অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्रात फुटबॉल क्रांती

महाराष्ट्रात फुटबॉल क्रांती

जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. केवळ भारतामध्येच नव्हे, तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिलीची फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा-क्रांती रुजविण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यासाठी राष्ट्रीयस्तरावर मिशन 11 मिलियन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मिशन 1 मिलियन हा फुटबॉल क्रांती प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. 17 वर्षाखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेनिमित्त राज्यात 8 सप्टेंबर 2017 रोजी 10 लाख मुले मुली शाळांमधून फुटबॉल खेळणार असल्याने या दिवशी ऐतिहासिक मिशन साकार होणार आहे. यानिमित्ताने अवघा महाराष्ट्र आनंदाचे क्रीडांगण बनणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने महाराष्ट्र मिशन 1 मिलियन – फुटबॉल क्रांती निर्माण करण्यात येणार आहे.

अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होण्याबरोरबच या निमित्ताने महाराष्ट्र मिशन 1 मिलियन साध्य करताना 30 हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे 1 लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहेत. तर शाळा, महाविद्यालये आणि विविध विद्यापीठे यामध्ये फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. याचबरोबर जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिरे, कार्यशाळा आणि क्रीडा क्षेत्रातील करीअर याबाबतही जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या धर्तीवर जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. मुळातच फुटबॉल हा खेळ अत्यंत कमी पैशात खेळला जाणार आणि आरोग्य आणि शारीरिक तंदुरुस्ती ठेवणारा खेळ आहे. शाळांना संबंधित यंत्रणेकडून फुटबॉल आणि इतर साहित्य प्राप्त करुन घेतल्यानंतर 30 हजार शाळांमध्ये फुटबॉल खेळला जाणार आहे.

फुटबॉलचा आनंद लुटण्यासाठी आता मोठ्या मैदानाची गरज नाही. FIFA, AFC आणि AIFF अशा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील निकषांनुसार आता कोणत्याही मोकळ्या मैदानात फुटबॉल खेळता येईल. तेही प्रत्येकी ५ जणांच्या संघांमध्ये सुध्दा खेळता येईल. १० आणि १२ वर्षांखालील मुला-मुलींना फुटबॉलमध्ये रूची निर्माण करण्यासाठी अशी पद्धत खूपच रंजक आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासाठी राष्ट्रीयस्तरावर मिशन 11 मिलियन हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात मिशन 1 मिलियन हा फुटबॉल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मिशनच्या निमित्ताने शाळांमधून जवळपास 10 लाखांहून अधिक मुला मुलींपर्यत फुटबॉल आणि क्रीडा संस्कृती पोहोचविण्यात येणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरणार आहे.

दृष्टिक्षेपात महाराष्ट्र मिशन १ मिलियन

•  30 हजारांहून अधिक शाळांमधून सुमारे १ लाख फुटबॉलचे वाटप

•  शाळा-महाविद्यालये, विद्यापीठांमधून फुटबॉल फेस्टिव्हल आणि युवक जागृती कार्यक्रम

•  १४ वर्षांखालील मुला-मुलींसाठी फुटबॉल स्पर्धा

•  आमदारांना सहभागी करुन लवकरच होणार आमदार चषक फुटबॉल -स्पर्धा

•  जिल्हास्तरीय प्रशिक्षक शिबिरे, कार्यशाळा, क्रीडा क्षेत्रातील करिअरसंदर्भात जनजागृती शिबिरे

•  अखिल भारतीय फुटबॉल संघटनेच्या धर्तीवर जिल्हास्तरीय फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रम

•  पीएम कप आंतरराष्ट्रीय युवा फुटबॉल स्पर्धा

•  फुटबॉल या विषयावर चित्रकला आणि निबंध स्पर्धा. भारतीय संघाला मिळणार 10 लाख विद्यार्थ्यांकडून शुभेच्छा

महाराष्ट्र मिशन १ मिलियनसाठी शालेय स्तरावर राबविण्यात येणारी कार्यपद्धती

•  आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घेत असलेल्या शाळा व खेळाडूंची नोंद करणे.

•  खेळाच्या सुविधांनुसार शाळांचे वर्गीकरण करणे.

•  क्रीडासुविधांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र मिशन १ मिलियन फुटबॉल मुव्हमेंट योजनेत कोणत्या शाळा सहभागी करून घेणे शक्य आहे, याची प्राथमिक यादी तयार करणे. ती संबंधित अधिकारीवर्गाकडे सादर करणे.

•  सर्व शाळांमध्ये जाऊन महाराष्ट्र मिशन १ मिलियन फुटबॉल मुव्हमेंट योजनेची माहिती देणे आणि त्यासंदर्भात जनजागृती करणे. तसेच, अधिकाधिक शाळांना त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करणे.

•  प्रत्यक्ष योजनेदरम्यानचा सहभाग नोंदविणे.

• फुटबॉल आणि इतर साहित्य प्राप्त करून ते योजना राबवित असलेल्या शाळांमध्ये वितरित करणे.

•  संबंधित क्रीडा साहित्याचा योग्य विनियोग होत आहे की नाही, याची माहिती घेणे. तसेच, राज्यस्तरीय अधिकारीवर्गापर्यंत सेल्फी-फोटो आदी साधनांच्या माध्यमातून ती सातत्याने पाठवित राहणे.

•  संपूर्ण योजनेचा अहवाल प्राप्त करून तो संबंधित अधिकारीवर्गाकडे सुपूर्द करणे.

•  फुटबॉल वाटपाचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर फुटबॉल आणि एकूणातच खेळांमध्ये रूची वाढलेल्या शाळांमधून अधिकाधिक कार्यक्रम-प्रकल्प राबविण्याबाबत जागरूक राहणे.

ऐतिहासिक फुटबॉल महोत्सव

•  राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सप्टेंबरमध्ये १० लाख मुले – मुली शाळांमधून खेळणार फुटबॉल.

•  जिल्हास्तरीय संबंधित यंत्रणेकडून फुटबॉल आणि इतर साहित्य प्राप्त करून ते योजना राबवित असलेल्या 30 हजार शाळांमध्ये वितरित केल्यानंतर सप्टेंबरमध्ये त्या प्रत्येक शाळेत तसेच इतर जास्तीतजास्त शाळांमध्ये फुटबॉल खेळला जाईल यासाठी प्रयत्न करणे.

•  स्थानिक लोकप्रतिनिधींसह आपल्या भागातील प्रतिथयश व्यक्ती मैदानात उतरून क्रीडा प्रसार व तंदुरुस्तीचा संदेश देतील.

•  देशातील हा क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम ठरेल.

•  आरोग्य, तंदुरूस्ती आणि आहाराबाबत जनजागृती होण्यास मदत. व्यसनाधीनतेच्या विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार निर्माण होणार आहे.

लेखिक: वर्षा फडके

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate