वैद्यकीय क्षेत्रात करियर करावयाचे असल्यास आधुनिक चिकित्सा विज्ञान म्हणजेच एलोपेथी चिकित्सा पद्धतीचा विचार केला जातो. मात्र, या पद्धतीबरोबरच भारतातील प्राचीन चिकित्सा पद्धतीमधील आयुर्वेदिक, होमीयोपेथी, नेचरोपेथी या शाखाही विस्तारत आहेत. या अन्य वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्यासाठीच्या काही शिक्षणक्रमांची माहिती घेऊ -

बी.फार्म. इन आयुर्वेद

हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. दोन वर्षाचा पदविका (फार्मासी/ आयुर्वेद) शिक्षणक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण दोन लाख शिक्षणक्रम शुल्क आहे.

आयुर्वेदिक मेडिसीन ॲण्ड सर्जरी विषयातील पदवी

हा पूर्ण वेळ पाच वर्षे सहा महिन्यांचा शिक्षणक्रम आहे. साधारण २० लाख शिक्षणक्रम शुल्क आहे. फिजीक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी या विषयासह १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वय वर्षे १७ पूर्ण असणे आवश्यक आहे.

बॅचलर ऑफ अल्टरनेटीव्ह मेडीकल सिस्टम

हा दोन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम असून, दूरस्थ शिक्षणपद्धतीनेही तुम्ही हा शिक्षणक्रम पूर्ण करू शकता.

पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन योगा एज्युकेशन ॲण्ड नेचरोपेथी

हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. साधारण १८,००० शैक्षणिक शुल्क आहे. ५० टक्केसह पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

आयुर्विज्ञान प्रमाणपत्र शिक्षणक्रम

हा चार महिन्याचा अर्धवेळ प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे.

एम.एस.स्सी. इन योगा ॲण्ड नेचरोपेथी

हा दोन वर्षाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. दुरस्थ शिक्षणपद्धतीनेही तुम्ही हा शिक्षणक्रम पूर्ण करू शकता. साधारण ६० हजार शिक्षणक्रम शुल्क आहे. मेथड ऑफ योगा प्रॅक्टीस, फिटनेस ॲण्ड वेलनेस, प्रिन्सीपल ऑफ योगा ॲण्ड नचरोपेथी आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो.

नेचरोपेथी आणि योगीक विज्ञान शाखेतील पदवी

हा तीन वर्षाचा पदवी शिक्षणक्रम आहे. तुम्ही दुरस्थ पद्धतीनेही पूर्ण करू शकता. यास प्रवेश घेण्यासाठी १०+२ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

एमडी/ एमएस

हा तीन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. आयबीएम, मारूती सुझुकी, इंटेल, एचपी आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

डिप्लोमा इन पंचकर्म टेक्नीशियन

हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. १० वी नंतर तुम्ही या शिक्षणक्रमास प्रवेश् घेऊ शकता.

बॅचलर ऑफ होमीयोपेथी मेडिसीन ॲण्ड सर्जरी

हा ५ महिन्याचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. १२वी मध्ये ५० टक्के गुण असणे आवश्यक आहे. साधारण ८ लाख शिक्षणक्रम शुल्क आहे.

आयुर्वेद विषयातील पदविका

हा दोन वर्षाचा पूर्णवेळ शिक्षणक्रम असून, साधारण १७ हजार शैक्षणिक शुल्क आहे. यास प्रवेश घेण्यासाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नेचरोपेथी विषयात पदविका

हा एक वर्षाचा पूर्णवेळ पदविका शिक्षणक्रम आहे. १० + २ उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. साधारण ८ हजार रूपए शैक्षणिक शुल्क आहे.

एम.एस.स्सी. इन हर्बल कॉलीटी ॲण्ड रेगुलेटरी अफेर्स

हा दोन वर्षाचा पूर्णवेळ पदवी शिक्षणक्रम आहे. हर्बल मटेरियल सोर्सिंग, सर्टिफीकेशन ऑफ हर्बल रॉ मटेरियल, हर्बल रिसॉर्स कॉलीटी कंट्रोल ॲण्ड स्टॅटिस्टीक, रिसॉर्स मॅनेजमेंट आदी विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असतो. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

लेखिका : श्रद्धा मेश्राम नलावडे

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : महान्यूज