অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारतीय पुराणकथा

भारतीय पुराणकथा

यूरोपमध्ये ख्रिस्ती धर्माच्या आगमनामुळे ग्रीक कथांचा प्रवाह जसा खंडित झाला, तसा भारतीय पुराणकथांचा प्रवाह मात्र कधीही खंडित झालेला नाही; वैदिक काळापासून ते थेट आधुनिक काळापर्यंत तो सलगपणे विकसित होत आला आहे. वैदिक पुराणकथांपेक्षा पुराणे व महाकाव्ये यांतील पुराणकथा बदललेल्या स्वरूपात आढळत असल्या, तरी मूळ प्रवाह पूर्णपणे अवरुद्ध झाल्याचे आढळत नाही. बौद्ध व जैन यांनी मूळ प्रवाहातील काही पुराणकथा उचलल्या आणि काही नवीन निर्माण केल्या; परंतु या कथांबरोबरच हिंदू कथांचा मूळ प्रवाहही स्वतंत्रपणे वाहत होताच. तसे पाहिले, तर कोणत्याच समाजाच्या पुराणकथा या एकजिनसी नसतात आणि भारतीय कथाही या  नियमाला अपवाद नाहीत. परंतु असे असूनही भारतासारख्या विशालकाय व विविधतेने भरलेल्या देशात राष्ट्रीय व सांस्कृतिक एकात्मता निर्माण करण्याचे महान कार्य भारतीय पुराण कथांनी प्राचीन काळापासूनच केले आहे. ईश्वराचे सान्निध्य वा ईश्वराशी ऐक्य साधणे, हा अनेक भारतीय पुराणकथांचा मुख्य उद्देश असल्याचे दिसून येते. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, वैष्णव, शैव, पाशुपत, तंत्रमार्ग इत्यादिकांनी आपापल्या पुराणकथा निर्माण केल्याचे दिसते. मूळच्या  एका कथेची या विविध मार्गांतून रूपांतरे झाल्याचेही आढळते. काळाच्या ओघात या पुराणकथांतून अनेक बदल झाल्याचेही आढळते. उदा., वैदिक काळातील दुय्यम प्रजापतीला  ब्राह्मणकाळात आणि विष्णूला पुराणकाळात प्राधान्य आले, तर वैदिक काळातील प्रधान अशा इंद्राला पुराणकाळात तुलनेने गौणत्व आले. अशा रीतीने काळाच्या ओघात बदलत व वळणे घेत घेत विकसित झालेला पुराणकथा हा भारतीय संस्कृतीचा विभाग अत्यंत समृद्ध आहे.

संदर्भ  : 1 Aldington, Richard; Ames, Delano; Trans. New Larousse Encyclopaedia of Mythology, Mythology, London, 1975.

2.Bolle, K. W. The Freedom of Man in Myth,Mashhville, Tenn. 1968.

3. Campbell, y3wuoeph, The Masks of God, 4 Vols. London,1959-68.

4. Dandekar, R.N.Vedic Religion and Mythology, Poona, 1965.

5 Dent, J. M ;Dutton, E. p. Everyman’s Dictionary of Non- Classical Mythology, New York, 1952.

6. Eliade,Micera; Trans. Myth and Reality, New York,1963.

7. Frazer,J.G.The Golden Bough, New York, 1922

8. Gray, L. H. Ed. The Mythology of all  Races, 13 Vols., Boston 1925-36.

9. Hackin ,J.; Huart Clement & other, trans , Atkinson, F, M, Asiatic mythology, London, 1967.

10. Hooke, S.H. Ed. Myth and Ritual, New York, 1933.

11. Ions, Veronica, Indian Mythology, London, 1967.

12. James, e.o Prehistoric, Religions London, 1957.

13. Jensen, a,e Trans. Myth and Cult among Primitive Peoples, New York, 1963.

14.  Jung, C.G. Kerenyi, K. Trans. Essays on a Science of Mythology, New York, 1950.

15.  Kramer, S.H. Ed ,Mythologies of the Ancient World , Creation, New York 1961.

16. Long C.H.Alpha : The Myths of Cretion, new York, 1963.

17. Malinowaski, Bronislaw Magic, Science and Religion and other Essays, Bosyon, 1948.

18. Malinoyaski Bronislaw Sex, Culture and Myth  ,London 1963.

19. Middleton, John, Myth and Cosmos: Readings in Mythology and Symbolism New York, 1967.

20. Picard, B.L Ed. The Enclcopadia of Myth & Lagends of All Nations, London 1962.

21. Savill, Sheila Ed. Barker Mary: Cook, Christopher Pears Encyclopaedia of Myth and Lagends,  4. Vols., London, 1976-78.

लेखक: आ. इ. साळुंखे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate