অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भारत - प्रसिध्द व्यक्ती

भारत - प्रसिध्द व्यक्ती

  • गणेशन् शिवाजी
  • तमिळ रंगभूमीवरील व चित्रपटसृष्टीतील एक श्रेष्ठ अभिनेते. मूळचे पूर्ण नाव विलुपुरम चिनय्या गणेशन्.

  • मोरारजी देसाई
  • भारताचे चौथे पंतप्रधान (२६ मार्च १९७७ पासून).

  • वैकुंठ लल्लुभाई मेहता
  • थोर गांधीवादी विचारवंत आणि भारतीय सहकारी चळवळीचे एक प्रवर्तक.

  • अंबालाल साराभाई
  • भारतातील एक प्रसिद्घ उद्योगपती आणि साराभाई उद्योग समूहाचे संस्थापक.

  • अब्दुल करीमखाँ
  • किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज ðकिराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ओळखण्यात येते.

  • अमिताभ बच्चन
  • हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेता. जन्म अलाहाबाद येथे. त्यांचे वडील _ हरिवंशराय बच्चन हे हिंदी साहित्यातील ख्यातनाम कवी होते.

  • अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर
  • गुजरातमधील समाजसुधारक, ‘ठक्करबाप्पा’ या नावानेही ते ओळखले जात. भावनगर येथे जन्म.

  • अल्लादियाखाँ
  • कोल्हापूर-दरबारचे सुप्रसिद्ध प्रभावशाली गायक.

  • अवकाशयात्री कल्पना चावला
  • भारतीय अवकाश भरारीच्या स्वप्नांना 'गरुडझेप' मिळवून देणारी नायिका म्हणजे कल्पना चावला.

  • अशोक मेहता
  • भारतातील एक समाजवादी क्रियाशील विचारवंत नेते. सौराष्ट्रातील भावनगर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

  • इन्शा
  • एक उर्दू कवी. त्याचे नाव सैयद इन्शाअल्ला खान. ‘इन्शा’ हे कविनाम. जन्म मुर्शिदाबाद (प. बंगाल) येथे. लखनौ येथील सुलेमान शिकोह या नबाबाच्या दरबारी तो आश्रयास होता.

  • इळंगो अडिगळ
  • एक तमिळ महाकवी. शिलप्पधिकारम् या आद्य तमिळ महाकाव्याचा कर्ता.इळंगो हा शेंगुट्टवन या चेर राजाचा कनिष्ठ बंधू.

  • ई. व्ही. रामस्वामी नायकर
  • द्राविड आंदोलनाचे प्रमुख नेते व तमिळ जनतेत पेरियार (थोर आत्मा) व थानथाई (पिता) म्हणून गौरविलेले समाजसुधारक.

  • ईश्वरचंद्र विद्यासागर
  • बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित, लेखक व उदारमतवादी सुधारक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमध्ये

  • उण्णायि वारियर
  • एक मलयाळम् कवी. त्यांच्या जीवनवृत्तांताविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. बहुसंख्य विद्वानांच्या मते त्यांचा जन्म त्रिशिवपेरूर गावाजवळ झाला

  • उमास्वाति
  • एक जैन आचार्य. जैन धर्मातील श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन्ही पंथ त्यांना आपले मानतात. श्वेतांबर पंथ त्यांना उमास्वाती या नावाने ओळखतो.

  • उमेशचंद्र बॅनर्जी
  • अखिल भारतीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. त्यांचा जन्म सधन घराण्यात सोनाई किड्डरपोर (कलकत्ता) येथे झाला.

  • उळ्ळूर एस्. परमेश्वर अय्यर
  • मलयाळम्‌मधील आधुनिक कवित्रयांपैकी एक. केरळवर्मांचे शिष्य म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तिरु-अनंतपुरम्‌जवळील उळ्ळूर येथे जन्म.

  • कनैयालाल माणेकलाल मुनशी
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक राजकीय पुढारी, कायदेपंडित, शिक्षणतज्ञ व साहित्यकार.

  • कमलादेवी चट्टोपाध्याय
  • सुप्रसिद्ध राजकीय व सामाजिक कार्यकर्त्या. मंगलोर येथे जन्म. त्या बाल विधवा होत्या. हरींद्रनाथ चट्टोपाध्याय यांच्याबरोबर त्यांनी पुनर्विवाह केला.

  • कस्तुरभाई लालभाई
  • भारतातील एक प्रसिद्ध दानशुर उद्योगपती.

  • काजी नज्‍रूल इस्लाम
  • क्रांतिवादी बंगाली कवी. त्यांचा जन्म चुरुलिया (जि. बरद्वान) या खेडेगावी गरीब कुटुंबात झाला.

  • कामाक्षी नटराजन
  • आधुनिक समाजसुधारक व पत्रकार. तमिळनाडूतील तंजावर येथे जन्म. कुंभकोणम्‌च्या सरकारी विद्यापीठातून अठराव्या वर्षी पदवीधर.

  • काळाच्या पुढे असणारा स्वच्छता दूत... दिवंगत डॉ.सुहास मापूसकर
  • अस्वच्छता हेच आजारांचे व रोगांचे मूळ कारण असून यावर मात करण्यासाठी केवळ शासनाने निधी देऊन किंवा विविध उपाययोजनांची घोषणा करुन उपयोग नाही तर त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करणे व त्यामध्ये लोकसहभागसुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.

  • काशीनाथ सीताराम वैद्य
  • ब्रिटिशांकित हिंदुस्थानच्या हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते व सनदशीर राजकारणी.

  • काशीप्रसाद जयस्वाल
  • प्रसिद्ध भारतीय प्राच्यविद्यापंडित व कायदेपटू. झालडा(मानभूम जिल्हा) येथे एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात जन्म.

  • कुमार पद्म शिवशंकर मेनन
  • भारतातील एक कार्यक्षम सनदी नोकर व मुत्सद्दी. त्यांचा जन्म पूर्वीच्या त्रावणकोर संस्थानातल्या कोट्टायम येथे सधन नायर कुटुंबात झाला.

  • केशवचंद्र सेन
  • ब्राह्मो समाजाचे प्रवर्तक आणि भारतातील प्रमुख बंगाली समाजसुधारक.

  • केशवदास
  • भक्तियुगातील एक प्रख्यात हिंदी कवी आणि रीतिकाव्याचा प्रवर्तक. त्याच्या जन्म - मृत्युतिथींबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत.

  • कोवलम माधव पणिक्कर
  • भारतातील एक राजकीय मुत्सद्दी व इतिहासाचे अभ्यासक.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate