অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कोकेन

एक अल्कलॉइड; सूत्र C17 H21 O4 N. हे एरिथ्रोझायलॉन कोका या वृक्षाच्या पानांत प्रामुख्याने सापडणारे अल्कलॉइड आहे. एरिथ्रोझायलॉन वंशातील इतर काही जातींतही हे थोड्या प्रमाणात आढळते.

कोकाची पाने तंबाखूसारखी चघळली तर तहानभूक लागत नाही, सहनशक्ती वाढते आणि दीर्घकाल कष्ट करणे शक्य होते, हे दक्षिण अमेरिकेतील लोकांना पूर्वीपासून माहीत होते. या पानांच्या अंगी स्थानिक संवेदनाहारी गुण आहे हे फ्रीड्रिख व्हलर यांनी १८६० साली प्रथम दाखवून दिले.

कोकाची पाने गरम पाण्यात भिजत घालून प्रथम त्यांचा अर्क काढतात. नंतर त्यातील टॅनीन इत्यादींचे अवक्षेपण (न विरघळणारे पदार्थ तळाशी बसणे) व्हावे म्हणून त्यात लेड अॅसिटेट मिसळतात व मिश्रण गाळतात. गाळून मिळालेल्या विद्रावातील शिशाचे सोडियम सल्फेटाने अवक्षेपण केल्यावर जो विद्राव मिळतो त्यात सोडियम कार्बोनेट मिसळून विद्राव क्षारीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असलेल्या पदार्थासारखा, म्हणजे अल्कलाइन) बनवितात. ईथराने निष्कर्षण (वेगळे करण्याची प्रक्रिया) केले म्हणजे कोकेनाचा ईथर विद्राव मिळतो. बाष्पीभवनाने ईथर काढून टाकले म्हणजे जो अवशेष राहतो त्याचे स्फटिकीकरण केले म्हणजे कोकेनाचे पांढरे स्फटिक मिळतात. कोकेनाचा वितळबिंदू ९८° से. आहे. ते पाण्यात अल्प विरघळते पण अल्कोहॉल, ईथर व क्लोरोफॉर्म यांमध्ये ते चांगले विद्राव्य आहे. ईथराने निष्कर्षण करण्याऐवजी वरील क्षारीय निष्कर्षाचे हायड्रोक्लोरिक अम्लाने उदासिनीकरण (अम्ल व क्षार दोहोंचेही गुणधर्म नसलेले असे) करून नंतर त्या विद्रावाचे बाष्पीभवन केले म्हणजे कोकेन हायड्रोक्लोराइडाचे C17H21O4N.HCl स्फटिक मिळतात. हे लवण वामवलनी (विशिष्ट प्रतलात कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाचे प्रतल डाव्या बाजूस वळविणारे) असून औषधात वापरतात.

कोकेनाची संरचना

कोकेनाची संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) व्हिल्‍श्टेटर आणि रॉबिन्सन यांनी त्याचे संश्लेषण करून (कृत्रिम रीत्या तयार करून) निश्चित केली आहे.

बाह्योपचाराने किंवा अंत:क्षेपणाच्या (इंजेक्शनाच्या) स्वरूपात याचा उपयोग स्थानिक संवेदनाहारी म्हणून दंतशस्त्रक्रियेत आणि इतर लहानसहान शस्त्रक्रियांत केला जातो. याचे सेवन केल्यास त्याची प्रथम क्रिया उत्तेजक व नंतर मादक होते. तंत्रिका (मज्जातंतू) केंद्रावरील त्याची क्रिया कॅफिनासारखी हृदय-उत्तेजक असते आणि श्वसन व अभिसरण इंद्रियांवर त्याचा अॅट्रोपिनाप्रमाणे आचके बंद करणारा परिणाम होतो. कोकेनाचे शरीरावर काही दुष्परिणाम होतात आणि ते उष्णतेने अपघटन (रेणू विभागला जाऊन लहान घटक होणे) पावत असल्यामुळे ते निर्जंतुक करणेही कठीण असते. त्यामुळे कोकेनाऐवजी नोव्होकेन, पँटोकेन, झायलोकेन इ. संश्लिष्ट संयुगे अलीकडे वापरली जातात.

याचे व्यसन फार लवकर लागते. त्यामुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोकेनावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढत जाते. कोकेनाच्या सेवनामुळे सामान्यत: निद्रानाश होतो, भूक लागत नाही, शिसारी येते व पचन-विकार होऊन क्षीणता येते. मनोऱ्हास होऊन बहुसंख्य व्यसनाधीन व्यक्ती मानसोपचार केंद्रात अत्यंत शोचनीय विषण्ण अवस्थेत मरण पावतात. संयुक्त राष्ट्रांच्या मादक पदार्थविषयक आयोगाने कोकाची पाने खाणे हे अफू, गांजा यांसारखे व्यसन ठरविले असून त्यापासून लोकांना परावृत करण्याचे प्रयत्न संघटितपणे चालविले आहेत.

एक अल्कलॉइड; सूत्र C17 H21 O4 N. हे एरिथ्रोझायलॉन कोका या वृक्षाच्या पानांत प्रामुख्याने सापडणारे अल्कलॉइड आहे. एरिथ्रोझायलॉन वंशातील इतर काही जातींतही हे थोड्या प्रमाणात आढळते.

शोध

कोकाची पाने तंबाखूसारखी चघळली तर तहानभूक लागत नाही, सहनशक्ती वाढते आणि दीर्घकाल कष्ट करणे शक्य होते, हे दक्षिण अमेरिकेतील लोकांना पूर्वीपासून माहीत होते. या पानांच्या अंगी स्थानिक संवेदनाहारी गुण आहे हे फ्रीड्रिख व्हलर यांनी १८६० साली प्रथम दाखवून दिले.

कोकाची पाने गरम पाण्यात भिजत घालून प्रथम त्यांचा अर्क काढतात. नंतर त्यातील टॅनीन इत्यादींचे अवक्षेपण (न विरघळणारे पदार्थ तळाशी बसणे) व्हावे म्हणून त्यात लेड अॅसिटेट मिसळतात व मिश्रण गाळतात. गाळून मिळालेल्या विद्रावातील शिशाचे सोडियम सल्फेटाने अवक्षेपण केल्यावर जो विद्राव मिळतो त्यात सोडियम कार्बोनेट मिसळून विद्राव क्षारीय (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देण्याचा गुणधर्म असलेल्या पदार्थासारखा, म्हणजे अल्कलाइन) बनवितात. ईथराने निष्कर्षण (वेगळे करण्याची प्रक्रिया) केले म्हणजे कोकेनाचा ईथर विद्राव मिळतो. बाष्पीभवनाने ईथर काढून टाकले म्हणजे जो अवशेष राहतो त्याचे स्फटिकीकरण केले म्हणजे कोकेनाचे पांढरे स्फटिक मिळतात. कोकेनाचा वितळबिंदू ९८° से. आहे. ते पाण्यात अल्प विरघळते पण अल्कोहॉल, ईथर व क्लोरोफॉर्म यांमध्ये ते चांगले विद्राव्य आहे. ईथराने निष्कर्षण करण्याऐवजी वरील क्षारीय निष्कर्षाचे हायड्रोक्लोरिक अम्लाने उदासिनीकरण (अम्ल व क्षार दोहोंचेही गुणधर्म नसलेले असे) करून नंतर त्या विद्रावाचे बाष्पीभवन केले म्हणजे कोकेन हायड्रोक्लोराइडाचे C17H21O4N.HCl स्फटिक मिळतात. हे लवण वामवलनी (विशिष्ट प्रतलात कंप पावणाऱ्या म्हणजे ध्रुवित प्रकाशाचे प्रतल डाव्या बाजूस वळविणारे) असून औषधात वापरतात.

कोकेनाची संरचना (रेणूतील अणूंची मांडणी) व्हिल्‍श्टेटर आणि रॉबिन्सन यांनी त्याचे संश्लेषण करून (कृत्रिम रीत्या तयार करून) निश्चित केली आहे.

बाह्योपचाराने किंवा अंत:क्षेपणाच्या (इंजेक्शनाच्या) स्वरूपात याचा उपयोग स्थानिक संवेदनाहारी म्हणून दंतशस्त्रक्रियेत आणि इतर लहानसहान शस्त्रक्रियांत केला जातो. याचे सेवन केल्यास त्याची प्रथम क्रिया उत्तेजक व नंतर मादक होते. तंत्रिका (मज्जातंतू) केंद्रावरील त्याची क्रिया कॅफिनासारखी हृदय-उत्तेजक असते आणि श्वसन व अभिसरण इंद्रियांवर त्याचा अॅट्रोपिनाप्रमाणे आचके बंद करणारा परिणाम होतो. कोकेनाचे शरीरावर काही दुष्परिणाम होतात आणि ते उष्णतेने अपघटन (रेणू विभागला जाऊन लहान घटक होणे) पावत असल्यामुळे ते निर्जंतुक करणेही कठीण असते. त्यामुळे कोकेनाऐवजी नोव्होकेन, पँटोकेन, झायलोकेन इ. संश्लिष्ट संयुगे अलीकडे वापरली जातात

व्यसन

याचे व्यसन फार लवकर लागते. त्यामुळे गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोकेनावर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढत जाते. कोकेनाच्या सेवनामुळे सामान्यत: निद्रानाश होतो, भूक लागत नाही, शिसारी येते व पचन-विकार होऊन क्षीणता येते. मनोऱ्हास होऊन बहुसंख्य व्यसनाधीन व्यक्ती मानसोपचार केंद्रात अत्यंत शोचनीय विषण्ण अवस्थेत मरण पावतात. संयुक्त राष्ट्रांच्या मादक पदार्थविषयक आयोगाने कोकाची पाने खाणे हे अफू, गांजा यांसारखे व्यसन ठरविले असून त्यापासून लोकांना परावृत करण्याचे प्रयत्न संघटितपणे चालविले आहेत.

लेखक : ज.वि.जमदाडे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate