অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्यूनिक युद्धे

प्यूनिक युद्धे

प्यूनिक युद्धे

प्राचीन काळी रोम व कार्थेज यांमध्ये इ. स. पू. २६४—१४६ दरम्यान झालेली तीन युद्धे. या युद्धांना कार्थेजिनियन युद्धे असे दुसरे नाव आहे. कार्थेज शहर फिनिशियन (लॅटिनप्यूनिकस) लोकांनी बसविले होते. त्यावरून या युद्धांस प्यूनिक युद्धे हे नाव मिळाले. पहिले प्यूनिक युद्ध इ. स. पू. २६४—२४१; दुसरे इ. स. पू. २१८—२०१ व तिसरे इ. स. पू. १४९—१४६ दरम्यान झाले.

आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील ट्यूनिसच्या आखातातील कार्थेज ह्या सुरक्षित बंदरातून भूमध्य समुद्राच्या परिसरातील स्पेनपासून ग्रीसपर्यंतच्या देशांशी कार्थेजचा मोठा व्यापार चाले. कार्थेजच्या सैन्यात युद्धनौका असून त्यांचे आरमार सुसज्‍ज होते. सागरी स्वामित्वाच्या बळावर कार्थेज वैभवाच्या शिखराकर गेले होते. तथापि कार्थेजिनियन लोक वृत्तीने व्यापारी असल्यामुळे त्यांचे शासन व्यापारी वर्गाकडे होते व त्यांचे सैन्यही भाडोत्री होते. रोम हे लोकसत्ताक राज्य असून त्याची भूसेना सुसज्‍ज होती; पण त्याच्याजवळ आरमार मुळीच नव्हते.


स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate