मागील भागात आपण वाणिज्य शाखेतील शिक्षणक्रम पाहिले...वाणिज्य क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास पदवी नंतर विशेष शिक्षणक्रम पूर्ण केल्यानंतर चार्टड अकाऊंटंट, कंपनी सेक्रेटरी, अकांऊंटंट म्हणून काम करण्याची संधी मिळते किंवा तुम्ही स्वत: व्यावसायिक म्हणूनही काम करू शकता.

सी.ए.शॉर्ट टर्म - हा तीन महिन्याचा पूर्ण वेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे.

चार्टर्ड फायनान्शीयल ॲनालीस्ट - हा २६० तासांचा ऑनलाईन प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. विप्रो, ईजी ट्रिप, क्रिसील अशा नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

इंटीग्रेटेड प्रोफेशनल काँम्पिटंट कोर्स - हा एक महिन्याचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे.

असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टीफाईड अकाऊंटन्स - हा दोन वर्षाचा ऑनलाईन पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. बँक ऑफ अमेरिका, सिटी ग्रुप, रिलायन्स इंडस्ट्रीयल लिमीटेड, केपीएमजी अशा नामांकिंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

ऑडटींग - हा एक वर्षाचा पूर्ण वेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. ईटीईन सीए, ठाणे येथे तुम्ही हा शिक्षणक्रम पूर्ण करू शकता.

सर्टीफिकेशन इन चार्टड अकाऊंट्स - हा चार महिन्याचा पूर्ण वेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे.केपीएमजी, डीलॉईज अशा नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन चार्टरिंग - हा एक वर्षाचा ऑनलाईन पदव्युत्तर पदविका शिक्षणक्रम आहे.

असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टीफाईड अकाऊंटन्स - हा तीस महिन्याचा पूर्ण वेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. डिलॉईट, केपीएमजी, प्राईज वॉटर हाऊस कूपर्स आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

सर्टीफीकेट इन अकाऊंट ॲण्ड टॅक्सेशन वीथ जीएसटी - हा दोन महिन्याचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे.

ॲडव्हान्स डिप्लोमा इन टॅक्स मॅनेजमेंट - हा दहा महिन्याचा अर्धवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे. १२ हजार रूपए शिक्षणक्रम शुल्क असून, डायरेक्ट टॅक्सेशन, गुड ॲण्ड सर्व्हीस टॅक्स आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो. एल ॲण्ड टी इन्फोटेक, टाटा अशा नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

सर्टीफीकेट इन टॅक्स प्रॅक्टीस ॲण्ड प्रोसीजर - हा ७ महिन्याचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. डारेक्ट टॅक्स, जीएसटी, टॅली आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. या शिक्षणक्रमानंतर एडीडास, एशियन पेंट, गोदरेज, गुगल, आयबीएम आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

एम.कॉम इन अकाऊंट ॲण्ड टॅक्सेशन - हा दोन वर्षाचा पूणवेळ पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन टॅक्सेशन - हा एक वर्षाचा अर्धवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. फायनान्शियल अकाऊंटींग, इनडायरेक्ट टॅक्सेस, स्ट्रक्चर ॲण्ड प्रोसीजर, ऑडीटींग ॲण्ड स्ट्रक्चर ॲण्ड प्रोसीजर आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो.

चार्टर्ड फायनान्स मॅनेजर - हा दोन वर्ष पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. कॉस्ट ॲण्ड मॅनेजमेंट अकाऊंटन्सी, इंटरनॅशनल फायनान्स मॅनेजमेंट, फायनान्शीयल अकाऊंटन्सी, फायनान्शीयल इन्सटीट्युट आदी विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे. एअर सहारा, ॲम्बीट, बीपीएल, एचएसबीसी, बीपीएल मोबाईल आदी विषयांचा अभ्यासक्रमात समोवश आहे.

जीएसटी एक्झीक्युटीव्ह - हा ६० तासांचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. १० + २ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. गोदरेज, एचपी, एचएसबीसी, टीसीएस आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिप्लोमा इन इन्कम टॅक्स ॲण्ड सेल्स टॅक्स - हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे.

एम.कॉम. इन टॅक्सेशन - हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.

ॲडव्हान्स डिप्लोमा इन टॅक्स कन्सल्टनसी मॅनेजमेंट - हा एक वर्षाचा ऑनलाईन पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण १५ हजार शिक्षणक्रम शुल्क असून, १०+२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ऑडीटींग, अकांउंटींग, टॅक्सेशन, कॉस्ट अकाऊंटींग आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश आहे. इंडियन स्कुल ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट अंधेरी येथील शैक्षणिक संस्थेत हा शिक्षणक्रम पूर्ण करता येऊ शकेल.

कंपनी सेक्रेटरी - हा तीन वर्षाचा प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. दूरस्थ शिक्षणपद्धतीने पूर्ण करता येऊ शकेल. इन्स्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया, नवी मुंबई ही संस्था या शिक्षणक्रमातील विविध कालावधीचे अभ्यासक्रमांना प्रवेश देते. त्यामध्ये सी.एस. फाउंडेशन - हा चार महिन्याचा पूर्णवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे., सी.एस. इक्झिक्युटीव्ह आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

इन्स्टीट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया, नवी मुंबई, इंडीयन इन्स्टीट्युट ऑफ फायनान्स ॲण्ड अकाऊंट, पुणे, सिद्धार्थ अकॅडमी, ठाणे, झेल एज्युकेशन मरीन लाईन, फिनोव्हेटीव्ह सोल्युशन्स, बोरीवली आदीसह राज्यात अनेक शैक्षणिक संस्था आहेत, जेथे इच्छुक विद्यार्थी आपले शिक्षणक्रम पूर्ण करू शकतील.

लेखक - श्रद्धा मेश्राम नलावडे

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : 'महान्यूज'