অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संपन्न व्यक्ती : संपन्न राष्ट्र!

संपन्न व्यक्ती : संपन्न राष्ट्र!

१२ जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती देशात युवा दिन म्हणून साजरी होते. युवादिनानिमित्त अल्पसे चिंतन करणारा हा विशेष लेख

दरवर्षी युवकांची संख्या वाढत असणारा आजचा जगातील सर्वात तरुण देश म्हणजे भारत. सांगायचं यासाठी की आज आपला देश खूप मोठ्या स्थानावर आहे आणि आगामी काळात महासत्ता होण्याची ताकद आपल्या देशात आहे ती या तरुणाईच्या जोरावरच.

युवकांनी केवळ पदवी घेऊन नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा स्वयंरोजगार केल्यास नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त होऊ शकते. मात्र आजही म्हणावा तसा प्रचार-प्रसार युवकांमध्ये झाला नाही. त्यामुळे युवा उद्यमींची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे.

जगात महासत्ता म्हणून स्थान निर्माण करायचे असेल तर आजच्या युवकांना संपत्तीची संकल्पना शिकून घ्यावी लागेल व त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करायला पाहिजे ज्याने राष्ट्र संपन्न आणि समृध्द होऊ शकेल.

अमेरिका आर्थिक महासत्ता तर आहेच सोबतच इतरही बाबतीत सर्वांपेक्षा अग्रेसर असणारा देश आहे. सोव्हिएत युनियन विसर्जित झाल्यानंतर अमेरिका एकमेव महासत्ता म्हणून समोर वाटचाल करताना आपणास दिसत आहे. रशियाची ओळख नव्याने निर्माण झाली मात्र आर्थिक समस्यांमुळे महासत्ता होणे रशियाला जमलेले नाही. आज जगात भावी महासत्ता म्हणून चीन आणि आपल्या भारताकडे बघितले जात आहे.

भारत आणि चीन यांची तुलना करायची झाली तर चीनने औद्योगिक क्षेत्रात खूप प्रगती केलेली आहे आणि आपल्या लोकसंख्येच्या रेट्याचा मनुष्यबळाच्या रुपात वापर करुन जागतिक बाजारपेठेत स्वत:चे असे स्थान निर्माण केले आहे.

आपल्या गेल्या काही वर्षात विशेषत: नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले तेव्हापासून मेक इन इंडियाच्या माध्यमातून औद्योगिकरणास चालना देण्यात आली आहे. बाहेरील कंपन्यांनी आपल्या देशात उत्पादन केल्यास आपल्याकडे मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती तर होणार आहे. सोबत सकल दरडोई उत्पन्न आणि विकास दरात वाढ होणार आहे.

मेक इन इंडिया अंतर्गत नव्या उद्योगांच्या तसेच नव्या व्यवसायांच्या संकल्पना घेऊन युवकांनी स्वयंरोजगारातून इतरांसाठी रोजगार निर्मिती करावी या भूमिकेतून 'स्टार्ट अप' आणि 'स्टॅन्ड अप' इंडिया या संकल्पनेला चालना देण्यात आलेली आहे.

छोटे छोटे व्यवसाय सुरु करणे शक्य व्हावे तसेच, आहे त्या व्यवसायांचा विस्तार करणे शक्य व्हावे या भूमिकेतून 'मुद्रा' कर्ज योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. या सर्वांचा लाभ तरुणांनी घेण्याची गरज आहे.

अमेरिका संपन्न असण्यामागील कारण तेथे संपत्तीची संकल्पना रुजलेली आहे. विविध मार्गांनी संपत्ती कमावण्याला अधिक महत्त्व द्यायची सवय प्रत्येक अमेरिकन व्यक्तीला आहे. त्याचे अनुकरण करुन संपन्न व्हा आणि देशालाही संपन्न बनवा इतकाच संदेश युवा दिनानिमित्त द्यावासा वाटतो.

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/20/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate