অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फायनान्शीयल एक्सपर्ट

फायनान्शीयल एक्सपर्ट

जागतिकीकरणामुळे आणि खुल्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल झाल्याचे आपण पाहतो. यामुळे जगासाठी भारत एक मजबूत बाजारपेठ बनली आहे. अनेक परदेशी समूहांनी देशात गुंतवणुकीला प्राधान्य दिल्याने येथील कॉर्पोरेट सेक्टरलाही नवी दिशा प्राप्त झाली आहे. या क्षेत्रात रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रात फायनान्शीयल एक्सपर्ट बनण्याची संधी तरुणाईला आहे. जागतिक मंदीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम होतो, पण पण हे क्षेत्र व्यापक असल्याने त्यास तेवढी झळ बसू शकत नाही. वित्त क्षेत्राचा आवाका मोठा असल्याने या विषयात तज्ञ असलेल्यांना कंपनी, विविध समूह यामध्ये नोकरी सहज मिळू शकते. यामध्ये बँकीग, इन्शुरन्स, मार्केटिंग, सार्वजनिक सेक्टर, खाजगी व स्वयंसेवी संस्था आदी क्षेत्रात यशस्वी करिअर करता येईल.

पात्रता

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र फायद्याचे ठरते. या क्षेत्रात प्रवेशासाठी पन्नास टक्के गुणासहित बारावी पास असणे गरजेचे आहे. इतर शाखेतील विद्यार्थीही या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकतात. काही संस्थात प्रवेश गुणानुक्रमे किंवा प्रवेश परीक्षा घेवून दिला जातो.

कार्य

फायनान्शीयल सेवेशी सबंधित असणाऱ्या या क्षेत्रात तज्ञाचे मुख्य कार्य म्हणजे संस्थेसाठी पैसे उभा करणे, गुंतवणुकीसाठी प्रयत्न करणे तसेच खर्चासंबंधी सल्ला देणे आणि समूहाला जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळवून देणे हे असते. तसेच कंपनीचे आर्थिक नियोजन करण्यातही तज्ञ सहकार्य करतात. संपूर्ण समूहाची वित्तीय आणि आर्थिक नीती ठरविण्यात यांचा मोठा वाटा असतो. तसेच क्रेडीट कार्ड ऑपरेशन्स या क्षेत्रातही यातील विशेष प्राविण्य असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते.

संधी

या क्षेत्रातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कॉर्पोरेट फायनान्स, इंटरनॅशनल फायनान्स, मर्चंट बँकिंग, कॅपीटल आणि मनी मार्केट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, स्टॉक ब्रोकिंग, शेअर, क्रेडीट रेटींग आदी क्षेत्रात नोकरी करता येते. शासकिय बँका, खाजगी आणि विदेशी बँकाही या तज्ञांना प्राधान्य देतात. फायनान्शीयल अॅनालीस्ट, प्लॅनर, वेल्थ मॅनेजमेंट प्रोफेशनल्स आदींची मागणीही वाढत आहे. तसेच गुंतवणूक फर्ममध्येही काम करता येईल. काही ठिकाणी परीक्षेच्या माध्यमातून नोकर भरती केली जाते.

कोर्स

या क्षेत्रात पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात खासकरून फायनान्शीयल अकौंटिंग आणि अर्थशास्त्र या विषयांवर भर दिला जातो. चार्टड अकाऊटंट, सीएस आणि एमबीए या क्षेत्रातील लोकही या विषयाला प्राधान्य देतात.

वेतन

या क्षेत्रात वेतनाच्या संधी उत्तम आहेत. २० ते २५ हजारांपासून सुरुवात होऊ शकते. अनुभवानंतर चांगले पॅकेज मिळू शकते. वेतन योग्यता, अनुभव, संस्थेची क्षमता यावरून ठरविले जाते.

प्रशिक्षण संस्था

• मुंबई विद्यापीठ, मुंबई

• जमनालाल बजाज व्यवस्थापकीय अध्ययन संस्था १६४, बॅकबे रेक्लेमेशन, एच.टी. पारेख मार्ग, डी.एन. घर, चर्चगेट, मुंबई

• अल्केश दिनेश मॉडरी फायनान्शियल आणि मॅनेजमेंट स्टडीज जोरावराव भवन, नवीन मुले वसतिगृह, टागोर लिंक रोड, विद्यानगरी, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई

• सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

• शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

• डीपार्टमेंट ऑफ फायनान्शियल स्टडीज दिल्ली विद्यापीठ, दिल्ली

• कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज दिल्ली विद्यापीठ, दिल्ली

• द इन्स्टीट्युट ऑफ चार्टड फायनान्शियल अॅनालीस्ट ऑफ इंडिया, हैद्राबाद, लखनौ, कोलकाता,चेन्नई,पुणेलेखक:

सचिन के. पाटील, संपर्क: ९५२७७७७७३२

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate