অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पत्रकारितेतील करिअरच्या नव्या संधी

पत्रकारितेतील करिअरच्या नव्या संधी

माहिती आणि तंत्रज्ञान गतिमान होत असताना अनेक क्षेत्रांना त्यांनी व्यापून टाकले आहे. बदलत्या युगात प्रत्येक क्षेत्राने कात टाकत नवे रुप धारण केले आहे. पत्रकारिता हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. सतत बदल स्वीकारत, आव्हाने पार करत पुढे जाणारे हे क्षेत्र आहे. पूर्वीपेक्षा आजची पत्रकारिता गतिमान झाली असून त्यात नवीन बदल झालेले दिसतात. तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता कौशल्य संपादन केलेल्या मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. गेल्या दहा वर्षात इलेक्ट्रॉनिक माध्यमे मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याकडे अनेक तरुण आकर्षित झाले आहेत. वेगवेगळ्या भाषेतील वृत्तपत्रे, मासिके, प्रकाशन संस्था, रेडीओ, वेब पोर्टल, युट्यूब चॅनेल आदीतील वाढती मागणी लक्षात घेता पत्रकारितेतील करिअर हा उत्तम मार्ग होऊ शकतो.

काय होऊ शकता?

पत्रकारितेतील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वृत्तपत्राचे संपादक, उपसंपादक, सहसंपादक, वार्ताहर, आवृत्ती प्रमुख, व्यवस्थापक, मुक्त पत्रकार, जाहिरात अधिकारी, प्रकाशन अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, माहिती अधिकारी, वृत्तवाहिनी वार्ताहर, वाहिनी अँकर, टी.व्ही.निवेदक, नभोवाणी निवेदक, प्राध्यापक इत्यादी विविध पदावर काम करता येते.

पात्रता

पत्रकारितेत पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच पदव्युत्तर पदवीसाठी कुठल्याही विषयातील पदवीधर असणे गरजेचे आहे.

संस्था

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन ही संस्था भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते. तिथे इंग्लिश, हिंदी, रेडीओ अ‍ॅण्ड टेलीव्हिजन जर्नालीझम, अॅडव्हर्टांयझिंग अ‍ॅण्ड पब्लिक रिलेशन या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

संपर्क: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, जेएनयू न्यू कॅम्पस, अरुणा असफली रोड नवी दिल्ली-११००६७

संकेतस्थळ- http://www.iimc.nic.in

इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन ग्वालियर

क्रीडा व पत्रकारिता या दोन्ही विषयांत आवड असलेल्यांना ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्टस् जर्नालिझम हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. हा अभ्यासक्रम कोणत्याही शाखेतील पदवीधराला करता येतो. केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाअंतर्गत कार्यरत इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेने हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष. पत्ता- रजिस्ट्रार, लक्ष्मीबाई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन, शक्ती नगर, रेस कोर्स रोड, ग्वालियर- ४७४००२.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिट्यूट मुंबई

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस जर्नालिझम हा अभ्यासक्रम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिट्यूटने सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. निवड- मुलाखतीद्वारे. पत्ता- अ‍ॅडमिशन इनचार्ज (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस जर्नालिझम), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज इन्स्टिट्यूट लिमिटेड, १८ वा मजला, पी.जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई- ४००००१

स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अँड कम्युनिकेशन अंधेरी मुंबई

स्कूल ऑफ ब्रॉडकास्टिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन या संस्थेने पुढील अल्प कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत –

• सर्टिफिकेट कोर्स ऑन व्हाइसिंग अँड रेडियो जॉकिइंग

• सर्टिफिकेट कोर्स ऑन टीव्ही अँकरिंग

• सर्टिफिकेट कोर्स ऑन स्क्रिप्ट रायटिंग

• सर्टिफिकेट कोर्स ऑन डॉक्युमेंटरी अ‍ॅण्ड शार्ट फिल्म मेकिंग, अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. पत्ता- गिल्बर्ट हिल रोड, भवन्स कॉलेजजवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई- ४०००५८.

संकेतस्थळ- www.sbc.ac.in

गुरुनानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स मुंबई

बॅचलर ऑफ मास मीडिया. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. पत्ता- गुरुनानक खालसा कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स, माटुंगा मुंबई- ४०००१९

संकेतस्थळ - www.gnkhalsa.edu.in

घनश्यामदास सराफ कॉलेज ऑफ आर्टस् अ‍ॅण्ड कॉमर्स

या संस्थेने बॅचलर ऑफ मास मीडिया हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण.

पत्ता- स्वामी विवेकानंद रोड, मालाड (पश्चिम),

मुंबई- ४०००६४

संकेतस्थळ- www.sarafcollege.org

सेंट झेविअर महाविद्यालय मुंबई

या संस्थेत बॅचलर ऑफ मास स्टडीज हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहे.

संकेतस्थळ- http://xaviercomm.org

इंदिरा स्कूल ऑफ कम्युनिकेशन

• बॅचलर ऑफ आर्टस् इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन. कालावधी- तीन वर्षे. अर्हता- बारावी उत्तीर्ण.

• मास्टर ऑफ आर्टस् इन जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमामध्ये प्रिंट आणि ब्रॉडकास्ट जर्नालिझम, अ‍ॅडव्हर्टायजिंग आणि प्रिंट, पब्लिक रिलेशन्स, फिल्म आणि टीव्ही प्रॉडक्शन या विषयांमध्ये स्पेशलायझेशन करता येते. पत्ता- ८५/५- बी, समन्वय आयटी कॅम्पस, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, तथवाडे, पुणे-४११०३३.

संकेतस्थळ- http://indiraisc.edu.in

एमईईआर आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, कोथरूड, पुणे.

• एम.ए. इन मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम.

एमआयटी इंटरनॅशनल स्कूल ऑफ ब्रॉडकॉस्टिंग अ‍ॅण्ड जर्नालिझम, पुणे.

• पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन मास कम्युनिकेशन. प्रोग्रॅम इन मास कम्युनिकेशन.

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

• बॅचलर ऑफ जर्नालिझम

• मास्टर्स ऑफ जर्नालिझम

संकेतस्थळ- http://www.unishivaji.ac.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

• मास्टर्स ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन

संकेतस्थळ- http://unipune.ac.in

नागपूर विद्यापीठ

• बॅचलर ऑफ जर्नालिझम

• एम.ए. इन मास कम्युनिकेशन

संकेतस्थळ- http://nagpuruniversity.org/mindex.htm

कॉलेज ऑफ जर्नालिझम अ‍ॅण्ड मास कम्युनिकेशन, औरंगाबाद.

• बी.ए. इन मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम

• बी.ए. इन इंटरनॅशनल जर्नालिझम

• एम.ए. इन मास्टर ऑफ इंटरनॅशनल जर्नालिझम

• डिप्लोमा इन टीव्ही जर्नालिझम

संकलन- सचिन पाटील

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate