money ग्राहकांचे पैसे जमा करणे.
  • Withdrawal of Money ग्राहकांचे पैसे काढून देणे.
  • Mini Statement ग्राहकांना त्यांच्या पैशांचा तपशील काढून देणे.
  • Term Deposits ग्राहकांच्या इच्छेनुसार त्यांचे पैसे काही अवधीसाठी जमा करणे.
  • Recurring Deposit आवर्ती जमा खाते
  • Home Loan / Loan Against Property  ग्राहकांना घरासाठी कर्ज / मालमत्तेवर कर्ज काढून देणे.
  • SME Loans  लहान व मध्यम उद्योगासाठी कर्ज काढून देणे.
  • Auto Loan  वाहन कर्ज काढणे
  • बँकेने व कंपनीने ठरवल्याप्रमाणे Micro Insurance /Mutual Fund/ Pension व other third party products खातेदारांना व इतर लोकांना देऊ शकतात.
BCA Identification & Engagement / VLE हाच बँक प्रतिनिधी

BCA म्हणजे काय

  • आर्थिक समावेशानामध्ये संग्राम संगणक परिचालक (KO) हा गावपातळीवरील उदयोजक (Village level entrepreneur) हाच बँकेचे सर्व कार्य बँकेचा प्रतिनिधी म्हणून सांभाळतो.
  • गावपातळीवरील उदयोजक (Village level entrepreneur) हा संबंधित ग्रामपंचायतीच्या रहिवासी क्षेत्रातलाच आहे.

BCA चे कार्य

  • संग्राम संगणक परिचालकाला (KO) आर्थिक समावेशानाबद्दलआवश्यक ते प्रशिक्षण देणे.
  • बँकेने निवडून दिलेल्या (Mapped) गावामधील लोकांचेच तो व्यवहार करू शकतो.
  • बँकेचे कार्य संग्राम संगणक परिचालकाला (KO) करण्याआधी त्यास स्वतःचे चालू खाते (OD Account) दिलेल्या संबधित बँकेत काढणे अनिवार्य आहे.

OD Account काढण्यासाठी लागणारे KYC कागदपत्रे

  • KYC Form.
  • Identity Proof Xerox, Aadhar Card, PAN card, Voter ID.
  • 2 Passport size Photographs.
  • Mahaonline Joining Letter.
  • संगणक परिचालकाला (KO) ला आर्थिक समवेशनाचे कार्य करण्यासाठी स्वतःच्या OD Account मध्ये किमान 5000 रुपये असणे अनिवार्य आहे. म्हणजेच खातेदारंचे पैशाचे व्यवहार काढणे व जमा करण्यास त्यास स्वतःच्या OD Account मध्ये पैसे नसल्यास त्यास व्यवहार करणे शक्य नाही.
  • बँकेत काढलेले OD Account No. आपल्या संबधित तालुका समन्वयकास कळविणे.
  • बँकेच्या सेवाबाबत व बँकेच्या सोफ्टवेअर बाबतीत त्यास प्रशिक्षण घेणे.
  • बँके मार्फत VLE ला बँकेच्या सॉफ्टवेअर Login करण्यास व गावातील लोकांना बँकेच्या सेवा देण्यास त्यास USER ID दिला जाईल.

VLE Functional ट्रेनिंग

  • Banking and Company Guidelines 
    बँकेचे व कंपनीचे मार्गदर्शन घेणे.
  • Organize a Camp 
    जास्तीत जास्त गावातील लोकांचे बचत खाते उघडण्यासाठी ग्रामसभेतून बँकेची माहिती व सेवा लोकांना देणे.
  • Bank Passbook Delivery 
    बचत खाते उघडलेल्या लोकांचे बँक पासबुक वाटप करणे.
  • Cash Handling 
    खातेदाराच्या रक्कम सांभाळणे व बँकेत जमा करणे.
  • Audit and Monitoring 
    खातेदाराच्या रक्कमेची तपासणी करणे व त्यावर लक्ष देणे.
  • Reporting and MIS 
    वेळोवेळी खातेदाराच्या रकमेची माहिती संबधित बँकेच्या अधिकारी वर्गास व कंपनीच्या संबधित व्यक्तीस देणे.

VLE Role of IT in Financial Inclusion

Technical ट्रेनिंग

  • Banking KIOSK Application
  • Installed Software in GP
  • Connect the Biometric Device
  • Login to Bank Application
  • निवडून दिलेल्या बँकेचे सॉफ्टवेअरवर कामकाजाची माहिती असणे.

बँकांची यादी

  • अलाहबाद बँक
  • आंध्र बँक
  • बँक ऑफ बडोदा
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • कॅनरा बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडीया
  • कॉपोरेशन बँक
  • देना बँक
  • इंडीयन बँक
  • इंडीयन ओव्हरसिज बँक
  • पंजाब नॅशनल बँक
  • पंजाब सिंध बँक
  • सिंडीकेट बँक
  • युको बँक
  • युनायटेड बँक ऑफ इंडीया
  • युनियन बँक ऑफ इंडीया
  • विजया बँक
  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स
  • बँक ऑफ इंडीया
  • स्टेट बँक ऑफ इंडीया
  • आयडीबीआय
  • हिमाचल ग्रामीण बँक
  • स्टेट बँक ऑफ बिकानेर ॲन्ड जयपूर
  • स्टेट बँक ऑफ पटीयाला
  • स्टेट बँक ऑफ हैदराबाद
  • स्टेट बँक ऑफ म्हैसूर
  • स्टेट बँक ऑफ त्रावणकोर

 

आर्थिक सामावेष्ण - शासन निर्णय [Financial Inclusion (FI GR)]

 

स्त्रोत : ग्राम विकास विभाग

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate