অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुणे जिल्हा

भौगोलिक स्थान, विस्तार व आकार

पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार 17 अंश54' ते 10 अंश 24' उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार 73 अंश 19' ते 75 अंश 10' पुर्व रेखावृत्तापर्यत आहे. पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 15.642 चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हयाच्या सीमेस उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, आग्नेयेस सोलापूर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा तसेच वायव्येला ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे 5.10 टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे: : "घाटमाथा", "मावळ" आणि "देश".


पुणे जिल्हा अतिशय ऊष्ण मोसमी वारे असलेल्या भूप्रदेशाचा भाग आहे आणि त्यामुळे तापमानात तसेच पर्जन्य मानातही बदल जाणवतो. पुण्याचा पश्चिम भाग हा थंड आहे तर पूर्व भाग ऊष्ण आणि कोरडा आहे.

पाऊस :

पर्जन्यवितरण पुणे जिल्हयाच्या भौगालिक रचनेनुसार पुणे जिल्हयात पर्जन्याचे वितरण समसमान नाही. जिल्हयाचा पश्चिम भाग जंगलांनी व्यापलेला असल्यामुळे या भागात पुर्वेकडील भागापेक्षा पर्जन्याचे प्रमाण जास्त आहे. येथील बराचसा पाऊस हा उन्हाळयात वाहणा-या नैऋत्य मान्सून वा-यांमुळे येतो व या महिन्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण सुमारे 87 टक्के असते. जुलै व ऑगस्ट या महिन्यात पर्जन्याची तीव्रता जास्त प्रमाणात असते. वेल्हा, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण जास्त असते. भोर, आंबेगाव, जुन्नर, खेड, हवेली व पुणे शहर या तालुक्यांमध्ये पर्जन्याचे प्रमाण मध्यम असते. शिरुर, दौंड, इंदापूर आणि बारामती हे तालुके कमी पर्जन्याचे, कोरडे व शुष्क भागात येतात.

तापमान :

एप्रिल व मे या महिन्यांमध्ये पुणे जिल्हयात सर्वात जास्त तापमान असते. जिल्हयाचा पश्चिम भाग उदा.जुन्नर, आंबेगाव,खेड, मावळ, मुळशी आणि वेल्हा या तालुक्यांमध्ये तापमान थंड असते. परंतु जिल्हयाचा पुर्व भाग उदा. शिरुर, दौंड, बारामती आणि इंदापूर हे तालुके कोरडे व जास्त तापमान असणारे आहेत. डिसेंबर व जानेवारी या महिन्यांमध्ये तापमान 11 अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाते

आर्द्रता

उन्हाळयामध्ये बाष्पीभवनाचे प्रमाण वाढल्यामुळे हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. या काळात आर्द्रतेच्या प्रमाणात विविधता आढळून येते. रात्रीच्या वेळी तापमान कमी असल्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे द्रवात रुपांतर होते आणि दिवसा तापमान जास्त असते.

नैसर्गिक आपत्ती

नैसर्गिक आपत्ती जगाच्या आर्थिक उलाढालींना धक्का बसवू शकतात. भूकंप, पूर, चक्री वादळ, दुष्काळ तसेच इतर हवामानसंबंधी आपत्तींमुळे अनेकांचे मानवी जीवन धोक्यात येते व करोडो रुपयांची मालमत्तेचे नुकसान होते. आपत्ती मानवी प्रयत्नांची व गुंतवणुकींचा नाश करते आणि पुनर्वसनाबाबत नवीन मागण्या समाजापुढे निर्माण करते. भूतकाळात भूकंपाचा व पूराचा पुणे जिल्हयावर परिणाम झाला आहे. जो भाग नैसर्गिक आपत्तींना संवेदनशील आहे अशा भागात ओद्यागिकरण केले जात नाही.

भूकंपग्रस्त क्षेत्र

पुणे जिल्हयातील टेकडयांच्या रचनेमुळे येथे भूकंप होत असतात. उदरवायू क्षेत्र पुणे जिल्हयात पसरलेले आहे आणि ती क्षेत्र कमी भूकंप प्रवण क्षेत्र आहेत. भोर तालुक्याचा दक्षिण पुर्व (वायव्य) भाग अणि वेल्हा हे तालुके जोखीम विभाग -4 मध्ये मोडतात. जिल्हयाचा उर्वरीत भाग जो मध्यम धोकादायक आहे तो विभाग -3 मध्ये मोडतो.

पूरग्रस्त भाग

पुणे जिल्हयातील जास्त तालुके पूर प्रवण क्षेत्रात येतात. भीमा नदी (ता. शिरुर, दौंड, इंदापूर, हवेली), मुळा नदी (पुणे शहर), मुठा नदी ( पुणे शहर व मुळशी) इंद्रायणी नदी ( ता. खेड, हवेली, मावळ), घोड नदी ( ता. आंबेगाव), मीना आणि पुष्पावती नदी (ता. जुन्नर ) निरा नदी ( ता. इंदापूर व पुरंदर), पवना नदी (ता. हवेली) या नद्यांना पुर येतो.

दरडग्रस्त भाग

पावसाळयाच्या काळात जोरदार पावसामुळे आंबेगाव, जुन्नर, व मुळशी सारख्या तालुक्यात भूमिस्खलन घडून येते

 

माहिती संकलक : अतुल पगार

स्त्रोत : http://pune.gov.in/puneCollectorate/PuneCity/mClimate.aspx

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate