অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेकअप अर्थात रंगभूषा... करियरचे नवे दालन...

मेकअप अर्थात रंगभूषा... करियरचे नवे दालन...

'नॅशनल फिल्म अॅवॉर्ड फॉर बेस्ट मेकअप' या पुरस्काराने जेव्हा विक्रम गायकवाड यांना नावाजले गेले. तेव्हा अनेकांची 'मेकअप इंडस्ट्रीकडे' बघण्याची दृष्टी बदलली. शहिद भगतसिंग ते डॉ. आंबेडकर या चित्रपटांतील कलाकारांना त्यांनी आपल्या रंगभुषेने या भुमिका साकारण्यासाठी सज्ज केले. त्यामुळेच या भुमिका प्रभावी आणि साजिंवत ठरल्या. यातूनच मेक-अप हे करियरचे नवे क्षेत्र ''मेकअप इंडस्‍ट्री'' म्हणून आपल्यापुढे खुले झाले आहे...

अनेक वर्षापूर्वी सौंदर्य प्रसाधन गृह फक्त महिलांसाठी आणि एका विशिष्ट वर्गासाठी हेती.  मात्र, आता मेक-अप इंडस्ट्रीज उदयास आली आहे. या क्षेत्राच्या कक्षा दिवसेंदिवस रूंदावत असून, बॉलीवूड पासून हॉलीवूड पर्यंत सगळ्यांवर याचा प्रभाव दिसतो.  ज्याप्रमाणे आता बदलत्या काळानुसार मध्यमवर्गीय कुटूंब प्रत्येक सण-सणावळांचा इव्हेंट बनवित आहेत. त्याचबरोबर समांतर मेक-अप मॅन आणि वुमनची मागणीही वाढत आहे. या क्षेत्राशी संबंधित काही शिक्षणक्रम पाहू -

हेअर फाउंडेशन कोर्स -  चार आठवड्याचा हा अर्धवेळ शिक्षणक्रम आहे. प्रमाणपत्र शिक्षणक्रम असून, पुण्यातील जावेद हबीब ॲण्ड ब्युटी अकॅडमी येथे हा शिक्षणक्रम उपलब्ध आहे. साधारण २५ हजार शिक्षणक्रम शुल्क आहे.

डिप्लोमा इन प्रोफेशनल मेक-अप- हा पुर्ण वेळ ४५ आठवड्यांचा पदवी शिक्षणक्रम आहे. मेकअप टुल्स, मेकअप अलाईंमेंट, अशा अनेक विषयांचा समावेश आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 10 + 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

डिप्लोमा इन स्टायलिंग ॲण्ड ग्रुमींग - ह एक वर्षाचा पूर्ण वेळ पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण एक ते दीड लाख या शिक्षणक्रमाचे शुल्क आहे.

डिप्लोमा इन कॉस्मेटीक्स ॲण्ड परफ्युमरी टेक्नॉलॉजी - हा दोन वर्षाचा पुर्ण वेळ शिक्षणक्रम असून, मुंबई विद्यापीठात तुम्ही प्रवेश घेऊ शकता.

सर्टीफीकेट इन बेसिक ब्‌युटिशीयन - हा तीन महिन्याचा पुर्ण वेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. किमान 5वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ब्लु डार्ट, इलेक्ट्रोलक्स, गोदरेज, एचसीएल, अशोक ले लॅण्ड एअरटेल आदीसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

प्रोफेशनल सर्टीफीकेट इन पर्सनल स्टायलींग ॲण्ड ग्रुमींग - हा 11 महिन्यांचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10+2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. डब्लु फॉर वुमन, विल्स लाईफस्टाईल, मनीष मल्होत्रा, युनायटेड कलर फॉर बेनेटॉन आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते. साधारण दीड लाख या शिक्षणक्रमाचे शुल्क आकारले जाते.

बॅचलर ऑफ कॉस्मेटीक टेक्नॉलॉजी - हा चार वर्षाचा पूर्ण वेळ शिक्षणक्रम आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे हा शिक्षणक्रम उपलब्ध आहे.

बी.एसस्सी. इन ब्युटी कॉस्मॅटीक - हा तीन वर्षाचा पूर्ण वेळ पदवी शिक्षणक्रम आहे. यास प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. एअरटेल, ॲमेझॉन, जेट एअरवेज, जस्ट डायल आदी नामांकित कंपन्यात काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिप्लोमा इन कॉस्मोटोलॉजी - हा 5 महिन्याचा पूर्ण वेळ पदविका शिक्षणक्रम आहे. एबीपी न्युज, बॉडी केअर, लॅकमे, रेवलॉन, जावेद हबीब, व्हीएलसीसी आदी नामांकित संस्थात काम करण्याची संधी प्राप्त होते.

कॉस्मोटोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी - हा 12 महिन्याचा शिक्षणक्रम आहे. पूर्ण वेळ शिक्षणक्रम असून, लॅकमे, रेवलॉन आदी संस्थात काम करण्याची संधी प्राप्त होते.

मास्टर ऑफ सायन्स इन कॅस्मोटॉलॉजी - हा दोन वर्षाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे.

डिप्लोमा इन ब्युटी कल्चर - हा चार महिन्याचा पूर्ण वेळ पदविका शिक्षणक्रम आहे. एबीपी न्युज, जावेद हबीब, व्हीएलसीसी आदी नामांकित संस्थात काम करण्याची संधी प्राप्त होते.

प्रोफेशनल सर्टीफीकेट इन फॅशन मिडीया मेकअप - एक वर्षाच पूर्ण वेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. 10 + 2  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्हीज्युअल स्टडीज, कॉस्मेटीक टेक्नीक्स, मेकअप स्टडीज आदी अभ्यासक्रमाचा समावेश असून, अरविंद ब्रँड, विनीत बहल, रिलायन्स ट्रेंड आदी नामांकित संस्थामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिप्लोमा इन मेकअप आर्टीस्ट - हा एक महिन्याचा पूर्ण वेळ पदविका शिक्षणक्रम आहे.

विद्यार्थ्यांसाठी भारतात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. व्हीएलसीसी इन्स्टीट्युट ऑफ ब्‌युटी हेल्थ ॲण्ड मॅनेजमेंट मुंबई, पर्ल अकॅडमी मुंबई, एलटीए स्कुल ऑफ ब्‌युटी मुंबई, क्रिश्चन वाल्मी इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ ब्युटी पुणे, व्हीएलसीसी इन्स्टीट्युट दिल्ली, अनुस इंटरनॅशनल ब्‌युटी स्कुल हैद्राबाद, आयएसएएस इंटरनॅशनल ब्‌युटी स्कुल पुणे, जावेद हबीब अॅकॅडमी दिल्ली अशा भारतभर अनेक सरकारी आणि खाजगी संस्था कार्यरत आहेत.

लेखिका - श्रद्धा मेश्राम

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत -'महान्यूज'

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate