অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पारंपरिक व्यवसायांची माहिती

पारंपरिक व्यवसायांची माहिती

  • कथिलाच्छादित पत्रे
  • सामान्यपणे कथिलाचा मुलामा दिलेल्या पोलादी पत्र्याला किं वा पट्टीला कथिलाच्छादित पत्रा म्हणतात.

  • चर्मकलाकाम
  • प्राण्यांच्या कातड्यापासून विविध प्रकारच्या वस्तू बनविण्याची कला. ही फार प्राचीन असून सार्वत्रिक आहे.

  • जाळीकाम
  • दगडी फरश्यांमध्ये किंवा मातीच्या मोठ्या मुलायम चिपांमध्ये भोके पाडून त्यामध्ये लाकडाच्या उभ्याआडव्या पट्ट्या मारून तयार केलेल्या जाळ्यांचा वापर उष्ण कटिबंधात विशेषेकरून करण्यात आला.

  • धातुपत्राकाम
  • निरनिराळ्या धातूंच्या किंवा मिश्रधातूंच्या पत्र्याला थंड अवस्थेत ठोकून वा वाकवून हवा असेल तो आकार देऊन वाहनांचे, यंत्रांचे भाग तसेच बरण्या, डबे, व भांडी यांसारख्या वस्तू तयार करण्याच्या कामास धातुपत्राकाम म्हणतात.

  • भरतकाम
  • कोणत्याही वस्त्रप्रकारांवर सुती, रेशमी, लोकरी, जरतारी यासारख्या अनेक प्रकारच्या धाग्यांनी विविध प्रकारचे टाके घालून सुईने केलेले कलापूर्ण अलंकरण म्हणजे भरतकाम.

  • मेणकाम
  • मेणकाम : (वॅक्स वर्क). मेणापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध कलात्मक वस्तू तसेच मेणाचा एक माध्यम म्हणून उपयोग करून तयार करण्यात येणाऱ्या बाबींचा यात अंतर्भाव करण्यात येतो. रासायनिक दृष्ट्या मेण हे तेल व चरबी ह्या कार्बन संयुगांत मोडले जाते. प्राणी, वनस्पती व खनिज पदार्थ यांपासून ते उपलब्ध होते.

  • मेणबत्ती
  • मेणबत्ती : मेण, घन चरबी वा तत्सम पदार्थांनी तंतुमय वात संतृप्त होईपर्यंत (पूर्णपणे भिजेपर्यंत) वातीभोवती थर देऊन तयार होणाऱ्या दंडगोलाकार वस्तूस सामान्यतः ‘मेणबत्ती’ असे म्हणतात. मेणबत्त्या विविध आकारमानांच्या बनवितात.

  • लोहारकाम
  • भट्टीमध्ये लोखंडाच्या अगर पोलादाच्या लहान वस्तू लाल होईपर्यंत तापवून व ठोकून हाताने बनविण्याच्या कामास लोहारकाम म्हणतात.

  • सुतारकाम
  • लाकडाचा वापर करून त्याद्वारे मानवोपयोगी वस्तू तयार करण्याची कला म्हणजे सुतारकाम होय.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate