অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बेरोजगार तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

बेरोजगार तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण

भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अखत्यारितील गॅस ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनी ‘नवरत्न’ म्हणून ओळखली जाते. भारत सरकारच्या ‘कौशल भारत-कुशल भारत’ या योजनेअंतर्गत सामाजिक उत्तरदायित्व म्हणून या कंपनीच्या वतीने महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी औरंगाबाद येथे रोजगाराभिमुख प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण भारत सरकारच्या रसायने व खते मंत्रालयांतर्गत असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ प्लास्टिक इंजिनियरींग अॅण्ड टेक्नोलॉजी (सीपेट) या संस्थेमार्फत देण्यात येईल.

या संस्थेत ‘प्लास्टिक प्रोजेक्ट मॅन्युफॅक्चरींग’ हे सहा महिने कालावधीचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण/आयटीआय/पदविकाधारक असावा. उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 28 वर्षे पर्यंत असावे. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे तर इतर मागासवर्गीय उमेदवारासांठी 3 वर्षे इतकी वयोमर्यादा शिथील आहे.

या अभ्यासक्रमासाठी 39 जागा असून त्यापैकी अनुसुचित जाती - 6, अनुसुचित जमाती - 8, इतर मागासवर्गीय - 4 तर खुल्या प्रवर्गासाठी 21 जागा आहेत. राखीव जागांसाठी उमेदवार उपलब्ध नसल्यास या जागा खुल्या वर्गातून भरण्यात येतील.

या प्रशिक्षणासाठी उमेदवाराची निवड त्यांना 10वी/आयटीआय/पदविका या अभ्यासक्रमात मिळालेले गुण आणि मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल. अभ्यासक्रमाचा कालावधी 12 सप्टेंबर 2017 ते 12 मार्च 2018 असा आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2017 अशी आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या https://www.cipet.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा श्री.प्रवीन बी यांना 9325687905, श्री.नीलेश पी यांना 9325687910/0240-2478316/317 या क्रमांकावर संपर्क साधावा.

लेखक: देवेंद्र भुजबळ

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 2/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate