অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

पूर्वेतिहास :: स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या ज्ञानविज्ञानाच्या क्षेत्रातील आधुनिक गरजा आधीच हेरुन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री.यशवंतराव चव्हाण यांनी दिनांक 1 मे, 1960 ला महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी शासनाची जी धोरणविषयक प्रमेये जाहीर केली त्यात महाराष्ट्र राज्याच्या मराठी साहित्य, कला व संस्कृती या क्षेत्रातील कार्यकर्त्याच्या कार्यांची उपेक्षा होणार नाही; एवढेच नव्हे तर त्या कार्याची प्रगती व विकास होईल ह्या दृष्टीने पावले निश्चितपणे टाकण्यात येतील; असे आश्वासन दिले होते. त्याच धोरणानुसार महाराष्ट्राचे साहित्य, इतिहास व संस्कृती यांच्या विकासासाठी दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 ला शासनाने साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना पहिल्यांदा पाच वर्षाकरिता केली. त्यानंतर वेळोवेळी मंडळाची पुनर्रचना करण्यात आली. थोर विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मंडळाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर वेळोवेळी अनेक मान्यवर साहित्यिक व विचारवंतांची नियुक्ती या पदावर झाली. त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे

- 1) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी 1960 ते 1980 2) डॉ.सुरेंद्र बारलिंगे 1980 ते 1989 3) प्रा. यशवंत मनोहर 1989 ते 1990 4) डॉ. य.दि. फडके 1990 ते 1995 5) श्री. विद्याधर गोखले 1995 ते 1996 6) डॉ. मधुकर आष्टीकर 1996 ते 1998 7) श्री. द.मा. मिरासदार 1998 ते 1999 8) श्री. सुरेश द्वादशीवार 2000 ते 2000 9) प्रा. रा.रं. बोराडे 2000 ते 2004 10) प्रा. रतनलाल सोनग्रा 2004 ते 2004 11) 
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक 2006 ते 16 ऑगस्ट 2013.मंडळाची पुनर्रचना करण्याची कार्यवाही शासनस्तरावर सुरु असून आजमितीस मंडळाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सचिव मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडे आहे.

:: उद्दिष्टे व जबाबदाऱ्या ::

दिनांक 19 नोव्हेंबर 1960 च्या ज्या शासकीय ठरावान्वये मंडळाची प्रथम स्थापना झाली त्या ठरावानुसारच शासनाने मंडळाकडे खालील उद्दिष्टे व जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत –

महाराष्ट्राचे साहित्य, संस्कृती व इतिहास या क्षेत्रातील संशोधनांचे प्रकल्प वा योजना यांच्या पूर्ततेसाठी चालना देणे, मदत करणे वा अशा योजना मंडळाने स्वतः हाती घेणे.
अशा संशोधनांचे मराठीतून प्रकाशन करण्यासाठी चालना देणे, मदत करणे वा मंडळाने स्वतः प्रकाशित करणे.
स्वतंत्र व विद्यमान्य प्रबंध, व्याप्तिलेख, ग्रंथ, नियतकालिके त्याच प्रमाणे ज्ञानविज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील कोणत्याही अन्य लेखनाचे मराठीतून प्रकाशन करण्यासाठी चालना देणे, मदत करणे वा मंडळाने ते स्वतः प्रसिद्ध करणे.
संदर्भकोश, ज्ञानकोश, शब्दकोश इत्यादीं संदर्भ साहित्याचे मराठीतून प्रकाशन करणाऱ्या योजनांना चालना देणे, मदत करणे वा मंडळाने त्या स्वतः कार्यान्वित करणे.
साहित्य अकादमीने आधीच भाषांतरासाठी हाती घेतलेले ग्रंथ वगळून मराठीखेरीज अन्य भारतीय भाषा व परदेशी भाषा यातील अन्य उत्कृष्ट ग्रंथांची मराठीत भाषांतरे करुन घेणे व ती प्रसिद्ध करणे. तसेच, अशा भाषांतराच्या योजनांस चालना देणे व मदत करणे.
महाराष्ट्राचा इतिहास व संस्कृती यांची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आधारभूत अशी महत्त्वाची प्रकाशित वा अप्रकाशित साधनसामग्री (कागदपत्रे) संपादित करणे, मराठीत भाषांतरित करणे व प्रसिद्ध करणे आणि अशा योजनांना चालना देणे, मदत करणे वा त्या योजना स्वतः कार्यान्वित करणे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक व वाङ्‌मयीन इतिहासाचे संपादन व प्रकाशन करण्याबाबतच्या योजनास चालना देणे, मदत करणे वा अशा योजना स्वतः कार्यान्वित करणे.
मराठी साहित्याच्या अभिवृद्धीच्या दृष्टीने ज्ञानविज्ञानाच्या कोणत्याही शाखेत संशोधनार्थ नवनवीन मार्गाचा शोध घेणे व पाहाणी करणे.
त्याचप्रमाणे, या क्षेत्रात खुद्द मंडळाने तसेच अन्य खाजगी संस्था वा विद्वान यांनी, मंडळाच्या अनुदानाने वा अन्यथा, हाती घेतलेल्या निरनिराळ्या वाङ्‌मयीन कार्याच्या अद्ययावत प्रगतीबाबत शासनास वेळोवेळी माहिती पुरविणे.
इतिहासविषयक संशोधन व साहित्याची अभिवृद्धी याबाबत शासकीय धोरण आखण्यासाठी शासनास मदत करणे.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate