অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हेलिकॉप्टर पायलट

देशातील हेलिकॉप्टर सेवा देणारी पवन हंस ही आशिया खंडातील नामांकित संस्था आहे. भारत सरकारच्या नियंत्रणाखाली ही संस्था कार्य करते. मी १७२, बेल-४१२, डौफिन ३६५ एन/एन ३, एएलएच ध्रुव अशी हेलिकॉप्टर पवन हंसच्या ताफ्यात असलेली पाहायला मिळतात. जम्मू काश्मीर, वैष्णाेदेवी तसेच पूर्व भारतातील दुर्गम भागात या माध्यमातून सेवा पुरवली जाते. १९८५ साली स्थापन झालेल्या या संस्थेत काम करण्याची संधी आता तरुणांना उपलब्ध होते आहे. गतिशील आणि व्यावसायिक दृष्टीकोन असणाऱ्या तरुण उमेदवारांची कॅडेट पायलट कार्यक्रमासाठी निवड केली जाणार आहे. या उपक्रमाची सविस्तर माहिती खास करिअरनामा सदरासाठी.

पवन हंस कॅडेट पायलट कार्यक्रम

हेलिकॉप्टर पायलट म्हणून करिअर करु इच्छित असणाऱ्या तरुणांसाठी खास कार्यक्रम संस्थेने आखला आहे. यामध्ये उमेदवाराकडे तांत्रिक ज्ञान, कल तसेच विश्लेषणात्मक समस्या सोडविण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर यासाठी हेलिकॉप्टर पायलट लायसन (सी.एच.पी.एल.) प्राप्त करणे अनिवार्य आहे.

या कार्यक्रमाचे स्वरुप

कॅडेट पायलट हा १८ ते २० महिन्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या प्रशिक्षणात उड्डाणासंबंधीचा अभ्यासक्रम असेल. त्यात ३५० तास मैदानी व १५० तासांचे इतर बाबींचे प्रशिक्षण दिले जाईल, उमेदवारास विद्यार्थी पायलट लायसन्स परीक्षा तसेच फ्लाईट रेडीओ ऑपरेटरर्स लायसन्स परीक्षा द्यावी लागेल. तसेच या प्रशिक्षण कालावधीमध्ये अनेक व्याख्याने, तोंडी परीक्षा घेतल्या जातील. त्याचबरोबर इतर तांत्रिक बाबींचे प्रशिक्षणही दिले जाईल. हा खडतर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पार पाडल्यानंतर विशिष्ट प्रकारची हेलिकॉप्टर चालविण्यासाठी आपण पात्र व्हाल. तदनंतर ज्युनिअर पायलट इन पीएचएल म्हणून ५०० तासांचे प्रशिक्षण हे उमेदवारास दिले जाईल.

पदांची संख्या

१० (आरक्षण आणि वयातील सवलत शासन निर्देशानुसार)

वय

उमेदवार अर्ज करावयाच्या तारखेस सतरा वर्षांपेक्षा खालील नसावा तसेच तो २५ वर्षाच्या आतील असावा.

शैक्षणिक पात्रता

उमेदवार १०+२ विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषय घेऊन ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा. एस.सी आणि एस.टी उमेदवार ५५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असावा.

शारीरिक तपासणी

डीजीसीए कडून वैद्यकीय तपासणी पास होणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा

सर्व पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा देशातील परीक्षा केंद्रावर घेतली जाईल. या लेखी परीक्षेत तर्क क्षमता, अभियोग्यता आणि विषयाचे ज्ञान तपासणारे प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर इंग्रजीतील प्राविण्यही तपासले जाईल.

मानसोपचारिक चाचणी

लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची मानसोपचारिक चाचणी दिल्ली येथे घेण्यात येईल.

मुलाखत

अंतिम निवड झालेल्या उमेदवाराची मुलाखत दिल्ली येथे घेण्यात येईल

(सदर निवड प्रक्रियेतील गुण विभागणी अनुक्रमे लेखी ५०, मानसोपचारिक चाचणी ३०, मुलाखत २० टक्के अशी राहील.)

अधिक माहितीसाठी

www.pawanhans.co.in इथे भेट द्यावी.

ज्यांना आकाशाला गवसणी घालायचीय अशा तरुणांना हेलिकॉप्टर पायलट बनण्याची ही नामी संधी पवन हंस या अग्रणी संस्थेकडून उपलब्ध होत आहे. चला तर मग लागा तयारीला आपल्या स्वप्नांना नवे पंख देण्यासाठी...

लेखक - सचिन पाटील

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate