অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सद्दनीति ( शब्दनीती )

सद्दनीति ( शब्दनीती )

पाली भाषेचा आदय व्याकरणकार मानला जाणारा कच्चयन आणि पाली व्याकरणकार मोग्गल्लन ह्यांच्या अनुकमे कच्चयन-व्याकरण आणि मोग्गल्लान-व्याकरण ह्या गंथांनंतर पाली व्याकरणाची तिसरी पंरपरा सुरू करणारा विद्वत्तापूर्ण व्याकरणगंथ. ह्या गंथांचा कर्ता अग्गवंस हा ब्रह्मदेशातील ( विदयमान - म्यानमार ) अरिमद्दनपूर ( हल्लीचे पगान - पूगाम ) येथील रहिवासी असून त्या देशाचा राजा नरपतिसिथु ह्याचा गुरू होता, असे दिसते. हा गंथ इ. स. ११५४ च्या  सुमारास सिद्ध झाला, अशी समजूत आहे. ह्या गंथाचे ‘ पदमाला ’, ‘ धातुमाला ’ व ( सूत्रमाला ) असे तीन विभाग व २७-२८ परिच्छेद आहेत. सद्दनीती लिहिणाऱ्याने समग पाली वाङ्मयाचे त्रिपिटक, अट्ठकथा, त्रिपिटकबाह्य प्रकरण गंथ व त्यांवरील साहाय्यभूत गंथ आदींचे आलोकन करून त्यांतून उदाहरणे दिलेली आहेत. त्यामुळे हा गंथ दक्षिण आशियातील बौद्ध देशांत मान्यता पावलेला आहे. कच्चयन, पाणिनी आदींच्या गंथांचा आधार घेऊनच हा गंथ तयार केलेला आहे.

लेखक: पु. वि. बापट

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate