অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पशुवैद्यक क्षेत्रातील करिअरच्या नवसंधी

पशुवैद्यक क्षेत्रातील करिअरच्या नवसंधी

भारत हा कृषिप्रधान देश आहे. जगातील सर्वात जास्त पशुधन आपल्याकडे उपलब्ध असल्याचे पहावयास मिळते. अनेक विज्ञान शाखा विस्तारत असताना विद्यार्थ्यांचा ओढा अनेकवेळा तंत्रज्ञानावर आधारित शाखांकडे जास्त असल्याचे  दिसून येते. तसेच अनेक शाखा प्रचलित शाखा म्हणून समोर न आल्याने त्याकडे प्रवेश घेण्याचा कल दिसून येत नाही. अनेकदा पूर्वग्रहदूषित झाल्याने किंवा अपुऱ्या ज्ञानामुळे चांगल्या संधी हातातून निसटण्याची शक्यता असते. आजकाल पशुवैद्यकीय क्षेत्रही नव्याने संशोधनात अग्रेसर ठरत आहे. कृषी विकासाचा विचार करता येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात सुसंधी उपलब्ध होतील. पशुधनात आणि दुध उत्पादनात जगात आपण सर्वोत्तम ठरलो आहोत. मित्रहो पशुवैद्यकीय क्षेत्र (Veterinary Science) मधील करिअरच्या संधी निश्चित फायद्याच्या ठरतील. या संदर्भात घेतलेला आढावा खास करिअरनामासाठी.

कामाच्या संधी

पशुवैद्यक शास्त्रातील पदवीधरांना करिअरच्या उत्तम संधी मिळतात. राज्य सरकारच्या पशुवैद्यक दवाखान्यांमध्ये नोकरी मिळू शकते. खासगीरीत्याही व्यवसाय करता येऊ शकतो. पाळीव प्राण्यांच्या देखभाल-तंदुरुस्तीकडे लोक काटेकोरपणे लक्ष देतात. त्यामुळे चांगल्या पशुवैद्यकांना उत्तम करिअर करता येऊ शकते. पशुवैद्यकास राज्यसेवा परीक्षा आणि केंद्रीय नागरी सेवांद्वारे अनुक्रमे राज्य आणि केंद्र सरकारी प्रशासकीय नोकऱ्या मिळू शकतात. कृषी प्रकिया उद्योग, मोठे दुग्धप्रकिया उद्योग आदी क्षेत्रांतही संधी मिळू शकते. भारतीय सैन्यामध्ये त्यांच्या विविध प्रकारच्या अ‍ॅनिमल स्कॉड व अ‍ॅनिमल फार्मसची काळजी घेण्याकरीता दरवर्षी मुबलक संख्येमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्यांना मागणी असते. याखेरीज सरकारी क्षेत्रामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या पशुसंवर्धनविषयक धोरणांच्या अंमलबजावणीकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची मागणी असते.

थोडेसे अभ्यासक्रमाविषयी

राज्यात पाच वर्षांचा पशुवैद्यक (B.V.Sc. and A.H) अभ्यासक्रम कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डॉक्टर पदवी मिळते. यात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (M.V.Sc) हा दोन वर्षाचा अभ्यासक्रमही आहे. तसेच पीएच.डी. अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. बारावी विज्ञानशाखेत भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना यावर्षी नीट परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश दिला जाईल.

कोणत्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता?

• महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्सेस युनिव्हर्सिटी

संकेतस्थळ- www.mafsu.in

• बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज मुंबई (बिविसी)

संपर्क- फोन :०२२ – २४१५७०२०

• नागपूर व्हेटर्नरी कॉलेज, नागपूर (एनव्हीसी’)

संकेतस्थळ- http://www.nvcnagpur.net.in/

• क्रांतिसिंह नाना पाटील कॉलेज ऑफ व्हेटर्नरी सायन्सेस, शिरवळ (सातारा) (केएनपीसीव्हीएस)

संकेतस्थळ- http://www.knpvc.in/

• पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस, अकोला (पीजीआयव्हीएस)

संकेतस्थळ- http://www.pgivasakola.in/

• कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस, परभणी (सीओव्हीएएस)

• कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस, उदगीर (सीओव्हीएएस)

मित्रहो पशुवैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. केवळ जनावरांचा डॉक्टर या मानसिकतेतून बाहेर पडून विचार केल्यास या क्षेत्राकडे व्यापक अर्थाने पाहता येईल. या क्षेत्रात संशोधनास अधिक वाव आहे. स्वतः व्यावसायिकरित्या कार्यरत राहून अनेकजण उत्तमरित्या काम करत आहेत. अलीकडे महाराष्ट्र शासनाच्या पशुधन विकास अधिकारी या पदाच्या जागाही नियमितपणे भरल्या जातात. अन्न, औषध, इंडस्ट्रीतही कामाच्या संधी चांगल्या वेतनासहीत उपलब्ध आहेत. तसेच केंद्र सरकारच्या संशोधन संस्थामध्ये नवनवीन संधी निर्माण होत असतात. चला तर मग नव्या वाटा चोखाळण्यास तयार व्हा..

संकलन- सचिन के. पाटील, संपर्क- ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate