অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बिंदु

बिंदु

बिंदु : बिंदू हा भूमितीमधील एक मूलघटक आहे. यूक्लिड यांनी बिंदूची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे : ‘बिंदूला स्थान असते पण विस्तार नसतो’. म्हणजेच लांबी, रुंदी आणि जाडी नसलेला घटक म्हणजे बिंदू होय. आधुनिक स्वयंसिद्धकानुसारी भूमितीमध्ये  बिंदू हा एक अव्याख्यात (व्याख्या न केलेले) पद मानला जातो. ज्या भूमितीतील रेषा हाच मूलभूत घटक मानतात, त्या भूमितात विशिष्ट तऱ्हेने काढलेल्या रेषाजालाने बिंदू दाखवितात. प-मितीय मापीय भूमितीत प-क्रमित संख्यांच्या प-युताने बिंदू दर्शवितात. प-मितीय प्रक्षेप भूमितीमध्ये बिंदू क्रमित (प+१) युताने दर्शवितात. अर्थात सर्व (प+१) संख्या एकाच वेळी शून्य असता कामा नयेत. या भूमितीमध्ये (क्ष१, क्ष२, क्षप+१) व (य१, य२...., यप+१) हे दोन बिंदू जर क्षर = स यर असेल (र = १, २,...., प + १; स स्थिरांक), तर एकरूप मानले जातात. ज्या (प + १) युतामध्ये शेवटचा घटक शून्य असतो, त्यांना आदर्श बिंदू म्हणतात.

 

लेखक - ल. वा. गुर्जर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate