অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक – वाळवंट व बेटे

जागतिक – वाळवंट व बेटे

  • अँबोइना
  • अँबोइना : इंडोनेशिया प्रजासत्ताकातील बेट व शहर. हल्लीचे नाव ‘आंबोन’. अक्षांश ३०२९' ते ३०४८' द. व रेखांश १२७०५४' ते १२८० २५' पू. हे मालूक् प्रांतात व द्वीपसमूहात, बांदा समुद्राच्या उत्तरेस आणि सेराम बेटाच्या दक्षिणेस ५१·५ किमी. लांब व १६ किमी. रुंद पसरले आहे.

  • अल्यूशन बेटे
  • अल्यूशन बेटे : उत्तर पॅसिफिकमधील बेरिंग समुद्राच्या दक्षिणेकडील बेटे. क्षेत्रफळ १७,६६६ चौ. किमी.; लोकसंख्या ६,०११ (१९६०). विस्तार ५२° ते ५५° उ. व १७२° पू. ते १६३° प. अलास्काच्या नैर्ऋत्य टोकापासून रशियाच्या कॅमचॅटका द्वीपकल्पापर्यंत सु. १,९०० किमी. पसरलेल्या या द्वीपसमूहाचे फॉक्स, आंद्रे आनॉफ, रॅट आणि निअर आयलँड्स असे चार विभाग असून ते अमेरिकेच्या अलास्का राज्यात मोडतात.

  • अ‍ॅडमिरॅल्टी बेटे
  • अ‍ॅडमिरॅल्टी बेटे : (१) पॅसिफिकमध्ये न्यू गिनीच्या उत्तरेस सु. ३२० किमी.वरील बिस्मार्क द्वीपसमूहातील लहानमोठ्या चाळीस ज्वालामुखी व प्रवाळ बेटांचा समुदाय. द. अक्षांश १० ते ३० व पू. रेखांश १४६० ते १४८०. क्षेत्रफळ २,०७२ चौ. किमी., लोकसंख्या २१,५८८ (१९६९).

  • अ‍ॅसेन्शन बेट
  • अ‍ॅसेन्शन बेट : दक्षिण अटलांटिकमधील सेंट हेलीना बेटाच्या वायव्येस १,१२७ किमी.वरील ब्रिटनचे बेट. अक्षांश ७०५६' द. आणि रेखांश १४०२२' प. क्षेत्रफळ ८८ चौ.किमी.; लोकसंख्या १,१२९ (१९७२). या ज्वालामुखीयुक्त बेटाची कमाल लांबी १५ किमी. व रुंदी ९ किमी. आहे.

  • आँटॅरिओ सरोवर
  • आँटॅरिओ सरोवर : उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. ८५ किमी. रुंद व ३१० किमी. लांबीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ १९,४७७ चौ.किमी. असून त्याशिवाय सरावराचे एकूण जलवाहनक्षेत्र ९०,१३० चौ.किमी. आहे.

  • आइल ऑफ मॅन
  • ब्रिटिश बेटांपैकी आयरिश समुद्रातील एक बेट, क्षेत्रफल ५७२ चौ. किमी. लोकसंख्या ६२,००० (१९८१).

  • आइसलँड
  • आइसलँड : (लीद्वेल्दिद ईस्लांत). उत्तर अटलांटिकमध्ये यूरोपच्या वायव्येस असलेले बेट व प्रजासत्ताक राष्ट्र. अक्षांश ६३०२४' ते ६६०३३' उ. उत्तरेकडील व दक्षिणेकडील बेटे धरून ६३०१९' उ. ते ६७०१०' उ. व रेखांश १३०३०' ते २४०३२' प. पूर्वपश्चिम लांबी सु. ४८० किमी., दक्षिणोत्तर रुंदी सु. ३०० किमी. क्षेत्रफळ १,०३,१०० चौ.किमी.

  • आटाकामा वाळवंट
  • आटाकामा वाळवंट : दक्षिण अमेरिकेच्या प. किनाऱ्यावरील मरुस्थल. अक्षांश ५० ते ३०० द. पेरू देशाच्या दक्षिण सरहद्दीपासून चिलीमधील कोप्यापो नदीपर्यंत हे सु. ९६० किमी. लांब व पश्चिमेस पॅसिफिक किनाऱ्यावरील पर्वतश्रेणीपासून पूर्वेस अँडीज पर्वताच्या डोमेको श्रेणीपर्यंत सु. ३३ ते ८० किमी. रुंद आहे.

  • आरूबेटे
  • आरूबेटे : इंडोनेशियाच्या मोल्यूकस प्रांतातील पूर्वेकडील द्वीपसमूह. हा पश्चिम न्यू गिनीच्या दक्षिणेस आहे. ६० १०' द. १३४०२०' पू.; क्षेत्रफळ ८,५५३ चौ. किमी.; लोकसंख्या २९,६०४ (१९६१). या द्वीपसमूहात तानाबेसार या ९३ किमी. रुंद व १३४ किमी. लांब बेटाशिवाय १०० लहान बेटांचा समावेश होतो.

  • कँटन व एंडरबरी बेटे
  • कँटन व एंडरबरी बेटे : दक्षिण पॅसिफिकमधील फीनिक्स द्वीपसमूहातील कंकणद्वीपे. परंपरेप्रमाणेच तीगिल्बर्ट आणि एलिस या द्वीपसमूहात येतात. कँटन हवाईच्या नैऋत्येस ३२० किमी., २० ४९’ द. व १७१० ४१’ प. येथे असूनते सु. १३ किमी.

  • कानेरी बेटे
  • कानेरी बेटे : अटलांटिक महासागरातील, अफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्यापासून ९६ किमी अंतरावरील, स्पेनच्या आधिपत्याखाली सु. १३ बेटे. २७० ३७' उ. ते २९० २४' उ. आणि १३० २५' प. ते १८० १०' प. क्षेत्रफळ ७,२७३ चौ. किमी.; लोकसंख्या ११,७०,२२४ (१९७०).

  • काराकुम
  • काराकुम : रशियामधील विस्तीर्ण वाळवंट. हे तुर्कमेन प्रजासत्ताकात आग्नेय-वायव्य पसरलेले असून, त्याच्या नावाचा अर्थ ‘काळे वाळवंट’ असा आहे.

  • कालाहारी
  • कालाहारी : दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध वाळवंट. २०० द. ते २८० द. आणि १९० पू. ते २४० पू. क्षेत्रफळ २, ५९, ००० चौ. किमी. बोट्‌स्वाना, नैऋत्य आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका संघराज्य या देशांमध्ये हे वाळवंट पसरले असून, त्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ९०० मी. आहे.

  • कूरील बेटे
  • कूरील बेटे : (जपानी चीशीमा रेट्टो). जपानचे होक्काइडो व सायबीरियाचे कॅमचॅटका यांदरम्यानचा द्वीपसमूह. ओखोट्स्क समुद्र व पॅसिफिक महासागर यांमधील सीमा. ४३०२०' उ. ते ५०० ६६' उ. आणि १४५०२४' पू. ते १५६० ३०' पू.; क्षेत्रफळ सु. १५,६०० चौ. किमी. लोकसंख्या सु., १५,००० (१९६४). या सु. १,२०८ किमी.

  • कूरील बेटे
  • कूरील बेटे : (जपानी चीशीमा रेट्टो). जपानचे होक्काइडो व सायबीरियाचे कॅमचॅटका यांदरम्यानचा द्वीपसमूह. ओखोट्स्क समुद्र व पॅसिफिक महासागर यांमधील सीमा. ४३०२०' उ. ते ५०० ६६' उ. आणि १४५०२४' पू. ते १५६० ३०' पू.; क्षेत्रफळ सु. १५,६०० चौ. किमी. लोकसंख्या सु., १५,००० (१९६४). या सु. १,२०८ किमी. लांबीच्या रांगेत ५६ बेटे व असंख्य निर्मनुष्य खडक असून दक्षिणेकडून उत्तरेकडे कूनाशीर, ईतरूप, ऊरुप्पू, सीमूशीर, केटॉय, मात्सूवा, शासुकोतान, ओन्येकोतान, पारामूशीर व शूम्सू ही प्रमूख बेटे आहेत.

  • केप व्हर्द बेटे
  • केप व्हर्द बेटे : अटलांटिक महासागरातील ५ जुलै १९७५ पर्यंत पोर्तुगालच्या आधिपत्याखालील बेटे. क्षेत्रफळ ४,०३३ चौ. किमी.; लोकसंख्या २,४४,८०० (१९७० अंदाज). १४० ४८′ उ. ते १७० १२′ उ. व २२० ५२′ प. ते २५० २२′ प. या दरम्यान अर्धचंद्राकृती पसरलेली ही बेटे सेनेगलमधील डाकारपासून सु. ६०० – ८७५ किमी. पश्चिमेस आहेत.

  • कॉर्सिका
  • कॉर्सिका: पश्चिम भूमध्य समुद्रातील फ्रान्सचे बेट. क्षेत्रफळ ८,७२२ चौ. किमी. लोकसंख्या २,१८,५०० (१९७२ अंदाज). हे बेट फ्रान्सपासून १६८ किमी. आग्नेयीस व इटलीपासून ८० किमी. पश्चिमेस असून बोनिफाचो ही ११ किमी. रुंद सामुद्रधुनी या बेटास दक्षिणेकडील इटलीच्या सार्डिनिया बेटापासून वेगळी करते.

  • कोकोस (कीलिंग) बेटे
  • कोकोस (कीलिंग) बेटे : ऑस्ट्रेलियाची हिंदी महासागरातील बेटे. १२० द व ९६० ५३’ पू.; क्षेत्रफळ १३ चौ. किमी. लोकसंख्या ६२५ (१९७१). ही डार्विनच्या पश्चिमेस ३,६८० किमी., पर्थच्या वायव्येस २,७५२ किमी., कोलंबोच्या आग्नेयीस २,२४० किमी. आणि जाकार्ताच्या नैर्ऋत्येस ९२८ किमी. आहेत.

  • क्रीट
  • भूमध्य समुद्रातील ग्रीसचे सर्वांत मोठे बेट व यूरोपातील प्राचीन समृद्ध संस्कृतीचे एक स्थळ. क्षेत्रफळ ८,३३१ चौ.किमी.

  • क्व्हार
  • एड्रिअॅटिक समुद्रातील यूगोस्लोव्हियाचे बेट. क्षेत्रफळ २९० चौ. किमी.; लोकसंख्या १२,१३२ (१९६१).

  • ख्रिसमस बेट
  • ख्रिसमस बेट : हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या ताब्यातील बेट. क्षेत्रफळ १३५ चौ. किमी. लोकसंख्या २,७४१ (१९७२ अंदाज). पैकी ७५ टक्के चिनी. लांबी सु. १८ किमी.; रुंदी ७ किमी. हे ९०० २५’ २२” द. १०५० ३९’ ५९” पू. यांच्या दरम्यान फ्रीमँटलच्या उत्तरेस २,६०८ किमी. जावाच्या दक्षिणेस ३५८ किमी. व सिंगापूरच्या दक्षिण – आग्नेयीस १,३०५ किमी. आहे.

  • गालॅपागस बेटे
  • गालॅपागस बेटे : दक्षिण अमेरिकेच्या एक्वादोर देशाची पॅसिफिक महासागरातील बेटे. क्षेत्रफळ ७,८४४ चौ. किमी.; लोकसंख्या ३,६०० (१९७० अंदाज). ही बेटे एक्वादोरच्या सु. ८००—१,१०० किमी. पश्चिमेस व पनामा कालव्याच्या १,६०० किमी. नैर्ऋत्येस असून पॅसिफिकच्या ६१,५७,००० चौ. किमी. क्षेत्रात पसरली आहेत.

  • गिल्बर्ट आणि एलिस बेटे
  • गिल्बर्ट आणि एलिस बेटे : ब्रिटिशांची पॅसिफिकमधील द्वीपवसाहत. पश्चिम पॅसिफिकमध्ये ही द्वीपे एकूण ५२ लक्ष चौ.किमी. प्रदेशात पसरलेली असली तरी त्यांचे प्रत्यक्ष भूक्षेत्र फक्त ९७१ चौ.किमी. आहे. एकूण लोकसंख्या १९६८ मध्ये ५५,१८५ होती. तारावा बेटावरील बैरिकी हे मुख्य ठाणे आहे.

  • ग्रीनलंड
  • ग्रीनलंडचे हवामान ध्रुवीय असून हवा बरीच अस्थिर असते. स्वच्छ सूर्यप्रकाशानंतर लगेच दाट धुके, बर्फगार वारे आणि हिमवर्षाव यांचा अनुभव पुष्कळदा येतो.

  • ग्वादलूप
  • ग्वादलूप : कॅरिबियनमधील लेसर अँटिलीसच्या लीवर्ड द्वीपसमूहापैकी बेटे व फ्रान्सचा सागरपार प्रांत. क्षेत्रफळ १,७०२ चौ. किमी.; लोकसंख्या ३,३७,९०० (१९७२). यांत १६० १५' उ. व ६१० ३५' प. वरील पूर्वेचे ग्रांद तेअर (५६६ चौ. किमी.) आणि पश्चिमेस बास तेअर (९४० चौ. किमी.) ही रिव्ह्येर साले या खाडीने विभागालेली जोडबेटे प्रमुख असून त्यांशिवाय २५ किमी. परिसरातील पेती तेअर, देझराद, मारीगालांत व लेसँत आणि सु. २००-२५० किमी.वरील बार्तेलमी व सँ मार्तेचा उत्तर भाग यांचाही ग्वादलूपमध्ये समावेश होतो.

  • ग्वॉदल कॅनल बेट
  • ग्वॉदल कॅनल बेट : ब्रिटिश सॉलोमन बेटांपैकी सर्वांत मोठे बेट. क्षेत्रफळ ५,६६८ चौ. किमी. लोकसंख्या २३,९२२ (१९७०). हे पश्चिम पॅसिफिक महासागरात न्यू गिनीच्या पूर्वेस ९७० किमी. वर, ९० १५' द. ते १०० द. व १५९० ३५' पू. ते १६०० पू. यांदरम्यान असून त्याची कमाल लांबी-रुंदी अनुक्रमे १४७ किमी., ५२ किमी. आहे.

  • ग्वॉम बेट
  • ग्वॉम बेट : पॅसिफिक महासागरातील मेअरीॲना द्वीपसमूहातील सर्वांत मोठे व दक्षिणेचे बेट. क्षेत्रफळ ५४१ चौ. किमी.; लोकसंख्या ८६,९२६ (१९७०). १३० २६' उ. व १४४० ४३' पू. हे बेट सु. ५० किमी. लांब व ६.५ ते १६ किमी. रुंद असून त्याच्या पश्चिमेस २,५४२ किमी. फिलिपीन्समधील मानिला व पूर्वेस ५,३४४ किमी. हवाईमधील होनोलूलू आहे.

  • ग्वॉम बेट
  • ग्वॉम बेट : पॅसिफिक महासागरातील मेअरीॲना द्वीपसमूहातील सर्वांत मोठे व दक्षिणेचे बेट. क्षेत्रफळ ५४१ चौ. किमी.; लोकसंख्या ८६,९२६ (१९७०). १३०२६' उ. व १४४० ४३' पू. हे बेट सु. ५० किमी. लांब व ६.५ ते १६ किमी. रुंद असून त्याच्या पश्चिमेस २,५४२ किमी. फिलिपीन्समधील मानिला व पूर्वेस ५,३४४ किमी. हवाईमधील होनोलूलू आहे.

  • चागोस
  • चागोस : हिंदी महासागरातील ब्रिटिशांचा द्वीपसमूह. मॉरिशसच्या ताब्यातील ही बेटे १९६५ मध्ये सेशेल बेटांकडे आल्यामुळे ती हिंदी महासागरातील ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी या नवीन वसाहतीचा एक भाग बनली आहेत.

  • चॅनेल बेटे
  • चॅनेल बेटे : इंग्लिश खाडीतील द्वीपसमूह. क्षेत्रफळ १९४ चौ. किमी.; लोकसंख्या १,२५,२४० (१९७०). ही बेटे फ्रान्सच्या वायव्य किनाऱ्यापासून १५ ते ५० किमी. आणि इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यापासून ८० ते १५० किमी. दूर असून रोशेदूव्र व शोझे ही फ्रेंच सत्तेखालील बेटे वगळता, जर्सी, गर्न्सी, ऑल्डरनी, सार्क ही बेटे व इतर अनेक लहानसहान बेटे, खडक वगैरे प्रदेश आकडेवारीसाठी युनायटेड किंगडममध्ये समाविष्ट असला, तरी त्यावर प्रत्यक्ष सत्ता ब्रिटिश राजाची (किंवा राणीची) असते.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate