অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पॉलिबिअस

पॉलिबिअस

पॉलिबिअस

(इ. स. पू. सु. १९८-११७). एका प्रसिध्द ग्रीक इतिहासकार. पॉलिबिअसचा जन्म आर्केदीआ प्रांतातील मेगलॉपलिस येथे झाला. लायकोर्टस या तत्कालीन ग्राक मुत्सद्याचा तो मुलगा.तेथे त्याने अनेक जबाबदारीची पदे भूषविली. तो ग्रीकांच्या घोडदळाचा सेनापती होता. तो रोमनांचा उघडउघड पक्षपाती होता. रोमाच्या मॅसिडोनिया प्रांतावरील स्वारीत पिडनाच्या लढाईत इ. स. पू. १६८ त्याला कैदी म्हणून रोमला पाठविण्यात आले. तो इमिलिअस पॉलस या रोमन सेनापतीच्या घरी राहिला. त्याच्या प्रयत्नाने रोमनांशी झालेल्या तहांत ग्रीकांना महत्त्वाच्या सवलती मिळाल्या.

रोममधील सिपिओ इमिलिअस या कुटुंबाचा आश्रय सु. १६ वर्षे मिळाल्यमुळेत्याला रोममधील घडामोडींची, तसेच राजकीय परिस्थितीची अद्ययावत माहिती गोळा करता आली. त्याने स्पेन व आफ्रिका खंडात प्रवास केला आणि इ. स. पू. २६६-१४६ या कालखंडातील रोमन प्रजासत्ताकाच्या विकासावरिल प्रसिध्द ग्रंथ लिहीला. या ग्रंथाच्या चाळीस भागांपैकी केवळ पाच भाग व उर्वरित भागातील काही उत्तरे उपलब्ध आहेत.

त्याला मुख्यत: दुसर्‍या प्यूनिक युध्दपासून (इ. स. पू. २२०) अँटोयओकस व टॉलेमी फिलॉपॉटर यातील युध्दांपर्यंतचा इतिहास लिहहावयाचा होता; तथापी तो पहिल्या प्यूनिक युध्दापर्यंत मागे गेलेला दिसतो. पॉलिबिअस हा थ्यूसिडिडिझ इतकाच प्रभावी इतिहासकार आहे. त्याने उपलब्ध ऐतिहासिक साधने आणि भौगोलिक स्थिती यांचा चिकित्सक अभ्यास करून रोमचा इतिहास लिहीला.


संदर्भ : 1. Bury, J. B. Ancient Greek Historians, New York, 1958.

2. Walbank, F. W. Polybius, New York, 1973.

ओक, द. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate