অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दिवाळी अंकातील कसदार साहित्य लुप्त

दिवाळी अंकातील कसदार साहित्य लुप्त

दिवाळी हा वर्षसण असतो. तेजाचे, प्रकाशाचे देणे घेऊन येणारी दिवाळी दिवाळी अंकांची एक समृद्ध परंपराही सोबत आणते. १९०९ साली का. र. मित्र यांनी ' मनोरंजन ' चा पहिला दिवाळी अंक काढला, तेव्हा त्यांना कल्पनाही नसेल की, आपण सुरू केलेला हा साहित्यिक उपक्रम थेट शंभरी गाठेल! दिवाळी अंक आज मराठी भूमीतील एक महत्त्वाची सांस्कृतिक घटना झाला आहे. मराठी माणसाला जितका दिवाळीतला खाद्यफराळ प्रिय, तितकाच बौध्दिक भूक भागवणारा हा शब्दफराळही प्रिय आहे. या दिवाळी अंकांनी महाराष्ट्राची जाणीव समृद्ध करण्याबरोबरच साहित्य परंपराही चांगल्या पद्धतीने जोपासली. अनेक नामवंतांचे पहिले लेखन दिवाळी अंकांतूनच प्रकाशित झाले आहे. किंबहुना दिवाळी अंकांनी अनेक लेखक घडवलेही आहेत. त्या त्या काळात झालेल्या महत्त्वपूर्ण घटना, चळवळी, वादविवाद, स्थित्यंतरे यांची सुस्पष्ट प्रतिबिंबे दिवाळी अंकांमधून उमटलेली आहेत.

प्रारंभीचे अंक निखळ साहित्याला वाहिलेले असत. पण कालांतराने विषयांचे वैविध्य हे दिवाळी अंकांचे वैशिष्ट्य बनू लागलेले दिसते. आरोग्य, ज्योतिष, पर्यावरण, पर्यटन, सौंदर्योपचार, आयुर्वेद, चित्रपट, छोटा पडदा, विज्ञान-तंत्रज्ञान, स्त्रीविषयक, कामगार, रंगभूमी, वास्तुविषयक, शैक्षणिक, बालवाचकांसाठी, संगीत, उद्योग...अशा अनेकानेक विषयांचे अंक प्रकाशित होतात. अलीकडे बहुतेक वृत्तपत्रेही आपला दिवाळी अंक प्रकाशित करतात. माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात दिवाळी अंकसुद्धा नेटवर पोचले आहेत. परदेशात राहणा-या मराठी मंडळींची त्यामुळे चांगलीच सोय झाली आहे. एवढेच नव्हे तर आता दृकश्राव्य दिवाळी अंक आहेत. या साºयांचा एकत्रित विचार करताना दिवाळी अंकाच्या या परंपरेला मानाचा मुजरा करावासा वाटतो.

शंभर वर्षांच्या वाटचालीत दिवाळी अंकांनीही चढउतार अनुभवले आहेत. दिवाळी अंकांची आजवरची सशक्त साहित्यिक-सांस्कृतिक धारा, दिवसेंदिवस अशक्त बनत चालली आहे गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकाच्या संख्येत लक्षणीय भर पडलेली असली आणि त्यांच्या बाह्य सजावटीत कमालीचा फरक पडलेला असला तरी दिवाळी अंकांचा मूळ गाभा असलेलं साहित्य मात्र दिवसेंदिवस आपला आत्मा हरवत चाललं आहे. कारण गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात काय होतं, ते यावर्षी आपल्याला आठवत नाही. अर्थात आताच्या दिवाळी अंकांत प्रकाशित होणारं सारंच साहित्य वाईट असतं, असं नाही. कदाचित हा काळाचा परिणामही असू शकतो. साठ-सत्तर-ऐंशी ही दशकं जशी एकूण साहित्यासाठी पोषक होती, तशीच ती दिवाळी अंकांसाठीही पोषक होती. कारण याच काळात मोठ्या प्रमाणावर साहित्यिक-सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय उलथापालथी होत होत्या.

प्रत्येकाला आपल्या जाणिवा-संवेदना नव्याने तपासून पाहाव्या लागत होत्या. एकूणच सामाजिक उत्थानाचा हा काळ होता आणि तो त्या काळातील लेखकांनी आपल्या लेखनात पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच प्रतिबिंब तत्कालीन दिवाळी अंकांतही उमटलेलं दिसतं. मात्र १९९०नंतर भारतात आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाची आलेली लाट आणि या साऱ्याचा एकूणच जगण्यावर आणि जीवनशैलीवर मोठा परिणाम झालेला असतानाही, वाचकाला हादरवून सोडेल, त्याच्या काळजावर प्राणांतिक खोल जखम करेल असं कुठलंच साहित्य ना दिवाळी अंकांत आलं, ना स्वतंत्रपणे प्रकाशित झालं. आजवरच्या मोजक्याच दिवाळी अंकानी एकूणच महाराष्ट्रातील सर्व पातळ्यांवरच्या वाचकांची चांगलं काही वाचण्याची जी भूक भागवली होती, ती भूक आजचे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रसिध्द होणारे हजारो दिवाळी अंक भागवतात का, हा संशोधनाचा विषय आहे. आज लिहिणाऱ्यांची संख्या वाढलीय, त्यांच्यासाठी दिवाळी अंकांचं व्यासपीठही उपलब्ध आहे, परंतु एखाद्या समस्येचा, कथाविषयाचा सर्वंकष धांडोळा घेण्याचं प्रमाण फार अल्प आहे.

खरंतर विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत बहुतेक दिवाळी अंक ट्रॅकवर होते. त्यांनी मराठी वाचकांची रुची जाणीवर्पूक घडवली होती आणि त्याला काळानुरूप आपल्या स्वरूपात केलेला केलेला बदल कारणीभूत होता. त्यावेळी फडके-खांडेकरांपासून केशवसुत-गोविंदाग्रजांपर्यंत ते ग.त्र्यं. माडखोलकर-र.वा. दिघ्यांपासून भा.रा. तांबे-माधव ज्युलियनांपर्यंत अनेक नामवंत कथा-कादंबरीकर व कवींनी त्यावेळच्या वेगवेगळ्या दिवाळी अंकांतून महत्त्वाचं लेखन केलेलं दिसतं. पूर्वी अंकाची अनुक्रमणिका व त्यातील साहित्यकारांची नावे पाहून अंक किती दर्जेदार आहे हे समजायचे.

एकेकाळी याच दिवाळी अंकांतून व्यंकटेश माडगूळकर, खानोलकर, अनिल अशा महान प्रतिभावंतांची ओळख झाली होती. अंकाच्या गुणवत्तेच्या कसोट्याही आता बदललेल्या आहेत. पहिली कसोटी अभिजात साहित्याची आणि दुसरी कलात्मक निर्मितीची. आजतरी अंकाचे दोनच प्रकार दिसतात. एक वाचायचे अंक आणि पाहायचे अंक.१०७ वर्षांच्या दिवाळी अंकांच्या परंपरेत मागे वळून पाहिले, तर १९८० पर्यंत दिवाळी अंकांच्या संपादकांचा वाड्मयीन अधिकार व धाक जाणवत होता.त्या काळातील संपादकांनी महाराष्ट्राची एक वाड्मयीन अभिरुची तयार केली. संपादक-लेखक यांच्या सतत भेटी, चर्चा व्हायच्या. वादविवाद व्हायचे. एका बाजूला कलावाद, सौंदर्यवाद, सुबकता, तर दुसर्‍या बाजूला साम्यवाद आणि एक धग धुमसत होती. या दोन विचारप्रवाहांचे लोक आपली बाजू ज्या बौद्धिक कौशल्याने सांस्कृतिक उंचीवर नेत होते, ते पाहता दोन्ही विचारांचा आदर करावा, असा एक प्रवाह तयार झाला. तो निखळ आनंद घेत होता. यातले आता काही उरले नाही.

लेखक : अतुल पगार (मास्टर्स ऑफ जर्नालिझम)

अंतिम सुधारित : 7/26/2023

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate