অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यवसाय, उद्योग क्षेत्रात व्यवस्थापन तज्ञ म्हणून काम करण्यासाठी एमबीए…

व्यवसाय, उद्योग क्षेत्रात व्यवस्थापन तज्ञ म्हणून काम करण्यासाठी एमबीए…

जागतिक व्यावसायिक बदलामुळे शैक्षणिक बदलही घडून आले आहेत. पारंपारिक शिक्षण आणि नोकरी यापलीकडे जाऊन नवीन उद्योगधंदे आणि व्यवसाय उदयास येत आहेत. या नव्याने उदयास येणा-या क्षेत्रात करीयर करावयाचे असल्यास त्या क्षेत्राशी संबंधीत विषयात पारंगत असणे काळाची गरज आहे. अशा अनेक विषयांपैकी एक म्हणजेच (एमबीए) व्यवसाय प्रशासन अभ्यासक्रम, आंतरराष्ट्रीय स्तरावर या शिक्षणक्रमाचा प्रभाव जास्त आहे. त्याचबरोबर भारतात मात्र समाजातील अभिजात वर्गाच्या ट्रेंडप्रमाणे संबंधित विषयात एमबीए केले जाते.

तरूण एम.बी.ए. करताना दिसत आहे. कोणत्याही शाखेतून पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्ही ए.बी.ए. (मास्टर इन बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन) करू शकता. ज्याप्रमाणे विविध क्षेत्रात उद्योगाच्या /व्यावसायाच्या संधी आहेत. त्याचप्रमाणे त्या त्या विषयातील एम.बी.ए.चे शिक्षणक्रमही विकसीत आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही एम.बी.ए. दूरशिक्षणाने म्हणजेच Distance MBA, ऑनलाईन किंवा पार्ट टाईम पद्धतीनेही एमबीए इन फायनान्स, एमबीए इन मार्केटींग, एमबीए इन ह्युमन रिसोर्सस, इन्फॉर्मेशन सिस्टम मॅनेजमेंट अशा विविध विषयांत पूर्ण करू शकता. तुमचे कौशल्य आणि अभ्यासक्रम यांची सांगड घालून तुम्ही हा शिक्षणक्रम पूर्ण केला. तर, भविष्यात या क्षेत्रात करियरच्या अनेक संधी प्राप्त होतात.

व्यवस्थापक विश्लेषक (मॅनेजमेंट ॲनालीस्ट), प्रशासकिय सेवा व्यवस्थापक (ॲडमिनीस्टरेटिव्ह सर्व्हीस मॅनेजर), मुख्य कार्यकारी अधिकारी (चीफ एक्झीक्युटीव्ह ऑफीसर) अशा जबाबदार पदांवर आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

एमबीए - हा दोन वर्षाचा शिक्षणक्रम असून, पदवीनंतर तुम्ही या शिक्षणक्रमास प्रवेश घेऊ शकता. मॅनेजरीयल इकोनॉमीक्स, बिझनेस कम्युनिकेशन, स्टॅटिस्टीक फॉर मॅनेजमेंट, फायनान्शीयल ॲण्ड मॅनेजमेंट अकाऊंटींग, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिसर्च मेथोडोलॉजी आदी विषयांचा समावेश अभ्यासक्रमात असतो. एअर टेल, जेट एअरवेज, जस्ट डायल, सोडेक्सो, फ्लिपकार्ट आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

एम.बी.ए + एम्पलॉयाबिलीटी ॲण्ड लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम - हा २ वर्षाचा पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम आहे. या शिक्षणक्रमास प्रवेश घेण्यासाठी पदवी ५० टक्केसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बेसिक ऑफ मार्केटिंग, फायनान्शीयल मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशनल बिहेवीअर, डिसीजन सायन्स, स्टॅटेजिक मॅनेजमेंट, अकाउंटींग फॉर बिझनेस डिसीजन आदी विषयांचा समावेश असतो. या शिक्षणक्रमानंतर युरेका फोर्ब्स, इन्टेल, स्टार्डंट चार्टड बँक, हिंदुस्थान युनीलिव्हर आदी नामांकिंत कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

मास्टर प्रोग्राम इन बिझनेस मॅनेजमेंट – हा दोन वर्षाचा प्रमाणपत्र शिक्षणक्रम असून, पदवी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. स्टॅटिस्टीक फॉर बिझनेस, ऑर्गनायझेशनल बिहेवीअर, प्रोफेशनल स्किल डेव्हलपमेंट आदी विषयांचा समावेश आहे.

बीबीए + एमबीए - हा ५ वर्षाचा शिक्षणक्रम असून, १२ वी इयत्तेत ५० टक्के असणे आवश्यक आहे. ओरॅकल, सोनाटा, इन्फोसिस, एचपी, एचसीएल, ओरॅकल आदी नामांकित कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

एक्झीक्युटीव्ह एमबीए - हा दोन वर्षाचा पार्ट टाईम कोर्स असून, यामध्येही स्पेशलायझेशनसाठी विषय असतात. तुम्ही फायनान्स, मार्केटींग, हयुमन रिसोर्सेस, ऑपरेशन मॅनेजमेंट, इन्फॉमेशन टेक्नॉलॉजी आदी विषयात तुम्ही स्पेशलाझेशन करू शकता. यास प्रवेश घेण्यासाठी पदवी सह दोन वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. प्रिन्सीपल ऑफ मॅनेजमेंट, कम्युनिकेशन स्कील, रिसर्च मेथोडॉलॉजी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलीटी, प्रेझेंटेशन स्किल आदी विषयांचा समावेश असतो. बर्गर पेंट, नॉर्थन ट्रस्ट, बिरला सनलाईफ, साऊथ इंडीयन बँक यासारख्या नामांकित कंपन्यामध्ये काम करण्याची संधी प्राप्त होते.

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस ॲडमिनीस्ट्रेशन - हा 6 महिन्याचा पदव्युत्तर पदवीका शिक्षणक्रम आहे.

एमबीए शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर सामाईक प्रवेश परिक्षा घेण्यात येतात त्यातील काही परिक्षा म्हणजेच कॉमन मॅनेजमेंट टेस्ट (CMAT) ही राष्ट्रीय स्तरावरची सामाईक प्रवेश परिक्षा असते. मॅनेजमेंट ॲपटीट्युट टेस्ट (MAT) ही सुद्धा राष्ट्रीय स्तरावरची मॅनेजमेंटच्या विषयांच्या प्रवेशासाठीची सामाईक परिक्षा असहेत.सिबॉसिस इंटरनॅशल ॲप्टीट्युट टेस्ट (SNAP) ही सिबॉसिस इंटरनॅशनल विद्यापीठाद्वारे आयोजीत केली जाणारी प्रवेश परिक्षा आहे. याचबरोबर एटीएमए ही इन्डीयन मॅनेजमेंट स्कुलद्वारा आयोजीत परिक्षा असते.

एमबीए करून करियर करू ईच्छीणा-या विदयार्थ्यांसाठी सर्टीफीकेट इन बिझनेस ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीज ची भारतात ५७५ महाविद्यालये आहेत. तर, याचबरोबर बिझनेस ॲण्ड मॅनेजमेंट स्टडीजचे मुंबईत २९८ महाविद्यालये आहेत. गुआहाटी, हैद्राबाद, लखनऊ आणि नागपूर येथे बिझनेस मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनीस्ट्रेशन हा शिक्षणक्रमास तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आयटीएम एक्झीक्युटीव्ह एज्युकेशन सेंटर, वाशी, चेन्नई आणि लखनऊ इथे एक्झीक्युटीव्ह एमबीए तुम्ही पुर्ण करू शकता.

भारतात अनेक खाजगी तसेच सरकारी संस्था भारतातील व्यवस्थापन अभ्यास प्रदान करीत आहेत. भारतातील क्रमवारीतील सर्वोत्तम सरकारी एमबीए महाविद्यालये म्हणजेच इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद (IIMA), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट बँगलोर (IIMB), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट कोलकता (IIMC), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट लखनऊ (IIML), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट इंदोर (IIMI), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट काझीकोड (IIMK), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट गुरगाव (MDI), फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज दिल्ली युनीव्हसिटी न्यु दिल्ली (FMS), जमनालाल बजाज इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई (JBIMS), इंडियन इन्स्टीट्युट ऑफ फॉरेन ट्रेड न्यु दिल्ली (IIFT) याचबरोबर अनेक सरकारी आणि खासगी संस्था कार्यरत आहेत.

लेखिका - श्रद्धा मेश्राम नलावडे

meshram.shraddha@gmail.com

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate