অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रूझवेल्ट, फ्रँक्लिन डेलॅनो

रूझवेल्ट, फ्रँक्लिन डेलॅनो

रूझवेल्ट फ्रँक्लिन डेलॅनो

(३० जानेवारी १८८२−१२ एप्रिल १९४६). अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाना बत्तीसावा राष्ट्राध्यक्ष व ⇨न्यू डील या क्रांतिकारक कार्यक्रमाचा उदगाता. त्याचा जन्म हडसन नदीकाठी हाईड पार्क. न्यूयॉर्क येथे सुखवस्तू कुंटुबात झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. हार्व्हर्ड विद्यापीठातून त्याने पदवी घेतली (१९०४). यानंतर त्याने कायद्याचा अभ्यास केला व १९०७ मध्ये तो बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला. थीओडर रूझवेल्टची पुतणी एलेनॉर हिच्याशी त्याचा विवाह झाला (१९०५). त्यांना तीन मुलगे व दोन मुली होत्या.

वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी न्यूयॉर्क राज्यातून तो सिनेटवर निवडून आला व त्याने सक्रिय राजकारणात प्रवेश केला. या काळात उगवता पुरोगामी नेता अशी त्याची प्रतिमा उभी राहिली. वुड्रो विल्सन फ्रँक्लिन रूझवेल्टराष्ट्राध्यक्ष असताना त्याने आरमार खात्यात दुय्यम चिटणिसाचे काम केले होते. या काळात पोलिओने त्रस्त असूनही तो राजकारणात क्रियाशील राहिला.

१९२० साली उपराष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत त्याचा पराभव झाला. पुढे तो न्यूयॉर्क राज्याचा गव्हर्नर झाला (१९२८). १९३२ अखेरीस अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर तो निवडून आला. १९३३ पासून १९४५ पर्यंत तो त्या पदावर होता. अमेरिकेच्य इतिहासात सातत्याने चार वेळा राष्ट्राध्यक्ष पदी निवळून येण्याचा मान त्याला मिळाला.

त्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा जागतिक मंदीची लाट आली होती व अमेरिकेची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली होती. बेकारीचे प्रमाण फारच वाढले होते. लोकांचा बँकांवरील विश्वास उडाला होता. शेतमाल व औद्योगिक उत्पादनांच्या किंमती फार घसरल्या होत्या. या आर्थिक समस्यांवर त्याने ‘दिशा’ (न्यूडल) हा कार्यक्रम आयोजित केला. बँका व रोखेबाजार यांचे व्यवहार नियंत्रित करणे, राष्ट्राची नैसर्गिक संपत्ती वैयक्तिक नफेबाजीच्या अंकित राहू नये म्हणून प्रयत्न करणे, यांसारखे धोरणात्मक निर्णय त्याने घेतले; तसेच आवश्यक ते कायदे करून ते काँग्रेसकडून मंजूर करून घेतले.

नवी दिशा कार्यक्रमाच्या या पहिल्या भागातील काही कायदे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काही अंशो रद्दबातल ठरवले. मात्र १९३५ व १९३६ या दोन वर्षांत आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्याचे दिसून आले. तो गरिबांचा कैवारी म्हणून ओळखला जाऊ लागला. १९३६ च्या निवडणुकीत तो पुन्हा प्रचंड बहुमताने राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा निवडून आला. या लोकमताच्या दबावामुळे सर्वोच्च न्यायालयानेही नवी दिशा धोरणाला पुढे फारसा विरोध केला नाही.

यानंतर काही वर्षांतच दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटले आणि सारा यूरोपच त्यात गोवला गेला. हिटलरने पोलंडवर स्वरी केल्याने (१९३९) यूरोपमध्ये युद्धाचा भडका उडाला. सुरुवातीला अमेरिकेला प्रत्यक्ष युद्धात न गुंतवला लोकशाही राष्ट्रांना मदत करण्याचा रूझवेल्टने विचार केला; परंतु १९४० मध्ये फ्रान्सचा पाडाव झाल्यानंतर काँग्रेसच्या संमतीने त्याने इंग्लंडला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांची मदत सुरू केली.

१९४० च्या अखेरीस तो तिसर्यांनदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. १९४१ मध्ये उधार−उसनवार (लेन्ड−लिझ) कायदा संमत करून घेऊन इंग्लंड आमि इतर मित्र राष्ट्रांना यूद्धामध्ये मदत करण्यास त्याने सुरुवात केली. इंग्लंड, रशिया यांच्या बरोबर युद्धासाठी मैत्रीगट तयार करण्यात तो प्रयत्नलशील राहिला. १९४३ मध्ये तोहरान येथे आणि १९४६ मध्ये याल्टा येथे चर्चिल आणि स्टालिन यांच्या बरोबर दोन महत्त्वपूर्ण बैठकी त्याने घेतल्या. १९४४ अखेर चौथ्या वेळी तो राष्ट्राधयक्ष म्हणून निवडून आला; परंतु पुढे दोन वर्षांनी तो मेंदूतील रक्तस्त्रावाने मृत्यू पावला.


संदर्भ : 1. Beschloss, M. R.Kennedy and Roosevelt, Norton. 1980.

2. Dallek, R. Franklin D. Roosevelt and American Foreign Policy, Oxford, 1980.

3. Einaudi, M. The Roosevelt Revolution, Green-wood, 1978.

4. Flynn. G. Q. Roosevelt and Roman, Green-Wood, 1976.

साखळकर, एकनाथ

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate