অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अर्थशास्त्र

अर्थशास्त्र

  • अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस
  • ३१ ऑक्टोबर १९२० रोजी स्थापन झालेली भारतीय सर्वांत जुनी मध्यवर्ती ⇨कामगार संघटना.

  • अधिदान
  • एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी वा आयात-निर्यातीसाठी शासनाने ठराविक प्रमाणात दिलेले आर्थिक साहाय्य.

  • अधिस्थगन
  • न्यायालय किंवा कायदा ह्यांच्या आधारे शासन जेव्हा देय किंवा कर्ज परत करणे लांबणीवर टाकते, तेव्हा त्या क्रियेस ‘अधिस्थगन’ म्हणतात.

  • अनिर्बंध अर्थव्यवस्था
  • शासनाने आर्थिक व्यवहारात कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू नये, कोणतेही निर्बंध अर्थव्यवस्थेवर लादू नयेत, हे अनिर्बंध अर्थव्यवस्थेच्या कल्पनेचे मुख्य सूत्र आहे.

  • अनुदाने
  • वरिष्ठ सरकारी शासनाने आपल्या उत्पन्नातून कनिष्ठ शासनाला दिलेली आर्थिक मदत.

  • अनुपस्थित मालकी
  • स्वतःच्या शेतजमिनीवर न राहता व जमिनीची मशागत न करता, शेतीच्या उत्पन्नातील वाटा मात्र जमिनीवरील मालकी हक्काने घेणाऱ्‍यांना ‘अनुपस्थित मालक’ असे संबोधतात.

  • अन्न व शेती संघटना
  • संयुक्त राष्ट्रांच्या कायमस्वरूपी प्रातिनिधिक संस्थांपैकी १६ ऑक्टोबर १९४५ मध्ये क्वेबेक (कॅनडा) येथे स्थापन झालेली पहिली संस्था.

  • अन्नविषयक धोरण (भारतीय)
  • कृषिप्रधान भारताला अन्नमस्येस गेली अनेक दशके तोंड द्यावे लागत आहे.

  • अर्थनीति
  • एखाद्या देशाचे शासन देशातील आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलणे किंवा त्या व्यवहारांचे नियमन करणे तसेच त्यांमागील उद्देशांचा पाठपुरावा करणे ह्

  • अर्थव्यवस्था
  • समाजाच्या अमर्यादित गरजा त्याच्या मर्यादित साधनांचा पर्याप्त उपयोग करून भागविण्याचे प्रयत्न करण्यासाठी अस्तित्वात आलेली किंवा आणलेली आणि उत्पादन, विभाजन व भविष्यकाळासाठी तरतूद करणारी आर्थिक घटकांची व्यवस्था.

  • अर्थशास्त्र
  • मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधनसंपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी, याचा विचार करणारे शास्त्र अर्थशास्त्र हे होय.

  • अर्थसंकल्प
  • आयव्ययाचे अंदाजपत्रक. विशिष्ट आर्थिक परिस्थितीने लादलेल्या आर्थिक मर्यादांनुसार जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्याची कला म्हणजे अर्थसंकल्प.

  • अवमूल्यन
  • एखाद्या चलनाची विदेशी चलनाच्या परिमाणात निर्धारित केलेली चालू किंमत कमी करणे.

  • आंतरराष्ट्रीय अर्थ-निगम
  • आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँकेची संलग्न संस्था.

  • आंतरराष्ट्रीय चलन निधी
  • आंतरराष्ट्रीय चलन-विनिमय-दरांत स्थैर्य आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेली संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संलग्न संस्था.

  • आंतरराष्ट्रीय देणीघेणी निर्धारण बँक
  • ह्या बँकेची स्थापना बाझेल (स्वित्झर्लंड) येथे १९३० मध्ये पुढील उद्दिष्टांसाठी करण्यात आली

  • आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास- बँक
  • दुसऱ्या महायुद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या देशांमध्ये पुनर्रचना करण्यासाठी व जगातील—विशेषत: अर्धविकसित—देशांचा व प्रदेशांचा विकास करण्यासाठी अर्थप्रबंध करणारी आंतरराष्ट्रीय बँक.

  • आंतरराष्ट्रीय मजूर संघटना
  • पॅरिस येथे १९१९ मध्ये व्हर्सायच्या तहाच्या वाटाघाटीतून स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय संघटना.

  • आंतरराष्ट्रीय विकास संस्था
  • आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँकेची संलग्न संस्था. ती १९६० पासून कार्यान्वित झाली.

  • आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना
  • जगातील देशांमधील वस्तूंचा व्यापार अधिक खुला होण्याच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या स्थापनेची कल्पना अमेरिकेने १९४६ मध्ये सुचविली.

  • आंतरराष्ट्रीय व्यापार-संतुलन
  • एका वर्षामध्ये देशातून निर्यात होणाऱ्या मालाचे मूल्य व देशात आयात होणाऱ्या मालाचे मूल्य यांमधील तोलाच्या परिस्थितीस ‘आंतरराष्ट्रीय व्यापार-संतुलन’ म्हणतात.

  • आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक संस्था व परिषदा
  • मानवी जीवनाची विविध क्षेत्रे अधिक समृद्ध व्हावीत आणि आधुनिक जगातील तांत्रिक विकासाचा लाभ भूतलावरील सर्व मानवजातीस व्हावा, या उद्देशाने अनेक संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थापन झाल्या आहेत.

  • आंतरराष्ट्रीय संबंध
  • दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत येणाऱ्या सलोख्याच्या, तटस्थतेच्या किंवा संघर्षाच्या संबंधाना व्यापक अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ असे म्हणतात.

  • आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण
  • राष्ट्राराष्ट्रांच्या हितात संघर्ष अटळ नाही, सर्व मानव बांधव होत व संगरापेक्षा सहकार्यानेच मानवी प्रगती साधेल, हे पटवून देऊन विश्वबंधुत्वाची भावना निर्माण करणारे शिक्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय सामंजस्याचे शिक्षण होय.

  • आफ्रिकी विकास बँक
  • आफ्रिकेच्या आर्थिक आयोगाने पुरस्कार केल्यावरून सप्टेंबर १९६४ मध्ये ही बँक स्थापन होऊन जुले १९६६ पासून तिचे कार्य सुरू झाले.

  • आर्थिक प्रोत्साहन
  • सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा.

  • आर्थिक विषमता
  • खाजगी मालमत्तेच्या मूलभूत हक्कावर आधारलेल्या भांडवलशाही राष्ट्रांमध्ये, व्यक्तिव्यक्तींमध्ये आणि कुटुंबा-कुटुंबांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी विषम प्रमाणात झालेली दिसून येते.

  • आर्थिक संघ
  • व्यापक अर्थाने दोन किंवा अधिक देशांच्या दरम्यान आर्थिक क्षेत्रात घडून आलेल्या कोणत्याही स्वरूपाच्या सहकार्याचा निर्देश करण्यासाठी ‘आर्थिक संघ’ ही संज्ञा वापरली जाते.

  • आर्थिक स्वयंपूर्णता
  • एखाद्या राष्ट्राने आपणास लागणाऱ्या वस्तू व सेवा ह्यांची निर्मिती स्वतःच करावयाची व त्यांसाठी इतर राष्ट्रांवर अवलंबून रहावयाचे नाही असे धोरण अनुसरले, तर त्यास आर्थिक स्वयंपूर्णतेचे धोरण म्हणता येईल.

  • इंटक (इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस-INTUC.)
  • भारतातील पहिल्या क्रमांकाची मध्यवर्ती कामगार संघटना.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate