অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धुळे जिल्हा

खानदेश उत्‍पत्‍ती

भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे.प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारत, सुदेशकुमार चरत्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता. महाभारताच्या भिष्म पर्वात विविध प्रदेशांचा गोमता, मंदका, खंडा, विदर्भा व रुपवाहिका असा उल्लेख आढळतो. त्यातील खंडा म्हणजेच खानदेश असा अर्थ पाश्चात्य इतिहासकारांनी लावलेला आहे, तर काही अभ्यासकांच्या मते खानदेशचे पुर्वीचे कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश असे होते. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात थाळनेरचा दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी बहाल केली होती व त्यावरुन खानदेश असे नाव पडले.

जिल्‍हयाची भौगोलिक माहिती


हल्लीच्या धुळे, नंदुररबार व जळगांव या तीन्ही जिल्ह्याचा प्रदेश मध्ययुगीन काळापासून खानदेश नावाने ओळखला जात असे व एकच जिल्हा म्हणून धुळे मुख्यालयापासून कारभार चालत असे. तथापि प्रशासनाच्या दृष्टीने 1906 मध्ये खानदेशचे पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन जिल्ह्यात विभाजन झाले.जळगांव जिल्हा पुर्व खानदेश म्हणून तर धुळे जिल्हा पश्चिम खानदेश या नावाने ओळखला जात असे. दिनांक 1.7.98 रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन होवून धुळे व नंदुरबार असे दोन जिल्हे अस्तित्वात आले. धुळे जिल्हा हा तापी नदीच्या वरच्या खो-यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला वसलेला आहे.धुळे जिल्ह्याचे भौगोलीक क्षेत्र 8063 चौ.कि.मी. असून राज्याचे एकुण क्षेत्रापैकी 2.6 टक्के क्षेत्र व्यापलेल्या धुळे जिल्ह्याचा राज्याच्या एकुण क्षेत्रफळाचा विचार करता 19 वा क्रमांक आहे.धुळे जिल्ह्यात राज्याच्या एकुण लोकसंख्येपैकी 1.76 टक्के म्हणजेच 1707947 लोक राहतात. राज्याचा दर चौ.कि.मी ला 314 लोकसंख़्येच्या घनतेच्या तुलनेत जिल्ह्याची दर चौ.कि.मी. ला लोकसंख्येची घनता 212 आहे.जिल्ह्यातील एकुण 681 गावे ( 3 ओसाड गावासंह) 4 तहसिलातील सामूहीक विकास गटात सामावलेली आहेत.जिल्ह्यात 1 महानगरपालिका व 2 नगरपालीका असून नागरीक क्षेत्रातील लोकसंख्या 445885 आहे.तर नागरी लोकसंख्या एकुण लोकसंख्येच्या 26.11 टक्के आहे.

धुळे जिल्ह्याच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षिणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिमेस नंदुरबार जिल्हा आहे.धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिकोणी आहे.जिल्ह्यात तापी, पांझरा,बुराई,अरुणावती,अनेर,बोरी,कान व आरु या महत्वाच्या नद्या आहेत. जिल्ह्यात एकुण 551 ग्रामपंचायती असून त्यांची सभासद संख्या 5262 इतकी आहे. जिल्ह्यातील एकुण 4 तहसिल प्रशासन व मुलकी सोईच्या दृष्टीने धुळे व शिरपुर या दोन उपविभागात विभागलेले आहे. धुळे उपविभागात धुळे व साक्री या तहसिलाचा तर शिरपुर उपविभागात शिंदखेडा व शिरपुर या तहसिलांचा समावेश आहे. जिल्हा मुख्यालय धुळे हे मुंबई-आग्रा व नागपूर-सुरत या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून राज्याच्या राजधानीपासून 343 कि.मी. आहे.

जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 592 मी.मी. आहे.जिल्ह्यातील जमीन ढोभळ मानाने हलकी, मध्यम प्रतीची व काळी कसदार या 3 प्रकारात मोडते एकुण जमिनीच्या 60 टक्के जमीन हलक्या प्रकाराची , 25 टक्के जमीन मध्यम प्रतीची व 15 टक्के जमीन काळी कसदार अशी जमीनीची ढोबळ प्रतवारी आहे.जिल्ह्यातील प्रमुख उद्योगापैकी कार्यरत असलेली 1 कापड गिरणी, 2 सुत गिरणी, 2 स्टार्च फॅक्टरी इत्यादि प्रकल्प तसेच शिरपुर येथे सोने शुध्दीकरणाच्या कारखाना आहे.जिल्ह्यात 4 कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत.जिल्ह्यातील दर हजार पुरुषामागे स्रीयांचे प्रमाण 944 असून ग्रामीण भागासाठी व नागरी भागासाठी हे प्रमाण अनुक्रमे 952 व 921 आहे. जिल्ह्यातील एकुण लोकसंख्येच्या 71.6 टक्के व्यक्ती साक्षर असून साक्षरतेचे प्रमाण ग्रामीण भागात 67.1 टक्के तर नागरी भागात 84.5 टक्के इतके आहे. तसेच पुरुष व स्रीयांचे साक्षरता प्रमाण अनुक्रमे 81.4 टक्के व 61.4 टक्के आहे.

धुळे जिल्ह्यातील एकुण 4 तालुक्यापैकी धुळे व शिंदखेडा हे 2 तालुके बिगर आदिवासी असून साक्री व व शिरपुर हे 2 तालुके अशतः आदिवासी आहेत.च्या जनगणनेनुसार जिल्ह्याच्या एकुण लोकसंख्येपैकी 6.39 टक्के अनुसुचित जातीची लोकसंख्या असून 25.97 टक्के अनुसुचित जमातीची लोकसंख्या आहे.

पुर्वी पश्चिम खानदेश या नावाने ओळखला जाणारा धुळे जिल्हा तापी नदीच्या वरच्या खोऱ्यात महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला पसरलेला आहे.

धुळे जिल्हा 20-38 ते 21-61 उत्तर अक्षांश व 73-50 ते 75-11 पुर्व रेखांश या दरम्यान पसरलेला आहे. धुळे जिल्हयाच्या पुर्वेस जळगांव जिल्हा दक्षीणेस नाशिक जिल्हा उत्तरेस मध्यप्रदेशातील नेमाड जिल्हा व पश्चिम्ोस नंदुरबार जिल्हा आहे. धुळे जिल्हा सर्वसाधारणपणे त्रिवेणी आहे जिल्हयाचे भौगोलिकदृष्टया उंचसखलपणा हवामान पर्जन्य जमीनीच्या प्रतिनुसार दोन विभाग पडतात. समुद्र सपाटीपासुन या जिल्हयाची उंची सुमारे 180 ते 215 मी. आहे.

धुळे जिल्हा राज्याच्या एकुण क्षेत्रापैकी 2.6% क्षेत्र व्यापलेले असुन क्षेत्रफळाचा क्रमवारीत जिल्हयाचे 19 व्या क्रमांकाचे स्थान आहे. धुळे जिल्हयात तापी, पांझरा, बुराई, अरुणावती, अनेर, बोरी, कान व आरु, या महत्वाच्या नद्या आहेत.

2001 जनगणनेनुसार जिल्हयाचे एकुण लोकसंख्या 17,08,000 एवढी असुन एकुण लोकसंख्येपैकी 12,62,000 लोकांचे ग्रामीण भागात तर 4,46,000 इतक्या लोकांचे शहरी भागात वास्तव्य आहे. धुळे जिल्हाचे विभाजन होवुन नंदुरबार हा नविन जिल्हा निर्माण झाला.

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : धुळे जिल्हा

अंतिम सुधारित : 4/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate