অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साहित्यसमीक्षा (लिटररी क्रिटिसिझम)

साहित्यसमीक्षा (लिटररी क्रिटिसिझम)

ह्या लेखन प्रकारात सामान्यत: पुढील लेखनाचा समावेश केला जातो : साहित्यविषयकप्रश्नांची चर्चा करणारे लेखन व साहित्याच्या संदर्भातील सैद्घांतिकस्वरुपाचे लेखन हे स्थूलमानाने तात्त्विक ( थिअरेटिकल ) समीक्षेत मोडते;तर विशिष्ट साहित्यकृतीचे स्वरुप, तिचे मर्म, तिचे रहस्य विशद करणारेलेखन, तसेच विशिष्ट साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण करणारे लेखनहे उपयोजित ( ॲप्लाइड ) समीक्षेत मोडते. तद्वतच एखाद्या लेखकाच्यासंपूर्ण साहित्याचे मूल्यमापन करणारे लेखन, तसेच लेखनतंत्राचा उलगडाकरणारे लेखन ह्यांचा समावेशही स्थूलमानाने उपयोजित समीक्षेत केलाजातो. अर्थातच वरील वर्गवारी व त्याखाली समाविष्ट केले जाणारेलेखनप्रकार ह्यांच्यात निश्चित व काटेकोर अशी सीमारेषा आखता येतनाही; कारण सैद्घांतिक स्वरुपाच्या समीक्षेतही विशिष्ट साहित्यकृती वलेखक यांचे संदर्भ तसेच विवरण-विश्लेषण येणे जसे स्वाभाविक ठरते;तद्वतच उपयोजित समीक्षेतही सैद्घांतिक चर्चा त्या विशिष्ट लेखकाच्यासाहित्यकृतीच्या अनुषंगाने येणे हे कित्येकदा अपरिहार्य ठरते.

साहित्यसमीक्षेचे आद्य उद्दिष्ट म्हणजे सम्यक् आकलन अथवा दर्शनहे असते. त्यात त्या साहित्यकृतीचे अर्थग्रहण हे प्रथम येते. त्यानंतरतिचे गुणग्रहण, रसग्रहण, मर्मग्रहण, सौंदर्यग्रहण ह्या गोष्टी येतात; परंतुसमीक्षा एवढ्यावरच थांबत नाही. ती साहित्यकृती ज्यासाहित्यप्रकारातमोडते, त्या साहित्यप्रकारातील अन्य कृतींमध्ये तिचे स्थान काय आहे,ती त्या कृतींहून श्रेष्ठ असल्यास तिची श्रेष्ठता वा महात्मता कशात आहे,हेही समीक्षक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे समीक्षेचे दुसरेउद्दिष्ट साहित्यकृतीचे मूल्यमापन हे ठरते. त्यातून वाचकांच्या अभिरुचीलावळण लावण्याचे उद्दिष्टही अप्रत्यक्षपणे वा अनुषंगाने साधते; तथापिह्यावरुन समीक्षा ही परार्थच असते, असे म्हणता येत नाही; कारणसमीक्षा हा एक शोध आहे. कोणत्याही साहित्यकृतीचे स्वरुप, तिचीवैशिष्ट्ये, तिचे सौंदर्य, तिच्या महात्मतेचे रहस्य ह्यांचा शोध समीक्षक स्वत:साठी घेत असतो. ते त्याचे प्रकट चिंतन असते. कोणतीही साहित्यकृती ही स्वत:चे नियम आणि तंत्र घेऊन अवतीर्ण होते, ते समजून घेणेहे समीक्षेचे खरे कार्य आहे. त्यामुळे समीक्षा ही परार्थ नसून स्वार्थचअसते, असेही मत मांडले गेले आहे.

समीक्षेची जी विविध उद्दिष्टे आहेत, त्यांना अनुसरुन –उदा., सम्यकआकलन-दर्शन आणि मूल्यमापन ही उद्दिष्टे–समीक्षेचे वेगवेगळे प्रकारआणि तिच्या पद्घती निष्पन्न होतात. उदा., साहित्यसमीक्षेच्या आकलन-दर्शनासाठी अर्थग्रहणादी ज्यापाच पायऱ्या वर निर्देशिल्या आहेत,त्यांतील अर्थग्रहण ही पायरी घेतली, तरी केवळ अर्थलापनिकेस प्राधान्यदेणारा संस्कृत टीकेचा प्रकार समोर येतो. हे करण्यास साहित्यकृतीचीमूळ अधिकृत संहिता अगर पाठ निश्चित करणे आवश्यक असते. तेकरणारा समीक्षाव्यापार हा  पाठचिकित्सा  ह्या नावाने ओळखलाजातो; मात्र पाठचिकित्सेच्या आधारे मूळ अधिकृत संहिता निश्चितकरणाऱ्या लेखनाचा समावेश साहित्यसमीक्षेत केला जात नाही. अर्थलापनिकेला जवळचा असलेला समीक्षाप्रकार हा आलंकारिक समीक्षेचावा टीकेचा ( ऱ्हेटॉरिकल क्रिटिसिझम ) म्हणता येईल. विशिष्ट काव्यकृतीचे गुण आणि अलंकार ही जी अंगे आहेत, त्यांची चर्चा करणारी हीसमीक्षा होय. साहित्यसमीक्षेच्या काही प्रकारांचे विवेचन पुढे केले आहे.

रुपनिष्ठ समीक्षा

अर्थग्रहणात्मक टीकेपेक्षा व्यापक अशा स्वरुपाचीटीका म्हणजे एखाद्या साहित्यकृतीचे साकल्याने रुपदर्शन घडविणारीटीका होय. ह्या समीक्षेत एखाद्या साहित्यकृतीची तांत्रिक अंगे तसेच त्यासाहित्यकृतीचा आकार वा रुपबंध (फॉर्म ) ह्यांचा विचार करण्यातयेतो. उदा., एखाद्या  सुनीताच्या १४ ओळींचे दोन विभाग ८–६ अशापंक्तींचे घडतात, की १२–२ अशा पंक्तींचे, त्यातील यमकरचनाकोणत्या पद्घतीची आहे, कलाटणी कोठे येते इ. विचार हा त्या सुनीताच्यातांत्रिक अंगाचा विचार होय. साहित्यकृतीचा आकार वा रुपबंध हातिच्यातील आशयाला किती अनुरुप आहे, तो प्रमाणबद्घ आहे कीनाही, त्या साहित्यकृतीची अंगे परस्परानुकूल, सुसंगत आणि त्यासाहित्यकृतीच्या रुपबंधाशी वा आकृतीशी योग्य प्रमाण साधणारी आहेतकी नाही, त्या सबंध कृतीला एकात्मता लाभलेली आहे की नाही, तीएक संपूर्ण आणि स्वयंपूर्ण वस्तू ठरते का इ. विचार हा आकारिक वारुपवादी ( फॉर्मल ) समीक्षेचा गाभा आहे. साहित्यकृतीचा रुपबंध हासाहित्यसमीक्षेच्या केंद्रस्थानी असतो. साहित्यकृतीचा रुपबंध हा सेंद्रिय (ऑर्‌गॅनिक ) असतो. साहित्यकृती म्हणजे तिच्या घटका-घटकांमधीलपरस्परसंबंधांची एकात्म संघटना असते आणि ती एक स्वायत्त, स्वयंपूर्णवस्तू असते, ही रुपवादाची तात्त्विक भूमिका होय.

न्यायिक समीक्षा

समीक्षा जसजशी प्रगत होत जाते, तसतशीतिला साहित्यातील सौंदर्यसाधनेविषयी काही रहस्ये वा नियम अवगतहोत जातात. त्यातून साहित्याचे एक शास्त्र निर्माण होत जाते. त्याचे ग्रंथनिर्माण होतात आणि त्या शास्त्राचे नियम म्हणजे साहित्यव्यवहारातीलकायदे होऊन बसतात व साहित्यकृतीच्या यशापयशाविषयीचे निर्णयया कायद्यांना धरुन दिले जातात. म्हणून ह्या प्रकारच्या समीक्षेस ‘न्यायिक समीक्षा ’ (ज्यूडिशिअल क्रिटिसिझम ) असे म्हटले जाते. पण अशी समीक्षा कडक, ताठर आणि ठराविक चौकटीतच वावरणारीअशी होते आणि चौकटीबाहेरील काही करु पाहणाऱ्या साहित्यकृतीवरतिच्याकडून अन्याय होण्याचा संभव असतो.

आस्वादक समीक्षा

काटेकोर नियमांना धरुन समीक्षेचे कार्यकोरडेपणाने न करता ते सहानुभूतीने व रसिकतेने केले पाहिजे, ह्या विचारातूनआस्वादक समीक्षा जन्माला आली. समीक्षा म्हणजे एक आस्वादनहोय. समीक्षकाची भूमिका आस्वादकाची असली पाहिजे. प्रत्येक साहित्यकृती ही एक स्वतंत्र व अनन्यसाधारण अशी निर्मिती असते. तिची स्वत:चीअशी काही वैशिष्ट्ये असतात. समीक्षकाने त्यांचे ग्रहण करुन त्यांचाआस्वाद घ्यावयाचा असतो. रसिकतेने घेतलेल्या ह्या आस्वादाचे त्याच्यामनावर झालेले परिणामही अशा समीक्षेत तो नोंदवू शकतो.

चरित्रात्मक समीक्षा

आतापर्यंत उल्लेखिलेल्या समीक्षेच्याप्रकारांचे लक्ष्य बहुतांशी साहित्यकृती हेच असते; परंतु प्रत्येक साहित्यकृती ही विशिष्ट स्थळ-काळ-परिस्थितीशी ज्याचेजीवन संबद्घ झालेलेअसते, अशा एका व्यक्तीची निर्मिती असते आणि त्या स्थळ-काळ-परिस्थितीने घडविलेल्या त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तित्वाचे प्रतिबिंब त्याच्यासाहित्यकृतीत पडलेले असते. त्याची शैलीही त्याच्या व्यक्तित्वातूनचआकाराला आलेली असते. त्यामुळे साहित्यकृतीचे आकलन, अर्थनिर्णयनआणि मूल्यमापनही त्याच्या जीवनाच्या तपशिलांच्या जाणकारीने शक्यहोते, अशी चरित्रात्मक समीक्षेची भूमिका आहे; मात्र अशा समीक्षेचाअवलंब विवेकानेच व्हायला हवा. साहित्यकृतीतील लहानसहान तपशिलांचा संबंध प्रत्येक वेळी साहित्यिकाच्या जीवनातील घटनांशी लावणेधोक्याचे ठरेल. त्याचे विश्वसनीय चरित्र उपलब्ध असेलच असे नाही आणिअसलेच तर, त्यात त्याचे अंतर्जीवन स्पष्ट झालेले असेलच असे नाही.त्याच्या साहित्यकृतीचा संबंध तर त्याच्या अंतर्जीवनाशीच अधिक असतो.

समाजशास्त्रीय समीक्षा

साहित्यिक ज्यासमाजात जन्मालाआलेला असतो, त्याचे संस्कार त्याच्यावर सातत्याने होत असतात. त्यामुळेसाहित्यिक आणि त्याचा समाज ह्यांच्यातील संबंध दुर्लक्षून चालत नाहीत.ह्या विचारातून समाजशास्त्रीय समीक्षा निर्माण झाली. फ्रेंच समीक्षक,इतिहासकार आणि तत्त्वज्ञ  इपॉलिस आदॉल्फ तॅन  (१८२८–९३)ह्याने साहित्यकृतीची चिकित्सा करण्यासाठी वंश, परिस्थिती आणि क्षणहे तीन घटक अभ्यासिले पाहिजेत, असा विचार मांडला. ‘वंश’ म्हणजेलेखकाचे उपजत आनुवांशिक गुण; त्याची सामाजिक-राजकीय-भौगोलिकपार्श्वभूमी म्हणजे ‘ परिस्थिती ’ आणि ज्याऐतिहासिक परिस्थितीत लेखकलिहित असतो, तिला तॅन ‘ क्षण ’ म्हणतो.

मार्क्सवादी समीक्षा

समाजशास्त्रीय समीक्षाप्रकारात मार्क्सवादाचा उल्लेखही आवश्यक आहे. एक सर्वांगीण जीवनदर्शन मांडण्यासाठीउभ्या ठाकलेल्या  मार्क्सवादाने अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र ह्याक्षेत्रांत स्वत:ची एक ठाम भूमिका मांडली. ह्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादीसाहित्यसमीक्षा निर्माण झाली.  कार्ल मार्क्स  (१८१८–८३) आणि फ्रीड्रिख एंगेल्स  (१८२०–९५) ह्यांनी विरोधविकासात्मक भौतिकवाद आणि ऐतिहासिक भौतिकवाद ह्यांच्या आधारे कलेची व साहित्याचीमीमांसा केली. त्यातूनच मार्क्सवादी समीक्षा आकाराला आली. साहित्यही एक स्वतंत्र आणि समाजनिरपेक्ष अशी वस्तू आहे, असे मार्क्सवादीसमीक्षेने मानले नाही. साहित्यसमीक्षेची स्वतंत्र मूल्ये न मानता, सामाजिकमूल्येच त्यासाठी अधिकृत मानावी, हा मार्क्सवादी दृष्टिकोण होता.साहित्याने वास्तवाचे म्हणजे आर्थिक-सामाजिक वास्तवाचे दर्शनघडविले पाहिजे, भांडवलशाहीने निर्माण केलेल्या आत्यंतिक व्यक्तिवादातून फोफावलेला ‘कलेसाठी कला’ हा कलावादी संप्रदाय तसेचरुपवादी संप्रदाय स्वीकारु नये, साहित्याचे प्रयोजन साम्यवादी समाजरचनाअस्तित्वात आणण्यास पोषक असले पाहिजे, श्रमजीवी बहुजन वर्गासाठीते असल्यामुळे ते सुबोधही असले पाहिजे, त्यात अध्यात्मवादाला स्थानअसू नये, अशी मार्क्सवादी समीक्षादृष्टीची काही वैशिष्ट्ये सांगता येतील.कलेचा विचार करताना तिच्या सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक संदर्भांचा,म्हणजेच तिच्या ऐतिहासिक आशयाचा विचार करावाच लागतो; कारणत्यातूनच ती निष्पन्न होत असते, हे मार्क्सवादी समीक्षेचे मूलभूत प्रमेयहोय. साहित्यकृती वा कलाकृती ह्या पूरोभूमीवर, तर सामाजिक-आर्थिकपरिस्थिती पार्श्वभूमीवर असते, हे पारंपरिक मार्क्सवादी समीक्षेने मानलेलेमुख्य गृहीतक आहे.

मानसशास्त्रीय समीक्षा

विख्यात मानसशास्त्रज्ञ आणिमनोविश्लेषणपद्घतीचा निर्माता  सिग्मंड फ्रॉइड  (१८५६–१९३९)ह्याचे ग्रंथ प्रसिद्घ झाल्यानंतर त्यांचा साहित्यसमीक्षकांवरही प्रभाव पडलाआणि त्यातून मानसशास्त्रीय साहित्यसमीक्षा उदयास आली. फ्रॉइडच्याकल्पनांचा साहित्यसमीक्षकांवरील पहिला प्रभाव म्हणजे साहित्यिकाच्याआंतरिक जीवनाचा, त्यातील आंतरिक संघर्षांचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनेत्याच्या साहित्यकृतीकडे पाहणे. फ्रॉइडने माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची ज्यातीन भागांत विभागणी केली, त्यांतील  इदम्  किंवा सुप्तात्मा ( इड )हा भाग त्याने माणसाच्या अबोध मनाचे प्रतिनिधित्व करणारा मानला.माणसाच्या अनेक इच्छा, वासना, विकार ह्या इदम्‌मध्ये वास्तव्य करुनअसतात. लेखकाच्या विशिष्ट साहित्यकृतीतून ह्या इदम्‌चा आविष्कारअप्रत्यक्षपणे कसा घडतो, हे पाहण्यात समीक्षकांना स्वारस्य निर्माण झाले.स्वत: फ्रॉइडने प्रख्यात प्रबोधनकालीन कलावंत  लिओनार्दो दा व्हींची   ह्याच्या कलाकृतींचा मनोविश्लेषणशास्त्राच्या आधाराने लिओनार्दो दाव्हींची  (१९१६) या ग्रंथातून सूक्ष्म वेध घेतला. मनोविश्लेषणाच्याआधारे कलानिर्मितीविषयीचे सिद्घांत मांडले गेले.

आदिबंधात्मक समीक्षा

मानसशास्त्रीय समीक्षेच्या विकासाच्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रभावस्रोत म्हणजे  कार्ल युंग(१८७५–१९६१) हा मानसशास्त्रज्ञ होय. युंगने आदिबंधाची वा मूलबंधाची संकल्पना मांडली. त्याने ‘ऑन द रिलेशन ऑफ अनॅलिटिकलसायकॉलॉजी टू पोएटिक आर्ट’ ह्या आपल्या निबंधात असे दाखवूनदेण्याचा प्रयत्न केला, की काही कवितांचे भावनात्मक आवाहन वाचकांकडे विशेष तीव्रतेने पोचते. ह्याचे कारण वाचकांच्या मनातल्या अबोध (अन्‌कॉन्शस) शक्ती त्या कवितांमुळे उत्तेजित होतात. ह्या शक्ती म्हणजेकाही ‘आदिबंध’ वा ‘मूलबंध’ (आर्किटाइप्स) आणि ‘मूलप्रतिमा’ वा ‘आद्यतन प्रतिमा’ (प्रिमॉर्डिअल इमेजिस) होत. माणसांच्या सामूहिकअबोधात (कलेक्टिव्ह अन्‌कॉन्शस) मानवजातीच्या अनेक पिढ्यांच्याएकाच प्रकारच्या असंख्य अनुभवांचे साठलेले अवशेष असतात. तेकाही विशिष्ट प्रतिमांमधून संघटित आणि साकार होतात. हे साकारणेज्याआदिम आकृतिबंधाकडून होते, त्याला आदिबंध वा मूलबंध अशीसंज्ञा आहे. युंगने अशा अनेक प्रकारच्या आदिबंधांचे स्वरुप स्पष्ट केले.मॉड बॉडकिन ह्या मानसशास्त्राच्याप्राध्यापिकेने युंगप्रणीत आदिबंधाच्यासिद्घांताचा आधार घेऊन आर्किटायपल पॅटर्न्‌स इन पोएट्री (१९३४)हा ग्रंथ लिहिला.या ग्रंथाने मानसशास्त्रीय साहित्यसमीक्षेचा एक महत्त्वाचाभाग असलेल्या आदिबंधात्मक समीक्षेचा पाया घातला. फ्रेंच मनोविश्लेषणवादी सिद्घांतकार झाक लाकाँ (१९०१–८१) ह्याने साहित्यकृती, संरचना, तिच्यामधून जाणवणारे अबोध अर्थ इत्यादींचा विचारकेला. संहिता आणि वाचक ह्यांच्यातील परस्परसंबंध ह्याचाही त्यानेविचार केला. फ्रॉइडच्या अबोध मनाच्या वा नेणिवेच्या सिद्घांताला पुढेनेणारे विचार त्याने मांडले व १९५९ मध्ये पॅरिस येथे त्याने ‘नीओ-फ्रॉइडियन’ ( नव-फ्रॉइडवादी ) गटाची स्थापना केली.

साहित्याचे सौंदर्य कशात असते, ह्यासंबंधीच्या काही पूर्वकल्पनाअसल्यास त्या सौंदर्याचे ग्रहण वाचक-रसिकांस सुलभ होते. अशा पूर्वकल्पना साहित्यविमर्शकांनी वेळोवेळी प्रकट केल्या असल्याचे दिसूनयेते आणि ह्या पूर्वकल्पनांतूनच साहित्याचे शास्त्र घडत जाते. आपल्याकडेसंस्कृत साहित्यशास्त्रात मांडण्यात आलेले साहित्यकृतीच्या रीतीविषयीचेविचार वा  रीतिसिद्घांत,  रससिद्घांत इत्यादींची मांडणी म्हणजेसाहित्यसौंदर्याचे घटक काय आहेत, हे सांगण्याचेच प्रयत्न होते. हेविचार सुटे सुटे मांडणे किंवा ह्या सर्वांची एका व्यापक अशा उपपत्तीमध्येमांडणी करणे, हेही समीक्षेचेच कार्य असून ते तिच्या आद्य उद्दिष्टाशीसुसंगत असेच आहे. साहित्याचा केवळ सौंदर्याचा नव्हे, तर मुळातसाहित्य म्हणजे काय हे सांगण्याच्या अधिक मूलगामी अशा स्वरुपाचासमीक्षेत अंतर्भाव होतो.

ह्यांशिवाय साहित्यविषयक अनेक प्रश्नांची चर्चा करणे, हेही समीक्षेचेकार्य ठरते. उदा., साहित्यापासून आपण कोणत्या अपेक्षा करतो ? साहित्याच्या आस्वादनाने केवळ आल्हादाचा अनुभव द्यावा, की काहीबोधही व्हावा ? आल्हादाचा अनुभव द्यावयाचा असलाच, तर तोकेवळ मनोरंजनाच्या स्वरुपाचा असला तरी चालेल, की तो त्यापेक्षाअधिक उच्च , म्हणजेमानवी जीवनदर्शनाचा वा मनुष्याच्या भावजीवनाचाअसावा ? बोध असला, तरी त्या बोधाला नैतिक आग्रहाचे स्वरुपअसावे, की भावबंधमोचनाचे अथवा परतत्त्वस्पर्शाचे असावे ? इ.अनेक प्रश्न साहित्यिक चर्चेच्या कक्षेत येतात.

साहित्यशास्त्रावरील ग्रंथ हे समीक्षेला साहाय्यभूत होतात. साहित्याचेविविध प्रकार आणि त्यांचे उद्‌गम-विकास ह्यांचा मागोवा घेणारे इतिहास-ग्रंथही साहित्यसमीक्षेस साहाय्य करतात; कारण त्यांतून त्या-त्याप्रकारच्या वाङ्‌मयाची अवस्थांतरे, त्यांची कारणे, त्यांतील विविध परंपराइत्यादींची माहिती मिळते व तीवरुन त्या-त्या वाङ्‌मयप्रकाराची प्रवृत्ती आणि प्रक्रिया यांच्याविषयी कल्पना येऊ शकते; तसेच एखाद्या विशिष्टकालातील व विशिष्ट परंपरेतील एखाद्या विशिष्ट साहित्यकृतीचे स्वरुपअधिक यथार्थतेने समजू शकते. ह्या इतिहासग्रंथांत साहित्यातील मूलतत्त्वांचा विकास आणि त्यांतील अवस्थांतरे सांगणारे ग्रंथही येऊशकतात आणि शेवटी साहित्यसमीक्षेचाही इतिहास लिहिला जाऊ शकतो.

साहित्यसमीक्षकाविषयीही काही विचार करणे ओघानेच येते. साहित्यही सुसंस्कृत समाजाची एक महत्त्वाची गरज आहे. किंबहुना समृद्घसाहित्य, साहित्यविषयक आस्था, उत्साह एखाद्या समाजात किती आहे,ह्यावरुन त्या समाजाच्या सुसंस्कृतपणाचा स्तर आपण जाणू शकतो.उत्तम समीक्षक साहित्याविषयीचे प्रेम समाजात वृद्घिंगत करुन, साहित्यनिर्मितीबदृल स्वारस्य निर्माण करुन ह्याबाबत मोलाचे योगदान देऊशकतो. निरनिराळ्या साहित्यकृती साहित्याविषयीचे जे प्रश्न उपस्थितकरीत असतात, त्यांची उत्तरे शोधण्यात त्याची जिज्ञासा कार्यरत असते.साहित्यकृती समजून घेण्यासाठी व्यासंगाबरोबरच आवश्यक असलेलीसह्र दयताही त्याच्यापाशी असते. एखाद्या साहित्यकृतीची शक्तिस्थानेकोणती आहेत, हे जसे तो सांगू पाहतो, तसेच एखाद्या साहित्यकृतीचेअपयश कशात आहे हेही तो स्पष्ट करु पाहतो.साहित्याच्या प्रेमापोटीशोधक वृत्तीने केलेली ही समीक्षा लेखकाला जशी मार्गदर्शक ठरते,तशीच ती वाचकांची अभिरुची समृद्घ करण्यासाठी, त्याची साहित्याचीजाण अधिक परिपक्व करण्याच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरते. साहित्यातल्यानव्या प्रवाहांबदृल, आविष्काराच्या नूतन पद्घतींबदृल तो स्वागतशीलअसतो. नवतेचा स्वीकार करण्यासाठी त्याचे अंत:करण खुले असते; तथापि नवतेच्या नावाने काही उथळ प्रवृत्ती साहित्यात अवतरत असतील, तर त्याही आपल्या समीक्षेतून तो वाचकांच्या निदर्शनास आणण्याचाप्रयत्न करतो. साहित्य आणि समीक्षा परस्परांना पूरक असतात. साहित्यगुणवत्तेने समृद्घ झाले आणि समीक्षाही प्रतिसादशील राहिली, तरसाहित्याप्रमाणेच समीक्षाही गुणवत्तेने श्रीमंत होते. समीक्षक हा साहित्याचीपूर्वपरंपराही डोळसपणे पाहतो, तिचे आणि साहित्यातील नवतेचे नातेशोधतो, नव्या दृष्टीने जुन्याचे नव्यानेमूल्यमापन करतो, हे सर्वसाहित्याच्या दृष्टीने उपकारक असते.

आधुनिक समीक्षा-सिद्घांत

विसाव्या शतकाच्या प्रारंभकाळापासून ते उत्तरार्धापर्यंत आधुनिक साहित्यसमीक्षाक्षेत्रात भाषा-विज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान,  रुपविवेचनवाद (फिनॉमिनॉलॉजी) इ. ज्ञानशाखांच्या प्रभावातून नवनव्या संकल्पना, प्रणाली, विचारव्यूह इ. उदयास आले. त्यांनी तत्कालीन साहित्यक्षेत्रातील प्रचलित व प्रभावी अशा रुपवादी ( फॉर्मलिस्ट ) संप्रदायालाआव्हान देऊन समीक्षा-सिद्घांतांच्या नवनव्या दिशा, दृष्टिकोण व प्रणालीविकसित केल्या. साहित्यातील आधुनिकतावाद, उत्तर-आधुनिकतावाद,रुपवाद, नवसमीक्षा, रशियन रुपवाद, संरचनावाद, उत्तर-संरचनावाद, विरचनावाद, वाचकनिष्ठ समीक्षापद्घती, वाचक-प्रतिसाद सिद्घांत, वाचक -ग्रहण सिद्घांत, स्त्रीवादी समीक्षा, नव-इतिहासवाद, उत्तर-वसाहतवाद, सांस्कृतिक समीक्षा, साहित्याचे परिस्थितिविज्ञान व पर्यावरणीय समीक्षाइ. अनेकविध विचार-प्रणाली व समीक्षा-सिद्घांत विसाव्या शतकातउदयास व भरभराटीस आले. मराठी साहित्यसमीक्षा-व्यवहारात साधारणत: १९६० पर्यंत रुपवादाचा प्रभाव होता. नंतरच्या काळात आशयवादावरभर देणाऱ्या अनेक समीक्षापद्घती पुढे आल्या; त्यांवर पाश्चात्त्य समीक्षाविचारांचा बराचसा प्रभाव जाणवतो. ह्या पार्श्वभूमीवर काही आधुनिकसमीक्षा-सिद्घांत व विचारप्रणाली यांचा अल्प परिचय पुढे दिला आहे :

आधुनिकतावाद

( मॉडर्निझम ). साधारणत: सु. १८९० ते १९६०हा आधुनिकतावादाचा स्थूलमानाने कालखंड मानला जात असला, तरीत्याच्या बहराचा काळ पहिल्या महायुद्घाच्या काळापासून (१९१४) तेदुसऱ्या महायुद्घापर्यंत (१९४५) होता. त्याची पाळेमुळे एकोणिसाव्याशतकाच्या उत्तरार्धात शोधता येतात. १९६० नंतरच्या दशकात पाश्चात्त्यविचारविश्वात उत्तर-आधुनिकतावादाचा उदय झाला व आधुनिकतावादीपर्व अस्तंगत झाले. फ्रँक करमोड या समीक्षकाने आधुनिकतावादाच्याया दीर्घकालीन प्रवासाचे दोन टप्पे पाडले : अतिवास्तववादा पर्यंतच्याकला-वाङ्‌मयीन चळवळींना त्याने ‘ पॅलिओ-मॉडर्निझम ’ ( पुरा-आधुनिकतावाद ); तर अतिवास्तववाद व त्यानंतरच्या चळवळींना ‘नीओ-मॉडर्निझम’(नव-आधुनिकतावाद) असे संबोधिले. या सर्वचळवळींमध्ये वैचारिकदृष्ट्या  काही फरक जाणवत असले, तरी शैलीदृष्ट्यासाधर्म्य आढळून येते.

आधुनिक कालखंडातील मानवी जीवनावर व कला-साहित्यविश्वावर  नीत्शे, कार्ल मार्क्स व फ्रॉइड यांच्या भिन्नभिन्न विचारसरणींचामोठाच प्रभाव पडला. नीत्शेची ईश्वराच्या मृत्यूची घोषणा ( गॉड इज डेड)व पारंपरिक नीतिमूल्यांच्याविरोधी तात्त्विक विश्लेषण; कार्ल मार्क्सचेभांडवलशाही वर्गाच्या शोषणाचे आर्थिक-राजकीय क्रांतिकारी विश्लेषण,तसेच फ्रॉइडप्रणीत मनोविश्लेषण, अबोध मनाचे नेणिवेतील व्यापार,अंतर्मनातील सुप्त कामेच्छा, लैंगिक वासना-विकार, दु:स्वप्ने इत्यादींविषयींचे शास्त्रीय विवेचन अशा विविध विचारसरणींमुळे नीतिमूल्यांविषयीच्या पारंपरिक, प्रचलित समजुती ढासळत गेल्या. परिणामी पारंपरिकवास्तववादी चित्रण करणारे, तसेच केवळ बाह्य रुपांचे अनुकरणकरणारे कला-साहित्यप्रकार मागे पडत गेले व आधुनिकतावादी प्रणालीच्याविविध नवप्रवाहांना प्रेरणा व चालना मिळत गेली.

साहित्य-कलांच्या इतिहासातील उत्क्रांतीची एक अवस्था या दृष्टीनेआधुनिकतावादाकडे पाहिले जाते. गतिमान असाऔद्योगिक विकास,प्रगत तंत्रज्ञान, नागरीकरण, निधर्मीकरण आणि समूहात्मक सामाजिकजीवन असलेल्या जगाची ती( आधुनिक ) कला आहे, असाही एकदृष्टिकोण आहे. पहिल्या महायुद्घात संस्कृती व विवेक यांचा झालेला ऱ्हास, भांडवलशाही व औद्योगिकीकरण यांना मिळालेली गती, मानवीअस्तित्वाच्या संदर्भात जाणवणारी निरर्थकता व वैफल्य यांचे प्रकटीकरणयांची आधुनिकतावाद ही एक अभिव्यक्ती होती. तद्वतच आधुनिकतावादही कलात्मक वृत्ति-प्रवृत्ती व प्रतिसाद यांचीही निदर्शक अशी संज्ञा आहे.साहित्यात मूल्य आणि दृष्टी यांच्या आंतरिकीकरणावर भर (व्यक्तिवाद,स्वत्त्वनिष्ठा इ. मूल्ये ); बाह्य जगाच्या संदर्भात त्यातील अंतर्विरोधामुळेआलेली परात्मता व निराशा; सखोल वविस्तृत अशी वैविध्यपूर्णप्रयोगशीलता ही आधुनिकतावादी साहित्याची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होत.

यूरोपभर पसरलेला आधुनिकतावाद म्हणजे बऱ्याच ठिकाणी आणिविविध कलांच्या क्षेत्रांत घडणाऱ्या वेगवेगळ्या चळवळींचा एकत्रितअसा परिपाक होता. त्यामुळे त्याचे स्वरुप संकीर्ण, व्यामिश्र व बहुजिनसीबनले. यूरोपमध्ये विसाव्याशतकाच्या पूर्वार्धात ठिकठिकाणी घडलेल्याकला-साहित्य क्षेत्रातील स्थित्यंतरांचा परस्परांवर फार मोठ्या प्रमाणातप्रभावपडला व ह्या कलाप्रणालींनी परस्परांवर संस्कारही घडवूनआणले. त्यामुळे आधुनिकतावाद ही एकसंध अशी चळवळ नराहतातिचे स्वरुप व्यामिश्र व बहुआयामी बनले. निसर्गवादाच्या अस्तानंतर (सु. १८९०) ज्याकला-वाङ्‌मयीन चळवळींनी पारंपरिक वास्तववादीआशयाभिव्यक्तिसरणींचा अव्हेर करुन नवनवे आशय, रुपबंध व शैलीयांचा अंगीकार केला; त्यांत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रतीकवाद (सिम्बॉलिझम), कलाक्षेत्रातील दृक्‌प्रत्ययवाद   वा वाङ्‌मयीन संस्कारवाद ( इंप्रेशनिझम ) इ. चळवळी होत्या. साहित्यातील आधुनिकतावादाची पूर्वचिन्हे वा आद्य बीजे त्यातआढळतात.पहिल्या महायुद्घाच्या अंतापर्यंतच्या  घनवाद ( क्यूबिझम ), नवकालवाद ( फ्यूचरिझम ),  रचनावाद ( कन्स्ट्नक्टिव्हिझम ),  प्रतिमावाद ( इमेजिझम ) इ. कला-वाड्मयीन चळवळी आधुनिकतावादाच्या पहिल्या टप्प्यातील प्रभावी प्रणाली होत्या. त्यांनी तसेचपहिल्या महायुद्घोत्तर दुसृया टप्प्यातील  दादावाद,अतिवास्तववाद(सर्रीअलिझम ), अभिव्यक्तिवाद (एक्सप्रेशनिझम) या चळवळींनीसाहित्य-कला प्रकारांच्या सर्जनशील आविष्कारांत व तात्त्विक विचारसरणींतक्रां तिकारी बदल घडवून आणले. यांतील काही प्रणाली वसंप्रदाय मूलत: चित्र-शिल्पादी दृ क्कलाक्षेत्रात प्रथमत: अवतरले, तरीत्यांनी तत्कालीन व उत्तरकालीन साहित्यनिर्मिती व सैद्घांतिक विचारसरणीयांवर दूरगामी परिणाम घडवून आणले. त्यांतून विविध समीक्षापद्घती वशैली विकसित झाल्या.

साधारणपणे १९१० ते ३० हा पाश्चात्त्य साहित्य व कला क्षेत्रांतीलआधुनिकतावादी साहित्यनिर्मितीचा व समीक्षाप्रणालींचा उत्कर्ष काळमानला जातो. टी.एस्.एलियट चे द वेस्ट लँड हे दीर्घकाव्य वजेम्स जॉइस ची यूलिसीझ ही कादंबरी या दोन्ही साहित्यकृती१९२२ मध्ये प्रसिद्घ झाल्या.येथेच सर्जनात्मक पातळीवर आधुनिकतावादाचाखरा प्रारंभ झाला, असे मानले जाते. एलियट व जॉइस यांच्याप्रमाणेच  एझरा पाउंड,  व्हर्जिनिया वुल्फ हे इंग्लिश-अमेरिकनलेखक; तसेच  मार्सेल प्रूस्त,  मालार्मे,  काफ्का,  रिल्के,  पीरांदेल्लो  इ. यूरोपीय लेखक आधुनिकतावादी साहित्याचे प्रमुखप्रवर्तक मानले जातात. समीक्षात्मक पातळीवरदेखील त्याच सुमारालासाहित्यविषयक दृ ष्टिकोण, साहित्याभ्यासपद्घती व समीक्षाप्रणाली बदलूलागल्या होत्या. आधुनिकतावादी साहित्यामध्ये भावनावेगाबरोबरचचिकित्सक व बौद्घिक दृ ष्टिकोणालाही कलात्मक तत्त्व म्हणून मान्यतामिळाली आणि सर्वसामान्य भाषिक वापरातील शैलीची प्रचंड मोडतोडहेही आधुनिकतावादी साहित्याचे गमक ठरले. मानवी स्वभाव वमाणसांची परस्परांशी असणारी नाती यांच्याविषयी नवे, अपारंपरिकदृ ष्टिकोण निर्माण झाले. या मूलभूत नवतेला साद व न्याय देण्यासाठीनवी भाषिक वसौंदर्यात्मक रचनातत्त्वे उदयाला आली. कलाकृतीच्याघाटाला व रुपबंधाला मिळालेले केंद्रवर्ती स्थान हे विसाव्या शतकाच्यासौंदर्यशास्त्रीय व समीक्षात्मक भूमिकेचे व्यवच्छेदक लक्षण मानलेजाते. आधुनिकतावादामधील रुपवादाचे मूळया नव्या सौंदर्यभानामध्येव रुपनिष्ठ जाणिवेध्ये आहे.

उत्तर-आधुनिकतावाद

( पोस्ट मॉडर्निझम ). विसाव्या शतकाच्याउत्तरार्धातील कला, वास्तुकला, साहित्य व समीक्षा याक्षेत्रांतील एकसंकल्पना व शैली. १९७० च्या दशकात उत्तर-आधुनिकतावाद ही संज्ञासर्वत्र प्रचारात आली. १९८७ पर्यंतही संज्ञा चित्रपट, रंगभूमी, नृत्य,संगीत, ललित कला व वास्तुकला, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, मानसशास्त्र,इतिहासमीमांसा इ. क्षेत्रांत आणि विविध सांस्कृतिक जीवनशैलींतपरवलीचा शब्द बनली होती, असे इहाब हसन यांच्या लेखनावरुन आढळते(पॅरॅ-किटिसिझम्स: सेव्हन स्पेक्युलेशन्स ऑफ द टाइम्स, १९७५).

महायुद्घकालीन प्रचंड नरसंहार, अणुबाँबचे भीषण विनाशकारीपरिणाम, नैसर्गिक पर्यावरणाचा नाश व ह्या सर्व घडामोडींची पश्चिमीजगाच्या नीतिधैर्याच्या खच्चीकरणात झालेली परिणती ह्याचे सर्वंकषप्रत्यंतर उत्तर-आधुनिकतावादीकला-वाड्मयीन प्रवृत्तींच्या आविष्कारातआढळते. आधुनिकतावादाने प्रस्थापित व पारंपरिक कला-वाड्मयीनसंकेतनाकारुन नवनव्या संकल्पना, आशय-विषय, घाट वा रुपबंध,शैली अशा सर्व अंगांनीच नव्या वैशिष्टय्पूर्ण प्रवृत्ती पश्चिमीकला-वाड्मयीन क्षेत्रांत आणल्या. उत्तर-आधुनिकतावादाने हेच वैशिष्ट्य  कधी-कधी टोकाला नेले. इतकेच नव्हे तर, आधुनिकतावादातून उद्‌भवलेलाएक प्रकारचा अभिजनवाद व त्याची निदर्शक अशी उच्चभ्रू कला उत्तर-आधुनिकतावादाने नाकारली; ह्याउलट बहुजन-संस्कृतीशी (मासकल्चर ) निगडित अशा चित्रपट, दूरदर्शन, वृत्तपत्रीय व्यंग्यचित्रे, जनप्रियसंगीताचे ( पॉप म्यूझिक ) विविध प्रकार ह्यांच्याशी जवळीक साधली.उत्तर-आधुनिकतावादाची पृथगात्म वैशिष्ट्ये म्हणजे भिन्नभिन्न कलाशैलीव माध्यमे यांची हेतुत: केलेली सरमिसळ; पूवार्रोक्त शैली व कलासंकेतह्यांचा आत्मभानयुक्त अवलंब; ह्यांबरोबरच उत्तर-औद्योगिक समाजावर (पोस्ट-इंडस्ट्रिअल सोसायटी ) सर्वंकष प्रभाव पाडणाऱ्या जनसंपर्कमाध्यमातील, ग्राहकवादाशी संबद्घ प्रतिमा-प्रतीकांचा सढळपणे ववैपुल्याने कलाविष्कारात केलेला वापर इ. होत. उत्तरआधुनिकतावादीसाहित्यात वेगवेगळे वाङ्‌मयप्रकार, नानाविध प्रकारच्या शैली वसांस्कृतिक स्तर, गांभीर्य व थिल्लरपणाह्यांची इतकी वैचित्र्यपूर्ण सरमिसळकेली जाते, की पारंपरिक रुढ वाड्मयीन चौकटीत त्यांचे वर्गीकरणकरणेही अवघड व्हावे.

उत्तर-आधुनिकतावादाची मीमांसा अनेक समीक्षकांनी वेगवेगळ्याप्रकारे केली आहे. झां-फांस्वा ल्योतार (१९२५–९८) हा त्यांतीलएक प्रमुख उत्तर-आधुनिकतावादी फ्रेंच विचारवंत होय. त्याचा द पोस्टमॉडर्न कंडिशन: अ रिपोर्ट ऑन नॉलेज ( इं. भा. १९८४) हा ग्रंथप्रथम फ्रें चमध्ये १९७९ मध्ये प्रसिद्घ झाला. तत्त्वज्ञान, राज्यशास्र,सामाजिक विज्ञाने यांच्या संदर्भांत ‘पोस्ट-मॉडर्न’ ही संज्ञा प्रचलितकरण्याचे आणि आधुनिकतेचे विश्लेषण करुन उत्तर-आधुनिकतावादाचीव्यापक मांडणी करण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते. समकालीन पाश्चात्त्यसंस्कृती आज उत्तर-आधुनिकतेच्या अवस्थेत आहे, असे त्याचे म्हणणेआहे. या अवस्थेत मानवी ज्ञानव्यवस्थांची काय स्थिती आहे, याचाआढावा ल्योतार याने घेतला आहे. ल्योतारच्या मते विशिष्ट प्रकारच्यासांस्कृतिक कथनांचा वा महाकथनांचा ( गँड नॅरेटिव्ह्ज : उदा., प्रबोधनाच्या चळवळीतील ज्ञान व स्वातंत्र्य ह्या मूल्यांच्या ऐतिहासिकविकासकमाचे महाकथन ) ऱ्हास होणे, हे उत्तर-आधुनिकतेचे मुख्यलक्षण आहे.फ्रेडरिक जेसन (१९३४– ) या अमेरिकन मार्क्सवादीविचारवंताने आर्थिक-सांस्कृतिक अवस्था म्हणून उत्तरआधुनिकतेचाविचार केला आहे. उत्तर-आधुनिकता ही विकसित पाश्चात्त्य भांडवलशाहीची१९६० नंतरची अवस्था आहे, असे जेसन म्हणतो. दुसऱ्यामहायुद्घानंतर भांडवलशाहीने आणखी पुढे जाऊन जेव्हा उत्तर-औद्योगिक,ग्रा हकवादी आणिबहुराष्ट्री य रुप धारण केले, तेव्हा उत्तर-आधुनिकतानिर्माण झाली, असे जेसन याचे विश्लेषण आहे. याउलट जर्मनविचारवंतयुर्गन हाबरमास (१९२९– ) याने आधुनिकतेला एक अपूर्ण प्रकल्पमानून उत्तर-आधुनिकतेचे विश्लेषण केलेआहे. त्याच्या मते सद्यकालीनपरिस्थिती ही आधुनिकतेचा ऱ्हास होण्याची किंवा आधुनिकता संपूनगेल्याची स्थिती नसूनआधुनिकतेचा प्रकल्प पूर्णत्वाला न पोहोचल्याचीस्थिती आहे. उत्तर-आधुनिकतावाद हा खरे पाहता आधुनिकतेच्यातसेच आधुनिकतावादाच्याही विरोधी आहे. त्याच्या भुलभुलैय्याला बळीन पडता हा प्रकल्प कसा पूर्ण करता येईल, याविषयीत्याने विवेचनकेले आहे. मानवतावादाला विरोध, तसेच चिन्हक ( सिग्निफायर ) वचिन्हित ( सिग्निफाइड ) यांतीलसरळ संबंधांचा लोप ही उत्तर-आधुनिकतावादी विचारसरणीची दोन ठळक वैशिष्ट्येहोत. उत्तर-आधुनिकतावादातून निर्माण झालेला मूलभूत प्रश्न म्हणजे, मूल्यभावाचाआधार काय ? मूल्यभाव हा पूर्णपणे यादृ च्छिक असतो ( रॅडिकलकन्टिंजन्सी ऑफ व्हॅल्यू ) या गृहीतकृत्यावर उत्तर-आधुनिकतावाद उभाआहे. ज्ञान-सत्य, नीति-न्याय, कला-सौंदर्य हीसर्वच मूल्ये ह्या विचारव्यवस्थेध्ये निराधार व बेवारशी ठरतात. त्यांना वस्तुगत वा वस्तुनिष्ठपातळीवर तर आधार नसतोचआधुनिकतावादाने तो काढून घेतला तथापि ज्ञातृगत वा कर्तृगत व्यक्तिनिष्ठ आधारही नसतो; कारण त्याचे येथेपूर्ण विघटन झाले आहे. उत्तर-संरचनावादी फेंच तत्त्वज्ञ झाक देरिदा(१९३०–२००४) याने मांडलेली ‘ दिफेराँस ’ ( भेऽद – अवकाशभेदव कालभेद ) ही फेंच संकल्पना आणि उत्तर-संरचनावादी फेंच तत्त्ववेत्तामिशेल फूको (१९२६–८४) प्रणीत ज्ञान व सत्तामीमांसा या संकल्पनाउत्तर-आधुनिकतावादी प्रणालीच्या संदर्भात महत्त्वाच्या मानल्या जातात.

उत्तर-आधुनिकतावादी साहित्यमीमांसेनुसार, सध्याच्या सर्जनशीललेखकासमोर नानाविध कला-वाङ्‌मयप्रकार, भिन्नभिन्न शैली, तंत्रे वतंत्रकौशल्ये यांचे अनेकविध व विपुल पर्याय खुले आहेत; परंतु त्यामुळेचत्यांच्या वापराबदृल आणि अस्सलपणाबदृल त्याच्या मनात संदेह वअनिश्चितताही निर्माण झाली आहे. साहित्यकृतीच्या अर्थनिर्णयनावरीलअधिकारशाहीला ( ऑथॉरिटी ओव्हर इंटरप्रिटेशन ) विरोध हे उत्तर-आधुनिकतावादाचे एक प्रमुख लक्षण ठरते. जादूई वास्तववाद ( मॅजिकरिॲलिझम ) हा नवाच वाङ्‌मयप्रकार उत्तर-आधुनिकतावादी वाड्मयीनचळवळीतून पुढे आला. गाबिएल गार्सीआ मारक्वेझ याची वन हंड्रेडस यिअर्स ऑफ सॉलिट्यूट ( इं. भा. १९६९) ही कादंबरी या प्रकारचेसर्वोत्कृष्ट उदाहरण मानली जाते. परंपरागत प्रतिष्ठित साहित्यप्रकारांवरीलविश्वा स उडाल्यामुळे, तसेच उत्तर-संरचनावाद व विरचनावाद यांच्याप्रभावामुळे उत्तर-आधुनिकतावादी साहित्यात हेरकथा, विज्ञानकथा, परी-कथा, वृत्तान्तकथन (रिपोर्टाज ) यांसारख्या लोकप्रिय वाङ्‌मयप्रकारांचेपुनरुज्जीवन व पुनर्रचना करण्यात आल्या.

उत्तर-संरचनावादी संप्रदायातील काही प्रमुख समीक्षातत्त्वे उत्तर-आधुनिकतावादी साहित्यविचारातही स्वीकारार्ह ठरली. उदा., (१)लेखक हा त्याच्या साहित्यकृतीचा जनक नसतो किंवा साहित्यकृतीच्याअर्थावर त्याची कुठल्याही प्रकारची मक्तेदारी नसते. (२) वस्तुनिष्ठवैज्ञानिक परिभाषिते नसतात. कुठलीही अधिभाषा (मेटॅलँग्वेज ) इतरपरिभाषांद्वारा अभ्यासली जाऊ शकते व ह्या प्रकियेला अंत नाही. (३) साहित्य इतर ज्ञानशाखांहून वेगळे काढता येत नाही. साहित्यावर नेहमीसंपूर्ण परिभाषितांच्या विश्वाचा प्रभाव असतो.

रुपवाद

( फॉर्मलिझम ). फॉर्म या इंगजी संज्ञेला मराठीत रुप,घाट, आकार, आकृतिबंध हे समानार्थी पर्याय वापरलेजातात. रुपनिष्ठअथवा आकृतिवादी समीक्षापद्घतीत रुप वा आकृतिबंध या संकल्पनेलामध्यवर्ती स्थान आहे.साहित्यकृती हा एक रुपबंध आहे, असे मानूनतिची समीक्षा करणारी पद्घती म्हणजे रुपनिष्ठ समीक्षापद्घती असेस्थूलमानाने म्हणता येते. या समीक्षेत रुप ही केंद्रवर्ती संकल्पना मानूनतिच्या आधारे साहित्यकृतीची कलात्मकता, तिच्यातले साहित्यत्व आणितिचे सौंदर्य, साहित्यकृतीत सौंदर्य निर्माण करणारे घटक यांचा शोधघेतला जातो.साहित्यकृती ही स्वायत्त व स्वयंपूर्ण वस्तू असते, तसेचसाहित्यकृतीला एकजिनसी वा सेंद्रिय घाट असतो, ही दोन तत्त्वेरुपवादीसमीक्षेत केंद्रस्थानी असतात. साहित्यकृतीची स्वायत्तता व तिचाएकजिनसीपणा यांतील परस्परसंबंधांचा शोधघेणारी ही समीक्षापद्घतीआहे. साहित्यकृतीची आशय ( कन्टेन्ट ) व अभिव्यक्ती वा घाट ( फॉर्म)ही दोन अंगे अभिन्न वएकजीव आहेत, हे या समीक्षेचे गृहीत तत्त्व आहे. कांटच्या (१७२४–१८०४) सौंदर्यशास्त्रामध्ये ‘रुप’ ही संकल्पनासौंदर्यानुभवाच्या केंद्रस्थानी मानली होती. एकोणिसाव्या शतकात कोलरिज सारख्या (१७७२–१८३४) स्वच्छंदतावादी कवि-समीक्षकांनी ‘सेंद्रिय घाट’ ( ऑर्‌गॅनिक फॉर्म ) यासारख्या संकल्पनांनामहत्त्व दिले; तथापिकलाकृतीच्या घाटाला वा रुपाला मिळालेलेकेंद्रवर्ती स्थान हे विसाव्या शतकातील सौंदर्यशास्त्रीय भूमिकेचे व्यवच्छे दकलक्षण मानले जाते. टी. एस्. एलियटने आधुनिक जीवनाला वसंस्कृतीला वैराण भूमीच्या ( वेस्ट लँड ) स्वरुपात पाहिले; तर जेम्सजॉइस व व्हर्जिनिया वुल्फ या कादंबरीकारांनी मानवी मनाला व मानसिकप्रकियांना अनाकार प्रवाह मानले.भूत-वर्तन-भविष्य या काल-तत्त्वाच्या व ऐतिहासिकतेच्या संकल्पनाही सुस्थिर व सुनिश्चित राहिल्यानाहीत. त्यांचीसरमिसळ आधुनिक साहित्यकृतींत दिसते. या सर्वांतूनकाहीएक संगती कलाकृतीमध्ये निर्माण करावयाची, तर रुपतत्त्वहेचमूलभूत प्राणतत्त्व ठरु शकते. असे नवे रुपभान विसाव्या शतकातप्राधान्याने निर्माण झाले. आधुनिकतावादामधीलरुपवादाची मुळे याप्रकारच्या रुपभानामध्ये आहेत. सारांश, साहित्यकृतीची स्वायत्तता वरुपबंधाची सेंद्रिय एकात्मता यांना केंद्रस्थानी मानून केलेला साहित्य-विचार ही रुपवादी समीक्षेची मूलभूत व मध्यवर्ती भूमिका आहे.

बा.सी.मर्ढेकर यांनी आधुनिक मराठी साहित्यसमीक्षेत रुपवादीसाहित्यविचार प्रथमत: शास्त्रशुद्घ रीतीने मांडला ( सौंदर्य आणि साहित्य, १९५५). त्यानंतर प्रभाकर पाध्ये, माधव आचवल, वसंत दावतर, सुधीर रसाळ प्रभृती समीक्षकांनी रुपवादी समीक्षेचा विशेषत्वानेपुरस्कार केला.

विसाव्या शतकात आधुनिक रुपवादी जाणिवेचे दोन आविष्कारअँग्लो-अमेरिकन व रशियन समीक्षा क्षेत्रांत पाहावयास मिळतात.अँग्लो-अमेरिकन समीक्षा क्षेत्रात हा रुपवादी समीक्षाविचार १९३० ते१९५० या काळात प्रचलित व प्रतिष्ठित झाला. ही प्रणाली ‘नवसमीक्षा ’ या नावाने ओळखली जाते. रशियन साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात १९१४ ते१९३० या कालखंडात ‘रशियन रुपवाद ’ विकसित झाला; मात्र अँग्लो-अमेरिकन नवसमीक्षा ही आधुनिक समीक्षाव्यवहारात जास्त परिचितव रुढ होती.

नवसमीक्षा

( न्यू किटिसिझम ). आधुनिक अमेरिकन समीक्षाप्रणाली.इंग्लंडमध्ये १९२० च्या सुमारास सुरु झालेल्या उपयोजितसमीक्षेचे अमेरिकेतील विकसित रुप. जॉन को रॅन्सम (१८८८–१९७४) या अमेरिकन कवि-समीक्षकाच्या न्यू क्रिटिसिझम (१९४१) या टीका ग्रंथावरुन अमेरिकेतील उपयोजित समीक्षाप्रणालीला ‘नवसमीक्षा ’ हेनाव पडले. या ग्रंथात  आय्. ए. रिर्चड्स, टी. एस्. एलियट,  विल्यम एम्प्सन व आयव्हर विंटर्स यांच्याविषयीचे प्रदीर्घ निबंधसमाविष्ट केले आहेत; त्यांत त्यांच्या उपयोजित समीक्षेविषयी विवेचनव चिकित्सक भाष्य आहे. मात्र नवसमीक्षाप्रणालीला खरी चालनामिळाली, ती आय्. ए. रिचर्ड्स (प्रिन्सिपल्स ऑफ लिटररी क्रिटिसिझम,१९२४) आणि टी. एस्. एलियट यांच्या समीक्षाविचारांतून, असे मानलेजाते. त्यांच्या खेरीज क्लिअंथ बुक्स, रॉबर्ट पेन वॉरन, ॲलन टेट, आर्.पी.ब्लॅकमॉर, विल्यम के. विमसॅट (ज्यू.) हे नवसमीक्षाप्रणालीतीलअन्य काही प्रमुख समीक्षक होत.

ऐतिहासिक, चरित्रात्मक, स्वच्छंदतावादी वा संस्कारवादी या समीक्षापद्घतींमध्ये मुख्यत: साहित्यकृती दुर्लक्षित राहून साहित्यबाह्य गोष्टींचाचऊहापोह केला जातो. त्यामुळे या पद्घतींना फारसे महत्त्व न देतानवसमीक्षाप्रणाली केवळ साहित्यकृतीवरच आपले संपूर्ण लक्ष केंद्रितकरुन तिचीच समीक्षा करण्यावर भर देते. ऐतिहासिक समीक्षेतून दर्शनघडते ते इतिहासाचे; साहित्यकृतीचे नव्हे. विशिष्ट साहित्यकृतीचा आस्वादघेतला जातो, तो सद्यकालीन साहित्याभिरुचीद्वारे. त्यामुळे नवसमीक्षकसाहित्यकृतीच्या ऐतिहासिक वा सामाजिक संदर्भाला प्राधान्य न देताभाषेच्या माध्यमातून निर्माण केलेली एक कलाकृती म्हणूनच तिचीसमीक्षा करतात. साहित्यकृती निर्माण झाल्यावर तिच्या कर्त्याशी तिचीनाळ तुटते व तिला स्वत:चे असे स्वयंभू रुप प्राप्त होते. ह्या स्वयंभूरुपामुळेच साहित्यकृती आस्वाद्य ठरते. त्यामुळे कर्त्या लेखकाच्याचरित्राचा वा साहित्यनिर्मितीमागील हेतूचा विचार समीक्षेत करणे गरजेचेनसते. निर्मितिहेतू कित्येकदा फसवे व वाचकाची दिशाभूल करणारेअसतात. तेव्हा साहित्यकृतीचा कर्ता किंवा त्याची साहित्यनिर्मितीप्रकियाहा समीक्षेचा विषय नसून विशिष्ट साहित्यकृती हाच असतो. साहित्यकृतीआस्वाद्य होते ती तिच्या अंगभूत गुणांमुळे; तिच्या निर्मात्यामुळे नव्हे,की निर्मितिप्रकिये मुळे नव्हे. म्हणून नवसमीक्षाप्रणाली ही कर्त्याच्याजीवनाला व त्याच्या मनोव्यापारांना डावलून प्रत्यक्षसाहित्यकृतीलाचभिडू पाहते. कलाकृतीची निर्मिती ही जाणिवेपेक्षा नेणिवेतच विशेषकरुनहोत असल्यामुळे तिच्याकर्त्यालाही निश्चितपणे व ठामपणे निर्मितिहेतूसांगता येईलच, असे नव्हे; आणि वाचकालाही हेतू माहीत नसला, तरीसाहित्यकृतीचा आस्वाद घेता येतो, अशी नवसमीक्षाप्रणालीची भूमिकाआहे. विशिष्ट साहित्यकृतीचा वाचकांवर पडणाराप्रभावही नवसमीक्षाविचारात घेत नाही. प्रभावानुसारी समीक्षेचा मोठा धोका म्हणजे समीक्षेचेलक्ष्य साहित्यकृतीऐवजी वाचक-श्रोतृवर्ग हे होते. शिवाय समीक्षकस्वत:वर पडलेल्या प्रभावाचे वर्णन करु लागतो, तेव्हा ती समीक्षाआत्मनिष्ठ बनते. समीक्षा शक्य तितकी वस्तुनिष्ठ असावी, असानवसमीक्षेचा आग्रह आहे.

कोणतीही साहित्यकृती हा एक स्वतंत्र व स्वयंपूर्ण वागर्थबंधअसतो, असे मानून शक्य तितक्या वस्तुनिष्ठ दृष्टीने तिचेविश्लेषणनवसमीक्षेत केले जाते.

साहित्यकृतीचे घटक म्हणजे शब्द, त्यांचे नाद, शब्दबंध व नादबंध,शब्दांच्या सूक्ष्म अर्थच्छटा व अनेकार्थता इ. घटकांचासूक्ष्म भाषिकअभ्यास नवसमीक्षेत केला जातो. प्रतिमा, प्रतीके व त्यांतून सूचितहोणारा आशय तसेच साहित्यकृतीत व्यक्तहोणारा उपरोध, विरोधाभास,संदिग्धता इत्यादींचा अभ्यास साहित्यकृती ही एक स्वयंपूर्ण कलाकृतीआहे ह्याचे भानराखून केला जातो. आशय व अभिव्यक्ती यांचे द्वैतनवसमीक्षा मानत नाही. आशयानुसार अभिव्यक्तीचे रुप बदलते; इतकेचनव्हे तर अभिव्यक्ती हाच कलाकृतीचा आशय असतो. अनेकार्थता,संदिग्धता, विरोध, विसंगती, उपरोध ही सर्व अंगेसाहित्यकृतीच्या संपूर्णआशयाची व्यामिश्र एकसंधताच व्यक्त करतात आणि अशी व्यामिश्रएकसंध साहित्यकृती श्रेष्ठ ठरते, अशी नवसमीक्षेची धारणा आहे.

रशियन रुपवाद

साहित्याची व साहित्याभ्यासाची स्वायत्तता वविशेषता मानणारा हा संप्रदाय रशियन साहित्यविचारात १९१४ ते१९३० या कालखंडात प्रभावी ठरला. रशियन रुपवादी चळवळीची दोनप्रमुख केंद्रे होती: (१) मॉस्को येथील मॉस्को भाषाविज्ञान मंडळ( मॉस्को लिंग्विस्टिक सर्कल )–ह्या मंडळाची स्थापना रशियन भाषावैज्ञानिक रोमॉन याकॉपसन (१८९६–१९८२) प्रभृतींनी १९१५ मध्येकेली. (२) पिट्सबर्ग येथील काव्यभाषाभ्यास मंडळ –याची स्थापनारशियन साहित्यमीमांसक व्हीक्तर श्क्लॉव्हस्की (१८९३– ? )प्रभृतींनी १९१६ मध्ये केली. पहिल्या गटालाभाषाविज्ञानात विशेषस्वारस्य होते व काव्यभाषेचा त्यांनी भाषाभ्यासाच्या कक्षेत अंतर्भावकेला होता. दुसरा गट हाप्रामुख्याने वाङ्मयाच्या अभ्यासकांचा होता.वाड्मयीन द्रव्यांचा अभ्यास करणारे एक स्वतंत्र साहित्यशास्त्र निर्माणकरुन त्याची स्वायत्तता व वेगळे महत्त्व त्यांना प्रस्थापित करावयाचे होते.

रशियन रुपवाद ही पश्चिम यूरोपीय रुपवादाची शाखा मानली जाते.साहित्याभ्यासाच्या चरित्रात्मक, सामाजिक, ऐतिहासिक इ. साहित्यबाह्यपद्घतींना त्या काळात महत्त्व प्राप्त झाले होते. रुपवाद्यांनी ह्या साहित्य-बाह्यअभ्यासपद्घतींना, प्रयोजनांना व ज्ञानदृ ष्टींना विरोध केला आणिसाहित्याच्या व साहित्याभ्यासाच्या स्वायत्ततेवर वविशेषतेवर( स्पेसिफिसिटी ) भर दिला. रोमॉन याकॉपसनच्या मते साहित्यशास्त्राचाविषय साहित्य हा नसून जिच्यामुळेसाधी भाषिक कृती ही साहित्यकृतीबनते, ती निखळ साहित्यिकता ( लिटररीनेस ) हा आहे. त्याच्या मतेसाहित्याची हीसाहित्यिकता भाषेच्या काव्यात्म कार्यामध्ये आढळूनयेते. साहित्यिकतेसाठी रुपवाद्यांनी काव्यभाषेवर लक्ष केंद्रित केले. काव्यात्म भाषा, अपरिचितीकरण व नियमोल्लंघन, रुपबंध व संरचनाही रुपवादी प्रणालीची प्रमुख समीक्षातत्त्वे होत :

काव्यभाषा

भाषेच्या व्यावहारिक संप्रेषणाखेरीज अन्य भाषिकसंप्रेषणात नादादी भाषिक घटकांना स्वायत्तमूल्य प्राप्त होते. त्यामुळेशब्दांचे व्यावहारिक अर्थूल्य क्षीण होऊन त्यांना निखळ नादमूल्य (काव्यमूल्य ) प्राप्त होते. काव्य हे अशा प्रकारच्या निखळ नादयुक्तभाषासरणीचे ( स्वायत्त काव्यमूल्याचे ) उत्तम उदाहरण होय. रुपवाद्यांच्यामते काव्यभाषा शब्दाच्या अर्थाला नकार देऊन त्याच्या नादरुपद्रव्यमयतेवर लक्ष केंद्रित करते. ती ( काव्यभाषा ) स्वत:खेरीज दुसऱ्याकोणत्याहीगोष्टीचा वा अर्थाचा निर्देश करीत नाही, म्हणून रुपवाद्यांनीअर्थविरहित/अर्थातीत शब्दांचा व भाषेचा ( ट्रान्सरॅशनल लँग्वेज )पुरस्कार केला.

अपरिचितीकरण

व्हीक्तर श्क्लॉव्हस्कीने ‘आर्ट ॲज टेक्निक’ यालेखात (१९१७) अपरिचितीकरणाचा (डीफॅमिल्यरायझेशन ) सिद्घांतसाहित्यकलेचे एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून मांडला. दैनंदिन जीवनव्यवहारात भोवतालच्या वस्तू वा विषय यांच्याकडे पाहण्याची व्यक्तीचीदृ ष्टी सांकेतिक, नित्य सरावाची व बरीचशी यांत्रिक स्वरुपाची असते.ही सरावलेली दृ ष्टी बाधित करुन वा मोडीत काढून ह्या नित्यपरिचितवस्तू/विषयांची त्यांच्या अनोख्या, अपरिचित (अन्‌फॅ मिलिअर) रुपातअनुभूती घडवणे, हे कलेचे खरे प्रयोजन होय. नित्याचे अनुभव नव्या दृ ष्टीनेपाहणे, त्यांची नवी, अपरिचित रुपे साहित्यातून आविष्कृत करणे व त्याअपरिचिताची प्रतीती वाचकांना देणे, हे साहित्याचे एक व्यवच्छेदकलक्षणरशियन रुपवाद्यांनी मानले. कलेत वस्तू/विषय महत्त्वाचा नसतो, म्हणूनअपरिचितीकरणाच्या तंत्रामधून कला क्रि याशील होत असते.

नियमोल्लंघन :कलावंत वा लेखक एखाद्या प्रस्थापित रुळलेल्याकथातंत्राचे, काव्यसंकेतांचे, व्याकरणादी नियमांचे उल्लंघन करुन नवेनिवेदनतंत्र, नवे संकेत निर्माण करतात. हे नियमोल्लंघन म्हणजेअपरिचितीकरणाचे कलातंत्र होय.उदा., एखाद्या कथेत माणसाऐवजीमूक प्राणी कथानिवेदन करतो व त्याच्या दृष्टिकोणातून मानवी जीवनव्यवहारावर भाष्य करतो. तेव्हा अपरिचितीकरणाचे हे अनोखे तंत्रवाचकाचे लक्ष वेधून घेते.

रुपबंध व संरचना

रुपवाद्यांच्या मते साहित्यकृतीत सौंदर्यदृष्ट्या उदासीन व सौंदर्यदृ ष्ट्या क्रि याशील असे दोन घटक कार्यरत असतात.शब्द, वाक्य, प्रतिमा, पात्र इ. भाषिक-वाड्मयीन घटक म्हणजे द्रव्यसामग्री  (मटेरिअल ). सौंदर्यदृष्ट्यी उदासीन असलेल्या अशा सौंदर्यनिरपेक्षद्रव्यसामग्रीची सौंदर्यनिष्ठ संघटना करणारे दुसऱ्या प्रकारचे घटक वासंघटक असतात. या सौंदर्यकारक संघटकांना तंत्रप्रयुक्ती ( टेक्निक,डिव्हाइस ) म्हणतात. अशा रीतीने सौंदर्यनिरपेक्ष वासौंदर्यपूर्व (प्री-ईस्थेटिक) द्रव्यसामगीची सौंदर्यकारक तंत्रप्रयुक्तीच्या अवलंबनानेसंघटित झालेली सौंदर्यपूर्ण संघटना म्हणजे साहित्यकृतीचा कलात्मकरुपबंध ( आर्टिस्टिक फॉर्म) होय.

लय, ताल, स्वनिमांची नादरचना, वाक्यरचना, कथानक ह्या काहीरचनाशील तंत्रप्रयुक्त्या होत. तद्वतच अपरिचितीकरण, नियमोल्लंघन हीदेखील रचनातंत्रे होत. ह्यांच्या उपयोजनातून साहित्यकृतीला साहित्यिकतावावाड्मयीन मूल्य प्राप्त होते. तेव्हा या तंत्रप्रयुक्त्यांचा अभ्यास म्हणजेसाहित्यिकतेचा अभ्यास वा समीक्षा करणे होय. ह्यासाहित्यिकतेचेस्वरुपविवेचन व मूल्यमापन करणे हे रुपवाद्यांच्या मते समीक्षेचे कार्यहोय. द्रव्यसामगी ( साहित्यकृतीचाआशय व अर्थ हा त्याचाच एक भागहोय ) आणि तंत्रप्रयुक्ती ( रुपबंधाला समांतर व संवादी ) ह्या संज्ञारुपवाद्यांनी आशयव रुप या पारंपरिक संकल्पनांऐवजी प्रचारात आणल्या.त्यांच्या मते द्रव्यसामगी ही रचनाशील तंत्रप्रयुक्तीचे केवळ निमित्तकारणसाधन असते आणि तंत्रप्रयुक्ती स्वत:च एक साध्य असते.

रशियन रुपवादी समीक्षक युरी त्यान्यानोव्ह याने ‘द प्रॉब्लेम्स ऑफव्हर्स लँग्वेज’ या लेखात रुपबंधाची संकल्पना गतिशील संरचनेच्यास्वरुपात मांडली, तसेच ‘लिटररी इव्हल्यूशन’ या लेखात (१९२७) साहित्यिक उत्क्रां तीची संकल्पना मांडली. साहित्याच्या उत्क्रां तीचा विचारकरताना प्रकारनिष्ठ तंत्राचा आणि रुपनिष्ठ उत्कांतीचा विचार त्यात मांडलाआहे.साहित्य, किंबहुना कोणतीही कला ही एक स्व-रुप-निर्भर अशीसामाजिक घटना असते ( अ सेल्फ-फॉर्म्ड सोशल फिनॉमिनन ) हे याविचारामागील मुख्य गृहीतकृत्य आहे. रुपवाद्यांच्या गतिशील संरचना,साहित्यिक उत्कांती यासंकल्पना साहित्याच्या परिवर्तनप्रकियेशी वऐतिहासिकतेशी निगडित आहेत, त्यामुळे त्या साहित्येतिहासाच्यासिद्घांतनासाठी आधारभूत ठरल्या आहेत.

रशियन रुपवादी समीक्षकांनी काव्यरचनांबरोबरच गद्यरचनांचाहीविचार आपल्या समीक्षाप्रणालीमध्ये केला, हे त्याचे लक्षणीय वैशिष्ट्य होय. अपरिचितीकरण, नियमोल्लंघन, साहित्याचे साहित्यिकत्व इ.संकल्पनांबरोबरच कथा वकथारचना यांसंबंधी महत्त्वाची संकल्पनाहीत्यांनी गद्य साहित्याच्या संदर्भात मांडली. रशियन रुपवादी विचारसरणीतूनपुढे प्राग संरचनावाद, कथनमीमांसा, चिन्हमीमांसा इ. वाङ्‌मय-विचारपद्घतींचा उदय झाला.

संरचनावाद

( स्ट्र क्चरॅलिझम ). साहित्यकृतीची संरचना ( स्ट्र क्चर)केंद्रीभूत मानून त्या संरचनेची, तिच्या समगअंगोपांगांची चिकित्सा वविश्लेषण करणारी ही समीक्षाप्रणाली आहे. मात्र ती केवळ वाङ्‌मयापुरतीचमर्यादित न राहता मानवशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र अशा अन्य ज्ञानक्षेत्रांत प्रभावी ठरलेली व सबंध यूरोपभर पसरलेली विसाव्या शतकातीलमहत्त्वाची वैचारिक चळवळ होती. स्विस भाषावैज्ञानिक  फेर्दिनांद सोस्यूर (१८५७ – १९१३) याच्या, भाषेची नवी संकल्पना वअभ्यासपद्घती मांडणाऱ्या व्याख्यानांवरुन त्याच्या निधनानंतर तयारकरण्यात आलेल्या Cours de linguistique generale (१९१६)या ग्रंथाने आधुनिक संरचनावादी भाषाविज्ञानाचा, तसेच चिन्हमीमांसेचावाचिन्हार्थ विद्येचा ( सेमिऑलॉजी ) पाया घातला. त्यात आधुनिकभाषाविज्ञानाच्या मूलभूत तत्त्वांची मांडणी आढळते. सोस्यूरच्या मतेभाषा ही एक चिन्हपद्घती वा संरचना आहे. भाषा ही ध्वनी व अर्थयांच्या द्रव्याला एकत्र आणून वा त्यांची युती साधून आकार ( फॉर्म )निर्माण करते. हा आकार म्हणजे चिन्हांची एक व्यवस्था होय. चिन्हहे चिन्हक ( सिग्निफायर ) व चिन्हित (सिग्निफाइड ) यांच्यातील संबंधांतूनवा युतीतून सिद्घ होते. भाषिक ‘चिन्हक’ हा एखादा ध्वनी असू शकेल, वा एखादे लिखित अक्षर असू शकेल. कित्येकदा एखाद्या सुट्या ध्वनीपेक्षाध्वनींची एक संहतीदेखील चिन्हक म्हणून वापरली जाते; तर ‘चिन्हित’या संकल्पना असतात. चिन्हे ही चिन्हक-चिन्हित यांच्या युतीतून जशीसिद्घ होतात, तसेच ती इतर चिन्हांशी असणाऱ्या त्यांच्या संबंधांमुळेहीसिद्घ होतात. आधुनिक भाषाविज्ञानाच्या ह्या नमुनारुपाच्या ( लिंग्विस्टिकमॉडेल ) आधारे साहित्याचा, साहित्यशास्त्राचा व साहित्यविषयक प्रश्नांचाविचार व अभ्यास संरचनावादीसमीक्षेत केला जातो.

संरचनावादी समीक्षेची मुळे रशियन रुपवादाच्या विचारसरणीतआढळतात. प्राग भाषामंडळाच्याएका परिषदेत (१९२९) भाषा वसाहित्यिक भाषा यांच्याविषयीचा संरचनावादी सिद्घांत मांडला गेला. त्यासंदर्भात रोमॉनयाकॉपसन याने आजच्या विज्ञानातील एक अग्रेसर विचारम्हणून ‘स्ट्रक्चरॅलिझम’ ही संज्ञा प्रथमत: उपयोजिली. सोस्यूरच्याआधुनिक भाषाविचाराच्या व चिन्हार्थविद्येच्या आश्रयाने संरचनावादाचीजडणघडण झाली. चिन्हव्यवस्था, चिन्हांची रचना, चिन्हांची यादृच्छिकता,भाषानियम ( लांग ), भाषित/भाषण ( पॅरोल ), चिन्हांची व भाषेची कार्येइ. संकल्पनांचा वापरसंरचनावादाच्या उभारणीत केला गेला. चिन्हार्थविद्याव संरचनावाद यांचे नाते निकटचे आहे. मानवी मन चिन्हांच्या आश्रयानेविचार, चिंतन, सर्जन व संदेशन करीत असते. मानवी संस्कृती ही चिन्हेव चिन्हव्यवस्था यांवर आधारलेली आहे. समाजातील आणि संस्कृतीतीलचिन्हांचे स्वरुप, त्यांची रचना, त्यांचा अर्थ व कार्य इ. बाबींचा शास्त्रशुद्घअभ्यास वमीमांसा चिन्हार्थविद्येत केली जाते. हे एक विज्ञान असूनसंरचनावाद ही त्याची विश्लेषणपद्घती आहे, असे काही समीक्षकमानतात,तर काहीजण या दोन ज्ञानशाखांत भेद मानत नाहीत.

एखाद्या व्यवस्थेतील वा समष्टीतील घटकाघटकांधील परस्परसंबंधांची विशिष्ट प्रकारची व्यवस्था म्हणजे संरचना. समष्टित्व ( होलनेस),स्व-नियमन ( सेल्फ-रेग्युलेशन ) व रचनान्तर ( ट्रा न्सफॉर्मेशन ) ह्या तीनघटकांनी संरचना युक्त असते. संरचनाविषयक या संकल्पनांवर संरचनावाद आधारलेला आहे :

(१) समष्टित्व : संरचनेचा हा मुख्य गुणधर्म असून ह्या तत्त्वामुळेसाहित्यव्यवस्था ही लेखक, वाचक व साहित्यकृती या तिच्या घटकांवर आपले प्राथम्य वा अधिकार प्रस्थापित करीत असते. वाचकालासाहित्यसंकेतांचे ज्ञान नसेल, तर त्यालासाहित्यकृती वाड्मयीन अर्थानेवाचता येणार नाही. साहित्याच्या संकेतव्यूहाचे ज्ञान म्हणजेच ‘साहित्यिक ज्ञानक्षमता’ ( लिटररी काँपिटन्स ) होय.

(२) स्व-नियमन : साहित्यव्यवस्था ही स्वतःच्या नियमसंकेतांनीबांधलेली, बंदिस्त असते. ती स्वत:च्या नियमसंकेतांच्या आश्रयानेलेखकाच्या निर्मितिप्रकियेवर, साहित्यकृतीवर व वाचनकियेवर आपलेनियंत्रण ठेवत असते; परंतु साहित्यकृती एकीकडे नियमांचे पालन करीतअसते, तर दुसरीकडे ती नियमोल्लंघन करीत सौंदर्यात्म कार्य करीत असते.

(३) रचनान्तर : एका रचनेचे दुसऱ्या रचनेत रुपांतर करणे. वाक्याततलरचनेचे पृष्ठरचनेत रुपांतर केले जाते. रचनान्तराचे उदाहरण – मूळगोष्टीत घटना जरी नैसर्गिक कालकमानुसार घडत असल्या, तरी कथाकारतिचे निवेदन करताना सृजनात्मक गरजेपोटी कित्येकदा नैसर्गिक कालक्र मन पाळता कालक्रमाची अनैसर्गिक परंतु सौंदर्यपूर्ण रचनाकरतो. साहित्य-व्यवस्थेत एक अंतर्गत गतितत्त्व कार्यरत असते. त्यामुळे जुने संकेत मोडलेजाऊन नवे संकेत प्रस्थापितहोत असतात. हे नियमोल्लं घनाचे व त्यातूनसौंदर्यनिर्मितीचे कार्य साहित्यव्यवस्थेत अविरत चालू असते.

संरचनावादी समीक्षा साहित्यकृतीच्या पूर्वस्थित अर्थाचा शोध घेतनाही, तर तिच्या अर्थाला शक्य करणाऱ्या साहित्यिक संकेतांचा, तिच्यासाहित्यिक व्याकरणाचा शोध घेत असते.

साहित्यकृतीत प्रत्यक्षाप्रत्यक्ष रीत्या प्रकट झालेल्या सामान्यनियम-संकेतांच्या आश्रयाने साहित्यशास्त्राची उभारणी करणे, तसेच त्या त्यासाहित्यप्रकाराच्या विशिष्ट साहित्यशास्त्राची शास्त्रशुद्घ रचना करणे, हेसंरचनावादी समीक्षेचे मूळ उद्दिष्टहोय. फेंच साहित्यमीमांसक रॉलां बार्त(१९१५–८०), फ्रेंच समीक्षक जेरार्द जेने, तत्त्ववेत्ता ए.जे. ग्रिमास(१९१७ –९२), रुमानियन समीक्षक त्स्वेतान तोदॉरॉव्ह (१९३९– ) इ. संरचनावादी समीक्षक व चिन्हमीमांसक हे या प्रणालीचे प्रमुखप्रर्वतक होत. त्यांनी ‘कथनमीमांसा ’, ‘काव्यचिन्हमीमांसा ’ अशाप्रकारनिष्ठ साहित्यशास्त्राची उभारणी केली. तद्वतच या समीक्षकांनीलेखक, संहिता, वाचक, संरचना, साहित्यिकता, साहित्याची भाषा इ.वाड्मयीन घटकांच्या संदर्भात संरचनावादी दृ ष्टिकोणातून नवे विचारमांडून संरचनावादी साहित्यशास्त्राची उभारणी केली.

कथनमीमांसा

कथनरुपाच्या गोष्ट, कथन वा निवेदन, पात्र, घटना, वातावरण इ. मूलघटकांचे स्वरुप, त्यांचे कथात्म कार्य व मूल्य, विविधप्रकारचे कथासंकेत इ. बाबींचा सुव्यवस्थित, शास्त्रशुद्घ, सूक्ष्म व सखोलअभ्यास वा मीमांसा म्हणजे ‘ कथनमीमांसा ’ ( नॅरॅटॉलॉजी ) होय.कथनविषयक निरनिराळे सिद्घांत, परिभाषिते आदींचा त्यात समावेशहोतो. कथनाच्या संरचनावादी विश्लेषणाचा प्रारंभ  क्लोद लेव्ही--स्त्राऊस (१९०८– ) ह्या फ्रेंच तत्त्वज्ञ-विचारवंताच्या मिथ्यकथा-विद्याविषयक विवेचनातून झाला ( मायथॉलॉजिक्स, ४ खंड, १९६४ –७१). त्याच्या मते, मिथ्यकथांच्या कथनात काही मूलभूत व विश्वात्मकअशा संरचना सातत्याने आढळतात. त्यांच्या आधारे कोणत्याही मिथकाचे विश्लेषण करता येते. ‘मिथ्य’ ही एक प्रकारची भाषा असतेव तिचे पृथक्करण करता येते. या भाषिक घटकांना त्याने ‘मिथिमे ’ ( ‘फोनिमां ’ च्या– म्हणजेच स्वनिमांच्या धर्तीवर ) हे नाव दिले.मिथ्यकथांचे वाचन अन्य मिथ्यकथांच्या संदर्भात करता येते. कथनाच्यापृष्ठस्तराखालील अंत:स्तर व त्यांचे परस्परसंबंध, व्याकरण यांची दखलसमीक्षाविचारात घेतली पाहिजे. रशियन रुपवादी समीक्षक व्लादीमिरप्रॉप याने मॉर्फॉलॉजी ऑफ द फोकटेल (१९२८) या ग्रंथात समगलोककथांचे सात ‘कृतिक्षेत्रां ’ तव कथनाच्या एकतीस स्थिर घटकांतअथवा कार्यांत विभाजन केले. ए. जे. ग्रिमास याने सिमँटिक स्ट्रक्चरल(१९६६) या ग्रंथात कथनाचे वैश्विक व्याकरण मांडले व वाक्याच्यासंरचनेचे शब्दार्थशास्त्रीय विश्लेषण केले. त्याने कृतिक्षेत्र या शब्दाऐवजी ‘ॲक्टंट’ हा शब्द वापरला. जेरार्द जेने याने नॅरेटिव्ह डिस्कोर्स (१९७२) या ग्रंथात रशियन रुपवादातील ‘फॅब्युला’ (कथा) व ‘स्यूयेत’ (कथारचना ) या संकल्पनांच्या आधारे ‘रेसी’ व ‘इस्तुआर’ यासंकल्पना मांडल्या. रॉलां बार्त याने कथनाच्या घटकस्तरांची एकश्रेणीयुक्त व्यवस्था कल्पिली व त्यांचा स्वतंत्रपणे विचार होऊ शकतो, हे सूचित केले. त्याच्या मते, कथन म्हणजे एक प्रदीर्घ वाक्य. त्याने ‘फंक्शन ’ ( क्रि यात्मक) व ‘इंडेक्स’ ( निर्देशनात्मक ) हे दोन मूलघटकमानले. फंक्शनमुळे कृतींची साखळी तयार होते, तर इंडेक्समुळे पात्रांच्यामाहितीचीरचना होते. फंक्शन्स सान्निध्यसंबंधांवर, तर इंडाइसेजसाम्यात्मक संबंधावर आधारित असतात. बार्तने पाच प्रकारचे कथात्मसंकेतव्यूह ( नॅरेटिव्ह कोड्स ) वर्णिले आहेत, ते असे: (१) घटनाक्रम-विषयक संकेतव्यूह ( प्रोअरेटिक कोड ), (२) अर्थिविषयक – म्हणजेआशयसूत्रे, पात्रांचे अन्वयार्थ, त्यांची संरचना, त्यांचे स्वभावविशेषइत्यादींशी निगडित असलेला–संकेतव्यूह ( सिमिक कोड ), (३) अर्थनिर्णयनपर संकेतव्यूह ( हर्मीन्यूटिक कोड ) हा कथारहस्य, गूढार्थ, कूटप्रश्न इत्यादींच्या अर्थनिर्णयनाशी निगडित असतो. (४) प्रतीकरुपसंकेतव्यूह ( सिंबॉलिक कोड ) हा कथेतील प्रतिमा / प्रतीके व त्यांचेप्रतीकात्मक अर्थ यांच्याशी निगडित असतो. (५) सांस्कृतिक संकेतव्यूह( रेफरेन्शल कोड ) हा समाज, अर्थकारण, शिक्षण, राजकारण आदीसांस्कृतिक व्यवस्थांशी निगडित असतो. अशा पाच प्रकारच्या संकेतव्यूहांनीकथात्म संहिता रचलेली असते, असे बार्त याचे प्रतिपादन आहे.

संरचनावादी साहित्यशास्त्राने गूढवादी तसेच आस्वादक-संस्कारवादीसंकल्पनांना व समजुतींना धक्के दिले. दुसरे म्हणजे, संकुचित रुपवादीभूमिकेलाही विरोध केला. साहित्यकृतीमागे सामान्य तत्त्वे नसतात, प्रत्येकसाहित्यकृती अनन्य असते व तिचे खास रुपतत्त्व शोधणे, हे समीक्षकाचेकार्य होय; ही संकुचित रुपवादी भूमिका संरचनावादाने मोडीत काढली. संरचनावादी समीक्षेची काही मूलतत्त्वे पुढीलप्रमाणे :

भाषा ही प्राथमिक स्वरुपाची चिन्हव्यवस्था असून, साहित्य हीत्यावर आधारलेली दुय्यम स्वरुपाची चिन्हव्यवस्था आहे. भाषेला जसेस्वत:चे भाषाशास्त्र, तसेच साहित्यालाही स्वत:चे साहित्यशास्त्र असते.भाषेला जशी नियमव्यवस्था, तसेच साहित्यालाही स्वत:चा साहित्यिकसंकेतव्यूह ( लांग/ लिटररी कोड ) असतो. साहित्यव्यवस्थेतील यासंकेतव्यूहाचे पालन / उल्लंघन करीत ( पॅरोल ) प्रत्येक साहित्यकृती अवतरतअसते. संकेतांचे पालन करण्यापेक्षा त्यांचे उल्लंघन करण्यावरच साहित्य-कृतीचा जास्त भर असतो. वाङ्‌मयकृती ही संरचनावादी दृ ष्टिकोणातून ‘संहिता ’ असते. लेखकाकडे संहितेचा निर्माता वा आदिकारण म्हणूनपाहिले जात नाही; तर तो लेखनाच्या प्रकियेतील एक संरचनात्मक घटकअसतो. संहितेच्या अर्थाचे मूळ हे लेखकाच्या व्यक्तिगत मनोव्यापारांतवा प्रतिभाव्यापारात नसून ते भाषेच्या व साहित्याच्या कार्ययंत्रणेत आहे, अशी भूमिका संरचनावादाने मांडली. संरचनावादी समीक्षेने लेखकाच्याजागी वाचकाची स्थापना केली. मात्र वाचक-व्यक्तीचे अस्तित्व ‘ वाचन’ या अ-व्यक्तिगत कियेत विरघळून टाकले आणि हे केवळएखाद्या ‘संहिते ’ चेवाचन नव्हे, तर समग लिखिताचे वाचन असते.साहित्यकृती वा संहिता साहित्यव्यवस्थेचाच एक घटक असून, तिलात्या व्यवस्थेच्या संदर्भात आणि संबंधसरणीत अस्तित्व, अर्थ व मूल्यप्राप्त होत असल्याने साहित्यकृती ही स्वायत्त, स्वतंत्रअशी वस्तू नसते.संरचनावाद्यांच्या मते, भाषेची नियमव्यवस्था व साहित्याची संकेतव्यवस्था हे भाषेचे/ साहित्याचे एकसामाजिक व सांस्कृतिक अंग होय.

उत्तर-संरचनावाद

( पोस्ट-स्ट्र क्चरॅलिझम ). १९६० च्या दशकातसंरचनावादी सिद्घांतांची चिकित्सक समीक्षा होऊ लागली व त्याविरुद्घप्रतिकिया उमटू लागल्या. उत्तर-संरचनावादाने संरचनावादाची तपासणीकरुन शोध, स्पष्टीकरण वअर्थनिर्णयन यांबाबतीत पर्यायी सिद्घांतांचीमांडणी केली. संरचनावादाच्या परिपूर्णतेबाबत उत्तर-संरचनावादीसमीक्षकांनीमूलभूत शंका उपस्थित केल्या. उत्तर-संरचनावादी टीकाकारांच्या मते कोणत्याही संहितेचा अर्थ अस्थिर असतो. चिन्हीकरणस्वभावत:च अस्थिर असते. सोस्यूर याने केलेला चिन्हक आणि चिन्हार्थयांतील मूलभूत भेदच ह्या अस्थिरतेच्या मुळाशी आहे. भाषेची अपूर्णता हीउत्तर-संरचनावादी विचारातील एक महत्त्वाची बाब आहे. अनिश्चितार्थ-कता ( अपोरिआ ) हा झाक देरिदा याच्या भेदसिद्घांतातील व वि-रचनावादीउपयोजनातील महत्त्वाचा घटक आहे. अर्थ हा आतून अस्थिरअसतो, ही उत्तर-संरचनावादी मीमांसकांची भूमिका आहे.

यूरोपीय साहित्यसमीक्षा-व्यवहारात साधारणपणे १९७० पासूनउत्तर-संरचनावाद ही संज्ञा प्रचारात आली. सोस्यूरप्रणीत संरचनावादीभाषाविचाराचे परिशीलन व चिकित्सक समीक्षा ही उत्तर-संरचनावादाचेपायाभूत अधिष्ठान होय. संरचनावादातील केंद्रयुक्त संरचना, ज्ञाता इ.संकल्पना या प्रणालीने त्याज्य ठरवल्या. तद्वतच संरचनावादातीलविज्ञाननिष्ठ व बंदिस्त अशा विचारांवरील टीकाही उत्तर-संरचनावादातआढळते. काही समीक्षकांच्या मते उत्तर-संरचनावाद हे संरचनावादाचेचविकसित रुप आहे. उत्तर-संरचनावादी समीक्षक व्यक्तीऐवजी ज्ञाता / कर्ताही संकल्पना वापरतात.

उत्तर-संरचनावादी सिद्घांताच्या संदर्भात रॉलां बार्त याची भूमिकामहत्त्वाची मानली जाते; कारण त्याने संरचनावाद आणि उत्तर-संरचनावादयांना सांधण्याचे कार्य केले. आधी संरचनावादाची मांडणी करणाऱ्या बार्त याने नंतरच्या काळात उत्तर-संरचनावादी दृ ष्टिकोणातून लेखक,संहिता, वाचक या संकल्पनांचे विश्लेषण केले. त्याने आपल्या इमेज-यूझिक-टेक्स्ट (१९७७) या पुस्तकात ‘लेखकाचा अंत’ (डेथ ऑफद ऑथर ) ही महत्त्वाची संकल्पना मांडली. ती उत्तर संरचनावादी तत्त्वप्रणालीच्या मुळाशी आहे. संहितेच्या अर्थाचा विचार लेखक या व्यक्तीशी, तिच्या मनोधारणेशी वा हेतू , उद्दिष्टे यांच्याशी जखडून ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद त्याने मांडला. पारंपरिक समीक्षेत साहित्यासंबंधीचा समगविचार लेखककेंद्रित होता. लेखकाचे व्यक्तिमत्त्व, चरित्र, मुलाखती हीसमीक्षेची मुख्य आयुधे होती. त्यात साहित्याचा संपूर्ण विचार हाआविष्कारनिष्ठ व पर्यायाने व्यक्तिनिष्ठ, लेखकनिष्ठ असाच राहिला. याउलट सोस्यूरप्रणीत भाषाविज्ञानामध्ये भाषिक व्यवस्थेची संकल्पनाकेंद्रस्थानी आहे. ह्याचा आधार घेऊन बार्तने असा युक्तिवाद केला, की भाषेमध्ये – भाषिक व्यवस्थेमध्ये – कर्ता किंवा कर्तृवाचक नामअसते; परंतु व्यक्ती नसते. याच भाषाविज्ञानावर आधारलेली लेखनाचीसंकल्पनासुद्घा अशीच व्यक्तिनिरपेक्ष झाली आहे. लेखनातून बोलते तीभाषा; व्यक्ती नव्हे. लेखन म्हणजेव्यक्तीच्या भावभावनांचा, विचारांचावा अनुभवांचा आविष्कार नसते; लेखन म्हणजे विविध प्रकारची भाषिककृत्येअसतात, तेव्हा लेखन आणि लेखक यांच्यातील संबंध तोडूनलेखकत्व हा लेखनाच्या एकूण प्रकियेतील एक संरचनात्मक घटकअसतो, यावर बार्तने भर दिला व त्यातून लेखकाच्या अंताची संकल्पनासिद्घ केली. बार्त व अन्य उत्तरसंरचनावादी विचारवंतांनी साहित्यकृतीतील लेखकाची सर्वसाक्षी व सर्वसमावेशक उपस्थिती नाकारली व त्याजागी वाचकाची प्रतिष्ठापना केली. ज्याविधानांमुळे लेखन सिद्घ झालेआहे, ती विधाने ज्या अवकाशात कोरलेली आहेत, तो अवकाश म्हणजेवाचक. संहितेची एकात्मता लेखकात नाही, तर वाचकात आहे. वाचकानेसंहितेचे सगळे धागेदोरे धरुन ठेवलेलेअसतात. वाचकाचा जन्म लेखकाच्या अंतातून होत असतो, अशी बार्तची भूमिका आहे. संस्कृतीच्याअसंख्य केंद्रांकडूनमिळवलेल्या वचनांचे पेशीजाल म्हणजे संहिता( टेक्स्ट). वाचकाला संहितेची बहुविधता कळत असते, तर लेखक म्हणजेसमीक्षकाने संहितेतून काढलेले, प्रक्षेपित केलेले एक ‘गृहीत’ असते, अशी उत्तर-संरचनावादाची धारणा आहे. समीक्षकाने साहित्यकृतीचीसंहिता व तिचे सांस्कृतिक संदर्भ यांवरच आपले लक्ष केंद्रित केलेपाहिजे. उत्तर-संरचनावादी समीक्षकांनी साहित्यकृतीऐवजी साहित्यिकसंहिता व संहितात्मकता ( टेक्स्चुॲलिटी) यांसंबंधीच्या संकल्पना मांडल्या.

जी लिखित रुपात असते, ती म्हणजे संहिता. ग्रंथवेष्टनाच्या आतसंहिता ही लेखनरुप शरीर ( बॉडी ऑफ रायटिंग ) धारण करते. वाचकव लेखक यांच्यामधील संबंधांच्या अवकाशात संहिता निर्माण केलीजाते. साहित्यकृती ही एक पूर्ण वस्तू असते, तर संहिता ही अशी वस्तूवा संकल्पना नसून सर्जक वाचन कियेत अनुभवली जाणारी गोष्ट असते.साहित्यकृती व संहिता या दोहोंतील भेद हा वस्तू आणि प्रकिया, उत्पादित वस्तू व उत्पादनप्रकिया, तसेच चिन्हार्थ व चिन्हरुप यांच्यातीलभेदासारखा आहे. संहितेचा अर्थ अनिश्चित, संदिग्ध, अनेकार्थसूचक असतोआणि एक संहिता दुसऱ्या संहितेशी देवघेव साधणे, कीडा करणे वसंबंध साधणे अशा प्रकियांनी जोडली जाते. त्यामुळे प्रत्येक संहिता हीदुसऱ्या संहितेची एक आंतरसंहिता ( इंटरटेक्स्ट ) असते. बार्तच्या मते, संहितेच्या बहुमुखीपणाची ( प्लूरॅलिटी ), तिच्या अर्थाच्या अनेकत्वाची वअनिश्चिततेची कल्पना करणे, ती प्रत्यक्षपणे अनुभवणे, जगणे आणिअर्थसर्जनाची निरंतरचालणारी प्रकिया मुक्त व खुली ठेवणे, हे उत्तर-संरचनावादी समीक्षेचे मुख्य उद्दिष्ट होय.

उत्तर-संरचनावाद्यांच्या मते, साहित्यकृती ही प्राथम्याने एक भाषिककृती – शब्दचिन्हांनी घडवलेली संहिता – असते. कोणत्याही संहितेतीलवा भाषिक कृतीमधील शब्दांची रचना ही भेद, साधर्म्य व सान्निध्य/साहचर्य अशा तिहेरी संबंधांवर अधिष्ठित असते. तेव्हा साहित्यकृतीच्यासंरचनेमध्ये अनुस्यूत असलेले सेंद्रिय एकतेचे तत्त्व वा केंद्र विचलितकरुन भेद, साधर्म्य व साहचर्य यांच्या आश्रयाने चाललेल्या शब्दांधीलदेवघेवीला, मुक्त कीडेला महत्त्व देऊन साहित्यकृतीची समीक्षा केली पाहिजे.ह्या भूमिकेमुळे उत्तर-संरचनावादी समीक्षकांनी साहित्यकृतीच्या सेंद्रियएकतेपेक्षा वियुक्ततेला ( डिस्युनिटी ) – मुक्त देवघेवीला – जास्त महत्त्व दिले.

उत्तर-संरचनावादी समीक्षकांनी ‘संहिता’ ही संकल्पना व्यापक वसर्वसमावेशक स्वरुपात मांडली. सर्वच भाषिक कृतींना त्यांनी संहितावा लेखन असे संबोधले. त्यामुळे ललित साहित्य, तत्त्वज्ञानपर लेखन,

समीक्षापर लेखन इ. सर्वच लेखनप्रकारांची गणना ते ‘संहिता’ ह्याव्यापक संज्ञेखाली करतात. या सर्वच प्रकारांध्ये भाषेचा आलंकारिक, काव्यात्म वा सर्जक वापर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. ललितसाहित्यात तो जास्त प्रमाणात होत असला, तरी त्यामुळे तो लेखनाचावेगळा प्रकार वा जाती मानण्याचे त्यांच्या मते कारण नाही. या अर्थानेते ललित साहित्य व समीक्षा या प्रकारांत फरक करीत नाहीत. त्यांच्या दृष्टीने ललित लेखन, तत्त्वज्ञानपर लेखन, समीक्षा लेखन हे सर्व ‘संहिताप्रकार’ आहेत. या उत्तर-संरचनावादी साहित्यविचाराने साहित्यसमीक्षेलाआणि विशेषत: सांस्कृतिक साहित्याभ्यासाला एक नवी दिशा व वेगळेपरिमाण दिले.

वि-रचनावाद

( डी-कन्स्ट्र क्शनिझम ). फेंच तत्त्वज्ञ झाक देरिदायाने आपल्या ऑफ ग्रॅमॅटॉलॉजी (१९६७) या ग्रंथात ‘ वि-रचना ’ हीसंकल्पना प्रथमत: मांडली. तद्वतच त्याचा ‘स्ट्र क्चर, साइन अँड प्ले इन दडिस्कोर्स इन द ह्यून सायन्सेस ’ (१९६६) हा निबंध व स्पीच अँडफिनॉमिना (१९७३), रायटिंग अँड डिफरन्स (१९७८) हे ग्रंथ यांतहीवि-रचनावादी विचारांची सूक्ष्म, सखोल व चिकित्सक मांडणी आढळते.पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, भाषाविज्ञान इ. ज्ञानशाखांतील आधारभूत तत्त्वांविषयी व केंद्रांविषयी देरिदाने मूलभूत शंका उपस्थित करुनकाही नव्या संकल्पना मांडल्या. त्याचे विचार समजून घेण्यासाठी ह्यासंकल्पनांचा परिचय करुन घेतला पाहिजे.

मूळ फ्रेंच संज्ञा ‘Deconstruirs’ म्हणजे विघटनाची, वि-रचनेचीकृती ( ॲक्शन ऑफ डी-कन्स्ट्र क्शन ). या संज्ञेचे (१) एखाद्या समष्टीचेघटक सुटे सुटे करणे, (२) स्वत:चेच विघटन वा वि-रचना ( सेल्फडी-कन्स्ट्र क्शन ) करणे इ. अर्थ देरिदाला अभिप्रेत आहेत. एखादीसंहिता ज्यातत्त्वविचाराचे, विचारप्रणालीचे वा अर्थाचे आवर्जून प्रतिपादनकरीत असते, त्याचे ती स्वत:च कसे केंद्रविचलन वा खंडन करीतअसते, ते त्या संहितेतील आलंकारिक भाषेच्या कार्याच्या आश्रयाने स्पष्टवा उघड करणे म्हणजे ‘वि-रचना’ ( डी-कन्स्ट्र क्शन ) होय.

फ्रेंच विचारविश्वात १९६५–७० या कालखंडात वि-रचनावादही तत्त्वप्रणाली उदयास आली व तिचा प्रभाव यूरोपीय तसेच अँग्लो-अमेरिकन साहित्यविचारावर व समीक्षेवर पडला. अमेरिकेत १९७०–८० या दशकात वि-रचनावादी साहित्यविचार व समीक्षा विकसितझाली. त्यातून ‘द येल किटिक्स’ हा समीक्षकांचा गट पुढे आला. हेरल्डब्लू, जेफरी हार्टन, पॉल डी. मॅन, जे. हिलिस मिलर हे या गटातीलसमीक्षक होत. त्यांनी अँग्लो-अमेरिकन आणि यूरोपीय साहित्यविचारांतदुवा व संवाद साधण्याचे कार्य केले.

देरिदाच्या मते, वि-रचन हे नकारात्मक वा विध्वंसक नसून ती भावात्मकव विधायक किया आहे. संरचना वा व्यवस्था नष्ट करण्यासाठी तिचेकेंद्र-विचलन वा वि-रचन करावयाचे नसते. उलट त्या संरचनेच्याशक्यतांचा, अर्थांचा, तिच्या घडणीचा, इतिहासाचा स्वीकार करण्यासाठीवि-रचन करावयाचे असते.

देरिदाने शब्दतत्त्वकेंद्रवाद ( लोगोसेंट्रि सिझम ), ध्वनिकेंद्रवाद( फोनोसेंट्रिसिझम ) व पुरुषबुद्घितत्त्वकेंद्रवाद ( फॅलोगोसेंट्रि सिझम )या तीन तत्त्वप्रणालींमागील आधारतत्त्वे विचलित, वि-रचित करणारीभूमिका मांडली :

शब्दतत्त्व वा विवेकतत्त्व

संहितेच्या अर्थाची सत्यासत्यतालेखकाच्या मनातील भाषापूर्व अर्थाच्या, हेतूच्या साक्षात उपस्थितीच्या वासमक्षतेच्या निकषाधारे निश्चित केली जाते. ही समक्षतेची ज्ञानशास्त्रीयसंकल्पना होय. या समक्षतेच्या तत्त्वाला देरिदा ‘लोगोस’ असे संबोधतो.लोगोस म्हणजे शब्दतत्त्व वा विवेकतत्त्व ( रीझन ) आणि ते ज्यातत्त्वविचाराचे आधारभूत केंद्र आहे, तो तत्त्वविचार म्हणजे शब्दतत्त्वकेंद्रवादवा विवेकतत्त्वकेंद्रवाद होय. देरिदाच्या मते ज्यातत्त्वप्रणालीतअस्तित्वाचा अर्थ बोलल्या जाणाऱ्या म्हणजे उक्त शब्दात ( स्पोकन वर्ड )वा विवेकबुद्घीत ( रीझन ) शोधण्याचा सदैव अपयशी ठरणारा प्रयत्नकेला जातो आणि ज्यातलेखनाला ( रायटिंग ) बोलल्या जाणाऱ्या उक्तशब्दापेक्षा कमी लेखले जाते, त्या तत्त्वप्रणालीला विवेकतत्त्वकेंद्रवादम्हटले जाते.

या विवेकतत्त्वकेंद्रवादाने प्रभावित झालेल्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात वज्ञानसंस्कृतीत अनेक प्रकारची परस्परविरोधी द्वंद्वे वा तत्त्वे ( बायनरीअपोझिशन्स ) एकत्र वसत असतात व त्यांपैकी एक पद वा संकल्पनादुसऱ्यावर आपली सत्ता वा वर्चस्व गाजवत असते; त्यामुळे त्यांच्या-मध्ये श्रेणीयुक्त विषम भावाचे नाते निर्माण होते. उदा., आत्मा-शरीर,संज्ञा-असंज्ञा, भाव-अभाव, सत्य-स्वप्न, निसर्ग-संस्कृती, वास्तव-कल्पित, पुरुष-स्त्री, मूळ वस्तू-प्रतिमा, मूलकृति-अनुकृती, अर्थ-ध्वनी, उच्चरित शब्द-लिखित शब्द, भाषण-लेखन इ. या परस्परविरोधीद्वंद्वांध्ये मूल्यभाव आहे. सांस्कृतिक संस्था व्यवस्थांच्या कार्यव्यवहारातही विरोधी द्वंद्वे कार्यशील झालेली आढळतात. त्यांतील पहिल्या पदालादुसऱ्या पदापेक्षा विशेष महत्त्व व प्रतिष्ठा दिली जाते. देरिदाच्या मते बुद्घि-तत्त्ववादाच्या विचारसरणीमागील ही विषममूल्य दृ ष्टी बदललीपाहिजेआणि या परस्परविरोधी मानल्या जाणाऱ्या दोन्ही पदांना सारखीच प्रतिष्ठाव सममूल्य दिले पाहिजे. यापरस्परविरोधी द्वंद्वांतील सत्ता वा वर्चस्वगाजवणाऱ्या पदांचे सत्ताकेंद्र विचलित करुन त्या दोहोंध्ये समभावाचेनातेप्रस्थापित करणे, ही वि-रचनावादाची पहिली पायरी होय.

साहित्यिक संरचनेच्या घटकांना एकार्थाशी सीमित, एकात्म व बंदिस्तकरणाऱ्या सेंद्रिय एकतेच्या रुपतत्त्वाला वा केंद्राला विचलित वा वि-रचित करणे व तिच्या घटका-घटकांधील भेदमूल संबंधांची देवघेवमुक्तपणे करु देऊन संहितेच्या अर्थाचे सर्जन, प्रसरण ( डिसेमिनेशन ) वअनेकीकरण निरंतरपणे करीत राहणे, हे वि-रचनावादी समीक्षेचे प्रमुखउद्दिष्ट होय.वास्तविक या विवेकतत्त्वकेंद्रवादाच्या विरोधात जाणारा एकव्यापार भाषेतच क्रियाशील असतो व त्यामुळे शब्दचिन्हांध्ये, पदापदांध्येभेदांची व भेदमूल संबंधांची निर्मिती होऊन त्यांच्या देवघेवींतून अर्थाचीनिर्मिती होत असते. या भाषागत कियाव्यापाराला देरिदाने ‘दिफेराँस’ (Diffe’rance ) ही नवी संज्ञा योजिली. Diffe’rence (भेद) या फेंचशब्दातील ‘e’ अक्षराऐवजी ‘a’ हे अक्षर घालून देरिदाने Diffe’rance ही नवी संज्ञा निर्माण केली (मराठी समीक्षाव्यवहारात गंगाधर पाटील यांनी ‘भेद’पासूनतिचे वेगळेपण दर्शविण्यासाठी अवग्रहचिन्ह-युक्त ‘ भेऽद ’ ही नवी संज्ञा रुढ केली ). देरिदाने दोन कृतींमध्ये निर्माणहोणारा कालावकाश, मध्यंतर, कालांतर ( काळाच्या पातळीवरीलभेद ) हे आपल्या नव्या संज्ञेतूनसूचित केले. Diffe’rence या मूळशब्दाने एखादी गोष्ट रुपगुणाने दुसरीपासून भिन्न असल्याचे सुचविलेजाते (अवकाशाच्या पातळीवरील भेद ). देरिदाप्रणीत Diffe’rance (भेऽद ) म्हणजे केवळ एखादा शब्द वा संकल्पना नव्हे, तर अतिभौतिकीय ( मेटॅफिजिकल ) विवेकतत्त्वकेंद्रवादाच्या पलीकडे जाणारा एकगतिशील व संबंधशील कियाव्यापार आहे. संबंधशीलता ( रिलेशनॅलिटी )हा भेऽदाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे. या संबंधशीलतेमुळे चिन्हेएकमेकांशी संबंध साधण्यास सक्षम बनतात, तिच्यामुळे संरचनेत भेदांचेवा भेदमूळ संबंधाचे एक जाळे निर्माण होते. या जाळ्यातील घटकांनापरस्परांशी मोकळेपणाने देवघेव वा मुक्तकीडा ( फ्री प्ले ) करण्यासवाव मिळून ते अविरतपणे अर्थनिर्मिती करीत राहतात. भेद आणि भेऽदयांच्यात रुढार्थाने कार्यकारणभावाचे नाते नसते. भेऽद हा भाषेतचघडणारा, विवेकतत्त्वकेंद्रवादाच्या विरोधी जाणारा कियाव्यापार आहे, अशी देरिदाची भूमिका आहे.

ध्वनिकेंद्रवाद

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या परंपरेने लेखनापेक्षा बोलण्यालानेहमीच अधिक महत्त्व दिले. प्लेटो, ॲरिस्टॉटलकालीन प्राचीन तत्त्व-विचारांपासून ही परंपरा चालत आली आहे. देरिदाच्या मते बोलणे नैसर्गिकआणि लेखन कृत्रिम मानणे म्हणजे बोलण्याला अधिक महत्त्व देणे होय.लेखनचिन्हापेक्षा ध्वनीला महत्त्व देणाऱ्या विवेकतत्त्वकेंद्रवादाच्या यारुपाला देरिदाने ‘ध्वनिकेंद्रवाद’ असे नाव दिले. या ध्वनिकेंद्रवादामुळेलेखनावर अन्याय झाला आहे, असे देरिदा मानतो. ध्वनिकेंद्रवादाच्याप्रभावामुळे बोलणे ही मूळ कृती व लेखन ही बोलण्याची अनुकृतीमानली गेली आणि लेखनाला–लिखित संहितेला-दुय्यम स्थान वसापत्नभावाची वागणूक दिली गेली. देरिदाने भेऽद संकल्पनेच्या साहाय्यानेया ध्वनिकेंद्रवादी तत्त्वाचे खंडन करुन लेखनाला भाषाविचारात आणिसाहित्यविचारात उचित समतुल्य स्थानव प्रतिष्ठा मिळवून दिली. लिखितचिन्हमीमांसेची ( ग्रॅमॅटॉलॉजी ) उभारणी हा या प्रयत्नाचाच एक भाग होय.देरिदाच्यामते भेऽद कियेमुळे भाषेतील पदापदांध्ये मधला अवकाश (स्पेसिंग ), अंतर वा मध्यंतरे ( इंटर्व्हल्स ) निर्माण होत असतात. हाअवकाश, अंतर वा मध्यंतरे म्हणजे स्वनिमांच्या ( फोनीम्स) व रेखिमांच्यारचनेत कोरलेले ‘आदिलेखन’ ( आर्किरायटिंग ) होय. हे आदिलेखनध्वनिखुणांच्या ( स्वनिमांच्या ) रुपाने हवेत आणि लेखनाच्या रुपानेकागदावर अवतरत असते. भेऽद कियेच्या रुपातील हे आदिलेखनबोलण्यापूर्वी ( आणि बोलण्यातून ) अस्तित्वात येत असते. देरिदाच्यामते साहित्याचा विचार करताना त्याच्या केवळ ध्वनिरुपाचा विचार नकरता त्याच्या रेखित / लिखित रुपाचाही विचार करणे आवश्यक आहे.पारंपरिक साहित्यविचाराने तसेच रशियन रुपवादाने साहित्याचीसाहित्यिकता ( लिटररीनेस ) ही शब्दाच्या ध्वनिरुपात शोधण्याचा प्रयत्नकेला. त्यांनी साहित्याच्या रेखित/लिखित अंगाकडे दुर्लक्ष केले, असादेरिदाचा आक्षेप आहे. संहितेबाहेर-भाषेबाहेर काहीही नसते, ( देअरइज नथिंग आउटसाइड ऑफ द टेक्स्ट ) हे सूत्र देरिदाने मांडले; मात्रसंहिताबाह्य वास्तवविश्व तो नाकारत नाही. त्याच्या मते वास्तवविश्व हेएक संहिता म्हणून आपल्या अनुभवाचा विषय होत असते. मार्टिनहायडेगरच्या विचारव्यूहातील ‘मानवी अस्तित्वा’ ऐवजी देरिदा ‘संहिता ही संकल्पना योजितो. संहिता हे मानवी अस्तित्वाचे भाषांतर आहे,म्हणून अस्तित्वाच्या अर्थाचा प्रश्न संहितेच्या अर्थाशी समांतर आहे. लेखकसंहिता लिहिताना वाचकास उत्तर देण्यास जसा जबाबदार असतो, तसावाचकही प्रतिसाद देताना लेखकाला उत्तर देण्यास जबाबदार असतो,म्हणून परस्परांना उत्तरदायित्वाला बांधील असलेल्या लेखक-वाचकाच्या साहित्यिक जबाबदारीचा ( लिटररी ॲन्सरेबिलिटी ) हा प्रश्न नीतिशास्त्रीयजबाबदारीचा प्रश्न आहे, असे देरिदाचे प्रतिपादन आहे.

देरिदाच्या पुरुषबुद्घिकेंद्रविरोधी विचारप्रणालीचा स्त्रीवादी समीक्षेवरविशेष प्रभाव पडला. प्रामुख्याने हेलन सिक्सस, ल्यूस इरिगॅरी इ. फेंचस्त्रीवादी समीक्षकांनी वि-रचनावादी प्रणालीचा आधार घेऊन आपलीसमीक्षा केली असल्याचे दिसून येते.

वाचकनिष्ठ समीक्षापद्घती

१९६० च्या दशकात रुपवादीसमीक्षेचे महत्त्व हळूहळू कमी होत गेले व नवनव्या समीक्षापद्घती पुढेयेऊ लागल्या. त्यांतील एक महत्त्वाची समीक्षापद्घती म्हणजे ‘वाचक-निष्ठ’ वा ‘वाचकवादी’ समीक्षापद्घती होय. १९७० च्या दशकातसाहित्यव्यवहारात ‘वाचक’ या घटकाला मध्यवर्ती केंद्रस्थानी प्रस्थापितकरणाऱ्या वाचकनिष्ठ समीक्षापद्घतीचा उदय झाला. त्यात दोन विचारधाराप्रामुख्याने निर्माण झाल्या: (१) जर्मन साहित्यमीमांसक वोल्फगांग आयझर(१९२६–२००७) याने पुरस्कृत केलेला वाचक-प्रतिसाद सिद्घांत ( रीडररिस्पॉन्स थिअरी ) आणि (२) हान्स-रॉबर्ट जौस या जर्मन समीक्षकानेमांडलेला वाचक-ग्रहण सिद्घांत ( रीडर रिसेप्शन थिअरी ). पूर्वीच्याअँग्लो-अमेरिकन आणि यूरोपीय रुपवादी समीक्षेत साहित्यकृती हीस्वायत्त व स्वयंपूर्ण आहे, असे मानून वाचकाचा अनुभव व अपेक्षाविचारात न घेता संहितेवरच लक्ष केंद्रित केले गेले. त्या विरुद्घची प्रति-क्रिया म्हणून वाचकनिष्ठ समीक्षापद्घती निर्माण झाली. तद्वतच विसाव्याशतकाच्या उत्तरार्धातील संज्ञामीमांसा, संरचनावाद, आधुनिक भाषा-विज्ञान, चिन्हमीमांसा इ. समीक्षाप्रणालींच्या उदयामुळे संहिता आणि वाचकयांच्यातील संबंधांकडे नव्या ज्ञानदृ ष्टीने पाहिले जाऊ लागले. उदा.,संज्ञामीमांसेच्या दृ ष्टीने संहितेचा अर्थ वाचकाच्या वाचनकियेतच निर्माणहोतअसतो. त्यामुळे संहितागत अर्थाचा शोध घेण्याऐवजी संहितार्थाचीनिर्मिती करणे, हे वाचकाचे व समीक्षेचे कार्य मानले जाऊ लागले.परिणामी समीक्षेचे लक्ष संहितेपेक्षा वाचकाच्या प्रतिसादावर व अनुभवावरअधिक केंद्रित होऊ लागले. यानव्या भूमिकेची स्वाभाविक परिणतीम्हणून वाचक-प्रतिसाद सिद्घांत उदयाला आला:

वाचक-प्रतिसाद सिद्घांत

ही अनेकांगी व बहुजिनसी स्वरुपाचीविचारधारा आहे. साहित्यकृतीचा ‘वाचक’ या संकल्पनेविषयी अनेकसमीक्षकांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. आयझरने असे मत मांडले, की संहितेतच तिच्या अनेक वाचनांची शक्यता अध्याह्रत असते. संहितावाचणारे दोन प्रकारचे वाचक असतात:  प्रत्यक्ष वाचक व अध्याहृ त( इंप्लाइड)वाचक. प्रत्यक्ष वाचक म्हणजे संहिताबाह्य लौकिक वाचक.अध्याह्रत म्हणजे संहितागत गर्भित वाचक. अध्याह्रत वाचकाची निर्मितीसंहिताच करीत असते; कारण वाचकाच्या प्रतिसादाला आमंत्रण देणाऱ्या संरचनांचे जाळे संहितेध्येच असते, असे आयझरचे मत आहे. याशिवायरोमॉन इन्गार्देनचा सहसर्जक वाचक ( को-किएटर ), ऊंबेर्तो इकोचासंहितारचितनमुनेदार वाचक, जेराल्ड प्रिन्सचा संहितागत श्रोता,जोनाथन कलरचा साहित्यिक ज्ञानक्षमता असलेला सक्षम वाचक ( काँपिटंट रीडर ) इ. अनेकविध संकल्पना ‘ वाचक ’ या घटकाला मध्यवर्तीकल्पून मांडल्या गेल्या.

आयझरचे इंप्लाइड रीडर (१९७४) व द ॲक्ट ऑफ रीडिंग(१९७८) हे दोन ग्रंथ वाचक-प्रतिसाद सिद्घांताच्या उभारणीत महत्त्वाचेमानले जातात. साहित्यकृतीची संहिता ही रित्या जागा व अनिश्चिततेचीक्षेत्रे ( स्पॉट्स ऑफ इन्‌डिटरमिनन्सी ) यांनी युक्त असते. संहिता ववाचक यांच्यातील देवघेवीत वा सहसर्जक वाचनकियेत ह्या रित्याजागा भरल्या जातात वकाव्यार्थरुप सौंदर्यवस्तूची ( इस्थेटिक ऑब्जेक्ट )निर्मिती केली जाते. संहितेचे वाचन करीत असतानाच वाचक संहितेचीपुनर्निर्मिती करीत असतो. ह्या पुनर्निर्मितीमध्ये तो सामाजिक-ऐतिहासिकसंदर्भांचे भान ठेवतो, तसेच अन्य काही तंत्रेहीवापरतो. संहितेत मोकळ्याजागा ( गॅप्स ) असतात व त्या वाचकाने भरावयाच्या असतात, अशीया समीक्षेची भूमिकाआहे. आयझरने वाचनव्यापाराची संकल्पनाकालजाणिवेशी जोडली आहे. त्याच्या मते वाचनाचा प्रत्येक क्षण हाभूतलक्ष्यीस्मृती व भविष्यलक्ष्यी अपेक्षा यांच्यातील द्वंद्वात्मक देवघेवीच्यास्वरुपाचा असतो. ह्या स्मृती व अपेक्षा साहित्यकृतीत प्रत्यक्षउपस्थितनसतात. वाचकानेच त्या आपल्या स्मरणशक्तीच्या व कल्पनाशक्तीच्यासाहाय्याने भरावयाच्या असतात.साहित्यकृतीतील रित्या जागा वाचकआपल्या स्मृतिरुप ज्ञानाच्या आधारे भरत असतो, तर संभवगर्भभविष्यलक्ष्यीघटकांना कल्पनाशक्तीच्या साहाय्याने मूर्त करीत असतो.सौंदर्यवस्तूच्या निर्मितीत हे दोन्ही व्यापार कियाशील असतात, असेआयझरचे प्रतिपादन आहे.

वाचक-ग्रहण सिद्घांत

जौसने वाचक-ग्रहण सिद्घांत मांडताना ‘अपेक्षांचे क्षितिज’ ( होरायझन ऑफ एक्स्पेक्टेशन्स ) ही नवी संकल्पनामांडली. मूलादर्शांमुळे ( पॅरडाईम) कोणत्याही काळात काही अपेक्षानिर्माण होतात, त्यांना जौसने ‘अपेक्षांचे क्षितिज’ असे संबोधिले. याअपेक्षांच्या क्षितिजामुळेच आपल्याला त्या काळातील कलाकृतीच्यामूल्यमापनाचे निकष मिळण्याची शक्यता असते; परंतु कलाकृतीच्यासंदर्भात अपेक्षांची क्षितिजे ही कल्पना स्थिर असू शकत नाही. जौसच्यामते, कलाकृतीच्या अपेक्षांची क्षितिजे नेहमीच बदलत असल्यानेकलाकृतीला निश्चितार्थ नसतो, तसेच सार्वत्रिक वा वैश्वि क स्वरुपाचाअर्थ नसतो. कलाकृतीचा सर्वकाळी लावता येण्यासारखा निश्चितार्थनसतो, तसेच कलाकृतीचा अर्थकलावंतानेच ठरवायचा नसतो, या दोनबाबी त्याने अधोरेखित केल्या. वाचकाने संहितेला दिलेल्या प्रतिसादामुळेव वाचकाच्या संहितेबरोबर होणाऱ्या किया-प्रतिकियेमुळे संहितेचे विशिष्टकाळातील रुप सिद्घ होते व हे रुप सिद्घ होण्यासअपेक्षेच्या क्षितिजाचीभूमिका महत्त्वाची ठरते, अशी जौसची थोडक्यात भूमिका आहे. जौसनेवाचक-ग्र हण सिद्घांतमांडताना वाचकाची व्यक्तिवादी भूमिका ज्याठरवून वाचक समूहाच्या गहणाचा विचार प्राधान्याने मांडला. सौंदर्यवादी-रचनावादी-रुपवादी घटक व सामाजिक-ऐतिहासिक-आशयवादीघटक यांच्यात परस्परसंवाद साधणारी व नवे वाचकनिष्ठ सौंदर्यशास्त्रसाकारणारी भूमिका हळूहळू उदयाला येते आहे व त्यात उच्च दर्जाच्याकलारुपांबरोबरच लोकप्रिय कला व प्रसारमाध्यमे यांचाही विचार होतो. आहे, त्याबरोबरच साहित्याच्या मूलादर्शातही बदल होत आहेत, असेजौसचे प्रतिपादन आहे. कलानिर्मिती, सौंदर्यानुभव व सौंदर्याचा वाचकावरीलपरिणाम या तिन्ही घटकांतील नेका फरक त्याने विशद केला.साहित्य केवळ वाचकाला आनंदच देत नाही, तर त्याचे उन्नयन घडवूनआणते. वाचकाच्या गहणाला ऐतिहासिकतेची चौकट असते आणि वाचन-इतिहासाची परंपरा असते, या मुद्यांवर जौसने आपल्या विवेचनात भरदिला. रुपवाद आणि सामाजिकता व आशयनिष्ठा या दोन टोकांच्याभूमिकांत सुवर्ण मध्य साधणारा जौसचा वाचक-गहण सिद्घांतयासमन्वयामुळेच महत्त्वाचा ठरला आहे.

फ्रेंच समीक्षक पॉल रिकर याने संज्ञामीमांसेच्या ( फिनॉमिनॉलॉजी )दृ ष्टिकोणातून संहिता व वाचनव्यापारविषयक नवेनमुनारुप मांडले. (अ रिकर रीडर, १९९१). त्याच्या मते, साहित्यकृती ही एक भाषाश्रयीसंहिता असून तिला संरचनात्मक, ऐतिहासिक, प्रत्यक्ष वाचनानुभवपरव अर्थनिर्णयनपर ( हर्मीन्यूटिक ) अशी चार अंगे असतात आणि त्यांनाप्रतिसाद देत वाचकाची वाचनकिया विकसित होते. वाचनकियेच्यापहिल्या संरचनात्मक ( कॉन्फिग्यूरेशन ) अवस्थेत साहित्यकृतीच्यासंरचनेचे–म्हणजे तिच्या घटकांधील अंतर्गत संबंधांचे–विश्लेषण वअर्थविवरण केले जाते. या अवस्थेत साहित्यकृतीच्या संरचनात्मक वऐतिहासिक अंगांना प्रतिसाद दिला जातो. वाचनकियेच्या दुसऱ्या पुनर्रचनात्मक (रिकॉन्फिग्यूरेशन ) अवस्थेत संहितेचे विश्व आणि वाचकाचेविश्व यांच्यामध्ये देवघेव, साद-प्रतिसाद, संवाद सुरु होऊनसहसर्जक( को-किएटिव्ह ) वाचनानुभवात संहितेच्या साहित्यिक अर्थाची नवनिर्मितीव रचना होत असते. या अवस्थेत साहित्यकृतीच्या अर्थात्म व ज्ञानात्मअंगाला प्रतिसाद दिला जातो. तिसऱ्या स्व-आकलनाच्या ( सेल्फअंडरस्टँडिंग )अवस्थेत साहित्यकृतीच्या आकलनाबरोबरच वाचकालास्वत:विषयीचे ज्ञान-आत्मज्ञान, स्व-आकलन होत असते. या अवस्थेततिच्या अर्थनिर्णयनपर अंगाला प्रतिसाद दिला जातो.

आपण साहित्यकृतीचे वाचन कसे करतो ?– तर साहित्यकृतीच्याशब्द, वाक्ये, परिच्छेद, प्रकरणे अशा एकेका घटकाचे अर्थाकलन करीततिच्या संपूर्ण समष्टीचे वाचन पूर्ण करतो आणि ते पूर्ण झाल्यावर पुन्हासमष्टीच्या अर्थाच्या प्रकाशात शब्द, घटनादी घटकांचा अर्थ लावतअसतो. आपल्या वाचनकियेचा प्रवास घटकाकडून समष्टीकडे आणिसमष्टीकडून घटकाकडे या वर्तुळाकार दिशेने व कमाने होत अर्थाकलनाचे एक मंडल पूर्ण होते. या मंडलाकार कियाव्यापाराला ‘अर्थनिर्णयनपर वर्तुळ ’ ( हर्मीन्यूटिक सर्कल ) असे म्हटले जाते. घटकाचा ( शब्दाचा ) अर्थकळल्याशिवाय समष्टीचा ( वाक्याचा ) अर्थ कळत नाही आणि समष्टीचाअर्थ कळल्याशिवाय घटकाचा अर्थ कळत नाही. हा विरोधाभास ह्यासंकल्पनेत अनुस्यूत आहे. अर्थनिर्णयनमीमांसेत वाचकाच्या वाचनक्रि येलामहत्त्वाचे स्थान दिले जाते.

ब्रिटिश-अमेरिकन समीक्षक जोनाथन कलर याने ‘सक्षम वाचका’ ची कल्पना मांडली. वाचक व लेखक या दोघांनीही चिन्हव्यवस्थेवर प्रभुत्वमिळवलेले असते आणि या प्रभुत्वावरच त्यांचे वाचक वा लेखक म्हणूनअसलेले सामर्थ्य अवलंबून असते, असे कलर म्हणतो. त्याच्या मतेअपरिचित, अस्वाभाविक व अर्थदुर्लभ वाटणाऱ्या साहित्यसंहितेलापरिचिताच्या, स्वाभाविकतेच्या व अर्थसुभगतेच्या पातळीवर आणून तिलासंप्रेषणसुलभ करणे आवश्यक असते. वाचनाच्या ह्या क्रि याव्यापारालाकल रने ‘स्वाभाविकीकरण’ असे म्हटले आहे. त्यासाठी वाचकाला भाषिकव साहित्यिक संकेतांचे चिन्हांचे – यथोचित ज्ञान असले पाहिजे, म्हणजेचवाचकाच्या ठायी ‘साहित्यिक ज्ञानक्षमता’ असली पाहिजे. साहित्यिकज्ञानक्षमतेच्या संकल्पनेत भाषिक, साहित्यिक व सांस्कृतिक अशा तीनप्रकारच्या संकेतांचे ज्ञान वाचकाला असावे, हे अपेक्षित असते. अशा सर्वप्रकारच्या ज्ञानदृ ष्टीने वाचक ‘सक्षम’ असला पाहिजे, असे कलर याचेम्हणणे आहे.

डेव्हिड ब्लीश (१९४०– ) या अमेरिकन समीक्षकाने सब्जेक्टिव्हक्रिटिसिझम (१९७८) या ग्रंथात वाचकनिष्ठ सिद्घांताची मांडणी करतानाव्यक्तिनिष्ठ भूमिकेचा पुरस्कार केला. वरील ग्रंथात त्याने उत्स्फूर्त वचिंतनशील अशा दोन प्रकारच्या वाचक-प्रतिसादांचे विवेचन केले.वाचक संहितेला प्रथम उत्स्फूर्त प्रतिसाद देतो आणि नंतर चिंतनकियेतया उत्स्फूर्तप्रतिसादाला एक विशिष्ट अर्थ देत असतो. म्हणजेच त्याचेएका विशिष्ट दृ ष्टीतून अर्थनिर्णयन करीत असतो. पहिल्या उत्स्फूर्तप्रतिसादाला त्याने प्राथमिक प्रतिमांकन ( सिंबलायझेशन ) म्हटले, तरदुसऱ्या चिंतनशील प्रतिसादाला पुनर्प्रतिमांकन ( रिसिंबलायझेशन ) म्हटलेआहे. अमेरिकन समीक्षक स्टॅन्ली फिश याने इज देअर अ टेक्स्ट इनधिस क्लास ? (१९८०) या पुस्तकात आपली भूमिका मांडली आहे.वाचक हा संहितेचा अर्थ लावणाऱ्या वाचकसमूहाचा एकभाग म्हणूनवाचन करीत असतो; व्यक्ती म्हणून नव्हे. अर्थ लावणारे वाचकसमूहअसतात, त्यांच्या अशा वाचन करण्याच्यापद्घती व युक्त्या असतात. आणि त्यांचा परिणाम म्हणून विशिष्ट वाचकाची वाचन करण्याची पद्घतीठरत असते. अशा प्रकारे त्याने आपल्या वाचनविषयक सिद्घांतातअर्थनिर्णयन करणाऱ्या वाचकवर्गाची वा वाचकसमूहाची ( इंटरप्रिटेटिव्हकमिटीज ) संकल्पना मांडली आहे. त्याच्या मते साहित्यसंहितेच्याअर्थनिर्णयनासाठी लागणारी कौशल्ये व व्यूहरचना ( इंटरप्रिटेटिव्हस्ट्रॅ टेजीज) ह्या वाचकाच्या व्यक्तिगत अधिकारक्षेत्रातील नसतात, तरवाचकवर्गाच्या सामूहिकअधिकारक्षेत्रातील असतात आणि प्रत्येकवाचक-सभासदाला त्या वाचकवर्गाकडून उपलब्ध होत असतात. साहित्यव वाचन यांविषयीची फिशची ही समीक्षाप्रणाली व्यक्तिवादाच्यामर्यादा ओलांडून सामाजिक भूमिकेच्या दिशेने जाणारी आहे.

उत्तर-संरचनावादी साहित्यमीमांसकांनी संहितात्मतेविषयी भाषावैज्ञानिक दृ ष्टिकोणातून वेगळी भूमिका मांडली. त्यांच्यामते संहितासर्जनहे लेखकाच्या वा वाचकाच्या प्रतिभेचे वा मनोव्यापाराचे कार्य नसून तेभाषेचे कार्य आहे. भाषेच्या भेदाश्रयी कार्ययंत्रणेतून अर्थसर्जन वसंहितासर्जन होत असते. भाषेच्या ह्या संहितासर्जक क्रियेला त्यांनीसंहितात्मता/ संहितागुणपरता असे नाव दिले. लेखनाच्या व वाचनाच्याभाषिक क्रियेतून अर्थसर्जन आणि संहितासर्जन होत असते. म्हणून लेखनव वाचन ह्या संहितासर्जक क्रिया असून ती संहितात्मतेची दोन रुपेहोत. वाचनाचा संहितात्मता म्हणूनविचार करणारी ( रिडिंग ॲजटेक्स्च्युॲलिटी) ही उत्तर-संरचनावादी भूमिका आहे. त्यात लेखन ववाचन, संहिता व वाचक यांच्यातील भेद गळून पडतात.

वाचक अर्थनिर्मितीच्या कार्यात सकिय व सर्जक सहभाग घेत असतोआणि संहितेवर आपला अधिकार प्रस्थापित करीत असतो. वाचकाचे हेदुहेरी कार्य विचारात घेऊन वाचकवादी/वाचकनिष्ठ समीक्षापद्घतीच्याविविध प्रणाली व सिद्घांत अनेक समीक्षकांनी मांडले आणि साहित्यकृतीचीस्वयंपूर्णता व स्वायत्तता, तसेच वाचक व संहिता यांच्यातील परंपरागतद्वैत अशा रुढ, पूर्वप्रस्थापित संकल्पनांना आव्हान दिले.

सारांश, साहित्यसमीक्षेच्या इतिहासात साहित्यकृतीच्या लेखक-संहिता-वाचक ह्या प्रमुख घटकांना केंद्रस्थानी मानून, त्यांचे चिकित्सकविश्लेषण-विवेचन ह्यांवर भर देणाऱ्या अनेकविध समीक्षापद्घती, प्रणालीव सिद्घांत काळाच्या ओघातवेगवेगळ्या कालखंडांत निर्माण झाले वप्रभावी ठरले. उदा., लेखक या घटकाला प्राधान्य व महत्त्व देणारीस्वच्छंदतावादी भूमिका अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रभावी होती; तर विसाव्या शतकातलेखकाच्या मनोविश्वाच्या चित्रणाचा वेध घेणारे अभिव्यक्तिवादासारखेसंप्रदाय प्रभावी ठरले. ‘संहिता’ या घटकाला केंद्रस्थानी ठेवून संहितेचेचिकित्सक विश्लेषण करणारे रुपवादी, भाषावैज्ञानिक संरचनावादी इ. सिद्घांतविसाव्या शतकात प्रभावी ठरले; तर वाचकवादी /वाचकनिष्ठ समीक्षापद्घतीतवाचक हा साहित्यकृतीचा प्रमुख घटक मानून व त्याला केंद्रस्थानीठेवून विविध समीक्षाप्रणाली व सिद्घांत अनेक समीक्षकांनी मांडले.

स्त्रीवादी समीक्षा

स्त्रियांचे, स्वत:च्या वेगळेपणाची जाणीव प्रकर्षानेव्यक्त करणारे व स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे साहित्य म्हणजे स्त्रीवादीसाहित्य होय. साहजिकच पुरुषी साहित्याहून ते स्वरुपत: वेगळे ठरते.स्त्रियांच्या साहित्यातील हे पृथ्‌गात्म वेगळेपण शोधून त्याची चिकित्साकरण्याचे कार्य गेल्या काही वर्षांत स्त्रीवादी समीक्षकांनी केले आहे.स्त्रियांच्या कथा, कादंबऱ्या , कविता आदी साहित्यातून त्यांच्या ‘स्व’ त्वाचाशोध त्यांनी कसा घेतला आहे, त्याची जाणीव त्यांना कशा प्रकारे झालीआहे, वर्षानुवर्षे पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेमुळे आपण दडपले गेलोआहोत, ह्या दडपशाहीचे भान स्त्रियांनी आपल्या लेखनातून कसे व्यक्तकेले आहे, ह्याचा शोध स्त्रीवादी समीक्षा घेते. पुरुषी साहित्यापेक्षा स्त्री-साहित्याचे जे वेगळेपण संभवते, त्या वेगळेपणाची-भिन्नत्वाचीकारणमीमांसा, त्याचे स्वरुप व ने केपणा यांचे विवेचन-विश्लेषणस्त्रीवादी समीक्षेत केले जाते. स्त्री व पुरुष यांचे जगाकडे पाहण्याचेदृ ष्टिकोणच मुळात भिन्न असतात, असे ही समीक्षा मानते. परंपरेने स्त्रीव पुरुष यांच्याकडे सोपविलेल्या वेगवेगळ्या विषमतावादी भूमिकांमुळे( उदा., पुरुषसत्ताक समाज व संस्कृती यांनी स्त्रियांना बहाल केलेल्यापत्नी-माता-गृहिणी ह्या भूमिका ) तसेच व्यवसायांमुळे स्त्री-पुरुषांच्यालेखनातला भेद निर्माण होतो, असेही मानले जाते. स्त्रियांचे स्त्रियांनीकेलेले चित्रण, स्त्रियांचे खास वेगळे अनुभव व विषय यांचे स्त्रीवादीदृ ष्टिकोणातूनदर्शन घडविणारे साहित्य, स्त्रीचे स्वत्वाचा शोध घेऊ पाहणारे,स्वत्वाच्या जाणिवेने केलेले आत्मप्रकटीकरण व आत्मशोधह्या स्त्रीवादीसाहित्याच्या वेगवेगळ्या दिशा आहेत. स्त्रीवादी समीक्षा ही अशा अनेक-दिशीय, बहुजिनसी स्वरुपाच्यास्त्रीवादी साहित्याचे विवेचन-विश्लेषणकरुन त्यातील स्वत्वाचा, वेगळेपणाचा शोध घेऊ पाहते.

स्त्रीवादी साहित्य वस्त्रीवादी समीक्षा ह्या संकल्पना स्त्रीमुक्तीचळवळीतून उदयाला आल्या. फ्रेंच लेखिका  सीमॉन द बोव्हार(१९०८–८६) ह्यांनी लिहिलेल्या ल दझिॲम सॅक्स (१९४९, इं. भा.द सेकंड सेक्स, १९५३) या पुस्तकापासून स्त्रीमुक्ती चळवळीचा प्रारंभझाला, असे मानले जाते. पुरुषप्रधान समाजात स्त्री ही पुरुषाशी अनेकनात्यांनी जखडून ठेवलीजाते व त्यातही पुरुष हा मुख्य व स्त्री ही‘इतर’ ( दुय्यम ) असा विषमभाव आहे. स्त्री-पुरुषातील ही विषमताजीवशास्त्रीय वा दैवी नसून संस्कृतिनिर्मित आहे. दोघांत इतर कुठलाहीभेद नसताना केवळ नैसर्गिक शारीरिक रचनेतील भेदामुळे स्त्रीला दुय्यमस्थान दिले जाते. ‘स्त्री म्हणून आपण जन्म घेत नसतो; तर आपण स्त्रीबनत असतो’ ( ‘वन इज नॉट बॉर्न अ वुन; रादर वन बिकम्स अवुन’) हे सीमॉन द बोव्हारचे विधान संस्कृतिनिर्मित स्त्री-पुरुष भेदावरव स्त्रीच्या दुय्यम स्थानावर अचूक शरसंधान करणारे आहे. अर्थातचस्त्री-पुरुष शारीर भेद इथे नाकारायचा नाही; परंतु स्त्री-देहाबरोबरच तिचालाजाळूपणा, नाजुकपणा, भावनाप्रधानता, ममता, स्वार्थत्याग, समर्पणवगैरे तिला बहाल केले जाणारे गुण हे जन्मजात असतात, हे येथेनाकारावयाचे आहे. हे गुण समाजाने व संस्कृतीने स्त्रीत्वावर लादलेलेअसतात. तेव्हा जैविक लिंगभेद म्हणजे सांस्कृतिक लिंगभेद नव्हे, हेस्त्रीवादाने स्पष्ट केले आहे.

सँड्रा गिल्‌बर्ट व सुसान ग्यूबर यांनी द मॅडवुन इन द ॲटिक: दवुन रायटर अँड द नाइन्टीन्थ सेंच्यूरी लिटररी इमॅजिनेशन (१९७९) या ग्रंथात एकोणिसाव्या शतकातील लेखिकांच्या साहित्याचे विश्लेषणकरुन स्त्रीवादी काव्यशास्त्राची ( फेमिनिस्ट पोएटिक्स ) मांडणी करणारेविवेचन केले. पुरुषांनी साहित्याच्या क्षेत्रामध्ये दडपशाही करुन स्त्रियांचीमुस्कटदाबी केली आहे. या पुरुषी अत्याचाराला स्त्रियांकडून विविधप्रकारच्या प्रतिकिया मिळाल्या आहेत. या प्रतिकिया व त्यांमागची मानसिकप्रकिया समजून घेण्यासाठी तार्किक अनुबंध ( मॉडेल ) तयार करणे, हेस्त्रीवादी काव्यशास्त्राचे प्रमुख उद्दिष्ट या लेखिकांनी मानले. केट मिलेट(सेक्शुअल पॉलिटिक्स, १९७७); बेट्टी फेडन (द फेमिनाइन मिस्टिक ); जर्मेन गीअर ( द फिमेल यूनक ) या लेखिकांनी समाजातील सांस्कृतिकघटकांचा अन्वयार्थ लावून समकालीन सामाजिक स्थितीतील स्त्रियांच्यासांस्कृतिक कुचंबणेचा व दडपणुकीचा अर्थ स्पष्ट केला. पुरुषप्रधान वपितृसत्ताक व्यवस्थेचे त्यामागचे राजकारण स्पष्ट केले आणि ही पुरुषीसांस्कृतिक दडपशाही नष्ट करण्यासाठी स्त्रीवादी समीक्षेची आवश्यकताप्रतिपादन केली. पाश्चात्त्य साहित्याच्या इतिहासकारांनी दुर्लक्षिलेल्यास्त्रियांच्या साहित्याचे संशोधन व्हर्जिनिया वुल्फ, बिटिश स्त्रीवादी समीक्षकएलेन शोवॉल्टर (१९४१– ), एलन मोएर इ. लेखिकांनी केले.

स्त्रीची विशिष्ट अशी संस्कृती असते. स्त्रियांच्या लेखनातून–त्यांच्याआगळ्यावेगळ्या, पृथ्गात्म अनुभवचित्रणातून–त्यांचे आशय-विषय, वाड्मयीन रुपबंध, आविष्कार-रीती, शैली, भाषा इ. वाड्मयीन घटकांतूनही स्त्री-संस्कृती वेगवेगळ्या रुपांत प्रकटत असते. स्त्रीवादी समीक्षास्त्रियांच्या साहित्याचा जीवशास्त्रीय, भाषिक, मानसशास्त्रीय, सांस्कृतिकअशा वेगवेगळ्या दृष्टिकोणांतून वेध घेऊन त्यातील वेगळेपणा अधोरेखत करते. स्त्रियांच्या लेखनाचा असा वेगळा स्वतंत्र विचारकरणाऱ्या समीक्षेला एलेन शोवॉल्टरने ‘गायनोसेंट्रिक फेमिनिस्ट क्रिटिसिझम’ वसमीक्षकाला ‘गायनोकिटिक’ ( स्त्री-समीक्षक ) असे संबोधिले आहे.स्त्रीवादी समीक्षेचा ‘वाचक स्त्री’ ( वुन ॲज अ रीडर ) असा वेगळाघटकही तिने मानला आहे.

पाश्चात्त्य देशांत स्त्रीमुक्ती चळवळ वेगाने फोफावली व तिचाच एकभाग असलेली स्त्रीवादी साहित्यसमीक्षा वेगवेगळ्या अंगोपांगांवर भर देतविकास पावली. उदा., इंगजी स्त्रीवादी समीक्षेने स्त्रियांच्या शोषणावर भरदेऊन मार्क्सवादी दृ ष्टिकोण स्वीकारला. फेंच स्त्रीवादी समीक्षेने वि-रचनावादी पद्घती स्वीकारुन मुख्यत्वे भाषिक अंगाने स्त्रीवादी साहित्याचा वेध घेतला. तसेच मानसशास्त्रीय भूमिकेतून स्त्रीवादी साहित्यातूनप्रकटणाऱ्या स्त्रीच्या मानसिक कोंडमायाचे, परवशतेचेविश्लेषण केले.अमेरिकन स्त्रीवादी समीक्षेने पाठचिकित्सक पद्घतीवर भर देऊन स्त्रियांच्यावाड्मयीन आविष्कारांचा शोधघेतला. हे सर्व प्रकार स्त्री-साहित्याचास्त्रीवादी भूमिकेतून अभ्यास करणारे आहेत.

स्त्रीवादी समीक्षा मुख्यत्वे विषयनिष्ठ आहे. समाजात स्त्रीचे पुरुषाकडूनहोणारे शोषण व छळवणूक यांवर साहित्याचा विषयम्हणून ती लक्षकेंद्रित करते. तसेच स्त्री-साहित्यातील खास पृथ्‌गात्म अनुभूतींच्यावेगळेपणाचा, एक व्यवच्छेदक लक्षणम्हणून शोध घेऊ पाहते. पुरुषआणि स्त्री यांच्या अनुभवांत सरळ व स्वच्छ असा भेद असतो. काहीअनुभव जे खास स्त्रियांचेअसतात, ते पुरुष अनुभवू शकत नाहीत वाजाणून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे स्त्रीलेखिकेचा वर्ण्य विषय मुळातच भिन्नठरतो. तद्वतच स्त्रीची भाषा, प्रतिमासृष्टी, शैली इ. पुरुषी आविष्कारापेक्षास्वभावत:च भिन्न असते. ह्या भिन्नत्वाचा, स्त्रीविशिष्ट वेगळेपणाचा शोधस्त्रीवादी समीक्षा घेऊ पाहते.

स्त्रीवादी समीक्षा कलेला विशिष्ट सांस्कृतिक वातावरणाचे उत्पादनमानते. म्हणून या समीक्षेत साहित्य व संस्कृती यांचा संकर झालेलाआढळतो. प्रस्थापित सौंदर्यशास्त्रीय रुपवादी समीक्षेचे वाड्मयीन निकषतिने नाकारले आहेत; मात्र १९६० नंतरच्या विविध समीक्षापद्घतींचा तीआश्रय घेत असल्याने स्त्रीवादी समीक्षेचे स्वरुप बहुतत्त्ववादी बनले आहे.

साहित्याला राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्थेचा व त्यांच्याऐतिहासिकतेचा संदर्भ असतो. या तत्त्वाचा पाठपुरावा करणाऱ्या वपर्यायाने रुपवादी, संरचनावादी भूमिकांना विरोध करणाऱ्या काहीसमीक्षाप्रणाली गेल्या पन्नास वर्षांत पाश्चात्त्यसमीक्षाविश्वात उदयालाआल्या. स्त्रीवादी समीक्षेचा उल्लेख वर आलाच आहे. नव-इतिहासवाद,उत्तर-वसाहतवाद, सांस्कृतिक समीक्षा या अन्य काही प्रणाली होत.मात्र या प्रणालींनी पुनरुज्जीवनवादी दृ ष्टिकोण न स्वीकारता इतिहास,समाज, संस्कृती, पौर्वात्य व पाश्चात्त्य कला-साहित्य इ. संदर्भांतसंकल्पनांची पुनर्मांडणी केली. सौंदर्यशास्त्रीयसिद्घांतामध्ये रुपवाद वसंरचनावाद अशा कलेला स्वायत्त स्थान देणाऱ्या भूमिका राजकीयपरिभाषेत ‘उजवी’ कडेकल असणाऱ्या ; तर कलेचा विचार इतिहास,समाज, संस्कृती या संकल्पनांच्या संदर्भांत करणाऱ्या भूमिका ‘डाव्या’किंवाजहाल विचारसरणीच्या मानल्या जातात. नव-इतिहासवाद, उत्तर-वसाहतवाद व सांस्कृतिक समीक्षा ह्या प्रणाली, पारंपरिक मार्क्सवादाचीफारशी कास न धरताही, समीक्षासिद्घांतक्षेत्रात जहाल, डाव्या भूमिकाम्हणून ओळखल्या जातात; कारण या भूमिका साहित्याचा विचार रुपवादी, स्वायत्त तत्त्वांच्या आश्रयाने न करता सामाजिक, राजकीय वऐतिहासिक तत्त्वांच्या आधारे करु पाहतात. साहित्यसमीक्षेच्या आजवरच्याइतिहासात आशयवादी व रुपवादी या दोन टोकांच्या विचारव्यूहांत क्रि या-प्रतिकियात्मक द्वंद्वांतून कधी रुपवादाच्या, तर कधी आशयवादाच्याअंगोपांगांनी अनेकविध समीक्षाप्रणाली विकसित होत गेल्याचे दृ श्यवारंवार पाहावयास मिळते.

नव-इतिहासवाद

ही समीक्षाप्रणाली अमेरिकन विद्यापीठांमध्ये मुख्यत्वे स्टीफन गीनब्लाट या सिद्घांतकाराच्या लेखनाच्याप्रभावाखाली १९८० च्या सुमारास निर्माण झाली व पुढे सु. दोन दशकेटिकून राहिली. मायकल मॅकान्लिस याने प्रबोधनाच्या ( रेनेसान्स )अभ्यासाच्या संदर्भात ‘नीओ-हिस्टॉरिसिझम’ ( नव-इतिहासवाद ) ही संज्ञाप्रथमत: वापरली, तर गीनब्लाटने ती अधिक प्रचलित केली. मात्र स्वत:च्यासमीक्षेला त्याने ‘सांस्कृतिक साहित्यशास्त्र’ ( कल्चरल पोएटिक्स )असे नाव दिले.

नव-इतिहासवाद प्रामुख्याने दोन तत्त्वप्रणालींच्या विरोधात उभाठाकला. प्रथमत: संदर्भहीन पोकळीमध्ये संहितांचे सूक्ष्म वाचन करणाऱ्या भूमिकांना त्याने विरोध केला. उदा., रुपवाद, संरचनावाद, वि-रचनावाद इ.समीक्षाप्रणालींमध्येसंहितांचे सूक्ष्म वाचन होते; तथापि संहितांच्याऐतिहासिक व सांस्कृतिक स्वरुपाला न्याय मिळत नाही व त्यातूनसंदर्भहीनअशी संहिताकेंद्री समीक्षा निर्माण होते, असा नव-इतिहासवाद्यांचा आक्षेप होता. दुसरे म्हणजे, इतिहासाला एकाचसत्त्वाच्यादावणीला बांधणाऱ्या इतिहासवादी भूमिकांना त्यांनी विरोध केला. हेगेलव मार्क्स यांच्या प्रभावाखाली आधुनिक साहित्याभ्यासामध्ये जोइतिहासवाद प्रस्थापित झाला होता, तो या समीक्षकांना मान्य नव्हता.पारंपरिक मार्क्सवादानेकला-साहित्याच्या विचारांत ऐतिहासिकतेलामहत्त्व दिले खरे; तथापि साहित्यकृती वा कलाकृती ह्या पुरोभूमीवर,तरसामाजिक-आर्थिक परिस्थिती पार्श्वभूमीवर असते, असे मानले. कला-साहित्याच्या ह्या पुरोभूमीकरणाला नव इतिहासवाद्यांनी विरोध केला; कारण कला-साहित्यादी संकल्पनांची स्वायत्तता व मक्तेदारी त्यांनामोडून काढावयाची होती. संहितेला प्राधान्य देऊन सामाजिक-राजकीयपरिस्थितीला पार्श्वभूमीचा दर्जा देणाऱ्या इतिहासवादी प्रणालीच्या विरोधातनवइतिहासवादी समीक्षकांनी मांडलेल्या भूमिकेत विशिष्ट संहिता हेअभ्यासाचे वा संशोधनाचे क्षेत्र न राहता, ती संहिता ज्याऐतिहासिक-सांस्कृतिक संदर्भांमध्ये निर्माण झाली, त्यांवर भर दिला जातो. हे संदर्भम्हणजे केवळ पार्श्वभूमीवर नव्हे आणि संहिता म्हणजे पुरोभूमी नव्हे.नव-इतिहासवादामध्ये ऐतिहासिक-सांस्कृतिक संदर्भांचे पुरोभूमीकरण( फोर-ग्राउंडिंग )केले जाते. विशिष्ट संहितेचा वा कलाकृतीचासंदर्भ म्हणजे ‘इतर’ ( अदर ) संहिता होय, यांना ‘सह-संहिता’ ( को-टेक्स्ट) म्हटले जाते. सह-संहिता या खरे म्हणजे विविध प्रकारचेसामाजिक-सांस्कृतिक व्यवहारच असतात. ग्रीनब्लाट याने नव-इतिहासवादाला तात्त्विक भूमिकेपेक्षा या विविध सामाजिक-सांस्कृतिकव्यवहारांचा किंवा परिभाषितांचा वेध घेणारा समीक्षात्मक व्यवहार मानलेआहे. कोणत्याही कालखंडात अनेक प्रकारच्या संहिता व परिभाषितेनिर्माण होत असतात, तसेच संहिता आणि संस्कृती यांचे संबंध सरळव सुटसुटीत स्वरुपाचे नसतात. या संबंधांध्ये परस्परविरोधी असेअनेक ताणतणाव दडलेले असतात. अशा सर्व घटकांचा एकत्रित समगविचार नव-इतिहासवादी समीक्षेने महत्त्वाचा मानला. थोडक्यात म्हणजेमानववादी व मार्क्सवादी विचारसरणींमध्ये एक प्रकारचा एकसुरीपणाहोता. बाख्तीनने यासाठी ‘एक-आवाजीपणा’ ही संज्ञा वापरली. हाएकसुरीपणा टाळून समीक्षेला बहुस्तरीय, बहुआवाजी बनवणे हे नव-इतिहासवादी समीक्षकांनी महत्त्वाचे कार्य मानले. प्रत्येक काळातले वसंस्कृतीतले बहुविध प्रकारचे आवाज त्यांनी महत्त्वाचे मानले.

उत्तर-वसाहतवाद

( पोस्ट-कलोनिअलिझम ).  साम्राज्यवाद( इंपीरिअलिझम ) म्हणजे एका समाजाने आपले राज्य व साम्राज्यइतरसमाजांवर लादण्याची प्रकिया; तर  वसाहतवाद ( कलोनिअलिझम )म्हणजे एखाद्या समाजानेपरक्या भूमीवर व तेथे राहणाऱ्या समाजांवरआपली वसाहत लादण्याची प्रकिया. आधुनिक लोकशाहीवादीविचारप्रणालीमध्ये साम्राज्य ही राज्यसंकल्पनाविसंगत ठरते. त्यामुळेचबहुधा आधुनिक यूरोपीय साम्राज्यवादासाठी‘वसाहतवाद’ ही संकल्पनारुढ झाली असावी. यूरोपीय समाजाच्या प्रगतीचा काळ हा वसाहतींच्यागुलामगिरीचा व पिळवणुकीचाही काळ होता, असेही म्हटले जाते. साम्राज्यवादही संकल्पना आधुनिक लोकशाहीच्या व उदारमानवतावादाच्या विचारसरणीशी विसंगत व विरोधी मानली जात असतानाहीआधुनिक यूरोपीय समाज ‘साम्राज्यसादी’ वावसाहतवादी कसे आणिसांस्कृतिक वर्चस्व गाजवण्याची प्रेरणा त्यांच्यात प्रबळ कशी, ह्यांमागीलविसंगतीचा शोध उत्तर-वसाहतवाद घेऊ पाहतो.

यूरोपीय साम्राज्यवादाचीपरिणती पहिल्या महायुद्घात (१९१४–१८)झाली. पहिल्या महायुद्घाच्या प्रारंभी १९१४ च्यासुमारास पृथ्वीचाजवळजवळ ८५% भूभाग यूरोपीय राष्ट्राच्या साम्राज्याखालीहोता. यूरोपीय साम्राज्यापासूनमुक्तीमिळविण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या स्वातंत्र्यलढ्यां तूनझाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक ‘उत्तर-वासाहतिक’ ( पोस्ट कलोनिअल ) परिस्थिती निर्माण झाली, असे म्हटले जाते. यूरोपीयराजकीय साम्राज्यनष्ट झाले, तरी अनेक भूखंडांवर त्याचा अवशिष्ट असासांस्कृतिक वर्चस्व-भाव शिल्ल्क राहिला, असेही दिसून येते. त्यापरिस्थितीचे आकलन करुनघेणारा सिद्घांत म्हणजे उत्तर-वसाहतवादहोय. एक अभ्यासक्षेत्र म्हणून जवळजवळ सर्वच सामाजिक शास्त्रे ( उदा., राज्यशास्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र इ.) तसेच तत्त्वज्ञान, साहित्य, कला वइतर विद्याशाखांत हा सिद्घांत सध्या व्यापक प्रमाणात उपयोजिला जातअसून त्याला फार मोठी मान्यता लाभली आहे. सांस्कृतिक समीक्षा वअभ्यासक्षेत्र ( कल्चरलस्टडीज ) हे उत्तर-वसाहतवादी विचारधारेतूनचविकसित झाले आहे.

उत्तर-वसाहतवादाला दोन वेगवेगळे अर्थ प्राप्त झाले आहेत. एकम्हणजे, त्याला कालकमाचा संदर्भ आहे : उत्तर वसाहतवाद म्हणजेवसाहतवादानंतर सुरु होणारी प्रक्रि या. दुसरा संदर्भ बौद्घिक-सांस्कृतिकचळवळीचा आहे.वसाहतवाद संपण्याची/संपविण्याची प्रक्रिया म्हणजेउत्तर-वसाहतवाद; पण ह्यात अनेक अंतर्विसंगती दडल्या आहेत. वसाहतवादाला केंद्र म्हणून मानल्याशिवाय उत्तर-वसाहतवाद उभाच राहू शकत नाही. शिवाय वसाहतवादी सत्ताकेंद्र हलविण्यासाठीच तो उदयाला येतो आणि हे केंद्र हलविण्यात तो यशस्वी ठरला, तर तो स्वत:च संपुष्टात येतो.

वसाहतवादामुळे शोषणाची प्रकिया सुरु होऊन शोषितांना आपले स्वत्व वा अस्मिता गमवावी लागते. ही अस्मिता पुनश्च प्राप्त करुन घेण्याची प्रकिया, हा उत्तर-वसाहतवादाचा गाभा होय. ब्रिटिश सत्तेखाली असणारा भारत व फ्रान्सच्या सत्तेखाली असणारा अल्जीरिया या दोन देशांच्या स्वातंत्र्यलढ्यांवर अनुक्रमे महात्मा गांधी (१८६९–१९४८) व फांट्स फनाँ (१९२५–६१) यांच्या विचारांचा व चळवळींचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्या विचारांना उत्तर-वसाहतवादी प्रणालीच्या सैद्घांतिक जडणघडणीत विशेष महत्त्वाचे स्थान आहे. तसेच इटालियन मार्क्सवादी विचारवंत आंतोनिओ गामची (१८९१–१९३७) याने मांडलेली सांस्कृतिक वर्चस्व-भावाची ( हेजिमनी ) संकल्पनाही उत्तर-वसाहतवादी सिद्घांतनात प्रभावी ठरली आहे.

वसाहतवादी सत्ता ही आपल्या सत्तेला अधिकृतता प्राप्त करुन घेण्यासाठी सहमतीद्वारे बौद्घिक-सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करीत असते. परिणामी साम्राज्यसत्ता राजकीय पातळीवर संपुष्टात आली, तरी वसाहतोत्तर कालखंडात सांस्कृतिक सत्ता अबाधितच राहते. उदा., ब्रिटन या देशाची साम्राज्यसत्ता संपल्यावरही आणि आर्थिक दृष्ठ्या तो देश फारसा वरचढ नसूनही इंगजी भाषा व साहित्य यांद्वारे त्याने आपले सांस्कृतिक वर्चस्व राखले आहे, अशी भूमिका उत्तर वसाहतवादी विचारवंतांनी मांडली आहे.

उत्तर-वसाहतवादी सिद्घांताची मांडणी करणारा प्रमुख समीक्षक म्हणजे एडवर्ड सैद (१९३५–२००३). त्याच्या ओरिएन्टॅलिझम (१९७८; विस्तारित आवृ. १९९५) या ग्रंथात त्याने उत्तर-वसाहतवादाला पायाभूत असणाऱ्या प्राच्यवादाची तात्त्विक मांडणी केली. त्याने वसाहतवादाच्या संदर्भात प्राच्यविद्येचा नवा अर्थ लावला. त्याच्या मते प्राच्यविद्या हे ज्ञानक्षेत्र म्हणजे ‘वसाहतवादी वर्चस्व-भावाचे परिभाषित’ ( डिस्कोर्स ऑफ डॉमिनेशन ) आहे. प्राच्यविद्येचा ज्ञानप्रकल्प हा वस्तुत: पाश्चात्त्य वसाहतवादाची सत्ता अबाधित राखणारा व तिला अधिकृतता प्राप्त करुन देणारा, सांस्कृतिक वर्चस्व मिळवून देणारा प्रकल्प असल्याचे त्याने दाखवून दिले. इतिहास, मानवशास्त्र, तत्त्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, साहित्य, प्रवासवर्णने, रोजनिशा अशा सर्वच प्रकारच्या परिभाषितांतून पाश्चात्त्यांनी पौर्वात्य समाजांवर गाजवलेले आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक वर्चस्वच दिसून येते, अशी भूमिका त्याने आपल्या ग्रंथातून मांडली. पाश्चात्त्यांनी निर्माण केलेल्या या प्राच्यविद्ये ध्ये ‘सत्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्पना या प्रत्यक्षात संरचित मिथके व सांस्कृतिक साचे असतात व त्यातून ती विद्याशाखा विकसित करणाऱ्यांचा आत्म-पर-भाव व्यक्त होत असतो, अशी उत्तर-संरचनावादी भूमिका सैदने घेतली आहे. बौद्घिक सहमतीच्या आधारे पौर्वात्यांची स्वत:बदृलची कल्पना पाश्चात्त्यांनी आपल्याला पाहिजे तशी घडवली. तेव्हा पौर्वात्य समाजांचे संशोधन करणारी प्राच्यविद्या म्हणजे खरे पाहता वर्चस्व-भाव व्यक्त करणारी प्रक्रिया होती. सैदप्रणीत या प्राच्यवादातून (ओरिएन्टॅलिझम) उत्तर-वसाहतवाद विकसित झाला. गायत्री चकवर्ती-स्पिवाक, होमी भाभा या भारतीय साहित्यमीमांसक्रांनी सैदच्या या सिद्घांताचा जोरदार पुरस्कार करुन त्यात अधिक भर घातली. गायत्री चक्रवर्ती-स्पिवाक यांनी निम्नस्तरीय उपसंस्कृतींच्या अभ्यासामध्ये वि-रचनावादी व स्त्रीवादी सिद्घांतांचा वापर केला. ‘ कॅन द सबल्टर्न स्पीक ? ’ या त्यांच्या निबंधामध्ये, पाश्चात्त्य मानव्यविद्याशाखांनी पौर्वात्य उपसंस्कृतींना निम्नस्तरीय मानून कायम परिघाबाहेर किंवा परिघावरच ठेवले आहे व त्यांचा आवाज दडपून टाकला आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. पाश्चात्त्य बुद्घिमंत हे उपसंस्कृतींना ‘पर’ मानून स्व आणि पर भावाची संरचना कशी करतात, विशेषत: स्त्रिया या पर म्हणून कशा संरचित केल्या जातात, ह्याचे विश्लेषण त्यांनी केले आहे. होमी भाभा यांनी द लोकेशन ऑफ कल्चर (१९९४) या आपल्या लेखसंगहात वसाहतवादी परिस्थितीत अस्मितांची घडण कशी होते, ह्याचा मनो- विश्लेषणवादी भूमिकेतून विचार केला आहे. उत्तर-वसाहतवादाचा सिद्घांत गेल्या २५–३० वर्षांत मानव्यविद्या व सामाजिक विज्ञानांच्या क्षेत्रांत मान्यता पावला असला, तरी त्याच्या मर्यादाही काही समीक्षक्रांनी दाखवून दिल्या आहेत. भारतीय मार्क्सवादी विचारवंत एजाझ अहमद यांचा इन थिअरी (१९९२) हा गंथ या संदर्भात महत्त्वाचा आहे.

सांस्कृतिक समीक्षा

संस्कृती म्हणजे उच्च मूल्यभावांची जोपासना, अशी पारंपरिक धारणा होती व त्यातून कला-वाङ्‌मयात अभिजाततावादी मूल्ये प्रस्थापित झाली. प्रबोधनोत्तरकालीन कला-वाङ्‌मयात स्वायत्ततावादी सौंदर्यतत्त्वे निर्माण झाली आणि कला म्हणजे उच्च वा अभिजात उदारमतवादी मानवकेंद्री मूल्यांचा आविष्कार, असे दृढ समीकरण बनले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील मॅथ्यू आर्नल्ड (१८२२–८८) या कवि-समीक्षकाचे वाङ्‌मय म्हणजे उदारमतवादी मानवकेंद्री भूमिकेचे उत्तम उदाहरण मानले जाते. विसाव्या शतकातील टी. एस्. एलियट व  एफ्. आर्. लिव्हिस(१८९५–१९७८) या आधुनिक इंगजी समीक्षक्रांनीही संस्कृतीला मूल्यभावात्मक अर्थ दिला.

१९७० नंतर मात्र संस्कृतीच्या अभिजन-अभिजाततावादी पारंपरिक धारणांना व उच्च मूल्यभावाधिष्ठित प्रस्थापित संकल्पनांना आव्हान देऊन त्या विरोधात बहुजन संस्कृती ( मास कल्चर ) व बहुजन समाजाचे साहित्य ह्या घटक्रांना मध्यवर्ती केंद्रस्थानी ठेवून सांस्कृतिक समीक्षेची नव्याने मांडणी करणाऱ्या काही प्रणाली पुढे आल्या. समाज, संस्कृती व साहित्य यांच्या संदर्भांतील पूवारोक्त उदारमतवादी व मानवतावादी संकल्पनांना त्यांनी मुख्यत्वे विरोध केला. स्त्रीवाद, नवमार्क्सवाद, नव इतिहासवाद, उत्तर-वसाहतवाद या सैद्घांतिक प्रणालींनी स्वायत्ततावादी सौंदर्यसिद्घांत जसा नाकारला, तसेच साहित्याची अभिजातता, श्रेष्ठ साहित्यकृतीची परंपरा ( लिटररी कॅनन ) अशा पारंपरिक कोटींना वा श्रेणीव्यवस्थेलाही आव्हान दिले. स्त्रियांनी लिहिलेले साहित्य, बहुजन समाजाने निर्मिलेले व बहुजनांच्या अभिरुचीस रुचणारे ‘लोकप्रिय’ साहित्य, श्रमिक वर्गाचे साहित्य, चित्रपट-दूरदर्शन अशा जनसंपर्क- माध्यमांतून केले जाणारे सामाजिक-सांस्कृतिक चित्रण ह्यांचा समावेश व्यापक अशा साहित्याच्या संकल्पनेत व्हावा आणि या साहित्याला मुख्य म्हणजे विद्यापीठीय अभ्यासक्रमात स्थान मिळावे, ह्यासाठी अमेरिकन व ब्रिटिश विद्यापीठांध्ये चळवळी सुरु झाल्या. बहुजन संस्कृती व साहित्याचा खंदा पुरस्कर्ता असलेल्या रेंड विल्यम्सने (१९२१–८८) इंग्लंडमध्ये सांस्कृतिक समीक्षेचा पाया घातला. त्याचे वडील रेल्वे कामगार होते व त्याला वेल्समधील गामीण व श्रमिक वर्गाची पाश्वभूमी होती. तो समाजवादी राजकीय चळवळीमध्ये सहभागी होता व मार्क्सवादी विचारसरणीचा पुरस्कारही त्याने उत्तरायुष्यात केला. ह्या कृतिशील व वैचारिक पार्श्वभूमीवर त्याने संस्कृतीच्या अर्थाची चिकित्सा करताना तिच्या मूल्यभावात्मक उपयोजनाबरोबरच मानववंशशास्त्रीय वर्णनात्मक वापरालाही प्राधान्य दिले. त्याने कल्चर अँड सोसायटी : 1780–1950 (१९५८) व द लाँग रेव्हलूशन (१९६१) या ग्रंथांतून संस्कृती, समाज व साहित्य यांसंदर्भांत नव्या संकल्पना मांडल्या. संस्कृती या संकल्पनेचा मूळापासून व ऐतिहासिक स्थित्यंतरांच्या पार्श्वभूमीवर, त्यातील बदलत्या मूल्यांचा आढावा घेऊन त्याने संस्कृतीला व्यापक व सर्वसमावेशक बहुआयामी अर्थ दिला. उदा., मुळात ‘कल्चर’ ही संज्ञा शेतीशी, जमिनीच्या मशागतीशी संबंधित होती. अठराव्या शतकात ‘मनाची मशागत’ हा अर्थ तिला प्राप्त झाला; तर एकोणिसाव्या शतकात कलात्मक व साहित्यिक आविष्कार, विशेषतः त्यांतील उच्च व अभिजात मूल्ये असा अर्थ संस्कृतीला प्राप्त झाला. विल्यम्सने हा अर्थ पूर्णत: नाकारला नाही; तथापि उच्च संस्कृती व निम्नवर्गीय श्रमिक समाज यांना एकत्र जोडणाऱ्या व्यापक, बहुआयामी संस्कृतीची संकल्पना मांडली. विल्यम्सप्रमाणेच रिचर्ड होगर्ट व स्टुअर्ट हॉल या समीक्षक्रांनीही इंग्लिश सांस्कृतिक समीक्षाप्रणालीत मोलाची भर घातली. होगर्ट याने द यूजेस ऑफ लिटरसी (अ‍ॅस्पेक्ट्स ऑफ वर्किंग क्लास लाइफ विथ स्पेशल रेफरन्स टू

पब्लिकेशन्स अँड एंटरटेनमेंट्स, १९५७) या ग्रंथात श्रमिकवर्गाची संस्कृती व रंजनसाधने तसेच जनसंपर्कमाध्यमे यांतील  आंतरसंबंध शोधून संस्कृतीचा बहुव्याप्त, वर्णनात्मक अर्थ मांडला. श्रमिक वर्गाची संस्कृती साधी, बालिश वाटली, तरी ती अस्सल आहे आणि बहुजन समाजाच्या फार मोठ्या वर्गाला तिने जगण्याची सकारात्मक प्रेरणा दिली आहे. त्यात अभिजनांच्या अभिजात साहित्यकृती आणि परंपरा, उच्च्भू संस्कृती व सौंदर्यूल्ये यांना स्थान नाही, अशी भूमिका त्याने मांडली आहे. स्टुअर्ट हॉल यानेही चित्रपट, जनसंपर्कमाध्यमे यांवर संशोधन करुन संस्कृतीची वेगळी संकल्पना तसेच सांस्कृतिक समीक्षा व अभ्यासक्षेत्र यांविषयी विवेचन केले. अमेरिकन मार्क्सवादी समीक्षक फेडरिक जे सन (१९३४– ) याने द पोलिटिकल अन्कॉन्शस: नॅरेटिव्ह अ‍ॅज अ सोशली सिंबॉलिक अ‍ॅक्ट (१९८१) या ग्रंथात पुढीलप्रमाणे भूमिका मांडली : कोणत्याही संहितेचे वाचन करताना कालसापेक्ष व ऐतिहासिक विवरण अपरिहार्य असते. साहित्यसंहितेचे स्वरुप मूलत: प्रतीकात्मक असून त्यात राजकीय व आर्थिक अर्थ दडलेला असतो; म्हणजेच साहित्य-संहितांना राजकीय व आर्थिक उपसंहिता ( सब्टेक्स्ट ) असतात. जेरल्ड गाफ या अमेरिकन समीक्षकाने साहित्याला सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक गाभा द्यावयाचा असेल, तर उच्च पातळीवरील साहित्याच्या अध्यापनामध्ये वैचारिक भूमिकांमधील संघर्ष-( कॉन्फ्लिक्ट ) संकल्पनांना मध्यवर्ती स्थान दिले पाहिजे, असे प्रतिपादन बियाँड द कल्चर वॉर्स : हाऊस टिचिंग द कॉन्फ्लिक्ट्स कॅन रिव्हायटलाइझ हायर एज्युकेशन (१९९२) या ग्रंथातून केले. सांस्कृतिक समीक्षेच्या जडणघडणीत ग्रीनब्लाटची सांस्कृतिक साहित्यशास्त्राची भूमिका व एडवर्ड सैदचा प्राच्यवाद यांचाही महत्त्वाचा वाटा आहे.

मराठीमध्ये दलित साहित्याचे वेगळे, स्वतंत्र सौंदर्यशास्त्र असावे, अशी भूमिका काही समीक्षक मांडतात. ती सांस्कृतिक समीक्षाप्रणाली व उत्तर-वसाहतवाद यांच्या सैद्घांतिक भूमिक्रांना बरीचशी जवळ जाणारी आहे, असे म्हणता येईल.

१९६० नंतर पाश्चात्त्य साहित्यसमीक्षेत जे नवनवे सिद्घांत, तत्त्वप्रणाली, संज्ञा-संकल्पना इ. उदयास आल्या, त्यांचा आधुनिक मराठी साहित्य- समीक्षेत प्रथमच सखोल व विस्तृत परिचय करुन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ज्येष्ठ समीक्षक गंगाधर पाटील (१९३१– ) यांनी केले. समीक्षेची नवी रुपे (१९८१) हे त्यांचे पुस्तक तसेच अनुष्टुभ या वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांनी लिहिलेले पाश्चात्त्य समीक्षा-संज्ञांविषयीचे लेख या संदर्भात उद्बोधक आहेत. मुख्यत: चिन्हमीमांसा व कथनमीमांसा- विषयक त्यांच्या लेखनाने मराठी समीक्षेत नव्या विचार-व्यूहांचा प्रवेश झाला. मिलिंद मालशे व अशोक जोशी यांनी लिहिलेल्या आधुनिक समीक्षा-सिद्घान्त (२००७) या पुस्तकात विसाव्या शतकातील आधुनिक पाश्चात्त्य समीक्षा-सिद्घांतांचा चिकित्सक व सखोल परिचय करुन दिला आहे. ह्या सिद्घांतांची तात्त्विक मांडणी, ऐतिहासिक पार्श्वभूमीवर, स्वरुपवैशिष्ट्ये व मर्यादा यांची साधकबाधक चर्चा त्यात असल्याने तो महत्त्वपूर्ण संदर्भगंथ ठरला आहे. उपरोक्त आधुनिक समीक्षा-सिद्घांतांचा परिचय करुन देताना मुख्यत्वे गंगाधर पाटील व मिलिंद मालशे यांच्या विवेचनाचा आधार घेतला आहे. ज्येष्ठ समीक्षक रा. ग. जाधव (१९३२– ) यांनी ‘साहित्याचे परिस्थितीविज्ञान’ ( इकॉलॉजी ऑफ लिटरेचर ) ही नवी संकल्पना मांडली. साहित्यकृती ही एक सजीव आहे व साहित्य ही समुदायवाचक कल्पना म्हणजे अशा सजीवांची जाती आहे. साहित्य- कृतीचे जीवनचक एका सांस्कृतिक पर्यावरणात चालू असते. या सृष्टीतील सजीवांचा त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणाशी ज्या प्रकारचा जैविक संबंध असतो, तशाच प्रकारचा जैविक संबंध साहित्यकृती व तिच्या सांस्कृतिक पर्यावरणात चालू असतो. अशा स्वरुपाचे विचार त्यांनी या संदर्भात मांडले आहेत. त्यांच्या सर्जनशील समीक्षावृत्तीचा प्रत्यय अशा नव्या सैद्घांतिक मांडणीतून येतो. निवडक समीक्षा : प्रा. रा. ग. जाधव (२००६) ह्या त्यांच्या लेखसंगहात त्यांनी तात्त्विक व उपयोजित अशा समीक्षा-लेखनात नव्याने घडविलेल्या, तसेच वापरात आणलेल्या संज्ञा-संकल्पना, आधुनिक विचारव्यूह व समीक्षाप्रणाली यांचे वेधक दर्शन घडते. सर्जनशील साहित्य हा खरे तर एक ज्ञानगर्भ व्यवहारच असतो आणि या सर्जनशील ज्ञानगर्भ व्यवहाराविषयीचे परिभाषित म्हणजे साहित्यसमीक्षा वा समीक्षा-सिद्घांत होत; ही भूमिका आधुनिक्रांध्ये दृढमूल झालेली दिसते.

संदर्भ : 1. Abrams, M. H. A Glossary of Literary Terms, Bangalore, 1993.

2. Ahmad, Aijaz, In Theory : Classes, Nations, Literatures, Delhi, 1992.

3. Arnold, Matthew, Culture and Anarchy, Cambridge, 1971.

4. Barthes, Roland; Trans. Heath, Stephen, Image-Music-Text, Fontana, 1977.

5. Culler, Jonathan, Structuralist Poetics, London, 1975.

6. Daiches, David, Approaches to Literature, 1956.

7. Derrida, Jacques; Trans. Chakravorty-Spivak, Gayatri, Of Grammatology, Delhi, 1994.

8. Devi, Ganesh, After Amnesia, Bombay, 1992.

9. Eagleton, Terry, Literary Theory: An Introduction, Oxford, 1983.

10. Ellis, John M.The Theory of Literary Criticism, 1974.

11. Gandhi, Leela, Postcolonial Theory, Delhi, 1999.

12. Iser, Wolfgang, The Act of Reading, Baltimore, 1978.

13. Jakobson, Roman, Language in Literature, Cambridge, 1987.

14. Jefferson, Ann; Robey, David, Ed. Modern Literary Theory, Bastford, 1986.

15. Kudchedkar, Shirin, Post Modernism and Feminism, Delhi, 1995.

16. Lodge, David, Ed. 20th Century Literary Criticism, London, 1990.

17. Richards, I. A. Principles of Literary Criticism, London, 1960.

18. Said, Edward, Orientalism, London, 1995.

19. Scholes, Robert, Structuralism in Literature, 1974.

20. Seldon, Roman, Ed. The Theory of Criticism; From Plato to the Present, London, 1989.

21. Wellek, Rene; Austin, Warren, Theory of Literature, 1963.

22. Wimsatt, W. K. The Verbal Icon, London, 1970.

२३. कुळकर्णी, वा. ल. साहित्य : स्वरुप आणि समीक्षा, मुंबई,१९७५.

२४. केळकर, अशोक रा. संपा. भाषा आणि समीक्षा, पुणे,१९८१.

२५. खोले, विलास, संपा. विसाव्या शतकातील मराठी समीक्षा, पुणे, २००४.

२६. गणोरकर, प्रभा; डहाके, वसंत आबाजी व इतर, वाङ्‌मयीन संज्ञा-संकल्पना कोश, मुंबई, २००१.

२७. गाडगीळ, गंगाधर, खडक आणि पाणी, मुंबई, १९६१.

२८. जाधव, रा. ग. निवडक समीक्षा, पुणे, २००६.

२९. जोग, रा. श्री.; कुळकर्णी, वा. ल.; भागवत, श्री. पु. संपा. मराठी समीक्षा, मुंबई, १९७२.

३०. दावतर, वसंत, संपा. मराठी टीका, पुणे, १९९६.

३१. धोंगडे, अश्विनी, स्त्रीवादी समीक्षा, पुणे, १९९३.

३२. नेमाडे, भालचंद्र, टीकास्वयंवर, औरंगाबाद, १९९०.

३३. पाटील, गंगाधर, समीक्षेची नवी रुपे, मुंबई, १९८१.

३४. मर्ढेकर, बाळ सीताराम, सौंदर्य आणि साहित्य, मुंबई, १९६०.

३५. मालशे, मिलिंद; जोशी, अशोक, आधुनिक समीक्षा-सिद्घान्त, मुंबई, २००७.

३६. राजाध्यक्ष, विजया व इतर, संपा. मराठी वाङ्‌मयकोश : खंड चौथा : समीक्षा-संज्ञा, मुंबई, २००२.

३७. रायकर, सीताराम आणि इतर, संपा. वाङ्‌मयीन वाद : संकल्पना आणि स्वरुप, पुणे, १९९०.

३८. शिरवाडकर, के. रं. मार्क्सवादी साहित्यविचार, पुणे, १९८०.

३९. हातकणंगलेकर, म. द. संपा. वाङ्‌मयीन शैली आणि तंत्र, कोल्हापूर, १९८१.

४०. क्षीरसागर, श्री. के. टीकाविवेक, मुंबई, १९६५.

लेखक: श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate