भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अखत्यारित ग्रामीण विकास आणि पंचायती राज्य राष्ट्रीय संस्था हैदराबाद येथे स्थापन करण्यात आली आहे. देशात ग्रामीण विकासासाठी समर्पित आणि सक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे हे संस्थेचे मुख्य ध्येय आहे. या दृष्टिने संस्थेत विविध अभ्यासक्रमांचे आयोजन करण्यात येते.

संस्थेने नुकतीच ग्रामीण विकास आणि व्यवस्थापन पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन रुरल डेव्हल्पमेंट ॲन्ड मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची घोषणा केली आहे. हा अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीसाठी आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी जानेवारी ते डिसेंबर 2018 असा राहील.

या अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हे केंद्रीय अनुदान आयोगाने मान्यता दिलेल्या विद्यापीठाचे पदवीधर असावेत. पदवी परिक्षेच्या अंतिम वर्षात असलेले विद्यार्थी देखील अर्ज करु शकतील.

या अभ्यासक्रमासाठी रविवार दिनांक 19 नोव्हेंबर 2017 रोजी बंगळुरु, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, दिमापूर, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कोलकाता, लखनऊ, नवी दिल्ली, पाटणा, पुणे आणि तिरुअनंतपुरम येथे प्रवेश परिक्षा घेण्यात येईल. या प्रवेश परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असुन ते 10 नोव्हेबर 2017 पर्यंत संस्थेत प्राप्त होणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.nird.org.in या संकेतस्थळास भेट द्यावी. संपर्कासाठी पत्ता - को-ऑर्डिनेटर (प्रशासन) पोस्ट ग्रॅजुएट स्टडिज और डीई/सीपीजीएस और डीई, ग्रामीण विकास आणि पंचायत राज राष्ट्रीय संस्था, राजेंद्र नगर, हैदराबाद-500030 दूरध्वनी क्रमांक 91-040-24008460/442, मो.नं.8499865285 यावर संपर्क साधावा. ई-मेल – pgdramadmission@gmail.com

लेखक - देवेंद्र भुजबळ,

संचालक (माहिती) औरंगाबाद

माहिती स्रोत : महान्यूज