অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारत – डोंगर पर्वत व पठार

भारत – डोंगर पर्वत व पठार

  • अरवली पर्वत
  • अरवली पर्वत : हा दिल्लीपासून गुजरातेपर्यंत ईशान्य-नैर्ऋत्य दिशेने जाणाऱ्‍या रांगांचा बनलेला आहे. लांबी सु. ६०० किमी. सर्वांत उंच शिखर, गुरुशिखर, (उंची १,७२२ मी.) अबूच्या पहाडात आहे. हिमालय व निलगिरी यांच्या मधल्या प्रदेशातील ते सर्वांत उंच शिखर आहे.

  • खंडगिरी
  • ओरिसा राज्यातील पुरातात्त्विक महत्त्व असलेली टेकडी. ही पुरी जिल्ह्यात कटकपासून २४ किमी. दक्षिण- नैर्ऋत्येस आणि भुवनेश्वरपासून ८ किमी. वायव्येस आहे.

  • गोवर्धन पर्वत
  • गोवर्धन पर्वत : उत्तर प्रदेश राज्यातील श्रीकृष्णचरित्रप्रसिद्ध पर्वत. हा मथूरेच्या पश्चिमेस २३ किमी. नैर्ऋत्य ईशान्य ८ किमी. पसरलेला असून याची दंडवती परिक्रमा १९ किमी.ची आहे. हा वालुकाश्माचा असून सपाट गाळमैदानात एकदम सु. ३० मी.वर आलेला दिसतो.

  • ड्रमलिन
  • ड्रमलिन : हिमनदांच्या संचयन कार्याने तयार झालेले टेकडीसारखे भूस्वरूप. याचा आकार चहाच्या उपड्या चमच्यासारखा लांबटगोल एका बाजूला निमुळता असतो. ड्रमलिन हिमनदांनी वाहून आणलेल्या रेताड गाळाने निर्माण झालेल्या असतात व त्यांचा मोठा आस हिमनदांच्या वाहण्याच्या दिशेत असतो.

  • दख्खन पठार
  • दख्खन पठार : ‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.

  • दोडाबेट्टा
  • दोडाबेट्टा : निलगिरी पर्वतातील सर्वांत उंच शिखर. हे पश्चिम घाटातील अनाईमुडी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शिखर असून उंची २,६३७ मी. आहे. हे तमिळनाडू राज्याच्या निलगिरी जिल्ह्यात ऊटकमंड तालुक्यात अनाईमुडीच्या दक्षिणेस सु. १६० किमी.वर आहे.

  • नंगा पर्वत
  • नंगा पर्वत : (दियामीर). भारताच्या जम्मू व काश्मीर राज्याच्या पाकव्याप्त प्रदेशातील हिमाद्रीचे सर्वोच्च शिखर. उंची ८,१२६ मी. जगातील अत्युच्च पर्वतशिखरांत याचा नववा क्रमांक आहे. याची समुद्रसपाटीपासून उंची न मोजता पायथ्यापासून माथ्यापर्यंत ती मोजली, तर याचा जगात बहुधा पहिलाच क्रमांक लागेल.

  • नामचा बारवा
  • नामचा बारवा : आसाम हिमालयातील एक अत्युच्च शिखर. उंची ७,७५६ मी. हे तिबेटमधील आसाम हिमालय पर्वतश्रेणीच्या पूर्व भागात असून, येथील भूमिस्वरूप व संरचनेविषयी अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे.

  • निल​गिरी पर्वत
  • द​क्षिण भारतातील प्रमुख डोंगरसमूह. हा पर्वतप्रदेश त​मिळनाडू राज्यात सु. २‚५९० चौ. ​किमी. क्षेत्रात पसरलेला आहे. सर्वच प्रदेश डोंगरदऱ्यांनी व्यापलेला आहे.

  • पत्थर घाट
  • पत्थर घाट : बिहार राज्याच्या भागलपूर चिल्ह्यातील गंगेच्या काठी असलेला एक डोंगर. पत्थर घाट पूर्व लोहमार्गावरील कोलाँग स्थानकाच्या ईशान्येस १०किमी. वर आहे. सध्या हा ‘बटेश्रर स्थान’ या नावाने ओळखला जातो.

  • पातकई टेकड्या
  • पातकई टेकड्या: भारत व ब्रह्मदेश यांच्या सरहद्दीवर असलेली टेकड्यांची मालिका. या टेकड्या २५° ३०’ उ. ते २७° १५’ उ. व. ९५° १५’ पू. ते ९६° १५’ पू. यांदरम्यान ईशान्य-नैर्ऋत्य पसरलेल्या असून, नैर्ऋत्येकडे त्या नागा टेकड्यांमध्ये समाविष्ट होतात.

  • पूर्व घाट
  • पूर्व घाट : भारतीय द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम समुद्रतटांना समांतर अशा डोंगररांगा आहेत. त्यांतील पूर्वेकडील डोंगररांगांना पूर्व घाट व पश्चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगांना पश्चिम घाट असे म्हणतात.

  • बाला घाट
  • बाला घा ट : पाश्चिम-मध्य महाराष्ट्रात वायव्य-आग्नेय दिशेने पसरलेली डोंगररांग. सह्याद्रीचाच एक फाटा असलेली ही रांग, अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड डोंगररांगेपासून सुरू होते. बालाघाट डोंगररांगेचे प्रमुख तीन फाटे आहेत.

  • भटका पाषाण
  • भटका पाषाण : (पाहुणा पाषाण). मूळ स्थानिक खडकांपेक्षा अगदी वेगळा व सामान्यपणे हिमनदीने वा हिमनगाने दूरवर वाहून आणलेला मोठा खडक. असे खडक हिमनदीने वाहुन आणलेल्या गाळात रूतलेले, जमिनीवर पडलेले किंवा डळमळीत स्थितीत जमिनीवर उघडे पडलेले आढळतात.

  • मलय
  • मलय : (१) मलयगिरि : दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. हा पर्वत ‘चंदनगिरि’ या नावानेही ओळखला जात असे. मलई (मळे) म्हणजे डोंगर; या मूळ द्राविडी शब्दावरून ‘मलय’ हा संस्कृत शब्द रूढ झाला. पुराणांतील उल्लेखांवरून पश्चिम घाटाचा (सह्याद्रीचा) दक्षिणेकडील भाग म्हणजे मलयगिरी असे मानतात.

  • महेंद्र पर्वत
  • महेंद्र पर्वत : दक्षिण भारतातील एक प्राचीन पर्वत. प्राचीन भारतातील भूगोलवेत्त्यांनी पूर्व घाटाला ‘महेंद्र पर्वत’ अथवा महेंद्रगिरी म्हटल्याचे दिसून येते. याच्या विस्ताराविषयी मतभेद आढळतात. काही ग्रंथांतील वर्णनांनुसार याचा विस्तार ओरिसा राज्यातील गंजाम जिल्ह्यापासून दक्षिणेस मदुराई (तमिळनाडू राज्य) जिल्ह्यापर्यंत असावा, असे काही तज्ञांचे मत आहे.

  • मैकल
  • मैकल : भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक पर्वतश्रेणी. ‘मेकल’ या नावानेही ही पर्वतश्रेणी ओळखली जाते. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे २१° ११′उ. ते. २२° ४०′ उ. व ८०° ४६′ पू. ते ८१° ४६′ पू. यांदरम्यान. साधारण उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेली मैकल पर्वतरांग म्हणजे विंध्य व सातपुडा ह्यांना जोडणारा दुवा आहे.

  • लुशाई टेकड्या
  • लुशाई टेकड्या : ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत.

  • विंध्य पर्वत
  • भारताच्या मध्य भागातील, सामान्यपणे पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेली एक पर्वतश्रेणी. देशाच्या साधारण मध्यातून गेलेल्या ह्या पर्वतश्रेणीमुळे उत्तरेकडील गंगा नदीचे खोरे दख्खनच्या पठारापासून अलग झाले आहे. म्हणजेच विंध्य पर्वताने भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पाडले आहेत.

  • सह्याद्रि
  • पश्र्चिम घाट, सह्य पर्वत. भारतीय व्दिपकल्पाच्या पश्चिम भागातील एक पर्वतश्रेणी.

  • सातपुडा
  • सातपुडा : भारतीय द्वीपकल्पावरील महाराष्ट्र–मध्य प्रदेश या राज्यांदरम्यानची एक पर्वतश्रेणी.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate