অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वनस्पतीशास्त्र

वनस्पतीशास्त्र

  • अंकुरण
  • वनस्पती

  • अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग
  • अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग : वनस्पतींना होणारे कित्येक रोग जीवोपजीवी म्हणजे दुसऱ्‍या जीवांवर उपजीविका करणाऱ्‍या जीवांमुळे होत असतात.

  • अपाच्छेदन व पानझड
  • अपाच्छेदन व पानझड : उच्च दर्जाच्या (वाहिनीवंत—द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्‍या वाहिन्या असलेल्या) वनस्पतींचे भिन्न भाग आपोआप गळून पडताना आढळतात; या घटनेस ‘अपाच्छेदन’ व ठराविक ऋतुमानात पाने गळून पडतात त्यास ‘पानझड’ म्हणतात.

  • आसामलोटा
  • (लॅ. यूपॅटोरियम ओडोरॅटम; कुल - कंपॉझिटी). सु. २५–३० सेंमी. उंचीचे वेलीसारखे चढणारे हे क्षुप (झुडूप) पश्चिम वेस्ट इंडीज बेटे, दक्षिण अमेरिका, आसाम, बंगाल इ. ठिकाणी आढळते.

  • इंगळी
  • १०–१५ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष भारतात सर्वत्र विशेषतः नद्या व ओढे यांच्या काठाने, पाणथळ जागी व समुद्रकिनाऱ्याजवळ आढळतो.

  • इंद्रायण कडू
  • जमिनीवर पसरणारी किंवा वर चढणारी ही वेल विशेषेकरून जंगलात आढळते.

  • इनोथेरा रोजिया
  • ०–६० सेंमी. उंचीची ही शोभिवंत वनस्पती मूळची मेक्सिकोतील (म. अमेरिका) असून हल्ली सर्वत्र बागेत लावलेली आढळते.

  • इपेकॅक
  • (इं. ब्राझील इपेकॅक; लॅ.सेफीलिस (सायकोट्रिया) इपेकॅक्युन्हा; कुल रुबिएसी). हे एका उपयुक्त औषधाचे व्यापारी नाव असून ते मूळच्या ब्राझीलमधील लहान, बहुवर्षायू ओषधीय वनस्पतीपासून काढतात.

  • इरिडेसी
  • फुलझाडांपैकी एकदलिकित वनस्पतींतील लिलिएलीझ (लिलिफ्लोरी) गणात ह्या कुलाचा अंतर्भाव केला जातो. यामध्ये सु. ६० वंश व १,५०० जाती आहेत.

  • इसेस
  • ह्या वृक्षांना संयुक्त द्विदली पाने असून, दले लंबगोल, चिवट व लहान असतात; फुले पांढरी, परिमंजरीवर येतात.

  • ऐन
  • कठिण लाकडासाठी प्रसिद्ध असणारा हा वृक्ष काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया टोमेंटोजा असे आहे.

  • ऑनेग्रेसी
  • आवृतबीज वनस्पतींपैकी [ वनस्पति, आवृतबीजी उपविभाग] द्विदलिकित या वर्गातील मिर्टेलीझ (मिर्टिफ्लोरी) गणात या कुलाचा अंतर्भाव केलेला आहे.

  • ऑफिओग्‍लॉसेलीझ
  • ऑफिओग्‍लॉसेलीझ : (अहिजिव्ह-गण; इं. अडर्स टंग अँड मूनवर्ट फर्नस). नेचे वर्गातील एक प्रारंभिक गण. यात ऑफिओग्‍लॉसेसी हे एकच कुल असून त्यामध्ये फक्त ३ वंश (ऑफिओग्‍लॉसम, बॉट्रिकियम व हेल्मिंथोस्टॅकिस) व सु. ८० जाती आहेत.

  • ऑर्किडेलीझ
  • फुलझाडांपैकी एकदलिकित वर्गातील ह्या गणामध्ये ऑर्किडेसी, बर्मानिएसी व अ‍ॅपोस्टॅसिएसी या तीन कुलांचा अंतर्भाव केला आहे.

  • ऑर्किडेसी - आमर-कुल
  • फुलझाडांपैकी ऑर्किडेलीझ या गणातील एक कुल. बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) अपिवनस्पती, जमिनीवर नेहमी आढळणाऱ्या, क्वचित शवोपजीवी (मृत शरीरावर जगणाऱ्या) अशा ओषधी ह्या कुलात समाविष्ट आहेत (४५० वंश व सु. १५,००० जाती).

  • ओक
  • फॅगेसी कुलातील सदाहरित तसेच पानझडी वृक्ष. हा वृक्ष मूळचा पश्चिम आशियामधील असून भारतात तो हिमालयाच्या पर्वतीय भागात आढळतो.

  • कवक
  • बहुतेक सर्व परिचित वनस्पतींतील हिरवा रंग (हरितद्रव्य) ज्यांमध्ये आढळत नाही अशा इतर सर्व अबीजी वनस्पतींना पूर्वी ‘कवक’ म्हणत असत.

  • काटेरी इंद्रायण
  • काटेरी इंद्रायण या नावाने भारतीय बाजारात तिची कोवळी, सुकी फळे मिळतात. काकडी, कडू इंद्रायण व कलिंगड यांसारख्यांची काही लक्षणे या वनस्पतीत आढळतात

  • कापूर वृक्ष
  • कापूर हे सुंगधी, वेदनाहारक, पूतिरोधक आणि कामोत्तेजक आहे. अनेक औषधांमध्ये आणि नायट्रोसेल्युलोज संयुगे तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. मेंथॉलाप्रमाणे ते त्वचेच्या संपर्कात आल्यास थंडगारपणा जाणवतो.

  • कीटकभक्षक वनस्पति
  • निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की, ज्यांना पोषणाकरीता कीटकासारख्या भक्ष्याची आवश्यकता भासते. अशा वनस्पतींना नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि लवणे जमीन, पाणी किंवा वातावरणातून जरी मिळत असले तरी ते गरजेपक्षा कमी पडतात.

  • कीटक्षोद
  • भूक वाढविणारे औषध

  • कुंगीण
  • सु. ६ मी. उंचीचा हा वृक्ष कोकणात, उंच घाटावर व उत्तर कारवारात सामान्यत: दाट जंगलात आढळतो.

  • कुटकी
  • ही सरळ वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी भारतात सर्वत्र तणासारखी उगवलेली आढळते; शिवाय ही श्रीलंका, अफगाणिस्तान,चीन इ. देशांतही आढळते.

  • कुडझू
  • अलीकडे भारतात आणि इतर उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत हिची लागवड केली जाते.ही जमिनीसरपट वाढते,तसेच आधारामुळे उंचीवरही पसरते.

  • कुडा
  • फुलझाडांपैकी अ‍ॅपोसायनेसी कुलामध्ये कुडा या नावाखाली पुढे वर्णन केलेल्या तीन निरनिराळ्या वनस्पतींचा समावेश होतो.

  • कुमुद
  • या नाजूक जलवनस्पतीचा प्रसार उष्णकटिबंधात व भारतात सर्वत्र (तळी, डबकी, खंदक इ. जलाशयांत) असून हिचे मुलक्षोड (जमिनीतील खोड) जाड व क्षितिजसमांतर वाढते.

  • कुमुद
  • कुमुद : (हिं. बाराचुली; लॅ. लिम्नॅथिमम इंडिकम; कुल-जेन्शिएनेसी). या नाजूक जलवनस्पतीचा प्रसार उष्णकटिबंधात व भारतात सर्वत्र (तळी, डबकी, खंदक इ. जलाशयांत) असून हिचे मुलक्षोड (जमिनीतील खोड) जाड व क्षितिजसमांतर वाढते.

  • कुमूर
  • बागेत शोभेकरिता लावलेली व सामान्यपणे आढळणारी ही आवृतकंदयुक्त (कंदावर आवरण असलेली) ओषधी मूलतः दक्षिण अमेरिकेतील असून हिचा प्रसार रानटी अवस्थेतही भारतात सर्वत्र आहे.

  • कुरासन्ना
  • अफगाणिस्तान, सिंध, उ. आफ्रिका व भारत (पंजाब व गंगेच्या वरच्या खोऱ्यात) सामान्यतः आढळणारे हे मरुवासी क्षुप (झुडूप) कंपाझिटी कुलातील असल्याने त्याची शारीरिक लक्षणे साधारणपणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत.

  • कृष्णकमळ
  • या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोभेच्या वनस्पतींच्या पॅसिफ्लोरा वंशात एकूण सु. २४ जाती असून त्या सर्व मूळच्या दक्षिण अमेरिकेतील आहेत व आता इतर उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील देशांत बागांतून लावलेल्या आढळतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate