"शास्रज्ञ" या शब्दाची व्यक्तिरेखा म्हणजे प्रयोगशाळेत स्व:ताला कोंडून घेतलेला, पुस्तकांच्या गराड्यात बसून परीक्ष्यानाल्या व इतर महागड्या उपकरणांत व विचित्र धुरांच्या वासांत धुरात हरविलेला असा माणूस नजरेसमोर येतो. पण या पुस्तकातील कित्येक शास्रज्ञ कथा किंवा कविता लिहित असत. काहींना कालेचीसुद्धा खूप आवड होती. काही शास्राद्न्यांना गाड्यांच्या वेगाची मजा घेणे आवडत होते. तर काहींनी आपल्या क्षेत्राचा व कार्याचा उपयोग जगाच्या कल्याणार्थ केला.
या पुस्तकात त्यांच्या जीवनचित्रा व्यतिरिक्त त्यांचे वैयक्तिक विचार मांडून त्याला वेगळे गहिरेपण दिले आहे. त्यांना शास्रज्ञ होण्याची प्रेरणा कशी मिळाली? त्यांच्या बालपणीतील कोणती घटना प्रेरणादायक ठरली? काय होते त्यांचे स्फूर्तीस्थान - त्यांचे गुरु का त्यांचे प्रेमळ पालक? त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागला? विशेषत: स्रियांना या क्षेत्रात कश्या अडचणी आल्या? हे सर्व वाचताना तरुण पिढीला निश्चितच नवी उमेद व प्रेरणा मिळेल. "असे घडले शास्रज्ञ" या पुस्तकामध्ये एकूण ३९ विशेष भारतीय शास्रज्ञाच्या जीवनाचा आढावा घेण्यात आला आहे.
'ब्राईट स्पार्क' हे अरविंद गुप्तांच्या शैलीदार लेखणीतून साकार झालेले अत्यंत सुंदर पुस्तक आहे. भारतातील गेल्या शतकातील फारश्या माहित नसणाऱ्या व काही ख्यातनाम थोर शास्रज्ञांचे जीवन योग्य प्रकारे तरुणांच्या समोर मांडण्यासाठी व विज्ञान जागृती व प्रसार करण्यासाठी हे पुस्तक सचित्र स्वरुपात बनविण्यात आलेले आहे. आपल्या देशातील तरुण व प्रौढ वाचक वर्गाला नवीन प्रेरणा मिळावी असा हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे. हे पुस्तक वैज्ञानिक व शालेय उपयोगाचेही आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.
http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5167882633284814047&PreviewType=books
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ: http://www.arvindguptatoys.com/
अंतिम सुधारित : 7/4/2020