অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

छोटी खेळणी

छोटी खेळणी

अत्यंत टाकाऊ आणि निरुपयोगी वस्तू अतिशय मजबूत वेष्टानांत भरलेल्या असणे हे विडंबन आधुनिक भोगवादात दिसून येते. सार्वजनिक बागांत जिकडे तिकडे विखुरलेली आणि कचरा कुंड्यामध्ये विविध प्रकारचा कचरा ओसंडून वाहत असतो. या मधील काही पाकिटे हि अल्युमिनिअम, प्लास्टिक, कागद यांसारख्या निरनिराळ्या पदार्थांचे पापुद्रे एकत्रपणे सांधून त्याच्या अनेकपदरी केलेल्या एका आवरणातून बनविलेली असतात. अल्युमिनिअम गंजत नाही आणि प्लास्टिक सडत नाही. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून या सार्याची जबर किंमत आपल्याला मोजावी लागत आहे.

या आधुनिक कचर्यापैकी काहींचा उपयोग काही आनंददायी खेळणी तयार करण्यासाठी कसा करता येईल हे सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केलेला आहे. फिल्म रोलच्या डबीचे रुपांतर एका कार्यक्षम पंपात करता येईल. फ्रुटी टेट्रा पंक चे रुपांतर मापन दंडगोलांत किंवा फुलपाखरांत करता येईल, तर, सिगारेटच्या पाकीटातून गम्मतचक्रे निघतील. या नवीन प्रकारच्या कच्या मालातून कमी खर्चाचे शास्त्रीय प्रयोग करण्याच्या किंवा हालती- चालती खेळणी तयार करण्याच्या असंख्य शक्यता पुढे येत आहेत. तसेच, 'सायन्स रिपोर्टर' या मासिकातून यातील बरीच खेळणी मालीकारुपातून अवतरली आहेत. या व अश्या विविध टाकाऊ पासून टिकाऊ व उपयुक्त खेळणी बनविण्याच्या विविध पद्धतींविषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

http://arvindguptatoys.com/arvindgupta/littletoysmarathi.pdf

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदर्भ: http://www.arvindguptatoys.com/

अंतिम सुधारित : 3/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate