Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 04:31:50.754208 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 04:31:50.759503 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 04:31:50.809812 GMT+0530

जागतिक इतिहास

या विभागात जगाच्या इतिहासाची माहिती देण्यात आली आहे.

बकल, हेन्री टॉमस
बकल, हेन्री टॉमस : (२४ नोव्हेंबर १८२१-२९ मे १८६२). प्रसिध्द इंग्रज इतिहासकार. इंग्लंडमधील ली (केन्ट) येथे सधन कुटुंबात जन्म. कडव्या कॅल्व्हिन पंथीय आईचे आणि संपन्न दशेतील काँझेर्व्हेटिव्ह पंथीय वडिलांचे त्याच्या व्यक्तिमत्वावर मोठे परिणाम झाले. अशक्त आकृतीमुळे नाममात्र शिक्षण घेऊन विपुल वाचनाने त्याने आपला व्यासंग वाढविला. १८४० ते १८४४ या दरम्यान त्याने यूरोपातील विविध देशांना भेटी देऊन अनेक भाषा आत्मसात केल्या उत्तम ग्रहणशक्ती, असामान्य स्मरणशक्ती आणि तल्लाख कल्पकता यांची देणगी त्याला लाभली होती.
बर्निअर, फ्रान्स्वा
बर्निअर, फ्रान्स्वा : (२५? सप्टेंबर १६२०-२२ सप्टेंबर १६८८). मोगल काळातील भारतात आलेला एक फ्रेंच प्रवासी. पश्चिम फ्रान्समधील अँजू प्रांतातील झ्वे या गावी शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या खासगी जीवनाविषयी फारशी माहिती ज्ञात नाही; तथापि अविवाहित राहून बरेचसे एकाकी जीवन त्याने कंठले. ⇨प्येअर गासँदी (१५९२-१६५७) या फ्रेंच तत्त्ववेत्त्याच्या मार्गदर्शनाखाली शारीरक्रियाविज्ञानाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून एम्.डी. ही पदवी संपादन केली (१६५२) व नंतर त्याच वर्षी तो पॅरिसला गेला.
बर्लिन काँग्रेस
बर्लिन काँग्रेस : (१८७८). यूरोपमधील अठराव्या शतकातील तिसरी महत्त्वाची राजकीय परिषदय या परिषदेचे वैशिष्टय हे की, तुर्कस्तानबरोबरचे युद्ध जिंकून केलेल्या सॅन जिंकून केलेल्या सॅन स्टेफनो येथील तहात (१८७८) रशियाने तुर्कस्तानकडून ज्या सवलती व प्रदेश मिळविले होते; त्यांपैकी काही रशियाला परत करावे लागले आणि यूरोपातील अनेक राष्ट्रांशी युद्ध टाळण्याच्या दृष्टीने रशियाने त्यांस मान्यताही दिली.
बहावलपूर संस्थान
बहावलपूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील (विद्यमान प. पाकिस्तानातील) एक संस्थान. क्षेत्रफळ ४२,५५४ चौ. किमी. लोकसंख्या सु. दहा लाख (१९४१); वार्षिक उत्पन्न ३५.५ लाख. पंजाब प्रांतातील या संस्थानात १० शहरे व १,००८ खेडी होती. ईशान्येस फिरोझपूर जिल्हा, वायव्येस सतलज नदी, आग्नेयीस जैसलमीर व बिकानेर ही संस्थाने यांनी ते सीमित झाले असून त्याची ईशान्य-नैऋत्य लांबी सु. ४९० किमी. व सरासरी रूंदी ७० किमी. होती.
बँक्रॉफ्ट, जॉर्ज
बँक्रॉफ्ट, जॉर्ज : (३ ऑक्टोबर १८००–१७ जानेवारी १८९१). अमेरिकन इतिहासकार व मुत्सद्दी. वुस्टर (मॅसॅच्यूसेट्स) येथे जन्म. त्याचे वडील कॅथलिक पाद्री होते. हार्व्हर्ड विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर (१८१७) र्जार्जने जर्मनीतील गटिंगेन (बर्लिन) व हायडलबर्ग या विद्यापीठांत अध्ययन करून पीएच्.डी. ही पदवी मिळविली आणि १८२२ साली तो अमेरिकेला परतला.
बॅक्ट्रिया
बॅक्ट्रिया : मध्य आशियातील एक प्राचीन राज्य. राजधानी बॅक्ट्रा, विद्यमान ⇨ बाल्ख. उत्तर अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगा (पॅरपमाइसस) आणि अमुदर्या (ऑक्सस) नदीच्या मध्यभागी ते वसले होते. इ. स. पू. ६०० ते इ.स. ६०० दरम्यान पूर्व पश्चिम व्यापार आणि राजकीय घडामोडी यांमुळे बॅक्ट्रियास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
बॅबिलोनिया
बॅबिलोनिया : प्राचीन मेसोपोटोतील (आधुनिक इराक) टायग्रिस व युफ्रेटीस यांच्या दुआबाचा दक्षिण भाग बॅबिलेनिया या नावाने ओळखला जातो. दक्षिणेस इराणचे आखात, पश्चिमेस युफ्रेटिसचे विस्तीर्ण पात्र व पूर्वेस टायग्रिसचे पात्र या तीन नैसर्गिक सीमा. उत्तरेकडे मात्र अशी निश्चित नैसर्गिक सीमा नाही; परंतु सामान्यपणे दुआबाच्या मध्याला ही सीमा येते.
बॅस्तील
बॅस्तील : पॅरिसच्या पूर्वबाजूस असलेला व ब्रिटिशांच्या हल्ल्यापासून पॅरिसचे रक्षण करण्यासाठी बांधलेला फ्रान्समधील इतिहास प्रसिद्ध किल्ला. बॅस्तील या शद्बाचे दोन अर्थ आहेत : तटबंदीयुक्त इमारत व शस्त्रागार. याची उभारणी ह्यूजिस ऑब्रिएट याच्या मार्गदर्शनाखाली १३६९-१३७० मध्ये शतवार्षिक युद्धाच्या वेळी झाली.
बायंझटिन साम्राज्य
बायंझटिन साम्राज्य : इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या शेवटी ‘रोमन’ नावाला अभिप्रेत ती वैशिष्ट्ये असणारे रोममधील साम्राज्य लयास गेले. शासकीय वालपकरी कारभाराला सुलभ व्हावे म्हणून एकाच सम्राटाच्या अधिपत्याखाली साम्राज्याचे पूर्व आणि पश्चिम असे भाग पूर्वीपासूनच करण्यात येत; डायोक्लीशन (कार. २८४ - ३॰५) याने सहसम्राट नेमला. कॉन्स्टंटीन (कार. ३३॰ - ३३७) याने ही विभागणी कायम केली.
बार्लो, सर हिलॅरो जॉर्ज
बार्लो, सर हिलॅरो जॉर्ज : (? १७६२-? फेब्रुवारी १८४७). ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अंमलाखालील बंगालचा एक गव्हर्नर-जनरल (कार. ५ ऑक्टोबर १८०५-जुलै १८०७). त्याचा जन्म इंग्लंडमधील एका सधन घराण्यात झाला. त्याच्या वडिलांचे नाव रॉबर्ट. ते नाविक दलात अधिकारी होते.
नेवीगेशन

T5 2019/10/18 04:31:51.253589 GMT+0530

T24 2019/10/18 04:31:51.261159 GMT+0530
Back to top

T12019/10/18 04:31:50.642557 GMT+0530

T612019/10/18 04:31:50.660764 GMT+0530

T622019/10/18 04:31:50.740489 GMT+0530

T632019/10/18 04:31:50.740631 GMT+0530