खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावेजगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलिततया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावेजयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडतीतया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावेसमस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावाअनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावेसदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकलतया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावेकुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावेसमस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावेप्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारीकुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावेअसे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्यासदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावेभरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतातसदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावेअसे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचेपरार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावेजयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारात्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे कवी : साने गुरुजी