অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंधी साहित्य

सिंधी साहित्य

सिंधी साहित्य मौखिक व लिखित अशाउभयविध वाङ्‌मयीन परंपरेने समृद्घ बनले आहे. डॉ. सुनीतिकुमार चतर्जी ह्यांच्या मते सिंध प्रदेशात लिहिले गेलेले पहिले पुस्तक प्राकृतभाषेतले होते आणि त्याचा काळ इ. स. पू. तिसरे शतक असा आहे;तथापि आज आपल्याला उपलब्ध असलेले लिखित सिंधी साहित्यसोळाव्या शतकापासूनचे आहे. त्यापूर्वी लोककथा, लोकगीते असेमौखिक साहित्य होते. सिंध अरब सत्तेखाली असताना सिंधी लेखकअरबी भाषेत लिहीत आणि मोगलांच्या राजवटीत ते फार्सीत लिहीत.फार्सीला दरबारी आश्रयही होता. सर्वसामान्य लोक मात्र सिंधीचाचवापर करीत. त्यांनीच ह्या भाषेचे पोषण केले; तिचा विकास केला.लोकांनी घडविलेल्या ह्या साहित्यात दीर्घ कथाकाव्ये, ऐतिहासिक कथाह्यांचा समावेश होतो. ह्या साहित्याच्या काही निर्मात्यांची नावे ज्ञातआहेत. उदा., शेख जमाली (चौदावे शतक), छतो (पंधरावे शतक), राजोदरवेश इत्यादी; परंतु त्यांपैकी कोणत्या कवीने कोणत्या रचना केल्याहे निश्चितपणे सांगता येत नाही. असे म्हटले जाते, की अकराव्या शतकातएका सिंधी कवीने मिर्झा जानी बेग ह्याच्या दरबारात महाभारत  सादरकेले होते. असेही म्हणतात, की सम्राट अकबराच्या दरबारात १५९१मध्ये एका सिंधी कवीला निमंत्रित करण्यात आले होते आणि त्यानेउमर-मारुईची गीतात गुंफलेली कथा गाऊन दाखवली होती. ‘ मारुई ’ हीसिंधी साहित्यातील एक अमर नायिका आहे. तिची कथा रामायणा तीलसीतेची आठवण व्हावी अशी आहे. ह्या स्त्रीचा एका तरुणाशी वाङ्‌निश्चय झालेला असतो; तथापि तिच्या रुपाची कीर्ती ऐकून उमर नावाचा एकराजा तिला पळवतो; पण राजवाड्यातल्या शाही सुखांना न भुलता मलामाझ्या नियोजित पतीकडे परत पाठव, हेच ती उमरला सतत सांगतराहते; त्याने आपल्याशी भावासारखे वर्तन करावे, हाच आग्रह धरतराहते. उमरही तिच्याशी नेहमीच सभ्यता आणि सुसंस्कृतता पाळूनवागतो. पुढे मारुई ही आपली दूधबहीण आहे, हे त्याला समजते. तोसन्मानाने तिला तिच्या घरी परत पाठवतो; पण बरेच दिवस ती उमरच्याराजवाड्यात राहिल्याने तिचा वाग्दत्त वर तिचा स्वीकार करत नाही. मारुईअग्निदिव्य करुन आपल्या शुद्घ चारित्र्याची खात्री पटवते. जवळजवळतीन दशकांहून अधिक काळ सिंधमध्ये फार्सीचे प्राबल्य होते. आजउपलब्ध असलेल्या सिंधी साहित्यात, लिखित सिंधी साहित्यापूर्वी ज्यामौखिक लोककथा प्रचलित होत्या, त्यांतील सात अतिशय महत्त्वाच्याआहेत : (१) राय डयाच, (२) उमर-मारुई, (३) लीला-चणेसर, (४)मुमल-राणो, (५) नूरी-तमाची, (६) सुहिणी-मेहर व (७) ससी-पुनहुनह्या साऱ्या प्रेमकथा आहेत आणि त्यांच्याभोवती बरेचसे सिंधी साहित्यरचले गेले आहे. सिंधी साहित्यामागची आणखी एक महत्त्वाची प्रेरणाम्हणजे सूफी तत्त्वज्ञान होय.

सिंधी साहित्याचे स्थूलमानाने तीन कालखंड मानता येतील : (१) १६वे ते १९ वे शतक; (२) १९ वे शतक ते १९४७; (३) १९४७ नंतर.

पहिला कालखंड ( सोळावे ते एकोणिसावे शतक ) :लोकसाहित्याच्या इतिहासानंतरचे आरंभीचे दोन सिंधी कवी म्हणजेकाझी काझन (मृ. १५५१) आणि शाह अब्दुल करीम बुलडीवाले(१५३८–१६२२) हे होत. ह्यांनी ‘ दोहा ’ ह्या प्रकारात त्यांच्या रचनाकेल्या. प्राचीन भारतीय संस्कृती, तसेच इस्लामी आणि सूफी संस्कृतीह्यांचा जो सुसंवादी संबंध उत्तरकालीन सिंधी कवींच्या रचनांमधूनआढळून येतो, त्याच्या पूर्वखुणा ह्या दोन कवींच्या काव्यातून प्रत्ययासयेतात. त्यानंतर सिंधी साहित्यात ठळकपणे येणारे नाव म्हणजे शाहअब्दुल लतीफ (१६८९–१७५२). सूफी तत्त्वज्ञानाचे दोन महत्त्वाचेपैलू त्यांच्या कवितांतून प्रत्ययास येतात : एक, मानवी आत्म्याचेपरमेश्वराशी प्रयत्नांती होणारे मीलन आणि दुसरा पैलू म्हणजे ऐहिकगोष्टींची क्षणभंगुरता. परंपरागत भारतीय रागरागिण्यांमध्ये त्यांचे काव्यगुंफलेले आहे. त्यांचा रिसालो (१८६६, म. शी. ‘ संदेश ’) हा काव्यग्रंथसिंधी साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतींत मोडतो. असे म्हटले जाते, की सिंधी लोक त्याला आपले सांस्कृतिक व आध्यात्मिक धन मानतात.रिसालो चे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील छंदप्रयोग स्वतंत्र आहे. त्यातगझल, मस्नवी, रुबाई, मुसददस, मुस्तजाद, किता इ. सापडणार नाहीत.रिसालो त तीस सूर (अध्याय) आहेत. काही सुरांची नावे हिंदुस्थानीरागरागिण्यांची आहेत. उदा., सूरकल्याण, सूर श्रीराग; तर काहींचीत्यातल्या नायिकांची आहेत. उदा., सूर सुहिनी, सूर लीलाचणेसर, सूरमारुई. अन्य नावेही आहेत. ह्या तीस सुरांच्या आशयावर सूफी तत्त्वज्ञानाचाप्रभाव आहे. शाह यांनी भाषेला समृद्घ बनवले. तिला अधिककलात्मक आशयाच्या आविष्काराची क्षमता प्राप्त करुन दिली. आपल्याभाषेत संस्कृत, फार्सी वा अरबी भाषांचे फारसे मिश्रण न करता त्यांनी हेसाधले. शाह अब्दुल लतीफ ह्यांच्यानंतरचे विशेष उल्लेखनीय कवीम्हणजे अब्दुल वहाब हे मूळ नाव असलेले कवी सचल सरमस्त(१७३९–१८२९),  सामी  (सु. १७४३–१८५०), फकीर कादरबक्षअब्दुल कादिर ऊर्फ ‘ बेदिल ’ (१८१४– ७२), फकीर मुहंमद मोहसिनऊर्फ ‘ बेकस ’ (१८५६–८२), रोहल आणि मुराद फकीर हे होत.

सचल ह्यांना ते अगदी लहान असतानाच, शाह अब्दुल लतीफ ह्यांनीआपले आध्यात्मिक वारस म्हणून घोषित केले होते. फार्सी साहित्यातील  हाफीज  ( सु. १३२६–१३९०) या लोकप्रिय गझलकारकवीप्रमाणेच ते क्रांतिकवी होते. उत्तर सिंधमधील खैरपूर संस्थानातीलराणीपूर व गंबट ह्या ठिकाणांच्या दरम्यान असलेल्या दारजन येथे सचलराहत होते. ज्यांनी सिंधी साहित्यात ‘ वाई ’ हा काव्यप्रकार प्रचलितकेला, त्यांत सचल हे प्रमुख होते; मात्र ‘ वाई ’ला त्यांनी ‘ काफी ’ हे नावदिले. सिंधी साहित्यातील भावकाव्याच्या उत्कटतेची सीमा त्यांच्या‘ काफी ’ रचनेने गाठली. सचल हे जातीच्या, धर्माच्या, व्यवसायाच्यामर्यादा मानत नसत. माणसाला त्याच्या आंतरिक परिपूर्तीची जाणीवआत्मज्ञानानंतर होऊ शकते, अशी त्यांची धारणा होती. आपल्या प्रतिभेच्याधुंदीत उन्मनी अवस्थेत मस्त असलेले कवी म्हणून त्यांना ‘ सरमस्त ’म्हटले जाते. सचल म्हणजे सत्य बोलणारा. आपल्या नावाला साजेसेत्यांचे वर्तन होते. औपचारिक धर्मपालनापासून दूर राहिल्याने त्यांच्यावरपाखंडीपणाचे आरोप झाले होते.

उस्मान अली अन्सारी यांचा रिसालो सचल सरमस्त : सिंधी कलम (१९५८); महम्मद सादिक राणिपुरी यांचा रिसालो सचल सरमस्त :सिरैकी कलम  (१९५९), तसेच कल्याण बुलचंद अडवाणी यांचासचल सरमस्त जो चूंदा कलाम  (१९६६) ह्या तीन संकलित-संपादितकाव्यसंग्रहांत सचल यांच्या सिंधी भाषेतील कविता एकत्रित केल्याआहेत. कल्याण बुलचंद अडवाणींनी संपादिलेल्या संग्रहाचे देवनागरीसिंधी लिप्यंतर साहित्य अकादेमीने प्रसिद्घ केले आहे (१९७०).

सचलप्रमाणेच सामी हे आणखी एक प्रमुख कवी. ‘ सामी ’ ह्यांचे खरेनाव चैनराय बचूमल दत्तारामाणी. सामींच्या जन्मवर्षाबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. वयाच्या चाळिसाव्या वर्षी सामी यांची कविप्रतिभाजागृत झाली आणि ते कविता करु लागले. आपल्या रचना ते गुरुमुखीलिपीत कागदाच्या तुकड्यांवर लिहून ते तुकडे एका रांजणात टाकीत.सामींच्या हयातीत सिंधमध्ये जी राजकीय परिवर्तने घडून आली, त्यांचासाधा उल्लेखही त्यांच्या काव्यात आढळत नाही. ते संतकवी होते.त्यांच्या रचनांमध्ये त्यांचे तात्त्विक चिंतन आणि नैतिक विचार आलेलेआहेत. मानवता व परमात्मा ह्यांचे स्मरण करणे, ह्यावर त्यांचा भर आहे.उपनिषदे व गीता  ह्यांचा त्यांच्या रचनांवर प्रभाव आहे.

फकीर कादरबक्ष अब्दुल कादिर ऊर्फ ‘ बेदिल ’ आणि फकीर मुहंमदमोहसिन ऊर्फ ‘ बेकस ’ हे पितापुत्र. ‘बेदिल ’ म्हणजे ज्याने आपले हृदय हरवले आहे तो आणि ‘ बेकस ’ म्हणजे ज्याला आपले कुणी नाहीतो. हे दोघेही सूफी कवी. बेदिल यांना आपल्या काव्याची प्रेरणासचलकडून मिळाली. सिंधी, फार्सी, उर्दू, अरबी आणि हिंदी ह्या भाषात्यांना चांगल्या अवगत होत्या. त्या भाषांत त्यांनी कविता लिहिल्या.मात्र सचलप्रमाणे ते बंडखोर नव्हते; पण सचलच्या काव्यातील गेयता व माधुर्य त्यांच्या काव्यात आहे. शारीरिक (मझाझी) प्रेमातून त्यांनीआध्यात्मिक (हकीकी) प्रेमापर्यंत पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला होता.बेदिल ह्यांच्या सिंधी काव्याचे तीन संग्रह आहेत : (१) वहदतनामा,(२) सरुदनामा आणि (३) फराइझ सूफिया. बेकस ह्यांच्यावर आपल्यावडिलांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांनाही मानवी सौंदर्याबद्दल विलक्षणआकर्षण होते. बेकसचे विचारही आपल्या वडिलांच्या विचारांशीमिळतेजुळते होते. इतके की, एकाच्या कविता दुसऱ्याच्या म्हणून सहजमानता येतील, असे म्हटले जाते.

रोहल हे कंडिरी कवी. आपल्या गुरुच्या आज्ञेवरुन ते खैरपूरसंस्थानातील कंडिरी येथे गेले, म्हणून ते कंडिरी कवी. सिंधी भाषातसेच सिंधीची सिराइकी बोली व हिंदी ह्या तीन भाषांतून त्यांनी आपलेलेखन केले. धार्मिक सहिष्णुतेचा संदेश त्यांनी आपल्या काव्यातून दिला.धार्मिक गट एकमेकांचा द्वेष करतात. त्यांना सत्याचे दर्शन घडणार नाही.‘ जो परमेश्वराच्या घरात झोपतो, त्याने कुठल्याही दिशेने पाय वळवले,तरी ते परमेश्वराखेरीज अन्य दिशेने कसे जातील ? ’ असा प्रश्न त्यांनीत्यांच्या एका रचनेत केलेला आहे. रोहल यांनी निर्माण केलेल्या कविपरंमपरेत मुराद फकीर हे एक विशेष उल्लेखनीय कवी होते. ‘ कुणाशीहीलढण्यापेक्षा आपण आधी आपल्या मोहाविरुद्घ लढले पाहिजे ’, असेत्यांचे विचार होते. सिंधी लोकसाहित्यातील कथांच्या माध्यमातूनत्यांनी आध्यात्मिकतेची शिकवण दिली.

स्थानिक मुस्लिम जमीनदार आणि जहागीरदार ह्यांची राजकीयताकद मोठी होती. आशय आणि घाट ह्या दोन्ही दृष्टींनी फार्सीकवितेचे अनुकरण करणाऱ्या कवींना ते आश्रय देत. काहीजण स्वतःचत्या प्रकारची कविता लिहीत. मुशायरे आणि मैफली सतत होत असत.ह्या वातावरणातले दोन महत्त्वाचे कवी म्हणजे मीर हसन अलीखानहसन (१८२४–१९०९) आणि ‘ सांगी ’ ह्या नावाने विशेष प्रख्यातअसलेले त्याचे पुतणे मीर अब्दुल हुसैनखान (१८५१–१९२४) हेहोत. हसन ह्यांनी लिहिलेल्या सिंधजो-शाहनामो  (म. शी. ‘ सिंधचाशाहनामा ’) ह्या ग्रंथामुळे त्यांना ‘ सिंधचे फिर्‌दौसी ’ म्हटले जाऊ लागले.आपल्या शाहनाम्यात त्यांनी सरफराजखानाच्या काळापासून मीर मुरादअलीखानाच्या काळापर्यंतच्या घडामोडींचे जिवंत वर्णन केलेले आहे. ह्याकाव्यात कल्होडा आणि टाल्पूर किंवा मीर ह्यांच्यात झालेल्या युद्घाचेप्रभावी वर्णन आहे. ह्या वर्णनात वापरलेले शब्द सिंधी असले, तरी ह्याकाव्याच्या अन्य भागांत फार्सी शब्दांचा विपुल वापर केलेला आहे. हसनयांनी शहनशाहनामा सारखी अन्य काव्येही लिहिली. सांगींनी सिंधीकाव्याखेरीज फार्सी व उर्दूमध्येही रचना केल्या. त्यांनी सिंधी भाषेत उत्कृष्टगझलरचना केली व त्यातून व्यक्तिगत अनुभव मांडले. विशेष म्हणजेव्यापार-उद्योगाच्या क्षेत्रातून त्यांनी आपल्या कवितेतल्या प्रतिमानिवडल्या. त्यांच्या कवितेत विनोदही आहे. त्यांचा दीवान  १९०४मध्ये प्रसिद्घ झाला. त्यात त्यांच्या गझला, कसीदे, काफी आणि काहीस्फुटरचना आहेत. सांगींच्या उत्कृष्ट रचना १९०४ पर्यंतच त्यांच्या हातूनझाल्या. सिंधी भाषेच्या सौंदर्याच्या अनेक छटा आणि पर्शियन इतिहासआणि संस्कृती ह्यांचा सुगंध ह्या कवींच्या काव्यातून प्रकटला, हे त्यांचेमोठे श्रेय होय; तथापि सर्वसामान्य सिंधी वाचकांपासून ही कविता दुरावली होती, असेही म्हटले जाते.

कवितेच्या तुलनेध्ये पाहता, तत्कालीन सिंधी गद्य सामान्य वाचकांचाविचार करणारे होते. सामाजिक सुस्थिती हे गद्याचे उद्दिष्ट असल्यामुळेहे गद्य मुख्यतः नीत्युपदेशात्मक होते. कौरोमल चंदनमल खिलनानी(१८४४–१९१६), हिरानंद शौकिराम, दयाराम गिदूमल (१८५७ –१९२७) ह्यांनी अत्यंत तळमळीने आपले गद्य लेखन केले.

दुसरा कालखंड ( एकोणिसावे शतक ते १९४७) : सिंध मधील ब्रिटिश सत्तेनंतर (१८४३) ब्रिटिश अभ्यासकांना सिंधीतल्यासमृद्घ लोकवाङ्‌मयाचा परिचय झाला. सिंधी गद्याचा खरा विकास ब्रिटिशांच्या राजवटीतच झाला. लेखनासाठी कोणती लिपी वापरायची ह्याबद्दलही गोंधळाचे वातावरण होते. १८५२ मध्ये सध्याची सिंधी लिपी अस्तित्वात आली. सिंधी गद्य आरंभी पाठ्यपुस्तकांतून प्रकट होऊ लागले. सिंधी गद्याला आरंभी काही यूरोपीय व्यक्तींनी योगदान दिले. वाथेनकृत ग्रामर अँड व्होकॅब्युलरी ऑफ द सिंधी लँग्विज (१८३६) व ईस्टवीकचे व्होकॅब्युलरी ऑफ सिंधी लँग्विज  (१८४३). कॅप्टन जॉर्ज स्टॅक यांनी इंग्लिश-सिंधी शब्दकोश  (१८४९) व सिंधी-इंग्लिश शब्दकोश  (१८५५) असा दुहेरी शब्दकोश सिद्घ केला. त्यात देवनागरी लिपीचा वापर केला होता. पंडित ब्रह्म सच्चिदानंद आणि पंडित जैतराम ह्या दोन विद्वानांनी ह्या कामी त्यांना मदत केली होती. कॅप्टन जॉर्ज स्टॅक यांनी सिंधी ग्रामर (१८४५–४९) हा व्याकरणग्रंथही तयार केला. स्वतंत्र सिंधी लिपी अस्तित्वात येण्याचा परिणाम सिंधी साहित्याच्या विकासात महत्त्वाचा ठरला. अनेक प्रकारचे साहित्य निर्माण झाले. उदा., शब्दकोश, व्याकरणे, इतिहास, भाषाशास्त्र, कथा-कादबंऱ्या-नाटकादी ललित साहित्य;तात्त्विक, सामाजिक, वैचारिक वाङ्‌मय इ. तसेच बंगाली, हिंदी, गुजराती, मराठी अशा अन्य भाषांतील साहित्याचे अनुवादही झाले. हे सर्व यथावकाश झाले, तरी १८५२ मध्ये सर बार्टल फ्रीयर ह्यांच्या आदेशावरुन तयार केल्या गेलेल्या सिंधी लिपीबद्दल सहा वर्षे वाद होताच. त्यामुळे जन्माने जर्मन असलेल्या डॉ. अर्नेस्ट ट्रंप ह्यांनी सिंधी पाठावली (१८५८) तयार केली, तेव्हा

ती दोन लिप्यांत प्रसिद्घ केली होती. डॉ. ट्रंप ह्यांनी एक समग्र सिंधी व्याकरणही तयार केले होते (सिंधी ग्रामर, १८७२). १८५८ पर्यंत विद्यार्थी आणि सर्वसाधारण लोक अरबी-सिंधी लिपीचा वापर करु लागले.

शैक्षणिक पुस्तकांच्या संदर्भात नंदीराम मीराणी आणि उधाराम थावरदास ही नावे उल्लेखनीय आहेत. मुलांसाठी उत्तम पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. उधाराम ह्यांनी दर्जेदार शैक्षणिक पुस्तके लिहिली. उधाराम ह्यांची लेखनशैली उत्तम होती. त्यांची पुस्तके आजही वाचनीय आहेत. प्रभुदास आनंदराम, गुलाम अली, मीरन मुहम्मद शाह, मियां मुहंमद, आलूमल टिकमदास, कौरोमल चंदनमल खिलनानी, प्रीतमदास, कृष्णशास्त्री ही नावेही शैक्षणिक पुस्तकांच्या संदर्भात उल्लेखनीय आहेत. एल्. व्ही. परांजपे ह्यांनी इंग्लिश-सिंधी डिक्शनरी   हा शब्दकोश तयार केला (१८६८). शब्दकोशनिर्मितीच्या क्षेत्रातली अन्य काही नावे अशी : अब्दुर रहीम,आखूंद फत्तेह मुहंमद, मिर्झा सादिक अली व झमटमल नारुमल (व्युत्पत्तिकोश, १८८६ व सिंधी व्याकरण, १८९२ ही त्यांची महत्त्वपूर्ण पुस्तके).

नवलराय आणि उधाराम थावरदास ह्यांनी डॉ. जॉन्सनकृत रासेलस चा सिंधी अनुवाद केला (१८६८ वा १८७०). डॉ. ट्रंप ह्यांनी शाह-जो-रिसालो ची आवृत्ती प्रसिद्घ केली (१८८६). त्यापासून प्रेरणा घेऊन काझी हाजी अहंमद यांनी मुन्तखिब शाह-जो-रिसालो  प्रसिद्घ केले.

बायबलचा सिंधी अनुवाद झाला (१८५३). मिश्र जयकिशन ह्यांनी महाभारता च्या काही पर्वांचा अनुवाद केला. परमानंद मेवाराम (१८६५–१९३८) ह्यांच्या जोत  ह्या पाक्षिकाने भिन्न भिन्न सामाजिक व साहित्यिक प्रश्नांच्या संदर्भात सिंधी लोकांच्या विचारांची दिशा निश्चित केली. त्यांचा सिंधी-इंग्रजी शब्दकोश  (१९१०) आजही प्रमाणभूत मानला जातो. जेठमल परसराम गुलराजाणी  (१८८५–१९४८), भेरुमल मेहरचंद अडवाणी  (१८७६–१९५३) ह्यांसारखे अनेक लेखक पुढे आले आणि त्यांच्या लेखनामुळे सिंधी भाषेतले वाङ्‌मयीन गद्य विकास पावले.

१८८७ मध्ये स्थापन झालेल्या डी. जे. सिंध कॉलेजच्या विद्यार्थी सभेने सिंधी गद्याच्या व नाटकाच्या विकासात मोठे योगदान दिले. ह्या कॉलेजच्या नाट्यमंडळाने सिंधी नाटकाचा पाया घातला; नाट्यलेखनाला उत्तेजन दिले. मास्टर जेठानंद (नलदमयंती ), लीलारामसिंह (हरिश्चंद्र ), देऊमल (राम-वनवास ), मिर्झा कलीच बेग (१८५३–१९२९) (इन्क्वायरी ऑफिसर ) अशा नाटककारांच्या नाटकांचे प्रयोग ह्या मंडळाने केले. ह्या मंडळासाठी कलीच बेग ह्यांनी सर्वाधिक नाटके लिहिली. कालिदासाच्या शाकुंतलवरुन त्यांनी नाटक लिहिले. शेक्सपिअरच्या नाटकांचे त्यांनी अनुवाद केले. शेवासिंह अजवाणींचे कनिष्ठ (शेरिडनच्या पिझारो  वर आधारित) हे नाटक ह्या मंडळाला फार मोठे यश देऊन गेले.

सिंधी गद्याला ज्यांनीआपल्या लेखनाने चालना दिली असे चार प्रमुख सिंधी साहित्यिक स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश कालखंडाच्या पहिल्या टप्प्यात (१८५७–१९०७) होऊन गेले. हे जेष्ठप्रमुख सिंधी साहित्यिक म्हणजे कौरोमल चंदनमल खिलनानी, मिर्झा कलीच बेग, दयाराम गिदूमल आणि परमानंद मेवाराम हे होत.

कौरोमल चंदनमल खिलनानी यांनी उत्तम पाठ्यपुस्तके तयार करुन शिक्षणक्षेत्रात लक्षणीय कामगिरी केलीच; परंतु त्यांनी सिंधी भाषेची केलेली सेवा फारच महत्त्वाची आहे. त्यांनी १८८५ मध्ये संशोधन करुन सामीअ-जा-श्लोक  (३ खंड; १८८५– ९०) या ग्रंथरुपात सामींच्या श्लोकरचना प्रकाशित केल्या. पको पह (१८६२) ह्या त्यांच्या पहिल्याच गद्य निबंधात त्यांनी महिलांच्या शिक्षणाचा केलेला प्रभावी पुरस्कार त्यांच्या उदारमतवादी वृत्तीचा प्रत्यय देतो. हर्षवर्धनाच्या रत्नावलि  ह्या संस्कृत नाटकाचा त्यांनी १८८८ मध्ये सिंधी अनुवाद केला. सिंधीत अनुवादिले गेलेले हे पहिले संस्कृत नाटक होय; पण हा अनुवाद तितकासा दर्जेदार झाला नाही. तथापि आर्य नारी चरित्र  (१९०५) हा त्यांचा अनुवाद सरस उतरला. एका बंगाली लेखकाने लिहिलेल्या कर्तृत्ववान भारतीय स्त्रियांच्या चरित्रांवर आधारित इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद होय. कौरोमल हे सिंधीतले पहिले निबंधकार होते. त्यांनी शुद्घ सिंधीत अनेक निबंध लिहिले. साहित्य अकादेमीने कौरोमलांच्या १९०७ पर्यंतच्या उत्कृष्ट ४४ लेखांचे संकलन साहित्यिक पुष्प  या नावाने प्रकाशित केले आहे. त्यांची शैली सहज साधी, पण तरीही वजनदार वाटावी, अशी आहे.

मिर्झा कलीच बेग ह्यांनी सिंधी काव्य, नाटक, कादंबरी व अन्य काही गद्यप्रकार ह्या क्षेत्रांत श्रेष्ठ दर्जाच्या कलाकृती निर्माण केल्या. सिंधीखेरीज इंग्रजी, अरबी, उर्दू, फार्सी व इतर काही भारतीय भाषांचे त्यांना उत्तम ज्ञान होते. त्यांनी विपुल लेखन केले. खुर्शीद  (१८८५) हे त्यांनी गुजरातीतून अनुवादिलेले नाटक अतिशय लोकप्रिय झाले. सिंधी भाषेतली पहिली स्वतंत्र कादंबरी झीनत (१८९०) त्यांनी लिहिली. टाल्पूरांच्या अखेरच्या काळातील आणि इंग्रज राजवटीच्या आरंभाच्या काळातील पार्श्वभूमीवर एका मध्यमवर्गीय सिंधी कुटुंबाचे चित्रण ह्या कादंबरीत आहे. दीवान कलीच  (१९०६) ह्या नावाने त्यांची वैशिष्ट्यपूर्ण कविता संगृहीत आहे. ते सिंधीतील साहित्यसमीक्षेचे प्रवर्तक होते. शाह अब्दुल लतीफ ह्यांच्या जीवनावर त्यांनी पुस्तक लिहिले (१८८५). सिंधी काव्यावर त्यांनी निबंध लिहिला (१९१५). कदीम सिंध  (१९२५, म. शी. ‘प्राचीन सिंध’ ) हा त्यांचा ग्रंथ आणि रुमीसारख्या फार्सी कवीवर त्यांनी लिहिलेले लेख उल्लेखनीय आहेत. त्यांनी सिंधी भाषेचा इतिहासही लिहिला आहे.

दयाराम गिदूमल ह्यांच्या लेखनाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे समर्थ आणि ओघवती भाषा होय. भगवद्‌गीतेचे सार त्यांनी सिंधीत आणले. त्यांनी जपजी साहिब चा आणि पतंजलीच्या योगदर्शना चा सिंधीत अनुवाद केला (१८९१; १९०३). ते सुधारणावादी होते. स्त्रीशिक्षण, घरगुती प्रश्न, हुंडा ह्या विषयांवरही त्यांनी लिहिले.

परमानंद मेवाराम हे मूळचे हिंदू ; पण पुढे मतपरिवर्तन होऊन कॅथलिक क्रिस्ती झाले. जोत  ह्या सिंधी भाषेत निघणाऱ्या कॅथलिक ख्रिस्ती पाक्षिकाचे साधारणपणे १८९९ वा १९०० पासून पुढे सु. ४० वर्षे ते संपादक होते. जोत मधील काही वेचक लेखांचे संकलन त्यांनी दिलबहार   (४ खंड, १९०४–१२) ह्या नावाने केले. तसेच ह्या पाक्षिकातील ४० वर्षांतील उत्कृष्ट लेख त्यांनी गुलफुल   (२ खंड, १९२५ व १९३६) या नावाने प्रसिद्घ केले. द इमिटेशन ऑफ ख्राइस्ट  ह्या पुस्तकाचा त्यांनी ख्रिस्ता जी पैरवी  या नावाने अनुवाद केला (१९२३). त्यांची गद्यशैली अभिजात म्हणता येईल अशी होती. त्यांनी सिंधी-इंग्रजी शब्दकोश (१९१०) तयार केला. तसेच त्यांनी तयार केलेला एक इंग्रजी-सिंधी शब्दकोशही १९३३ मध्ये प्रसिद्घ झाला.

हिरानंद शौकिराम यांनी सर वॉल्टर स्कॉटच्या द टेलिस्मन  (१८९१) या कादंबरीचा अनुवाद हाती घेतला होता. तो अर्धवट राहिला. भेरुमल मेहरचंद अडवाणी ह्यांनी तो पूर्ण केला. हिरानंद शौकिराम यांनी सिंध सुधार  आणि सरस्वती   ही वृत्तपत्रेही १८७० पासून सुरु केली.

सिंधीतील इतर गद्यलेखकांत हकीम फतेह महंमद सेव्हाणी आणि निर्मलदास फतेहचंद ह्यांचा उल्लेख आवश्यक आहे. हकीम फतेह महंमद यांनी १९१४ मध्ये पैगंबरांचे चरित्र लिहिले. पैगंबरांचे जीवन व शिकवण ह्यांवर सिंधी भाषेतला हा प्रमाण ग्रंथ मानला जातो. सम्राट अकबराच्या नवरत्न दरबारातले अबुल फज्ल आणि अबुल फैजी ह्यांचे चरित्रही त्यांनी लिहिले (१९२६). हकीम फतेह महंमद हे सूफी आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचे पुरस्कर्ते होते.

निर्मलदास फतेहचंद हेही सूफीच. फार्सी आणि अरबी शब्दांचा व वाक्‌प्रचारांचा सहज वापर त्यांच्या लेखनात दिसून येतो. हिंदी व संस्कृत भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. दलुराय-जी-नगरी (१९४४) मध्ये त्यांनी सिंधमधील मुसलमानांच्या आगमनाच्या आरंभकाळातील अधःपतित हिंदू शासक वर्गाचे वास्तववादी चित्र दलुराय राजाच्या पतनाच्या रुपात रेखाटले आहे.

सिंधी गद्याला विकासाकडे नेणाऱ्या उपर्युक्त चार साहित्यिकांखेरीज पुढच्या काळातल्या (१९०७–४७) साहित्यिकांचे आणखी एक चतुष्ट्य आहे. हे साहित्यिक असे : होटचंद गुरबक्षाणी  (१८८४–१९४७),जेठमल परसराम गुलराजाणी, भेरुमल मेहेरचंद अडवाणी, लालचंद अमरदिनोमल जगतियानी (१८८५–१९५४).

गुरबक्षाणी ह्यांची पहिली साहित्यकृती म्हणजे नूरजहाँ  (१९१५). ही कादंबरी सरदार जोगेंद्रसिंह ह्यांच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित आहे. मूळ इंग्रजी कादंबरीत नसलेले काही भाग गुरबक्षाणींनी स्वतंत्रपणे लिहून त्यांच्या कादंबरीत घातले. ते कादंबरीची प्रभावशीलता वाढवणारे आहेत. गुरबक्षाणींनी शाह यांच्या रिसालो चे संपादन, त्याला एक प्रदीर्घ विवेचक प्रस्तावना, शब्दावली व समीक्षा यांची जोड देऊन केल्यानंतर सिंधी साहित्याच्या क्षेत्रात त्यांचा मोठा बोलबाला झाला. सिंधीमध्ये असा ग्रंथ अभूतपूर्व होता. शाह यांच्या रिसालो चे १९२३ ते १९३० च्या दरम्यान तीन खंड बाहेर पडले. मात्र त्यानंतरचे भाग प्रसिद्घ होऊ शकले नाहीत. साहबसिंग शहाणी ह्यांनी हार्डीच्या मेयर ऑफ कॅस्टरब्रिज आणि टू ऑन ए टॉवर  ह्या कादंबऱ्यांची अनुक्रमे बिलू खोखर  आणि तारण-जो-अभ्यास  (म. शी. ‘ताऱ्यांचा अभ्यास’) ह्या नावांनी सिंधी रुपांतरे केली.

भेरुमल मेहरचंद अडवाणी ह्यांनी जौहर नज्म हा सिंधी काव्याचा पहिला संग्रह मिर्झा कलीच बेग ह्यांच्या प्रस्तावनेसह प्रसिद्घ केला. गुलझार-ए-नसर  (१९२९, म. शी. ‘गद्य फुलबाग') ह्या नावाने त्यांनी त्यांचा गद्यसंग्रह प्रसिद्घ केला; तथापि सिंधी साहित्यात ते श्रेष्ठ निबंधकार म्हणून प्रसिद्घ आहेत. प्रासादिक ललित शैली आणि अकृत्रिमपणा ही त्यांच्या लेखनाची विलोभनीय वैशिष्ट्ये. शाह अब्दुल लतीफ ह्यांच्यावरील लतीफी सैर (म. शी. ‘लतीफचा प्रवास’) हा त्यांचा सिंधीमधला सर्वोत्कॢष्ट ग्रंथ. सिंधी भाषेवर त्यांनी प्रबंध लिहिला (१९२५), तसेच सिंधी भाषेचा इतिहासही लिहिला (१९४१). त्यांचा कादिम सिंद  (१९५७) हा ग्रंथही महत्त्वपूर्ण असून त्यात सिंधमधील लोकजीवनाचा प्राचीन सिंधू संस्कृतीपासून ते आधुनिक काळापर्यंतचा साद्यंत आढावा घेतला आहे. भेरुमल मेहरचंदांचे पुत्र प्रभुदास वा हरनामसिंह ह्यांनी जॉन बन्यनच्या द पिल्‌ग्रिम्स प्रोग्रेस  ह्या प्रसिद्घ पुस्तकाचा अनुवाद सालिक-जो-सफर  (१९४३) ह्या नावाने केला. मात्र हा अनुवाद स्वैर आहे. त्यात शाह, सामी, सचल आणि अन्य कवींची अवतरणे आढळतात.

जेठमल परसराम गुलराजाणी हे सिंधी सूफीवाद्यांवर इंग्रजीत लेखन करणारे पहिले लेखक. शाह अब्दुल लतीफ व सचल सरमस्त ह्यांच्यावर त्यांनी शाह भिटाई-जी-हयाती  (१९१५), सचल सरमस्त  (१९२२) व शाह जे आखाणियूं जी समुझाणी  (१९२३) इ. ग्रंथ लिहिले. सचल ह्यांच्यावरील त्यांचा ग्रंथ सर्वोत्कृष्ट ग्रंथ मानला जातो. एडविन आर्नल्डच्या लाइट ऑफ एशिया चे भाषांतर त्यांनी पूरब जोती  (१९३३) या नावाने केले. सिंधीतल्या आद्य कथाकारांपैकी ते एक होत. जेठमल परसराम ह्यांचे तरुण सहकारी अमरलाल हिंगोराणी (१९०७ – ५६) यांनी १९३० मध्ये फुलवाडी   हे पत्र सुरु केले. कथाकार म्हणून त्यांचा विशेष लौकिक आहे. त्यांची ‘अदो अब्दुर्रहमान’ (म. शी. ‘ भाई अब्दुर्रहमान’) ही कथा आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून गेली.

लालचंद अमरदिनोमल जगतियानी हे महर्षी कर्वे यांच्या महिला विद्यापीठात सिंधीचे प्राध्यापक होते. सिंधीच्या अभ्यासाला त्यांनी एम्.ए. च्या पातळीवर मान्यता प्राप्त करुन दिली. पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला. त्यांच्या लेखनात परकीय शब्द आढळत नाहीत. स्त्रियांना आणि ग्रामीण लोकांना परिचित असलेले सिंधी शब्द त्यांनी त्यांच्या लेखनात वापरले. त्यांची शैली साधी, सरळ, शुद्घ व डौलदार आहे. चौथे-जो-चंद  (१९०६, म. शी. ‘चतुर्थीचा चंद्र ’) ही त्यांची पहिली कादंबरी आणि ‘ आवतराय रुपचंद मनचंदा ’ ह्या नावाने त्यांनी लिहिलेली किश्नीअ-जो-कष्ट  (१९१७, म. शी. ‘ कृष्णाचे कष्ट ’) ही कादंबरी खास उल्लेखनीय आहे. प्रेषित मुहंमद पैगंबरांवर त्यांनी मुहम्मद रसूल अल्लाह  हा ग्रंथ लिहिला (१९१०). सिंधी कवींवर त्यांनी अनेक समीक्षात्मक ग्रंथ लिहिले : शाहणो शाह  (१९१४; शाह अब्दुल लतीफ या महाकवीवरील समीक्षाग्रंथ ), सूंहारो सचल  (१९१६, म. शी. ‘सुंदर सचल’) हे त्यांतील काही विशेष उल्लेखनीय होत. फुलन मुठ्ठ  (१९२७, म. शी. ‘मूठभर मक्याच्या लाह्या’) ह्या ग्रंथात त्यांच्या गद्यशैलीचा समर्थ आविष्कार आढळतो. १९१४ मध्ये त्यांनी जेठमल परसराम ह्यांच्या सहकार्याने ‘सिंधी साहित (साहित्य) सोसायटी ’ची स्थापना केली व ह्या सोसायटीमार्फत दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली. लालचंद अमरदिनोमल यांनी उमर-मारुई  हे नाटकही लिहिले. त्याचा प्रयोग १९२५ मध्ये झाला. आसानंद मामतोरा हे लालचंद अमरदिनोमल ह्यांच्याकडून प्रेरणा घेतलेले लेखक. ते निबंधकार, कथाकार व समीक्षक होते. मात्र शायर   (१९४१) ह्या त्यांच्या कादंबरीमुळे सिंधी साहित्यात त्यांना मानाचे स्थान लाभले.

सिंधी बालसाहित्याच्या संदर्भात सेवक भोजराज ह्यांचा निर्देश अपरिहार्य आहे. त्यांनी बालकन-जी-बारी  म्हणजेच बालोद्यान वा बालकसंघ या संस्थेची स्थापना (१९२६) कराची येथे केली. मनोरंजनातून ज्ञान ही संकल्पना त्यामागे होती. लहान मुलांसाठी फुलवाडी सारख्या पत्रिका त्यांनी काढल्या. सिंधीतील बालसाहित्याचे ते जनक होत. फतेहचंद वासवाणींच्या प्रेरणेने ‘सुंदर साहित्य प्रकाशन’ ही संस्था १९२४-२५ च्या सुमारास स्थापन झाली. प्रबोधनपर बालसाहित्य छापण्यास सेवक भोजराज ह्यांना तिचे साह्य झाले. सेवक भोजराज ह्यांच्या आशीर्वाद  (१९३३) आणि दादा श्याम  (१९३४) ह्या आत्मचरित्रात्मक कादबंऱ्या मुलांना उद्बोधक ठरल्या. तसेच फतेहचंद वासवाणी ह्यांचा राणो प्रताप  (१९२६) हा ग्रंथ राजपूत स्त्रीदाक्षिण्याचे महत्त्व विशद करणारा आहे.

‘ सिंध मुस्लिम अदबी सोसायटी ’ची स्थापना १९२१ मध्ये झाली. तिचे संचालक मुहम्मद सिद्दिक मेमण हे विद्वान होते. सिंधी साहित्याच्या इतिहासाचे दोन खंड त्यांनी लिहिले ( हिस्टरी ऑफ सिंधी लिटरेचर, २ खंड, १९३७ व १९५१. हा साहित्येतिहास सिंधीत लिहिला; मात्र ग्रंथशीर्षक इंग्रजीत होते ). अर्थात हा प्रारंभिक स्वरुपाचा इतिहास आहे आणि त्याच्या काही मर्यादाही आहेत. विसाव्या शतकाच्या तिसऱ्या-चौथ्या दशकांत अनेक मुस्लिम गद्यलेखक पुढे आले. काझी अब्दुर्रझाक, आगा गुलाम नबी, अल्लाह बचायो, नादिर बेग मिर्झा, डॉ. यू. एम्. दाऊदपोटा (१८९६–१९५८) हे त्यांतील काही विशेष उल्लेखनीय होत. काझी अब्दुर्रझाक ह्यांनी जहाँआरा (१९३१) ही कादंबरी लिहिली. आगा गुलाम नबी ह्यांनी सचलच्या रिसालो चे १९३३ मध्ये संपादन केले. तसेच त्यांनी सिंधी कवींवर कुर्बकलीच  (म. शी. ‘ कलीचला प्रेमपूर्ण श्रद्घांजली ’) हा ग्रंथ लिहिला. सैर कोहिस्तान (१९४२, म. शी. ‘ कोहिस्तानचा प्रवास ’) हा अल्लाह बचायोंचा प्रवासवर्णनात्मक ग्रंथ त्यांच्या उत्कृष्ट शैलीबद्दल उल्लेखनीय ठरतो. त्यात ग्रामीण सिंधीचा वापर करण्यात आलेला आहे, हा त्याचा एक लक्षणीय विशेष. नादिर बेग मिर्झा हे मिर्झा कलीच बेग ह्यांचे पुत्र. त्यांनी ‘ मिस रुस्तुमजी ’ सारख्या चांगल्या कथा लिहिल्या. दाऊदपोटा हे अरबी, फार्सी व सिंधी भाषांचे विद्वान होतेच; शिवाय त्यांच्याभोवती व्यासंगी लेखकांचे वर्तुळ तयार झाले होते. उदा., गुलाम मुहंम्मद शाहवाणी, उस्मान अली अन्सारी, ए. डब्ल्यू. मुसवी, नबीबक्ष बलोच. गुलाम मुहंम्मद शाहवाणी ह्यांनी सादींच्या गुलिस्ताँ चा अनुवाद केला (गुलशन बहार). लुत्फ अल्लाह बडवींनी, उस्मान अली अन्सारी यांनी कथालेखन केले (पंज, म. शी. ‘पाच कथा’, १९३७). मुसवींनी बेकस आणि बेदिल ह्यांच्यावर ग्रंथ लिहिला. बडवींनी सिंधी काव्याचा इतिहास सिंधी भाषेत लिहिला (तजकिरा लुत्फी, ३ खंड -१९४३, १९४६ व १९५३). बलोच हे त्यांनी सिंधी साहित्याविषयी केलेल्या संशोधनाबद्दल प्रसिद्घ आहेत. दाऊदपोटा ह्यांनी शाह अब्दुल करीम ह्यांच्या साहित्याचे संपादन केले (१९३७); काही चांगल्या ग्रंथांचा सिंधीत अनुवाद केला.

ह्यांखेरीज सिंधी वैचारिक गद्य, चरित्र, निबंध इ. प्रकारांत मौलिक भर घालणारे काही लेखक असे : बूलचंद राजपाल हे सिंधू  ह्या पत्रिकेचे प्रकाशक होते. १९३२ मध्ये ह्या पत्रिकेचे प्रकाशन झाले व त्यामुळे दर्जेदार लेखन करणाऱ्या सिंधी लेखकांना एक व्यासपीठ उपलब्ध झाले. तोलाराम मेघराज बालाणी (सिख्या सागर, १९१०, म. शी. ‘ शिक्षणसागर' हे वेदान्तपर पुस्तक), प्रीतमदास थडाणी (जीवनवेद, १९९१, केशवचंद्र सेन ह्यांच्या शिकवणुकीवर आधारित), चैनराय बूलचंद (हिंदू तत्त्वज्ञानावर आधारित म. शी. ‘शोधकाचा मार्ग ’, १९२५; तसेच भगवद्‌गीतेचा सिंधी काव्यानुवाद), रोचीराम सडाणी (इन्सान व इन्सानियत, १९२३), टी. के. शहाणी (लाइफ ऑफ गोखले, १९२६, या स्वलिखित इंग्रजी चरित्राचा सिंधी अनुवाद), लालसिंह हजारीसिंह अजवाणी  (विचार, डी. जे. सिंध कॉलेजच्या मिसेलनी तल्या उत्तम निबंधांचे संपादन; त्यांचे स्वतःचेही चार निबंध त्यात समाविष्ट), वाघुमल गंगाराम (पंगती इन्किलाब,. म. शी.‘ सामाजिक क्रांती ’, १९४०), गोविंद भाटिया (वर्क, निबंधसंग्रह, म. शी. ‘ पाने ’, १९४०), तीर्थ वसंत (चिणिगूं, निबंधसंग्रह, म. शी. ‘ठिणग्या ’), लेखराज ‘अझीझ’ (अदबी आईनो, निबंधसंग्रह, म. शी.‘साहित्यदर्पण ’, १९४१), एन्. आर्. मलकाणी (अनारदाना, मौलिक निबंध, १९४२) इत्यादी.

१९०७ ते १९४७ पर्यंतच्या काळात सिंधी नाट्यलेखनाच्या क्षेत्रात लालचंद अमरदिनोमल (उमर-मारुई, १९२९), लीलाराम फेरवाणी (हिक रात, १९३६, म. शी. ‘एक रात्र ’), राम पंजवाणी (मुमल राणो ), मुहंमद इस्माइल उर्साणी (बदनसीब थरी, १९४१), के. एस्. दर्याणी (मोती-जी-मुखरी, म. शी. ‘ मोत्याची कळी ’; गुलाब-जो-गुल, म. शी. ‘गुलाबाचे फूल’) ह्यांनी काही यूरोपीय नाटकांचे सिंधी अनुवाद, रुपांतरेही केली. अहमद चागला यांनीही इब्सेनच्या काही नाटकांची रुपांतरे केली.

मंघाराम उधाराम मलकाणी (१८९६–१९८०) ह्यांनी सिंधीत एकांकिकालेखनास आरंभ केला. पंज नंढा नाटक  (१९३७, म. शी. ‘पाच नाटुकली ’), पंगती पर्दा (१९३८, म. शी. ‘ पंक्तिप्रपंच ’), जीवन चहचिटा (१९५७, म. शी. ‘ जीवनाची क्षणचित्रे ’) व सुडखबीता प्या टिम्कनि (१९६३, म. शी. ‘ काजवे चमचमताहेत ’) ह्या त्यांच्या एकांकिकासंग्रहांमुळे सिंधी साहित्यात त्यांना मानाचे स्थान मिळाले. समाजसुधारक अशी त्यांची प्रतिमा या एकांकिकांतून निर्माण झाली.

सिंधीमध्ये ब्रिटिशांच्या सत्ताकाळात (१८४३–१९४७) जे काव्य निर्माण झाले, ते दोन कालखंडांत विभागता येईल : (१) १८४३ – १९०७ आणि (२) १९०७ – १९४७ :

सिंधी काव्येतिहासातला प्रारंभकाळ (१८४३-१९०७) हा एकसाची कवितेचा होता. गझल हा तेव्हा प्रमुख काव्यप्रकार होता. ह्या गझलरचनेतली प्रतिमासृष्टी ही फार्सीतल्या गझलांमधली होती. फार्सीतले छंदशास्त्र आणि काव्यप्रकार उपयोगात आणले जात होते. फार्सीच्या प्रभावाखालील कवितेचा आरंभ गुल महंमद गुल (१८०८–५६) ह्यांनी केला. त्यांच्या गझलांना मोठी लोकप्रियता मिळाली. गुल ह्यांचे समकालीन कवी आखूंद मुहंमद कासीम (१८०६–८१) ह्यांच्या गझलांचा सूर उद्‌बोधकतेचा आहे. त्यांच्या कवितेवर सूफीवादाचेही संस्कार आहेत. मुहंमद फाजल शाह (१८३६–१९००) ह्यांच्या काव्यात फार्सी कवितेतली प्रतिमासृष्टी फारशी आढळत नाही. विविध विषयांवर त्यांनी काव्यलेखन केले. त्यांच्या कवितेत शारीर प्रेमाबरोबरच आध्यात्मिक प्रेमाचाही आविष्कार आढळतो. उद्‌बोधनाचा भाग त्यांच्याही कवितेत आहे. हाफीज हामीद टिखराई (१८३२–९७) हेही एक उल्लेखनीय कवी. त्यांनी गझल व कसीदे ह्यांसारखे फार्सी काव्यप्रकार हाताळले. अर्‌मधान-ई-हामीद  ह्या नावाने त्यांची संकलित कविता त्यांच्या मुलाने प्रकाशित केली. शम्स-अल-दीन (१८५७–१९२९) ह्यांनी ‘बुलबुल ’ ह्या टोपणनावाने काव्यरचना केली. त्यांनी विडंबनपर कविता लिहिल्या. फार्सी पद्घतीची काव्यरचना करणाऱ्या कवींमध्ये मीर हसन अलीखान हसन आणि ‘ सांगी’ ऊर्फ मीर अब्दुल हुसैनखान हे प्रमुख होते. गद्याप्रमाणे कवितेतही आपला ठसा उमटवणाऱ्या मिर्झा कलीच बेग ह्यांनी स्वतःचे युग निर्माण केले, असे म्हणता येईल. सौदा-ई-खाम  (म. शी.‘ अपरिपक्व प्रलाप ’) ह्या नावाने त्यांच्या कविता दोन खंडांत प्रसिद्घ करण्यात आल्या आहेत. उमर खय्यामच्या रुबायांचा त्यांनी सहजसुंदर अनुवाद केला. काही अरबी, फार्सी, उर्दू कविताही त्यांनी सिंधीत अनुवादिली. अमुल माणिक   (म. शी. ‘ अमूल्य माणिक ’) आणि मोतियन जी डबली   (म. शी. ‘मोत्यांची डबी ’ ) ह्या दोन पुस्तकांत हे अनुवाद समाविष्ट केलेले आहेत.

सिंधीमधील आख्यानक कविता म्हणता येईल अशा रचनेचा आरंभ उधाराम थावरदास यांनी केला (‘राय डयाचची कथा ’, १८६१). त्यानंतर अंधकवी लालू भगत ह्यांचे ‘ कामसेन व कामरुप ’ (१८६९, म. शी.) हे प्रेमकाव्य व ‘ मेहरमुनीर ’ची कथा (१८७१) या प्रसिद्घ झाल्या. अशा काव्यांची परंपरा पुढे ज्या कवींनी राखली, त्यांत आखूंद अब्दुल रहीम अब्बासी आणि मोरयो फकीर ह्यांचा समावेश होतो. ससुई पुनहुन  ह्या मोरयो फकीरांच्या कथाकाव्याला लक्षणीय लोकप्रियता मिळाली.

१९०७ ते १९४७ ह्या चाळीस वर्षांच्या कालखंडात सिंधी वाङ्‌मयीन जगाचा भर कवितेपेक्षा गद्यावर अधिक राहिला. राजकारण, सामाजिक सुधारणा, स्वातंत्र्यलढा ह्या विषयांकडे लोकांचा ओढा होता; परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतही ‘ अझीझ ’ ह्या टोपणनावाने काव्यलेखन करणारे कवी लेखराज किशिनचंद मीरचंदाणी  (१८९७–१९७१) हे फार्सी काव्यपरंपरेला चिकटून होते. गझला, रुबाया आणि मस्‌नवी ( खंडकाव्य) त्यांनी समर्थपणे लिहिल्या. मात्र गझलांसाठी ते विशेष प्रसिद्घ आहेत. हैदरबक्ष जतोई (१९०१–७०) यांनी उत्कृष्ट रुबाया रचल्या. त्यांनी सिंधू नदीच्या गौरवार्थ रचलेले काव्य तुहफा ए सिंध (१९३०) सर्वसामान्य सिंधी लोकांच्या ओठांवर रुळले. सुराही  ह्या त्यांच्या गझल व रुबाया संग्रहास साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला (१९६६). जतोई स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगला. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीही ते लढले. ह्या चळवळीत झोकून दिल्याने कविता लिहिण्याकडेही त्यांचे दुर्लक्ष झाले. परसराम

हिरानंद ऊर्फ ‘ जिया ’ (प्रकाश) ह्यांचा तसवीर-ए-एहसास  (१९४३) हा काव्यग्रंथ प्रसिद्घ आहे. हरुमल ईशरदास सदारंगाणी   (१९१३– ) ह्यांनी उत्कृष्ट रुबाया रचल्या. ‘ खादिम ’ या टोपणनावानेही ते प्रसिद्घ आहेत. रंगीन रुबैयुन (१९५९, म. शी. ‘ बहुरंगी चतुष्पद्या’) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात १९४ चतुष्पद्या असून त्यांवर फार्सी काव्याचा प्रभाव आढळतो. चीख (१९७७, म. शी. ‘ किंकाळी ’) या त्यांच्या काव्यसंग्रहास साहित्य अकादेमीचा पुरस्कार लाभला (१९७८). आधुनिक संवेदना व्यक्त करणाऱ्या त्यातील कविता मुक्तछंदात आहेत. मुहंमद वासीफ ह्यांनी सुंदर गझला लिहिल्या. त्या त्यांच्या दीवाण   (१९५५) या काव्यसंग्रहामध्ये संगृहीत आहेत. गुलाम अली बक्ष ऊर्फ ‘ मसरुर ’ ह्यांच्या हीरन-जो-हार  ( सु. १९५०) ह्या काव्यसंग्रहात फार्सी छंदशास्त्राचा उपयोग केलेला आहे. त्यातील कवितांच्या शब्दकळेवर सूफी पंथाचे संस्कार आढळून येतात. सिंधी कवितेतील मुक्तछंदाचा आरंभीचा वापर मन-जा-चहबुक  (१९२३–२६, म. शी. ‘ मनाचा चाबूक ’) ह्या दयाराम गिदूमल ह्यांच्या काव्यसंग्रहात आढळतो. वेदान्त, सूफी पंथ, शीख धर्मगुरुंची शिकवण ह्यांचा प्रभावही ह्या कवितांत आहे. त्यांची ‘ सिंधूडी ’ ही कविता सिंधी संस्कृतीचे गुणगान करणारी आहे. डेवनदास किश्नाणी ऊर्फ ‘ आझाद ’ ह्यांनी आर्नल्डच्या लाइट ऑफ एशिया चे रुपांतर पूरब संदेश (१९३७, म. शी. ‘ बुद्घजीवन ’) ह्या नावाने केले. एन्. व्ही. थडाणींनी भगवद्‌गीतेचा सिंधी अनुवाद फार्सी छंदांचा वापर करुन केला (१९२३). ह्या अनुवादामुळे संस्कृत न येणाऱ्यांनाही ह्या ग्रंथातील विचार जाणून घेणे शक्य झाले. मात्र साधू टी. एल्. वासवाणी ह्यांचा मुक्तछंदातील गीतानुवाद अधिक सोपा व वाचकप्रिय आहे. १९४७ मध्ये कालिदासाच्या मेघदूताचा पद्यानुवाद नानकराम धर्मदास मीरचंदानी ह्यांनी केला, तर एम्. यू. मलकाणींनी रवींद्रनाथ टागोरांच्या गार्डनर ( प्रीत-जा-गीत,

१९४०) व गीतांजली   (१९४२) यांचे अनुवाद केले. त्यांनी केलेल्या गीतांजली च्या अनुवादात मुक्तछंदातील रचना दिसते. टागोरांच्या मूळच्या गीतांचे सत्त्व त्यांनी आपल्या अनुवादात कायम राखले आहे. बंडखोर बंगाली मुसलमान कवी काजी नज्‍रुल इस्लाम ह्यांच्या कवितांचा अनुवाद डी. के. मन्शारामाणी ह्यांनी बागी ह्या नावाने केला.

सिंधी काव्यात जवळपास साठ वर्षे जाचक ठरलेला एकसुरीपणा आणि साचलेपणा नाहीसा करणारा आधुनिकतेचा एक चैतन्यमय प्रवाह कवी ‘बेवस ’-किशिनचंद तीरथदास खत्री   (१८८५–१९४७) ह्यांनी आणला. तसेच कवितेत आधुनिक विषय आणण्याचे प्रयत्न पूर्वीही अधूनमधून झाले होते. उदा., भेरुमल मेहरचंद अडवाणी ह्यांनी मिठाच्या खाणीत काम करणाऱ्या कामगारांवर एक दीर्घकाव्य लिहिले होते. मात्र बेवस ह्यांनी आधुनिक विषयांवरील कवितेस एका जोमदार प्रवाहाचे रुप दिले. आरंभी त्यांनी बालगीते लिहिली. शिरी शैरु (१९२९, म. शी. ‘मधुर काव्य’) ह्या नावाने ती संग्रहित आहेत. ह्या कविता सहज-सोप्या शैलीत लिहिलेल्या आहेत. सामुंडी सिपूं   (१९७०, म. शी. ‘ सागर शिंपले ’) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहातील कविता आधुनिक विचारांनी भारलेल्या आहेत. ह्या कवितांवर विस्तृत भाष्ये केली जाऊ शकतात. बेवस ह्यांनी फार्सी छंदशास्त्राच्या बंधनातून स्वतःला मुक्त मानलेच; परंतु स्वतःचा एक काव्यप्रकारही निर्माण केला. गंगाजूं लहरुं (म. शी. 'गंगालहरी ’) आणि गुरु नानक जीवन-कविता  (१९४१) ही काव्ये त्यांनी त्या काव्यप्रकारात लिहिलेली आहेत.मजुरांच्या जीवनावर त्यांनी काव्यरचना केली. इतरांसाठी संपत्ती निर्माण करणारा मजूर हा स्वतः मात्र विपन्नावस्थेत जगत असतो, हे करुण सत्य त्यांनी ‘ पोरिहियत ’ (म. शी. ‘ मजूर ’) ह्या कवितेतून सांगितले. ‘ गरीबन-जी-झोपडी ’ (म. शी. ‘ गरीबाची झोपडी ’) ह्या कवितेचे पालुपदच ‘ देव करो आणि गरीबांच्या झोपडीचे काही नुकसान न होवो ’ हे आहे. दुःखमय जगाला प्रसन्न, समृद्घ बनवावे, अशी भावना ते व्यक्त करीत. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी प्रभावी स्वातंत्र्यगीते लिहिली. भाषेच्या बाबतीत विशुद्घतेचा अनाठायी आग्रह त्यांनी धरला नाही. संस्कृत-प्राकृतप्रमाणेच ते अरबी-फार्सी शब्दांचाही वापर करीत. मात्र नित्याच्या वापरात असलेले शब्दही त्यांनी सिंधी काव्यात आणले. बेवस ह्यांच्याकडून प्रेरणा घेणाऱ्या प्रमुख कवींमध्ये हुंदराज दुखायल आणि हरी ‘दिलगीर’ ह्यांचा समावेश होतो. कवी म्हणून त्यांनी महत्ता प्राप्त केली. हुंदराज दुखायल ह्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रप्रेमाची उत्कृष्ट गीते  रचली. संगीत फूल   (१९४६) हा त्यांचा काव्यसंग्रह उल्लेखनीय आहे. त्यांतील कवितांत परमेश्वराच्या प्रशंसेपासून आत्मिक प्रेमापर्यंत अनेक  विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांत स्वातंत्र्यगीत हा शेवटचा भाग सर्वांत मोठा आहे. हरी ‘ दिलगीर ’ ह्यांचे हरिश्चंद्र  हे कथाकाव्य व कोड ( म. शी. ‘शिंपले ’) ह्या काव्यसंग्रहातील कविता ह्यांवर बेवस ह्यांचा गाढ प्रभाव आहे. इतरही अनेक कवींवर बेवस ह्यांचा प्रभाव पडला. अशा कवींपैकी शेख अयाझ आणि नारायण श्याम (१९२२–८९) ह्यांनी कवितेत नवनवे प्रयोगही केले.

तिसरा कालखंड ( स्वातंत्र्योत्तर कालखंड – १९४७ नंतरचे सिंधी साहित्य ) : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला जे स्वातंत्र्य मिळाले, ते त्याची फाळणी होऊन. फाळणीनंतर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला आणि तेथे झालेल्या जातीय दंगलींमुळे अनेक सिंधी हिंदू निर्वासित अवस्थेत भारतात आले. त्यांच्या भूमीपासून ते तुटले. सिंधी लेखकांच्या लेखनातून एका बधीर मनःस्थितीचा प्रत्यय येऊ लागला. ते भानावर आले, तेव्हा त्यांनी सिंधी समाजाच्या यातना, अगतिकता, निर्वासितांच्या छावण्यांतले जीवन चित्रित केले. पण ही दुःखमय स्थिती सिंधी समाजासाठी एक आव्हानही होते. ह्या समाजाची गतिमानता, भरपूर कष्ट करण्याची तयारी, इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता आणि सूफी पंथाचे ह्या समाजावर झालेले आध्यात्मिक संस्कार ह्यांतून हा समाज प्रतिकूल परिस्थितीतही आत्मविश्वासाने उभा राहिला. सिंधी लेखकही  याला अपवाद नव्हते. त्यांनी उभारी घेऊन विपुल लेखन केले. सिंधीमध्ये  विविध साहित्यप्रकारांतील लेखनाचा ओघ सातत्याने वाहत राहिला. उदा., प्रवासवृत्ते (मंघाराम उधाराम मलकाणी –पछिमी यात्रा, १९६३), सिंधी भाषेचा उद्‌गम आणि विकास (लीलो रुचंदानी, पोपटी हिरानंदाणी), सिंधी साहित्यातील निरनिराळे टप्पे आणि त्या साहित्याच्या निरनिराळ्या शाखा ह्यांचा आढावा घेणारे निबंध (के. बी. अडवाणी), संशोधनात्मक लेखन (गंगाराम सम्राट, द्वारकाप्रसाद सिन्हा), चरित्रे, कथा, कादंबऱ्या, नाटके, कविता हे साहित्यप्रकारही समर्थपणे हाताळले गेले. साहित्याच्या आशय- अभिव्यक्तीत अनेक प्रयोग झाले. १९४७ नंतरच्या सिंधी साहित्याचा आढावा साहित्यप्रकार, वाङ्‌मयीन प्रवाह, प्रमुख साहित्यिक व त्यांचे योगदान या अनुषंगाने पुढे घेतला आहे. तसेच या कालखंडातील साहित्याच्या जडणघडणीत ज्या पूर्वसूरी साहित्यिकांच्या प्रेरणा-प्रभावांचा खोलवर ठसा उमटला, त्यांचेही निर्देश पार्श्वभूमी दाखल केले आहेत.

फाळणीनंतरच्या काळात मुंबईच्या सिंधी साहित्य मंडळाने तरुण लेखकांना नाट्यलेखनास आणि नाटके सादर करण्यास प्रवृत्त केले. मंघाराम उधाराम मलकाणी आणि राम पंजवानी ह्या ज्येष्ठ साहित्यिकांनी ह्या बाबतीत पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः काही नाटके लिहिली. दास ‘ तालिब ’, राजन चावला आणि गोबिंद माल्ही (१९२१ –  ) ह्यांनी आपली नाटके सादर करताना आधुनिक नाट्यतंत्रांचा वापर केला. प्रेमप्रकाश या आधुनिक नाटककाराने सिंधी नाटकांत नवप्रवाह आणला. पिकनिक (१९७४), मोर्चाबंदी   ही त्यांची नाटके आधुनिकतेची निदर्शक आहेत.

अलीकडच्या काळात रुपांतरित व अनुवादित अशी नाटके रंगमंचावर आणण्याची एक नवी लाट आलेली आहे. काही वाङ्‌मयीन-सांस्कृतिक संस्था ह्यासाठी स्थापन झाल्या आहेत. मात्र ह्यात कोणी व्यावसायिक नाटककार कलावंत नाहीत. हे सर्व आपापल्या नोकऱ्या सांभाळून रंगभूमीची सेवा करीत असतात. त्यामुळे सिंधी नाटकाला व्यावसायिकतेची मिती प्राप्त झालेली नाही.

फाळणीनंतर जे यातनादायक अनुभव आले, ते आरंभीच्या सिंधी कवितेतून प्रकट झाले. पुढे तो काळ मागे पडून सिंधी समाजाचे जीवन स्थिरावले. सिंधी कवी नवनवे काव्यप्रकार हाताळू लागले. उदा., जपानी ‘हायकू ’, हिंदीमधली ‘ नई कविता ’, इंग्रजीतील निर्यमक कविता (ब्लँक व्हर्स) इत्यादी. ह्या कवितांचा आशय नित्यनूतन रुपे धारण करणाऱ्या मानवतेप्रमाणे शाश्वततेकडे झुकला होता. अशा कवींमध्ये गझलकार अझीझ एम्. कमल आणि सुगन आहूजा, भावकवी वफा आणि भारती; लोकगीतांशी नाते जोडणारी कविता लिहिणारे कृष्ण राही आणि हसिद ह्यांचा समावेश होतो. के. बी. अडवाणी आणि हरुमल सदारंगाणी हे सिंधीतले अलीकडच्या काळातील व्यासंगी कवी आहेत; तथापि झिआ आणि राम पंजवाणी (१९११–८७) हे लोकप्रिय कवी आहेत.आंचल, सिकायल, कुमल, निर्मल, प्रकाश, शाद, इंदूर भोजवानी ही अन्य काही कवींची नावे. १९४७ नंतरच्या काळातल्या सिंधी समीक्षेत बरेच परिवर्तन झाले आहे. मुंबईच्या सिंधी साहित्य मंडळाच्या माध्यमातून तरूण समीक्षकांचा एक गट उदयाला आला. कीरत बाबाणी, ए. जे. उत्तम, गोविंद माल्ही हे आरंभीचे काही समीक्षक; त्यानंतर सुगन आहूजा, आंचल आणि कृष्ण राही हे पुढे आले. रुढ चाकोरीतून बाहेर पडण्याची त्यांनी धडपड केली. त्यांची समीक्षा परखड होती. त्यातून जुन्या समीक्षाविचाराचे समर्थक आणि नव्या समीक्षादृष्टीचे समर्थक ह्यांच्यात जो संघर्ष निर्माण झाला, त्यातूनच अनेक उत्कृष्ट समीक्षात्मक निबंध लिहिले गेले. अलीकडच्या काही उल्लेखनीय समीक्षकांत हिरो शेवकानी, हरिश वासवाणी (१९४० –  ), परभ अबिचंदानी आणि आनंद खेमाणी (१९३३–  ) ह्यांचा समावेश होतो. त्यांच्या समीक्षेतून तारुण्यसुलभ जोम, तळमळ दिसून येते. त्याचप्रमाणे तर्कशुद्घ विचारसरणीचाही प्रत्यय येतो. त्यांच्या समीक्षेने पारंपरिक साहित्यिकांना आत्मजाणीव प्राप्त करुन दिली आहे, तसेच सिंधीतील वाङ्‌मयीन वातावरण सचेत केले आहे.

१९४० च्या दशकात मुन्शी प्रेमचंद, कृष्ण चंदर, ख्वाजा अहमद अब्बास इ. हिंदी, उर्दू साहित्यिकांच्या साहित्याची सिंधी भाषांतरे मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि त्यांच्या प्रेरणा-प्रभावातून सिंधी साहित्यात प्रागतिक विचारसरणीचे व सामाजिक वास्तववादाचा आविष्कार घडवणारे लेखन विपुल प्रमाणात झाले. रेगीस्तानी फूल   (१९४४, म. शी. ‘वाळवंटातील फुले’) या गोबिंद माल्हींनी संपादित केलेल्या प्रातिनिधिक सिंधी कथासंग्रहात प्रागतिकतेचे व सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवणाऱ्या सर्वोत्कृष्ट सिंधी कथा संगृहीत आहेत. त्यांत इतर लेखकांबरोबरच स्वतः गोबिंद माल्ही व सोभो ग्यानचंदानी यांच्या कथाही अंतर्भूत आहेत. हे दोघे सिंधी साहित्यातील प्रागतिकतावादाचे प्रमुख प्रवर्तक मानले जातात. पुरोगामी कथाकारांत ते अग्रणी होते.

गोबिंद माल्ही हे स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत महत्त्वाचे कथाकार आहेत. शिवाय ते अष्टपैलू लेखक असून त्यांनी २३ कादंबऱ्या, ३५ एकांकिका, सु. ४० लघुकथा आणि बहुसंख्य वाङ्‌मयीन लेख व निबंध लिहिले आहेत. सोभो ग्यानचंदानी या मार्क्सवादी लेखकाच्या सहवासामुळे ते साम्यवादाकडे वळले. ‘ हरी हकदार ’ (१९४५, म. शी. ‘शेतकरी जमिनीचा मालक आहे ’) ही त्यांची एक गाजलेली उत्कृष्ट कथा असून तीत सामाजिक ज्वलंत प्रश्न हाताळला आहे. त्यांच्या प्यार जी प्यास  (१९७२) ह्या कादंबरीला १९७३ मध्ये साहित्य अकादेमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘ अदब और अदीब ’ या आत्मपर लेखनात सिंधी संस्कृतीचा इतिहास उलगडला आहे. फाळणीनंतरच्या मुंबईच्या सिंधी साहित्यिक वर्तुळात गोबिंद माल्ही, कीरत बाबाणी व ए. जे. उत्तम ही त्रिमूर्ती प्रख्यात असून त्यांनी आधुनिक सिंधी साहित्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांनी ‘ सिंधी साहित मंडळ ’ ही संस्था स्थापन करुन तत्कालीन तरुण पिढीच्या लेखकांना संघटित केले. या मंडळाने सिंधी साहित्यात महत्त्वाचे योगदान दिले व सिंधी समाजात सांस्कृतिक चैतन्य निर्माण केले. गोबिंद पंजाबी (१९१८–    ) यांनी १९४० मध्ये सर्द आहूं   (म. शी. ‘ थंड निश्वास’) हा कथासंग्रह प्रसिद्घ केला. या संग्रहातील त्यांच्या कथांमध्ये प्रागतिकतेचा सूर आढळतो. प्रागतिक विचारसरणीचा आविष्कार घडवणारे आणखी दोन कथासंग्रह या काळात प्रसिद्घ झाले, ते म्हणजे प्रह फुटी  (१९४५, म. शी. ‘पहाट’) व फरक  (१९४५, म. शी. ‘फडफड’). यांतील कथांमध्ये सामाजिक-राजकीय प्रश्नांचे तीव्र पडसाद उमटले असले, तरी त्या नैराश्याकडे झुकलेल्या आहेत. ए. जे. उत्तम व कीरत बाबाणी यांच्या काही कथा प्रागतिक विचारसरणीचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. १९४७ च्या आसपास निर्माण झालेल्या सिंधी कथासाहित्याचे हे स्थूलमानाने प्रातिनिधिक चित्र म्हणता येईल. या काळातल्या प्रागतिकतावादी वा पुरोगामी कथालेखनावर प्रामुख्याने मुन्शी प्रेमचंद ह्या हिंदी लेखकाचा दाट प्रभाव होता. प्रेमचंदांच्या साहित्याची अनेक सिंधी भाषांतरे या काळात झाली; मात्र ह्या कालखंडात लिहिल्या गेलेल्या सिंधी कथांची मर्यादा अशी, की या कथांमधली पात्रे कधीच बंडखोरी करीत नाहीत; ती परिस्थितिशरण वा नियतिशरण अशीच रंगवलेली आढळतात.

आधुनिक सिंधी साहित्यात वास्तववादाचा प्रवाह लालचंद अमरदिनोमल यांनी आणला. जोत  मासिकात प्रसिद्घ झालेल्या त्यांच्या ‘ हूर माखिया जा ’ (१९०२) ह्या कथेने वृत्तपत्रीय वास्तवकथनाचा अभिनव प्रयोग केला. नंतर १९१४ मध्ये प्रसिद्घ झालेल्या त्यांच्या हूर माखिया जा  या कथासंग्रहात ही कथा समाविष्ट करण्यात आली. लालचंद ह्यांच्या ह्या वास्तववादी वाङ्‌मयीन प्रवाहाचे अनुकरण नंतरच्या काळात अमरलाल हिंगोराणी (१९०७ –५६) यांनी केले. ‘अदो अब्दुर्रहमान ’ (१९३०) ही त्यांची आंतरराष्ट्रीय ख्यातिप्राप्त कथा असून ती त्याच नावाच्या अदो अब्दुर्रहमान (१९८१) या त्यांच्या कथासंग्रहात समाविष्ट करण्यात आली. सिंधी साहित्यात स्वच्छंदतावाद व संज्ञाप्रवाह यांचे चित्रण आसानंद मामतोरा (१९०३– ) यांनी प्रभावीपणे केले. शायरु (१९४१, म. शी. ‘कवी’) या त्यांच्या कादंबरीत स्वच्छंदतावादी, तर पाप ऐन प्रेम जून कहानियाँ   (१९३९, म. शी. ‘पाप आणि प्रेम यांच्या कथा ’) या कथासंग्रहात संज्ञाप्रवाही चित्रण आढळते. १९६० च्या दशकातील सिंधी कथासाहित्यात प्रागतिकतेचा प्रवाह खूपच जोमदार व प्रभावी होता. १९४० च्या दशकातील प्रागतिकतेची परंपरा या कथांनी पुढे नेली व त्यात नवे बदल घडवून आणले. सामाजिक वास्तवाचे सखोल चित्रण १९६० च्या दशकातील एकूणच सिंधी साहित्यात आढळते; तथापि या काळातील कथासाहित्य प्रागतिक मतप्रणालीच्या इतके आहारी गेले होते, की अखेर ते कलात्मकतेला बाधक ठरु लागले. बहुतेक कथांचा शेवट एखाद्या बोधवचनाने होत असे; तथापि या काळातील सुंदरी उत्तमचंदाणी (१९२४–  ) यांच्या कथा व कादंबऱ्या गुणवत्तेच्या दृष्टीने उल्लेखनीय व दर्जेदार आहेत. त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील पात्रे जिवंत व जोमदार वाटतात.

प्रागतिक व सामाजिक वास्तववादी सिंधी साहित्याच्या मर्यादा मान्य करुनही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की या साहित्याने सिंधी साहित्याच्या भावी प्रगतीसाठी एक पायाभूत संरचनात्मक चौकट व संदर्भसाधने उपलब्ध करुन दिली. त्यायोगे आजचे आधुनिक सिंधी साहित्य विकसित झाले आहे.

प्रागतिक साहित्याच्या जाचक मर्यादांविरुद्घ संघर्ष व बंडखोरी करणाऱ्या उत्तरकालीन सिंधी लेखकांनी सिंधी साहित्यात नवनवे वाङ्‌मयीन प्रवाह आणले व सिंधी साहित्य प्रागतिक मतप्रणालीच्या व कम्युनिस्ट प्रचारकी बोधवादाच्या जोखडातून मुक्त केले. १९५७ दरम्यानच्या सिंधी साहित्यात ही विद्रोहाची प्रवृत्ती दिसून येते. या  विद्रोही म्हणजेच चळवळीचे नेतृत्व करणारे नव्या पिढीतील तीन प्रमुख बंडखोर लेखक म्हणजे मोहन कल्पना (१९३०–  ), गुणो सामताणी (१९३४–   ) व ‘ लाल पुष्प ’– लाल भगवानदास रिझवानी (१९३५– ) ही त्रिमूर्ती होय. हे तिघे या चळवळीचे प्रवर्तक होते. त्यांनी सिंधी साहित्यात नवे तत्त्वज्ञान आणले आणि कथा-कादंबऱ्यांतील व्यक्तिरेखा व संविधानक (प्लॉट) यांना नवे परिमाण दिले. त्यांचा दृष्टिकोण नववास्तववादी होता. मानवी मनाच्या सूक्ष्म, सखोल व गुंतागुंतीच्या भावनिक व मानसिक अवस्थांचे चित्रण त्यांनी केले. त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून केलेल्या व्यक्तिरेखांच्या मनोविश्लेषणातून मानवी वर्तनाच्या व्यामिश्र व बहुपदरी वास्तवाचे दर्शन घडते.

गुणो सामताणी यांचे अभिमान (१९६५) व अपराजिता (१९७०) हे दोन कथासंग्रह प्रसिद्घ आहेत.त्यांच्या कथांतून व्यक्तींच्या विविध भावावस्था, घटना, प्रसंग यांचे सूक्ष्म व सखोल चित्रण आढळते. विशिष्ट स्थळ, रीतिरिवाज, वृत्तिविशेष व बोलीभाषावैशिष्ट्ये यांचे प्रामाणिक व तपशीलवार सखोल चित्रण त्यांच्या साहित्यात असल्याने त्यात वास्तववादाचा परमोत्कर्ष आढळतो. मोहन कल्पना हे स्वच्छंदतावादी व आत्मनिष्ठ वृत्तीचे लेखक आहेत. त्यांची रुंजा ऐन पच्छा (१९६६, म. शी. ‘अरण्य व सावल्या’) ही कादंबरी व अनेक कथा प्रसिद्घ आहेत. त्यांच्या साहित्यातून एक प्रकारचा वैराणपणा व ओसाडी प्रत्ययाला येते. ‘ लाल पुष्प ’ हे तिसरे लेखक त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील संज्ञाप्रवाही चित्रणासाठी विशेष प्रसिद्घ आहेत. त्यांचे आठ कथासंग्रह व पाच कादंबऱ्या प्रसिद्घ आहेत. फ्रॉइडच्या मानसशास्त्रीय संकल्पनांचे वाङ्‌मयीन आविष्कार त्यांच्या कथा-कादंबऱ्यांतून आढळतात. त्यांच्या हिका सर्दु दिवार  (१९६६, म. शी. ‘ एक थंड भिंत’) आणि हुना जे आतमा जो मौत (१९७३, म. शी. ‘ त्याच्या आत्म्याचा मृत्यू’) ह्या कादंबऱ्या आधुनिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवतात. हुना जे आतमा जो मौत  या त्यांच्या कादंबरीला १९७४ चा साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला. सिंधीतील कादंबरीचा सांकेतिक व  साचेबंद परंपरागत जुना घाट नाकारुन त्यांनी कादंबरीचा प्रयोगशील नवा घाट निर्माण केला. या कादंबरीत प्रतिनायक घेऊ पाहात असलेल्या आत्मशोधाचे संज्ञाप्रवाही चित्रण आढळते. विश्वासू-अविश्वासू (१९५८),दायरो (१९६४), बंधन ऐन निर्माण (१९६५), पुनर मीलन (१९६६), लाल पुष्प जून चुंद कहांनियुन (खंड १–१९७० व खंड २–१९७१), कर्झ जी दरख्वास्त   (१९७६) हे ‘ लाल पुष्प ’ यांचे कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. नई कहानी, अ-कहानी, संज्ञाप्रवाहाचा वापर असे विविध प्रयोग नव्या पिढीचे लेखक आपल्या कथांतून करीत आहेत. आविष्काराच्या ठराविक सांकेतिक व साचेबंद प्रकारांत त्यांना स्वारस्य नाही. जीवनाची सखोल समज त्यांच्या ठायी आहे, तसेच तंत्रकौशल्यही आहे. त्यामुळे आधुनिक सिंधी कथा-कादंबऱ्यादी साहित्य विविध नवनव्या दिशांनी समृद्घ व विकसित होताना दिसून येत आहे.

राम पंजवानी हे विधायक व जीवनसन्मुख दृष्टिकोणातून लेखन करणारे एक आधुनिक सिंधी साहित्यिक होत. जीवनाची अर्थपूर्णता व हेतूगर्भता सूचित करणाऱ्या अनेक कथा-कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कैदी (१९४३), शर्मिला (१९४४), लतिफा (१९४५), जिंदगी   ऐन मौत (१९५२) इ. कादंबऱ्या आणि अजिब अरवान्यून   (१९६२), तुनहिंजा मुनहिंजा तजुर्बा   (१९७५) इ. कथासंग्रह उल्लेखनीय आहेत. त्यांची सिंध जा सात नाटक  (१९५२; शाह अब्दुल लतीफच्या सिंधी लोककथांवर आधारित) व पूरब ज्योती  (१९५४; गौतम बुद्घाच्या जीवनावर आधारित) ही नाटके प्रसिद्घ आहेत. अनोखा अझमूदा  (१९६४, म. शी. ‘अनन्यसाधारण अनुभव’) ह्या त्यांच्या आठवणीवजा पुस्तकाला १९६५ चा साहित्य अकादेमी पुरस्कार लाभला.

सिंधी साहित्यातील स्वच्छंदतावादी प्रवाहात लेखन करणारे आणखी एक प्रमुख लेखक म्हणजे कृष्ण खटवाणी (१९२७ –  ) हे होत. अकेली   (१९८०) हा त्यांचा कथासंग्रह उल्लेखनीय आहे. त्यांची याद हिका प्यार जी   (१९७८, म. शी. ‘ प्रणयाच्या स्मृती ’) ही सर्वोत्कृष्ट कादंबरी. नवस्वच्छंदतावादाचा एक उपप्रवाहही या काळात सिंधी साहित्यात वाहत राहिला. १९५० व ६० च्या दशकांत स्वच्छंदतावादी सिंधी कविताही बहरात होती. ‘श्याम ’– नारायण गोकळदास नागवाणी (१९२२–८९) हे सिंधीतले सर्वांत यशस्वी स्वच्छंदतावादी कवी होत. माक भिना राबेला (१९६४, म. शी. ‘ दवांत भिजलेली जाईची फुले’) या काव्यसंग्रहात त्यांच्या स्वच्छंदी मनोवृत्तीचे उत्कट दर्शन घडते. स्वच्छंदतावादी व मनोविश्लेषणात्मक संज्ञाप्रवाही चित्रण १९६५ नंतरच्या काळात मागे पडले व समकालीन वास्तवाचे व बदलत्या सामाजिक स्थितीचे चित्रण सिंधी साहित्यात होऊ लागले. समकालीन वास्तवचित्रणाची ही नवी जाणीव व दृष्टिकोण बाळगणाऱ्या आधुनिक लेखकांची नवी पिढी सिंधी साहित्यात उदयाला आली. माणूस व त्याच्या भोवतालची परिस्थिती यासंबंधीचे पूर्ण सत्य लेखकाने जाणून घेतले पाहिजे व त्याचा प्रामाणिक आविष्कार आपल्या साहित्यातून घडवला पाहिजे, अशी या लेखकांची धारणा होती. या नव्या वाङ्‌मयीन चळवळीचे मुख्य प्रवर्तक आनंद खेमाणी, विष्णू भाटिया (१९४१– )व ईश्वर चंदर (१९३७– ) हे होत. त्यांना अनुसरणाऱ्या अन्य लेखकांत हरिश वासवाणी, के. एस्. बालाणी (१९३०–  ), श्याम जयसिंघानी (१९३७ –  ), प्रेम प्रकाश (१९४६–  ) इत्यादींचा समावेश होतो. आनंद खेमाणींच्या नोव्हेंबर जी आखरीं रात (१९७६, म. शी. ‘नोव्हेंबर अखेरची रात्र ’) या कथासंग्रहात दोन परस्परविरोधी व तुल्यबळ प्रेरणांच्या संघर्षात सापडलेल्या व्यक्तीच्या भावजाणिवांचे वास्तव चित्रण आढळते. विष्णू भाटियांच्या कथांमध्ये कामवासनांचे व लैंगिकतेचे मुक्त, अनावृत्त चित्रण आढळते. उदा., त्यांच्या चंद्रमुखी  व सिजा जी तुक्रा ( म. शी. ‘सूर्याचे डाग’) या त्यांच्या कथासंग्रहांतील कथा. या नव्या पिढीतील ईश्वर चंदर या लेखकाने आधुनिक व समकालीन जीवनजाणिवांचे चित्रण करणाऱ्या काही सिंधी कथा लिहिल्या असून, त्यांतून त्यांची स्वतःची अशी विशिष्ट शैली प्रकर्षाने जाणवते. श्याम जयसिंघानी हे आधुनिक सिंधी साहित्यातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. त्यांनी कथा, कविता, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार यशस्वी रीत्या हाताळले आहेत. शिवाय साहित्य अकादेमीमध्ये सिंधीचे संपादक (१९७२ ते १९९३-९४) म्हणूनही त्यांनी कार्य केले. मुंबई मुन्झि (म. शी. ‘ माझी मुंबई’) व गोवनी मंझर (म. शी. ‘गोव्याच्या कविता’) हे त्यांचे स्थलवैशिष्ट्यपर काव्यसंग्रह; खाये-आ जे चाओतराफ  व कच्चा धागा  या कादंबऱ्या; नंगो आसमान, खंडहर, यांगो  (१९७६, म. शी. ‘विवराच्या भोवती ’) इ. कथासंग्रह हे त्यांचे साहित्य प्रसिद्घ आहे. सिंधीत दीर्घकथांचा पायंडा त्यांनीच पाडला. त्यांच्या कथा-कवितांतून महानगरातले जीवनानुभव, समकालीन घटना व समाजजीवन ह्यांचे उत्कट संवेदनक्षमतेने, आगळ्यावेगळ्या शैलीत केलेले चित्रण आढळते. ते सिंधीतले महत्त्वाचे उत्तर-आधुनिक लेखक मानले जातात. प्रेम प्रकाश हे देखील नव्या संवेदनक्षमतेने लिहिणारे महत्त्वाचे कथाकार व नवनाटककार आहेत. ‘पारूल’ (म. शी. ‘मुळे’) सारख्या त्यांच्या कथेतून ही नवी संवेदना जाणवते. सिंधीतील नवकथा ही अशी अनेक अंगांनी बहरताना, विकासाच्या नव्या दिशा सूचित करताना व आशयाभिव्यक्तीची व्याप्ती वाढवताना दिसून येत आहे. तात्त्विक, सामाजिक, मानसशास्त्रीय अशा जीवनानुभवाच्या विविध अंगांना ती सारख्या सामर्थ्याने भिडते आहे.

सिंधी साहित्यातील सध्याच्या समकालीन प्रवृत्ति-प्रवाहांचे दर्शन कथेप्रमाणेच काव्य, कादंबरी, नाटक या वाङ्‌मयप्रकारांतूनही घडते. आनंद खेमाणी यांची हिका शक्स जी वासना (१९७०, म. शी. ‘मानवाची विषयवासना’) ही समकालीन वृत्ति-प्रवृत्तींचे दर्शन घडवणारी पहिली आधुनिक सिंधी कादंबरी म्हणता येईल. माणसाची कामवासना व लैंगिकता यांचे आदिम पशुपातळीवरचे चित्रण या कादंबरीत आढळते. ‘ लाल पुष्प ’ यांची हुना जे आतमा जो मौत  ही सिंधीतील दुसरी आधुनिक कादंबरी.

मोतीलाल जोतवाणी (१९३६– ) यांची नारंगी ट्रॅफिक लाइट (१९७४) ही पति-पत्नीमधील ताणतणावांचे चित्रण करणारी कादंबरी या आधुनिक प्रवाहातच मोडते. श्याम जयसिंघानी यांच्या खाये-आ जे चाओतराफ  या आधुनिक कादंबरीत सामाजिक परिस्थितीच्या दडपणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आत्मकोशात दडून राहणाऱ्या व्यक्तीचे संवेदनक्षम चित्रण आढळते.

आनंद खेमाणी यांचे बिमार पिऱ्ही (१९७४, म. शी. ‘ रोगट पिढी’) व शमशान घाट वतन लंघंदे (१९८५) हे दोन काव्यसंग्रह प्रस्थापित व्यवस्थेला धक्के देणारे व काव्यरचनेची रुढ चौकट मोडणारे आहेत. या कवितांवर बिभत्सतेचे आरोप झाले असले, तरी त्या आजचे विदारक वास्तव व्यक्त करणाऱ्या, आजच्या पिढीतील व्यक्तीच्या दयनीय, नैराश्यजनक व अस्वस्थ मनःस्थितीचे चित्रण करणाऱ्या बंडखोर कविता आहेत. प्रस्थापित विचारसरणी व संस्कृती यांच्याविरुद्घ बंड करणाऱ्या धक्कादायकअशा या कविता आजच्या तरुण पिढीच्या प्रातिनिधिक मानता येतील.वासुदेव मोही यांचा ताझाद (१९७५, म. शी. ‘विरोधाभास’) आणि हरिश वासवाणी यांचा 40 -76 (१९७६) हे या आधुनिक प्रवाहातलेदोन उल्लेखनीय व दर्जेदार काव्यसंग्रह होत. श्याम जयसिंघानींच्या विच्छोतियुन (१९८०, म. शी.‘दरी’) या काव्यसंग्रहात मानवीआत्म्यांचे दुःखाने पिळवटलेले यातनामय जग साकारलेले आहे. त्यातदुरावा, खिन्नता, संवादाचा अभाव अशा विविध भावावस्थांचे चित्रणआढळते आणि त्यातून सर्वंकष ओसाडपणाचा प्रत्यय येतो. मोहनकल्पना यांचा जहजा जे डेक ते (१९८३, म. शी. ‘जहाजाच्या डेकवर’) हा नवकाव्यसंग्रह उल्लेखनीय आहे. सिंधीतील राजकीय उपरोधपरनवकवितांचे संकलन उघरा आवाझ (म. शी.‘खुले आवाज’) याशीर्षकाने हरिकांत यांनी प्रकाशित केले आहे. या संकलनातील बव्हंशीकविता सद्यकालीन वास्तवाचे चित्रण करणाऱ्या व प्रस्थापित शासनव्यवस्थेच्या दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या आहेत.

सिंधी साहित्यातील नवप्रवाहात लेखन करणाऱ्या लेखक पिढीचेवैशिष्ट्य हे की, ते वर्तमान वास्तवाला थेटपणे भिडतात व त्यातीलव्यथावेदनांचे व ताणतणावांचे रोखठोक चित्रण करतात. ते रम्याद्‌भुततेच्यावा ऐतिहासिक व्यक्तिचित्रणाच्या आहारी जात नाहीत.

प्रतिकूल परिस्थितीतही सिंधी साहित्यिक आपल्या भाषेचा आणिसाहित्याचा अधिकाधिक विकास करण्यासाठी धडपडत आहेत. ‘ऑलइंडिया सिंधी लँग्वेज अँड लिटररी असोसिएशन’चीस्थापना काहीदशकांपूर्वीच झालेली असून देशभर विखुरलेल्या ५९ साहित्यसंस्थातिच्याशी जोडलेल्या आहेत. ‘ऑल इंडिया ... असोसिएशन’ तर्फे दरवर्षी उत्तम साहित्यकृतींना पुरस्कार दिले जातात. तीर्थ ‘वसंत’, लेखराज‘अझीझ’, पोपटी हिरानंदाणी, ‘श्याम’ – नारायण... .. हे असे पुरस्कारमिळविणारे काही साहित्यिक होत. काही सिंधी साहित्यिकांना अकादेमीचे पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. हे साहित्यिक असे : त्यांच्या पुरस्कारमिळालेल्या साहित्यकृतींची नावे व पुरस्काराचे वर्ष कंसात –तीर्थ ‘वसंत’ (कनवर– कादंबरी –१९६०), राम पंजवानी (अनोखाअझमूदा–१९६४), लेखराज ‘अझीझ’ (सुराही– कविता –१९६६).

संदर्भ : अजवाणी, लालसिंह हजारीसिंह, हिस्टरी ऑफ सिंधी लिटरेचर;अनु. लिमये, चंपा, सिंधी साहित्याचा इतिहास, नवी दिल्ली , १९८२.

लेखक: पोपटी (इं) हिरानंदाणी; अ. र. (म.) कुलकर्णी; श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate