অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय हे शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अधिनस्थ राज्यस्तरीय कार्यालय असून,हे पुणे येथे स्थित आहे. या संचालनालय कडून राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या सर्व प्रशासकीय बाबींचे संनियंत्रण केले जाते.

याचबरोबर माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातंर्गत येणार्‍या सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा,त्यांचे प्रशासन,आर्थिक बाबी व शैक्षणिक बाबीसंबंधीचे संनियंत्रण या संचालनालयाच्या स्तरावरून केले जाते.

संचालनालयामार्फत चालणारे कार्य

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत मुख्यालयाच्या ठिकाणी विभागाच्या कामाचे प्रशासनिक,शैक्षणिक व मूल्यमापन या तीन निरनिराळ्या स्तरावरून अंमलबजावणी होते.शिक्षण संचालक यांचेकडून प्रशासकीय कामाचे नियंत्रण व समन्वयन केले जाते.शिक्षण संचालकांना त्यांच्या कामात शिक्षण सहसंचालक,शिक्षण उपसंचालक,सहाय्यक संचालक,सहाय्यक संचालक (लेखा),प्रशासन अधिकारी यांचे सहकार्य असते.

राज्यात शैक्षणिक प्रशासनाची त्रिस्तरीय पद्धत अवलंबिली असून ती राज्यस्तर,विभागस्तर व जिल्हास्तर अशी आहे.राज्यात शिक्षण उपसंचालकांचे आठ प्रशासकीय विभाग आहेत.विभागीय शिक्षण उपसंचालक यांना एक सहाय्यक संचालक,शिक्षण उपनिरीक्षक व विज्ञान सल्लागार शैक्षणिक बाबतीत सहाय्य करतात.

लेखाविषयक बाबीमध्ये लेखाधिकारी सहाय्य करतात.आस्थापना विषयक संदर्भात कनिष्ट प्रशासन अधिकारी सहाय्य करतात.विभागीय शिक्षण उपसंचालक हे मुख्यत: त्यांच्या विभागातील जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक/निरंतर(प्रौढ शिक्षण))व कनिष्‍ठ महाविद्यालये यासारख्या शासकीय व निमशासकीय शिक्षण कार्यालयाच्या कामकाजांवर नियंत्रण ठेवतात.

 

माहिती संकलक : अतुल पगार

 

अंतिम सुधारित : 5/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate