অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जैवविविधतेचे निरिक्षण कसे करावे ?

जैवविविधतेचे निरिक्षण कसे करावे ?

प्रस्तावना

सर्वांनाच माहित आहे की पशु-पक्षी-किडे आणि इतर वन्यजीव आपल्याला हवे त्यावेळी आपल्या आसपास दिसत नाहीत तर त्यांच्या ठराविक वेळा असतात. काही जीव दिवसा वावरतात तर काही अंधाराचा आसरा घेऊन फक्त रात्रीच बाहेर पडतात. पहाटेची आणि संध्याकाळची वेळ पक्षी-फुलपाखरे-कीटक यांच्या नोंदीसाठी उत्तम आहे. शाळेच्या आवारात एखादा पाणवठा असेल तर तिथे दुपारीही हे जीव दिसू शकतात.

वन्यजीवांची विविधता

वन्यजीवांची विविधता पाहण्यासाठी विविध अधिवासात जाऊन निरिक्षण करावे लागेल. अधिवास म्हणजे अशी जागा जेथे हे जीव राहतात अथवा विचरण करतात. जंगल किंवा झाडे-झुडपे अशा ठिकाणी दिसणारे जीव हे गवताळ भागात दिसणाऱ्या जीवांपेक्षा भिन्न असण्याची शक्यता आहे. पाणवठा आणि दगडी जमिनीवर आणखीन वेगळे जीव दिसू शकतात. जितक्या भिन्न अधिवासांची पाहणी कराल तितके वैविध्यपूर्ण जीव आपणाला पाहता येतील.

या पुस्तिकेमध्ये, आपल्या शाळेच्या परिसरात आढळू शकणाऱ्या काही ठराविक वन्यजीवांची फोटोसहीत माहिती देण्यात आली आहे. ही पुस्तिका निरीक्षणाच्यावेळी सोबत असू द्या म्हणजे कोणकोणते जीव दिसले त्यांच्या नावांची नोंद आपल्याला करता येईल. शिवाय, दिसलेल्या वन्यजीवाकडून आपणाला काय काय फायदा मिळतो (म्हणजेच कोणती परिसंस्था सेवा मिळते) याची नोंद करायची आहे. कोणाला यापेक्षा अधिक माहिती असेल तर त्याचीही नोंद करावी. या पुस्तिकेत दिलेले वन्यजीव हे मार्गदर्शनासाठी दिले आहेत. एवढेच जीव आपल्या परिसरात दिसतात असे अजिबात नाही. या पुस्तिकेबाहेरील जे जे जीव दिसतील त्यांचीही माहितीसहित नोंद करणेची आहे. स्थानिक भाषेतील नावाने ह्या नोंदी करता येतील.

भ्रमंती क्षेत्र हे शाळा केंद्रस्थानी ठेऊन निश्चित करावे. निसर्ग भ्रमण एकेकट्याने किंवा छोट्या गटा-गटात करावे. विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार भ्रमंतीचे क्षेत्र निश्चित करता येईल. उदाहरणादाखल-

  • इयत्ता पहिली ते चौथीच्या मुला मुलींनी फक्त शाळेच्या आवारातील जैवविविधतेची नोंद करावी
  • पाचवी ते सातवी – २०० मीटर च्या परिघातील जैवविविधतेची नोंद करावी
  • आठवी ते दहावी – २ किलोमीटर च्या परिघातील जैवविविधतेची नोंद करावी

ज्या शाळांमध्ये तुकड्या कमी असतील त्यांनी एकेका तुकडीचा एक गट करावा.

*पिकाची माहिती गोळा करणाऱ्या गटाला ही आकृती लागू नाही. त्यांनी गावातील माहितगार व्यक्तींकडून माहिती गोळा करावी.

 

स्त्रोत : शाळेची जैविविधता नोंदवही - मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 8/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate