অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काव्हूर, कामील्लोबेन्सोदी

काव्हूर कामील्लोबेन्सोदी

(१ ऑगस्ट १९१०- ६ जून १८६१). इटालियन राष्ट्रभक्त व मुत्सद्‌दी. पीडमॉटच्या एकासरदार घराण्यात तूरिन येथे जन्मला.

कामील्लो बेन्सो दी काव्हूर

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने सार्डिनियाच्या लष्करात नोकरी धरली. परंतु लवकरच त्याने लष्करी नोकरीचा राजीनामा दिला. इंग्रजी राज्यपद्धती आणि समाजव्यवस्था यांविषयी त्याला अतिशय आदर होता. तो उदारमतवादी असून प्रयोगशील होता. तो एक उत्कृष्ट अर्थकारणी होता. त्याचप्रमाणे उद्योगधंद्यातही त्याला रस होता. चार्ल्स अ‍ॅल्बर्टच्या काळात (१८३१-१८४८) रेल्वेआगबोटी यांच्या कंपन्यांचा तो संचालक होता. वर्तमानपत्रांना मुद्रण-स्वातंत्र्य देण्यात आले; तेव्हा त्याने रिसॉर्जिमेंटो ह्या प्रसिद्ध पत्राचे संपादन करण्यास सुरुवात केली. ह्या पत्रातून सार्डिनियाला संविधानात्मक सुधारणा देण्याचे आणि इटलीच्या राष्ट्रीय चळवळीत पुढाकार घेण्याचे आवाहन येत असे.

कामील्लो बेन्सो दी काव्हूर

 

दुसऱ्या व्हिक्टर इमॅन्युएलच्या कारकीर्दीत त्याने राजकारणात भाग घेण्यास सुरुवात केली. १८५० मध्ये व्यापार, शेती, उद्योग यांचा मंत्री म्हणून त्याने मंत्रिमंडळात प्रवेश केला. त्याच्या ध्येयधोरणांना एक प्रकारचा प्रौढपणा व परिपक्वता असल्यामुळे लवकरच त्यास नेतृत्व मिळाले. त्याची पंतप्रधान व परराष्ट्रमंत्री म्हणून १८५२ मध्ये नेमणूक झाली. सार्डिनियाच्या नेतृत्वाखाली इटलीचे एकीकरण करणेहे त्याचे मुख्य ध्येय असलेतरी तो वास्तववादी असल्याने प्रथम लष्कर,अर्थकारणऔद्योगिक क्षेत्रन्यापद्धती यांत त्याने अंतर्गत पण दूरगामी सुधारणा घडवून आणल्या. सार्डिनियाला ऑस्ट्रियाविरुद्ध फ्रान्सची मदत लागेलहे ओळखून त्याने फ्रान्सशी स्नेहसंबंध प्रस्थापित केले.

इटलीच्या एकीकरणास यूरोपचा पाठिंबा नसेलतर ते शक्य नाहीहे जाणून त्याने सार्डिनियाला यूरोपात मान्यता मिळवून देण्याचे ठरविले. क्रिमियन युध्दात त्याने सार्डिनियाला इंग्लंड व फ्रान्सच्या बाजूने युध्दात ओढले. १८५६ मध्ये पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदेत त्याने ऑस्ट्रियावर प्रखर टीका केली. पॅरिस येथे असताना त्याला तिसऱ्या नेपोलियनची ऑस्ट्रियाशी युद्ध करण्याची इच्छा समजली होती. त्याचा फायदा घेऊन त्याने फ्रान्सबरोबर तह करण्याचे ठरविले. फ्लाँबेअर येथे नेपालियन आणि काव्हूर यांची भेट होऊन युद्ध-बेत ठरला.

१८५९ मध्ये ऑस्ट्रियाचा पराभव केला. परंतु यूरोपीय राष्ट्रांच्याविशेषतः प्रशियाच्या प्रतिक्रियेची भीती वाटून नेपोलियनने ऑस्ट्रियाशी व्हीलाफ्रांका येथे तहाची बोलणी सुरु केली. इटलीचे संपूर्ण एकीकरण होण्याआधीच फ्रान्सने केलेल्या ह्या विश्वासघातामुळे काव्हूरने राजीनामा दिला. परंतु अल्पावधीतच तो पुन्हा अधिकारारुढ झाला. व्हिनिशियाखेरीज बाकी सारा इटली देश सार्डिनियाच्या ताब्यात आला. १७ मार्च १८६१ रोजी इटलीचे एक राज्य घोषित करण्यात आले. परंतु ज्या वेळेस त्याच्या संसदीय कौशल्याची आणि मुत्सद्‌देगिरीची इटलीला अत्यंत आवश्यकता होतीतेव्हाच काव्हूर तूरिन येथे मरण पावला. इटलीच्या एकीकरणाच्या कार्यातील सिंहाचा वाटा काव्हूरकडे जातो.


संदर्भ : 1. Holt, Edgar, The Making of Italy1815-1870, London, 1971.

2.Mark-Smioth, D.Covour and Garibaldi, 1860 : A Study in Political Canflict, Cambridge, 1954.

देशपांडेअरविंद

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate