Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/08/17 23:02:35.358351 GMT+0530
शेअर करा

T3 2019/08/17 23:02:35.363404 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/08/17 23:02:35.394684 GMT+0530

कुरव

गल या पक्ष्याला महाराष्ट्रात कुरव म्हणतात. कुरवाच्या दोन जाती भारतात आढळतात. दोन्हीही भारतात कायम राहणाऱ्या नाहीत.

गल

गल या पक्ष्याला महाराष्ट्रात कुरव म्हणतात. कुरवाच्या दोन जाती भारतात आढळतात. दोन्हीही भारतात कायम राहणाऱ्या नाहीत. हिवाळी पाहुणे म्हणून हे पक्षी बाहेरून भारतात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येतात आणि मार्च-एप्रिलमध्ये परत जातात.

तपकिरी डोक्याचा कुरवतपकिरी डोक्याचा कुरव

लॅरिडी पक्षि-कुल

कुरवाचा समावेश लॅरिडी पक्षि-कुलात केलेला आहे. भारतात येणाऱ्या दोन जातींपैकी एका जातीचे डोके तपकिरी पांढरे असते; याला तपकिरी डोक्याचा कुरव म्हणतात; याचे शास्त्रीय नाव लॅरस ब्रुनिसेफॅलसआहे. दुसऱ्या जातीचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असते; याला काळ्या डोक्याचा कुरव म्हणतात; याचे शास्त्रीय नाव लॅरस रिडिबंडस  आहे. या दोन्ही जातींच्या कुरवांचे स्वभाव, सवयी वगैरे सारख्याच असल्यामुळे या ठिकाणी तपकिरी डोक्याच्या कुरवाचेच वर्णन दिले आहे.

तपकिरी डोक्याचा कुरव डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो. त्याच्या पाठीचा रंग करडा आणि खालच्या बाजूचा पांढरा असतो. उन्हाळ्यात डोके कॉफीच्या रंगासारखे तपकिरी असते, पण हिवाळ्यात ते करडे पांढरे होते.

समुद्रकिनाऱ्यावर यांचे थवे आढळतात. भारतात पूर्व व पश्चिम समुद्रकिनाऱ्यावर ते मोठ्या प्रमाणात आणि देशाच्या आतल्या भागात नद्या, तलाव वगैरेंच्या काठी थोड्या प्रमाणात असतात. पाकिस्तान, श्रीलंका आणि ब्रह्मदेशातही ते आढळतात. बंदरे व किनाऱ्यावरील मासेमारीची ठिकाणे या जागी ते हटकून असतात. बंदरात नांगरलेल्या, बाहेर पडणाऱ्या किंवा आत येणाऱ्या जहाजांच्या आणि मच्छीमार पडावांच्या भोवती अन्नाच्या आशेने घिरट्या घालीत असलेले ते नेहमी दिसतात. जहाजांवरून खाद्यपदार्थाचे तुकडे समुद्रात फेकलेले दिसताच ते समुद्राच्या पृष्ठभागावरून उचलून ते खाऊन टाकतात. नद्या, तलाव वगैरे ठिकाणी असणारे कुरव गोगलगाई, किडे किंवा रोपांचे कोंब खातात.

यांची वीण लडाख व तिबटमध्ये मानस सरोवर, राक्षसताल आणि इतर सरोवरांच्या काठच्या दलदलीत जून-जुलै महिन्यात होते.

काळ्या डोक्याचा कुरव तपकिरी डोक्याच्या कुरवापेक्षा थोडा लहान असतो. हिवाळ्यात त्याचे डोके, मान, शेपटी व सगळा खालचा भाग पांढरा असतो; पाठ आणि पंख करडे असतात. उन्हाळ्यात याचे सगळे डोके आणि मानेचा वरचा भाग गर्द तपकिरी रंगाचा होतो.

लेखक : ज.नी.कर्वे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

2.96666666667
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/08/17 23:02:35.600374 GMT+0530

T24 2019/08/17 23:02:35.606483 GMT+0530
Back to top

T12019/08/17 23:02:35.269255 GMT+0530

T612019/08/17 23:02:35.297312 GMT+0530

T622019/08/17 23:02:35.347162 GMT+0530

T632019/08/17 23:02:35.348095 GMT+0530