অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाग ५: पंजाब

भाग ५: पंजाब

थोडीसी धूल मेरी, धरती की मेरे वतन की,
थोडीसी खुशबु बोहराईसी मस्त पवन की,
थोडीसी ढूंढने वाली धक-धक धक-धक धक-धक सांसे
जिन मे हो जुनूं जुनूं वोह बूंदे लाल लहू की...

पंजाब म्हटले मला ह्या गाणाच्या ओळी आठवतात. पंजाब म्हटले की आठवतात गुरु नानक, शहिद भगत सिंग, शहिद उधम सिंग, लाला लजपतराय, हिर रांझा...
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वात जास्त क्रांतिकारक पंजाब, महाराष्ट्र आणी बंगाल ह्या तीन राज्यांनी दिले.
भारतीय पायदळातील सर्वात कडव्या मानल्या गेलेल्या तीन रेजिमेंटस् मधील सिख रेजिमेंट ही एक. भारतावरील बहुतेक सर्व आक्रमणे ही उत्तरेकडून झाली. त्याचा सर्वात मोठा परिणाम ईथल्या लोकांवर झाला. फाळणीची झळ ही पंजाब आणी पश्चिम बंगाल ह्या राज्यांना सर्वात जास्त बसली. त्यामूळे ईथल्या लोकांचा पिंडच मूळी थोडासा आक्रमक बनला. पण जेव्हढे पंजाबी देहाने विशाल तेव्हढेच ह्रदयाने ही विशाल. अशा या पंजाबला भेट देण्याचा योग मी दिल्लीत असताना आला.

रात्रिची रेल्वे पकडून सकाळी अमृतसर ला पोहोचलो. ऑक्टोबर चा महिना होता आणी थंडीची सुरुवात होती. सकाळी फ्रेश होण्यासाठी म्हणून हॉटेल घेतले व आवरून बाहेर पडलो. ईथे शहर फिरवायला आणी वाघा बॉर्डर दाखवायला मोठ्या ऑटो रिक्षा (५-६ सीटर) पूर्ण दिवस मिळतात. हे रिक्षा वाले ३०० ते ५०० रुपये घेतात. तशी एक रिक्षा घेतली. हे शहर तसे स्वस्त आहे. अमृतसर ला गेलात तर Brother's Dhabaa मध्ये नक्की जा. ह्यांच्या शहरात बर्‍याच शाखा आहेत. ह्याला "बडे भाई का ढाबा" किंवा""प्रा दा ढाबा" असेही म्हणतात. ईथे अस्सल पंजाबी नाश्ता आणी जेवण मिळते. नाश्ता करून अमृतसर शहर पहायला बाहेर पडलो. रिक्षावाल्याने आधी एक दोन दुसरी मंदीरे दाखविली. छान होती. तिथुन सुवर्णमंदिर पहायला गेलो.

सुवर्णमंदिर


सुवर्णमंदिराचा परीसर अतिशय स्वच्छ आहे. ईथे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी कोणीही पैसे मागत नाही. कोणी हार वाले नाहीत, नारळ वाले नाहीत , प्रसाद वाले नाहित, एक्स्ट्रा पैसे देऊन दर्शन लौकर करुन देतो म्हणून लूटणारे नाहीत. पादत्राणे सांभाळणारे लोक सुध्धा अतिशय स्वच्छ निटनेटके आणी चांगल्या घरातले वाटत होते. हे लोक फक्त पादत्राणे सांभाळत नाहीत तर पुसुन, पॉलिश करून स्वच्छ करुन देतात. हे सर्व पाहुन आपल्या ईथला पंढरपुर किंवा शिर्डी ला चालणारा प्रकार आठवला. पादत्राणे देऊन पाय धूवून मंदिराकडे निघालो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एव्हढे मोठे आणी प्रसिध्ध मंदिर असूनही कुठल्याही प्रकरची तपासणी होत नव्हती. फक्त मेटल डिटेक्टर्स लावले होते. मंदिर एका तलावाच्या मध्य भागी आहे. मंदिराचा पहिल्या मजल्याचा बाहेरिल भाग सोन्याच्या पत्र्याने मढविलेला आहे. आतमध्ये गुरु ग्रंथ साहीब चा अखंडपाठ सुरु असतो. वरच्या मजल्यावर बसून तुम्ही तो ऐकू शकता. टेरेस वरून सुवर्णमंदिराच्या परीसराचे दर्शन होते. ईथे तलावात तुम्ही पवित्र स्नान करू शकता. सुवर्णमंदिर रात्रिही रोषणाईमध्ये फार छान दिसते.
मंदिराच्या बाहेर छान तलवारी, खंडा, कृपाण ईत्यादी भेटवस्तु मिळतात.

छायाचित्रे पाहण्‍यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.

स्‍त्रोत - मायबोली

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate