অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नृत्य क्षेत्रातील करिअर

नृत्य क्षेत्रातील करिअर

नृत्य कलेचा भारतीय संस्कृतीशी अनन्यसाधारण संबंध आहे. अनादी काळापासून नृत्याची महान परंपरा आपल्याला लाभली आहे. चौसष्ठ कलापैकी ही एक कला असून त्याचा भावभावनेशी जवळचा संबंध आहे. आजकाल रिअॅलिटी शोच्या माध्यमातून नृत्य प्रकार अगदी घराघरात पोहचले आहेत. नृत्याचा समृद्ध वारसा नटराज यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे. पूर्णवेळ करिअरच्या दृष्टीने आता हा पर्याय उपलब्ध झाला असून या क्षेत्रात स्टेजवरील सादरीकरणाला महत्व आहे. कठोर परिश्रम, मेहनत, साधना याच्या जोरावर तुम्ही नावलौकिक मिळवू शकता. तरुण पिढी आता या क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात वळते आहे. चला तर मित्रहो जाणून घेवूया या क्षेत्रातील करिअरच्या संधी खास करिअरनामा या लोकप्रिय सदरासाठी..

पात्रता

नृत्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी किमान बारावी पास असणे अनिवार्य आहे. तसे पाहता या क्षेत्राशी शिक्षणाचा संबंध कमी प्रमाणात येतो. हे क्षेत्र कौशल्यावर आधारित आहे. रिदमची समज, नृत्यातील सादरीकरणाचे टप्पे या गोष्टींना फार महत्व असते. आता यात पदवी आणि पदविकाही घेता येते. पीएचडीही संपादन करता येते.

नृत्याचे प्रकार

भारतीय नृत्य प्रकार

• कथक

• ओडिसी

• भरतनाट्यम

• कुचीपुडी

• मणिपुरी

• कथकली

पाश्चिमात्य नृत्य प्रकार

• बेले नृत्य

• जाज

• हिप- हॉप

• कॉन्ट्रा नृत्य

• आधुनिक नृत्य

• लैटीन नृत्य

• सालसा लाईन नृत्य

• बॉलरूम डान्स

कोर्स

नृत्याचे दोन प्रकार पडतात शास्त्रीय अथवा क्लासिकल दुसरा लोकनृत्य अथवा फॉकडान्स. या अभ्यासक्रमात सामान्य ज्ञानाबरोबर नृत्याच्या इतिहासाबद्दल शिकविले जाते. काही प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. पदव्युत्तर पदवी घेण्याच्या संधी अनेक विद्यापीठात आहेत. नृत्य शिकविण्याबरोबर त्यातील बारकावे, धून ऐकून स्टेप शिकणे आदी बाबी त्यात समाविष्ट असतात. प्रात्यक्षिकाला फार महत्व राहते.

संधी

हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कला केंद्र, विविध टी.व्ही चॅनेल, वेगवेगळ्या नृत्यसमूहात काम करू शकता. अनेक नृत्य महोत्सव जगभरात भरत असतात त्यातही सहभागी होता येते. मालिका, अल्बम, चित्रपट नृत्यदिग्दर्शक, नृत्योपचार तज्ञ म्हणूनही काम मिळेल. नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अध्यापनही करता येते. परदेशात भारतीय नृत्य शिक्षकांना चांगली मागणी आहे. ज्यांचा स्वभाव उद्योगी आहे ते स्वत:ची नृत्य संस्था काढू शकतात. आजकाल रिअॅलिटी शो साठी नृत्य प्रशिक्षक हवे असतात. आता छोट्या शहरातही कामाच्या संधी उपलब्ध आहेत.

प्रशिक्षण संस्था

• नालंदा डान्स रिसर्च सेंटर, मुंबई

• ललित कला केंद्र, पुणे

• भारती विद्यापीठ, पुणे

• खरागढ विद्यापीठ, छत्तीसगढ

• अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई

• प्रयाग संगीत समिती, अलाहाबाद

• प्राचीन कला केंद्र, चंदिगढ.

• भातखंडे महाविद्यालय, मध्य प्रदेश.

• टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे

• एसएनडीटी, मुंबई

• कथक केंद्र, दिल्ली

• कलाक्षेत्र, चेन्नई

लेखक: सचिन के. पाटील, संपर्क: ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate