অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र - प्रसिध्द व्यक्ती

महाराष्ट्र - प्रसिध्द व्यक्ती

  • महाराष्ट्राचे नाथ : संत एकनाथ
  • औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील नाथ षष्ठी सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची यात्रा. पंढरपूर यात्रेखालोखाल लाखोंच्या संख्येने भाविक येथे येतात.

  • ...अन् मुलांनी दिली बेल्जियमच्या राणीला अनोखी सलामी
  • राष्ट्रगीताचे एकही सूर ज्यांना ऐकू येऊ शकत नाहीत, यातील एक शब्दही ज्यांना उच्चारता येत नाही... अशा मूकबधीर (दिव्यांग) मुलांनी सादर केलेले राष्ट्रगीत बघताना अंगावर रोमांच उभे झाल्या शिवाय राहत नाही.

  • 1 नंबर
  • मग मंत्रालय पाहून काय वाटलं... मी असं विचारताच, एक बोलकी प्रतिक्रिया पटकन आली... १ नंबर....

  • अण्णाभाऊ साठे
  • कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक.

  • अनंत लक्ष्मण कान्हेरे
  • एक महाराष्ट्रीय क्रांतीकारक. बालपण आणि शिक्षण औरंगाबाद येथे.

  • आत्माराम रावजी भट
  • महाराष्ट्रातील कृतिशील विचारवंत. जन्म रत्नागिरीच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.

  • आद्य नाटककार विष्णूदास भावे
  • 5 नोव्हेंबर 1843 रोजी विष्णुदासांनी "सीता स्वयंवर" या पहिल्या मराठी नाटकाचा प्रयोग सांगलीत केला.

  • आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके
  • 17 फेब्रुवारी 1883 रोजी भारतमातेचे शूर पुत्र वासुदेव बळवंत फडके यांनी इहलोकाचा निरोप घेतला. आज त्यांचा स्मृतीदिन. त्यानिमित्त या थोर पुत्राला वाहिलेली ही सुमनांजली.

  • कमलाकांत वामन केळकर
  • भारतीय भूवैज्ञानिक, मराठी विश्वकोशाच्या विज्ञान व तंत्रविद्या कक्षेचे प्रभारी विभाग संपादक, शिक्षक व प्रशासक.

  • कवी शंकर बडे
  • शेती आणि शेतकऱ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्राच्या कवीचे कृषी संस्कृतीवरचे प्रेम बावणकशी होते. या कवीने विदर्भाच्या गावागावाला वऱ्हाडी भाषेतील कवितांवर डोलायला शिकवले.

  • कुसुमाग्रज
  • एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने काव्यलेखन.

  • केशवराव मारोतराव जेधे
  • महाराष्ट्रातील एक राजकीय पुढारी, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते. इतिहासप्रसिद्ध जेध्यांच्या घराण्यात पुणे येथे जन्म.

  • केशवसुत
  • आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी. पूर्ण नाव कृष्णाची केशव दामले. काव्यरत्नावली ह्या मासिकाचे संपादक नारायण नरसिंह फडणीस यांच्या सूचनेवरून ‘केशवसूत’ या टोपण-नावाचा स्वीकार केला.

  • गजानन त्र्यंबक माडखोलकर
  • माडखोलकर, गजानन त्र्यंबक : (२८ डिसेंबर १८९९–२७ नोव्हेंबर १९७६). विख्यात मराठी पत्रकार, कादंबरीकार आणि समीक्षक. जन्म व शिक्षण मुंबईत. गणित विषयात गती नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत; तथापि संस्कृत, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा होता.

  • गणेश दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे (दासगणू)
  • आधुनिक मराठी संतकवी. मूळ नाव गणेश दत्तात्रेय सहस्त्रबुद्धे.

  • गुरुनाथ प्रभाकर ओगले
  • भारतातील औद्योगिकीकरणास हातभार लावणारे प्रसिद्ध कारखानदार व ओगलेवाडी येथील 'ओगले ग्‍लास वर्क्स' चे एक संस्थापक.

  • गोवर्धन पारीख
  • महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ. पारीख कुटुंब मुळचे राजस्थानी. ते अनेक पिढ्या महाराष्ट्रात स्थायिक झाले.

  • जाणता राजा
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी येथे झाला.

  • डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी
  • १६ नोव्हेबर १८८६ ! नऊवारी साडी नेसलेली. नाकात नथीचा आकडा घातलेली. कृष शरीरबांध्याची व बोटीच्या तसेच जीवन सागरातील परावासाने थकलेली अशी मनस्वी स्त्री मुंबईच्या किना-यावर उतरली व तिच्या पदस्पर्शाने भारतातील स्त्रियांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.

  • डॉ. जयंत नारळीकर
  • डॉ. जयंत नारळीकर जयंत विष्णू नारळीकर डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला.

  • द. मा. मिरासदार
  • मिरासदार, द. मा. : (१४ एप्रिल १९२७ – ). मराठी कथाकार. संपूर्ण नाव दत्ताराम मारुती मिरासदार. जन्म अकलूजचा. शिक्षण अकलूज, पंढरपूर व पुणे येथे एम्‌.ए.पर्यंत. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर अध्यापनक्षेत्रात प्रवेश (१९५२). १९६१ पासून मराठीचे प्राध्यापक.

  • दादासाहेब फाळके
  • भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक. जन्म त्र्यंबकेश्वर (जि. नासिक) येथे. पूर्ण नाव धुंडिराज गोविंद फाळके. दादासाहेब या नावानेच ते प्रसिद्ध होते.

  • धोंडो केशव कर्वे
  • आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत.

  • नरहर विष्णू गाडगीळ
  • महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध राजकीय कार्यकर्ते, लेखक व प्रभावी वक्ते.

  • नाना पाटील
  • महाराष्ट्रातील एक देशभक्त. झुंझार नेते आणि क्रांतिसिंह म्हणून ते ओळखले जातात.

  • नाना फडणीस
  • याचे पूर्ण नाव बाळाजी जनार्दन भानू. उत्तर पेशवाईतील एक थोर मुत्सद्दी.

  • निळू फुले
  • मराठी नाट्य-चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय व ज्येष्ठ अभिनेते. मूळ नाव निळकंठ कृष्णाजी फुले. निळूभाऊ या नावाने सुपरिचित. त्यांचा जन्म पुणे येथे झाला.

  • पंडिता रमाबाई
  • स्त्रियांच्या-विशेषतः परित्यक्त्ता, पतिता व विधवांच्या-सर्वांगीण उद्धाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी.

  • पद्मश्री विठ्ठलराव विखे - पाटील
  • महाराष्ट्रतील सहकारी साखर कारखानदारीचे आद्य प्रवर्तक. अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता. श्रीरामपूर) या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात जन्म.

  • प्रतिभाताई पाटील
  • भारतीय प्रजासत्ताकाच्या बाराव्या आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate