অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र – नद्या व सरोवर

महाराष्ट्र – नद्या व सरोवर

  • आपला चंद्रपूर
  • आज चंद्रपूर हे नाव प्रचलीत असलेला हा जिल्हा प्राचीन काळी लोकापूर या नावाने ओळखला जात असे. याचेच नामांतर काही काळानंतर इंद्रपूर आणि त्यानंतर चंद्रपूर असे झाले.

  • इंद्रायणी
  • इंद्रायणी : पुणे जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहणारी भीमा नदीची एक उपनदी. लोणावळ्याच्या नैर्ऋत्येस सु. ५ किमी. वर सह्याद्रीतील कुरवंडे घाटाजवळ ही उगम पावते व ९३ किमी. पूर्व दिशेकडे वाहत जाऊन हवेली तालुक्यातील तुळापूर या गावानजीक भीमेस मिळते.

  • कृष्णा नदी
  • कृष्णा नदी : दक्षिण भारतातील गोदावरी आणि कावेरी यांदरम्यानची प्रमुख नदी. लांबी सु. १,२८० किमी.; जलवाहन क्षेत्र सु. २,५२,४०० चौ. किमी. कृष्णेचा उगम होतो.

  • गोदावरी नदी
  • गोदावरी नदी : दक्षिण भारतातील पवित्र आणि महत्त्वाची नदी. लांबी १,४९८ किमी. जलवाहन क्षेत्र गंगेच्या खालोखाल ३,२३,८०० चौ. किमी. हिचा उगम नासिक जिल्ह्यातील त्र्यंबक गावामागे सह्याद्रीतील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो.

  • घोडनदी
  • घोडनदी : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातून वाहणारी भीमेची आग्‍नेयवाहिनी उपनदी. आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावाजवळ हिचा उगम असून दौंडच्या वायव्येस पाच किमी. सांगवीनजिक ती भीमेस मिळते.

  • चंद्रभागा
  • चंद्रभागा : (१) कृष्णेची उपनदी भीमा हिला पंढरपुराजवळ चंद्रकोरीसारखे वळण आहे. त्यावरून तेथे तिला चंद्रभागा म्हणतात.

  • चौल
  • चौल : चेऊल. कुलाबा जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील एक ऐतिहासिक बंदर. लोकसंख्या ८,१५० (१९७१). शिलाहार राजांच्या राजधानीचे हे ठिकाण कुंडलिका नदीच्या मुखावर (रोहा खाडीवर), मुंबईच्या दक्षिणेस सु. ५६ किमी., अलिबाग—रेवदंडा मोटार रस्त्यावर आहे. टॉलेमी, ह्युएनत्संग, अरबी आणि रशियन प्रवासी इत्यादींच्या वृत्तांतात याचा वेगवेगळ्या नावांनी उल्लेख आहे.

  • तापी
  • तापी : ताप्ती. सातपुडा पर्वताच्या दक्षिणेची मोठी पश्चिमवाहिनी नदी. लांबी ७०२ किमी., जलवाहनक्षेत्र सु. ६५,३०० चौ. किमी. पैकी महाराष्ट्रात हिचा मार्ग २०८ किमी. व जलवाहन क्षेत्र ३१,३६० चौ. किमी. आहे.

  • दारणा
  • दारणा : गोदावरीची नासिक जिल्ह्यातील उपनदी. लांबी सु. ७७ किमी. ही इगतपुरीच्या आग्नेयीस १३ किमी. सह्याद्रीतील कुलांग किल्ले टेकडीच्या उत्तर उतारावर उगम पावून सामान्यतः ईशान्येकडे वाहत जाऊन नासिकच्या खाली सु. २४ किमी. वर गोदावरीस मिळते.

  • दुधना नदी
  • दुधना नदी : मराठवाड्यातून वाहणाऱ्या पूर्णेची प्रमुख उपनदी. लांबी सु. १७७ किमी. पैकी ९६ किमी. औरंगाबाद जिल्ह्यातून तर बाकीचा प्रवाह परभणी जिल्ह्यातून वाहतो. औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्दाबाद–म्हैसमाळ–सारोळा या अर्धवर्तुळाकार डोंगरागांमध्ये उगम पावून पूर्वेकडे परभणी जिल्ह्यात वाहत जाते आणि परभणी शहराच्या ईशान्येस सु. १५ किमी. वर पूर्णा नदीला मिळते.

  • नीरा नदी
  • नीरा नदी : कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते. भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते.

  • नीरा नदी
  • कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते. भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते.

  • नीरा नदी
  • नीरा नदी : कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगररांगांत उगम पावते. पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते. भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते.

  • पांझरा नदी
  • पांझरा नदी : धुळे जिल्ह्यातील तापीची उपनदी. लांबी सु. १६० किमी. हिचा उगम जिल्ह्यातील नैऋत्य कोपऱ्यात, सह्याद्रीतील गाळ्ण्याच्या डोंगरात व उजवीकडील गाळण्याच्या डोंगरात झाला असून, ती पिंपळनेरवरून डावीकडील धानोऱ्याचे डोंगर व उजवीकडील गाळण्याचा डोंगर यांमधून वाहते.

  • पूर्णा नदी
  • पूर्णा नदी : (१) तापी नदीची महत्वाची उपनदी. ‘पयोष्णी’ असेही तिचे जुने नाव आहे. नैऋत्य व पश्चिम दिशांनी वाहणाऱ्या या नदीचा प्रवाह अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यांतून जातो.

  • पैनगंगा
  • पैनगंगा : महाराष्ट्रातील वर्धा नदीची उपनदी. लांबी ६७६ किमी. सर्व उपनद्यांसह एकूण जलवाहनक्षेत्र २३,८९८ चौ. किमी. ही बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात, पश्चिम सरहद्दीलगत अजिंठा डोंगररांगेत उगम पावते.

  • प्रवरा
  • प्रवरा : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातून सामान्यतः पश्चिम-पूर्व दिशेने वाहणारी गोदावरीची उपनदी. लांबी २०० किमी. ही अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यात, सह्याद्रीच्या पूर्व उतारावर कुलांग व रतनगड या शिखरांदरम्यान उगम पावते.

  • बाणकोट
  • बाणकोट : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील दुय्यम प्रतीचे बंदर. हे सावित्री नदीमुखाशी आणि बाणकोट खाडीच्या किनाऱ्यावर मुंबईच्या आग्नेयीस सु. ११७ किमी.वर वसले आहे.

  • भीमा नदी
  • भीमा नदी : कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. लांबी सु. ८६७ किमी., जलवाहनक्षेत्र सु. ७०,६१३ चौ. किमी. 'भीमरथा', 'भीमरथी' ही तिची इतर नावे असून सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे तिचे पात्र चंद्रकोरीप्रमाणे दिसते. त्यामुळे तेथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते.

  • भोगावती
  • भोगावती : ही नदी म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील ⇨पंचगंगा नदीचा एक शीर्षप्रवाह होय. लांबी सु. ८२ किमी. सर्वसामान्यपणे दक्षिणोत्तर वाहणारी ही नदी सह्याद्रीच्या रांगेत, कोल्हापूर शहराच्या नैर्ऋत्येस सु. ४८ किमी.वर फोंडाघाटाच्या (फोंडा खिंडीच्या) दक्षिणेस उगम पावते.

  • भोज
  • भोज : (१) मध्य भारतातील एक प्राचीन जनपद. पुराणांतील उल्लेखांनुसार हे चंबळ व बनास या नद्यांच्या खोऱ्यात असून भिलवाडा हे शहर याच्या केंद्रस्थानी होते. हे जनपद विंध्य पर्वतरांगेत असल्याचा उल्लेख ब्रह्मांड व वायु या पुराणांत आढळतो.

  • मांजरा नदी
  • मांजरा नदी : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते.

  • माण नदी
  • माण नदी : महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो.

  • मिऱ्या बंदर
  • मिऱ्या बंदर : (भगवती बंदर). महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील बंदर. ते रत्नागिरीजवळ असून तेथील भगवती मंदिरावरून त्यास भगवती बंदर असे नाव देण्यात आले आहे. रत्नागिरीचा किल्ला असलेला, समुद्रात घुसलेला सु. ८० मी. उंचीचा भूभाग व त्याच्या उत्तरेचा सु. ४ किमी. अंतरावरील, तसाच समुद्रात घुसलेला सु. १४५ मी. उंचीचा मिऱ्या डोंगर यांच्या दरम्यानचा सागरी भाग मिऱ्या उपसागर (मिऱ्या बे) होय.

  • मुळा मुठा
  • मुळा मुठा : महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील सु. १२८ किमी. लांबीची भीमा नदीची उपनदी. जिल्ह्याच्या पश्चिम भागात उगम पावणाऱ्या मुळा आणि मुठा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाला पुणे शहरापासून मुळा-मुठा अथवा मुळा हे नाव प्रचलित आहे.

  • लोणार
  • लोणार : बुलढाणा जिल्ह्याच्या याच नावाच्या तालुक्यातील एक गाव व प्रसिद्ध सरोवर. लोकसंख्या ११,४८६ (१९८१). मेहेकरच्या दक्षिणेस २० किमी. अंतरावर असलेले लोणार हे विदर्भातील सर्वांत प्राचीन गावांपैकी एक आहे. कृतयुगात या गावाची स्थापना झाली, अशी दंतकथा आहे. त्याचे जुने नाव ‘विरजक्षेत्र’असे होते.

  • वर्धा नदी
  • वर्धा नदी : महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ प्रदेशातून वाहणारी एक मुख्य नदी. लांबी ४६४ किमी. मध्य प्रदेश राज्याच्या बेतूल जिल्ह्यात सातपुडा पर्वतातील मुलताई पठारावर ही नदी उगम पावते. मध्यप्रदेश राज्यातून वाहत येऊन महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर ती नागपूर-अमरावती, अमरावती-वर्धा, यवतमाळ-वर्धा, चंद्रपूर-यवतमाळ या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून साधारणपणे दक्षिणेस, पश्चिमेस नंतर पुन्हा दक्षिणेस व आग्‍नेयीस वाहत जाते.

  • वारणा नदी
  • वारणा नदी : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

  • वारणा नदी
  • सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

  • वेण्णा
  • वेण्णा : येण्णा. महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातून वायव्य- आग्नेय दिशेने वाहणारी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. हिचा उगम महाबळेश्वर पठारावर क्षेत्र महाबळेश्वर परिसरात असून तेथून उगम पावणाऱ्या पंचनद्यांपैकी ही एक आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate