आपल्या देशात अनेकांना दागदागिन्यांची मोठी हौस आहे. जगाच्या तुलनेत आपल्याकडे दागिने वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अगदी सोन्यातली गुंतवणूक महत्वपूर्ण समजली जाते. नव्या पिढीनुसार लोकांच्या गरजा, फॅशन सर्वच बाबीत बदल होताना दिसत आहे. विशेषतः महिलांना दागिन्यांची मोठी आवड असल्याचे निदर्शनास येते. आजकाल दागिन्यांच्या निर्मितीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून आपल्या देशही या यादीत अग्रणी आहे. सोने, हिरे, चांदी, मोती आदीच्या निर्यातीतही आपण मोठा वाटा उचलत आहोत. हा व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याने यात रोजगाराच्या अनेक नामी संधी सहज उपलब्ध होत आहेत. डायमंड कटिंगच्या आपल्याकडे सुविधा उपलब्ध आहेत. जयपूरचे ‘जेम्स कटिंग सेंटर’ हे नावाजलेले आहे. सुरात, दिल्ली, मुंबई अहमदाबाद या ठिकाणी मोठे एक्स्पोर्ट हाउस पाहायला मिळतात. थोडीशी कलेची जाण आणि नाविन्याची आवड असल्यास आणि त्या जोडीला दागिने डिझाईन करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास करिअरला नवा आकार मिळू शकतो. वाढती मागणी लक्षात घेता या क्षेत्रात करिअर करण्यास नवसंधी मिळतील. त्या अनुषंगाने करीअरनामा या लोकप्रिय सदरासाठी घेतलेला आढावा खास महान्यूज या सदरासाठी..

पात्रता

या क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच काही कोर्स पदवीनंतरही अभ्यासक्रम पूर्ण करता येतात. सहा महिन्यांचे कमी कालावधीचे प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध असतात.

उपलब्ध अभ्यासक्रम

डिप्लोमा इन ज्वेलरी टेक्निक अँड मॅनेजमेंट

डिप्लोमा इन ज्वेलरी मॅनेजमेंट

बी.ए. इन ज्वेलरी डिझाईन अँड मॅन्यूफॅक्चरिंग टेक्निक

काय काम करावे लागते..?

या क्षेत्रात काम करताना ज्वेलरी निर्मिती, रंग, धातूची ओळख, दागिन्यांच्या नवनवीन प्रकारांची डिझाईन, डायमंड कटिंग, दागिन्यांची विक्री, विपणन, संशोधन आदी कामे करावे लागतात.

कामाच्या संधी

हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर खाजगी हाऊसेस, ज्वेलरी डिझाईनिंग आणि कटिंग फर्म्समध्येही काम मिळू शकते. तसेच स्वत:चा व्यवसायही करता येतो. तसेच अनुभवानंतर ज्वेलरी शॉपही खोलू शकता. सुरुवातीला १५ ते २० हजार रुपये वेतन मिळू शकते.

प्रशिक्षण संस्था

• इंडियन इन्स्टीट्युट ऑफ जेमोलॉजि, दिल्ली

• आर्च जेमोलॉजि अँड ज्वेलरी इन्स्टीट्युट, जयपूर

• इंडियन डायमंड इन्स्टीट्युट- सरदार वल्लभभाई पटेल सेंटर ऑफ ज्वेलरी डिझाईन अँड मॅन्यूफॅक्चर, सुरत

• जीआयए, इंडिया लेबॉरेटरी प्रायव्हेट लिमिटेड, दहावा मजला, ट्रेड सेंटर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५१.

• आयआयजीजे बागमल लक्ष्मीचंद पारिख कॅम्पस, प्लॉट क्र. १११/२, १३वा मार्ग, एमआयडीसी अंधेरी- पूर्व, मुंबई- ४०००९३.

लेखक: सचिन के. पाटील.

माहिती स्रोत: महान्युज